A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907defaaefc5b28c8dbac4a9b0a33755c8694c1c78b215): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Storm
Oct 27, 2020
स्पर्धा

वादळ (प्रेरणादायी कथालेखन स्पर्धा )

Read Later
वादळ (प्रेरणादायी कथालेखन स्पर्धा )

वादळ
सिद्धी भुरके ©️®️

    "सुमा अगं झालं का आवरून?? किती वेळ? नेहा वाट बघत असेल आपली. फॅशन शो तिचा आहे आणि तू कशाला आवरायला वेळ लावतीयेस?? " राजेशराव आज फार गडबडीत होते. लाडक्या लेकीच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्याने त्यांना अजिबात उशीर करायचा नव्हता.
"अहो झालं.. बास दोन मिनिट थांबा जरा.. "सुमाताईंनी सांगितले. तेवढ्यात राजेशरावांचा फोन वाजला.
"बघ नेहाचा फोन आलाय.." म्हणत त्यांनी फोन उचलला. "नेहा बाळा निघालो ग आम्ही.. "
"हॅलो कोण बोलताय.. "समोरून अनोळखी व्यक्ती बोलू लागली आणि काही क्षणात नेहाचे बाबा मटकन सोफ्यावर बसले.
"अहो काय झालं? "म्हणत सुमाताईंनी फोन घेतला.
"हॅलो मी नेहाची आई बोलतीये.. काय झाल? कोण बोलताय? "
"मी सिव्हिल हॉस्पिटल मधून बोलतोय.. तुमच्या मुलीवर ऍसिड अटॅक झालाय.. लवकर या तुम्ही." समोरची व्यक्ती बोलली. ही बातमी ऐकताच दोघेही हॉस्पिटलमध्ये पळत सुटले. तिथे पोहचले तर समोर काय बघतायेत  नेहाचा चेहरा लाल निळा झाला होता.. जिवाच्या आकांताने ती रडत विव्हळत होती. तेवढ्यात तिथे पोलीस पण पोहचले. त्यांनी नेहाच्या आई वडिलांकडे चौकशी केली. नेहाच्या आईला तर रडू कोसळले.
"माझी मुलगी कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात.. घर कॉलेज मित्र मैत्रिणी एवढंच तिचं जग.. कोणी असं क्रूर नीच काम केलं असेल? "म्हणत नेहाची आई रडायला लागली. काही वेळाने नेहाला भेटायला परवानगी दिली गेली. तेव्हा तिच्याकडून समजले कि गल्लीतील चार मुलं नेहमी तिच्या मागे असायची, एकाने तर तिला लग्न करणार का म्हणून विचारल.. नेहाने नकार दिला म्हणून त्याने तिच्यावर ऍसिड फेकलं. सगळा वृतांत नेहाच्या तोंडून ऐकून पोलीस सुद्धा सुन्न झाले. नकार दिला म्हणून चेहऱ्यावर ऍसिड फेकलं याचं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं.

    इथे पोलिसानी त्या मुलांचा तपास सुरु केला. नेहाची प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. अर्थात त्या नंतरही तिला तिचा पूर्वीचा चेहरा मिळणार नव्हता पण थोडा फार फरक पडणार होता. नेहाच्या आई वडिलांनी तिच्या शिक्षण आणि लग्नासाठी ठेवलेले पैसे सर्जरीला वापरले आणि काही दिवसांनी नेहा घरी आली.
       
      पोलिसांनी तपास करून त्या मुलांना शोधून काढले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. कोर्टात केस उभी राहिली. नेहाच्या आई वडिलांनी तिला केस लढण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि साधारण तीन वर्षांनी नेहाला न्याय मिळाला. आरोपींना शिक्षा सुनावली गेली.
      तीन वर्षानंतर नेहा एका नामांकित एफ एम चॅनेलवर 'रेडिओ जॉकी' म्हणून काम करत होती. आज तिला तिने दिलेल्या लढ्याबद्दल पुरस्कार देण्यात आला होता. तिला आपला प्रवास लोकांसमोर मांडायची संधी देण्यात आली होती. नेहा स्टेजवर गेली.. तिने पुरस्कार स्वीकारला आणि ती बोलू लागली....

"नमस्कार,  मी नेहा,  आज मी तुमच्याशी माझ्या लढ्या बद्दल बोलणार आहे. एक लढा कोर्टातला आणि एक जो मी दैनंदिन जीवनात सुद्धा दिला. एक  ऍसिड अटॅक झालेली तरुणी आज रेडिओ जॉकी काय बनते.. तिला मान सन्मान काय मिळतो हे बघून सगळ्यांना खूप छान वाटत असेल. पण माझा हा प्रवास इतका सहज सोपा अजिबात नव्हता. मी सुद्धा इतर मुलींप्रमाणे काही स्वप्न पहिली होती..  मला नाटकांमध्ये काम करायला फार आवडत असे. कॉलेज मध्ये तर सगळ्या स्पर्धा मी जिंकले होते. पुढे जाऊन अभिनयातच करिअर करायचं असं मी ठरवलं होतं. पण तो एक काळा कुट्ट दिवस माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या स्वप्नांवर पाणी फिरले.....
कोर्टात जेव्हा आरोपीला माझ्यावर ऍसिड फेकण्यामागचा  जाब विचारला तर मी त्याला नकार दिला म्हणून त्याचा इगो दुखावला गेला..मी त्याला नाही कशी म्हणू शकते.. म्हणून त्याने माझा चेहरा जाळण्याचा निर्णय घेतला असं त्याने अगदी निर्लज्ज पणे सांगितले... त्याला आपल्या कृत्यावर जरा देखील पश्चाताप नव्हता. खूप राग आला मला त्या दिवशी. त्याचा इगो दुखावला म्हणून त्याने माझ्या आयुष्याशी खेळावं..?? सुन्न झाले मी.. बर हे कोर्ट प्रकरण चालू होत पण आमच्या सोसायटीतील लोकांनी माझं जगणं मुश्किल केलं हो..  'नेहा काय निर्लज्ज आहे... सारखी मुलांसोबत फिरत असते.. 
रात्री उशिरा घरी येते.. आणि हो कमी कपडे घालते.. '
ज्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला तेव्हा मी शॉर्ट घातली होती म्हणून माझ्यावर असा हल्ला झाला अशा विविध चर्चेला उधाण आलं होतं.
         मला सांगा कोणा साडी आणि कुर्ता घालणाऱ्या मुलीवर कधी अत्त्याचार झाला नाही का हो?? या विचित्र मानसिकतेच्या लोकांना मुलीचे वय आणि कपडे याने काही फरक पडत नाही हो.. नाहीतर चिमुकल्या मुलींवर आणि साडी नेसणाऱ्या बाईवर कधीच बलात्कार झाला नसता. आणि माझी मुलांसोबत सोबत मैत्री आहे म्हणून मी चारित्र्यहीन आहे?? हे सगळं माझ्या बुद्धीच्या पलीकडचं होतं.. अहो माझी खरी लढाई तर कोर्टाच्या बाहेरच चालू  होती. 
        रस्त्यावरून चालायचे तेव्हा लोक या विचित्र चेहऱ्याच्या मुलीला  वळून वळून बघायचे,  लहान मुलं मला बघून घाबरायची.  आमच्या सोसायटीमधल्या काही बायका तर 'बिल्डिंग मध्ये चेटकीण आलीये.. जेवून घे बाळा तू नाहीतर तुला ती घेऊन जाईल'..अशी आपल्या मुलांना भीती दाखवायच्या. खूप खूप वाईट वाटायचं मला. एकदा तर आई बाबांकडे खूप रडले मी.. नाही राहायच इथे म्हणाले. पण तेव्हा त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली मला कि, 'एखादं झाड कसं जमिनीतील पाण्याचा शोध घेत आपली मूळं मातीत घट्ट रुतवत ना अगदी तसंच तू तुझ्या मार्गावरून हटू नकोस.. कोणी काही बोललं तरी मातीला घट्ट धरून ठेव...'
खूप उभारी आली मला या वाक्याने. म्हटलं आता कुठेतरी जॉब शोधू आणि स्वतःच्या पायावर उभं राहू.. पण नाही... तिथे पण चेहरा बघून लोकांनी नाकारला मला. शेवटी एखाद्या हॉटेल किंवा कपड्याच्या दुकानात तरी बघावं जाऊन तर 'तुमचा चेहरा बघून आमच्याकडे ग्राहक येणार नाही '..असं चक्क चक्क सांगितलं मला.. पण मी सुद्धा जिद्दी.. प्रयत्न करत राहिले आणि आज रेडिओ जॉकी म्हणून नावारूपाला आले.
         आज कोर्टाने ऍसिड विक्रीवर बंदी आणली आहे पण हे जरा आधी झाले असते तर माझ्यासारख्या अनेक मुलींचे आयुष्य आज वेगळे असते. माझ्या आई वडिलांकडे पैसा होता म्हणून माझी सर्जरी झाली पण कित्येक अशा मुलींना परवडत नाही हो हा खर्च.
        पण खरं सांगू.. ती साधी वीस तीस रुपयाची ऍसिडची बाटली माझं काही बिघडवू शकली नाही कारण मनात एक होतं कि माझ्या सोबत जे वाईट घडायचं होतं ते घडून गेलं, चांगले दिवस आणणे माझ्या हातात आहे आणि मला नेहमी साथ देणारे माझे आई बाबा माझ्या सोबत आहेत.
      त्या मुलाचा इगो दुखावला गेला ना.. तर आज मी जिद्दीने उभारी घेऊन त्याला दाखवून दिलय कि माझा चेहरा कुरूप केलास पण माझा आत्मा नाही.. माझा स्वभाव नाही.. आणि माझी जिद्द नाही.. तुझं ते ऍसिड नाही बदलू शकलं या नेहाला...
      एक अनपेक्षित वादळ आलं माझ्या आयुष्यात.. पण मला ते नाही उध्वस्त करू शकलं. कारण वादळ काय क्षणिक असतं.... वादळ कधी येऊन जातं ते कळत पण नाही आपल्याला.. पण त्या वादळासमोर आपण कसा टिकाव  धरतोय हे महत्वाचं असतं... शेवटी मी एवढंच म्हणेन कि या अनपेक्षित वादळामुळे मला जीवनाचा खरा अर्थ उमगला आहे... धन्यवाद.. "
        आणि हॉल मध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. आज नेहविषयी सगळ्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त आदर होता.

वरील कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही. असे झाल्यास निव्वळ योगायोग समजावा.
   कथा आवडली तर like आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. 

सिद्धी भुरके ©️®️

Circle Image

Siddhi Gautam Bhurke

Interior designer

Hello everyone.. My self Mrs.siddhi Bhurke. I'm an interior designer and a co owner at studio intelize. I'm a trained bharatnatyam dancer. And a proud mommy of two years old daughter.. Recently I've started writing blogs..