स्टीफन हॉकिंग असामान्य बुद्धीमत्तेचा चमत्कार
विसाव्या शतकातील, जगातल्या सर्वात बुद्धीमान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच नाव बहुतेक सगळ्यांनाच माहित आहे. ब्रिफ हिस्टोरी ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तकं जगप्रसिद्ध आहे.असं मानलं जात की जगातल्या सर्वोच्च बुद्धीमत्ता असलेल्या दहा हजार व्यक्तिंमध्ये केवळ शंभर लोकांनाच हे पुस्तकं समजत. कॉस्मॉलॉजी आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या विषयात वैश्विक योगदान दिल्याबद्दल त्यांना विशेष गौरवल गेलं. दुर्दवाने वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना मोटर न्यूरॉन नावाचा डिसीज झाला. या आजारात रोग्याच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूवरचे नियंत्रण संपूर्णपणे नष्ट होऊन जाते. चालणं फिरणं तर खूप दूरची गोष्ट झाली, पेशंट ला त्याच्या डोळ्याच्या पापण्या देखील हलवता येत नाहीत. इतका तो असहाय्य असतो. त्यात त्यांच्या श्वासनलिकेचे ऑपरेशन करावे लागले असल्याने त्यांना बोलता पण येत नसे. ते सतत व्हील चेअर वर बसून असतं. त्याच्या मनातील गोष्टी व्यक्त करू शकेल असा एक कॉम्पुटर बनवला गेला. केवळ एका बोटाच्या द्वारे हॉकिंग कॉम्पुटर चालवत आणि संशोधन करत असतं. कृष्णविवर हा हॉकिंग यांचा आवडीचा विषय. या साठी त्यांनी अनेक ठिकाणी अनेक व्याख्यान दिली. या असामान्य शास्त्रज्ञाची बुद्धीमत्ता किती असामान्य होती याच्या बद्दलची ही एक सत्यघटना.
आमच्या डिपार्टमेंट मध्ये डॉक्टर इंदू सहानी म्हणून एक फिजिशियन होत्या. त्यांना एकदा इंग्लंड येथे 1986 साली केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. स्टीफन हॉकिंग याचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी हजारो लोकं उपस्थित होते. भाषण संपल्यावर त्या आणि त्यांची मुलगी त्यांना भेटायला स्टेजवर गेल्या. हजारो लोकं रांगेत त्यांना भेटत होते. त्या वेळी हॉकिंग हे कोणतीही हालचाल करायला असमर्थ होते. ते जो काही संवाद करीत तो कॉम्पुटरच्या मार्फतच. पुन्हा त्यांची कोणतीही प्रतिक्रिया त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसे. डॉक्टरांनी त्यांच्याशी कॉम्पुटर मार्फत संवाद साधून मी भारतातून आली आहे आणि ही माझी मुलगी आहे असं सांगितलं.त्यांनी ओके म्हटलं. बस ती त्यांची भेट साधारण काही सेकंदच झाली असेल.
त्या नंतर 2001 साली, जानेवारी महिन्यात स्टीफन हॉकिंग भारतात मुंबई मध्ये ओबेरॉय हॉटेल मध्ये आले होते.तिथं त्यांच भाषण होतं. एव्हढा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ मुंबईला आलेला आहे म्हटल्यावर डॉ इंदू सहानी ही संधी सोडणं शक्यच नव्हतं. त्या त्यांच भाषण ऐकायला गेल्या.
भाषण झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळे श्रोते हॉकिंग याची भेट व्हावी म्हणून प्रयत्न करू लागले. डॉ. इंदू सहानी पण रांगेत होत्या. त्यांचा नंबरं येताच आणि त्यांना बघताच स्टीफन हॉकिंग यांनी कॉम्पुटर द्वारे विचारलं, डॉक्टर तुम्ही कशा आहात आणि तुमची मुलगी सध्या काय करते ?
जागतिक कीर्तीच्या या शास्रज्ञाने आपली पंधरा वर्षा पूर्वी एक सेकंद झालेली भेट लक्षात ठेवावी, हे पाहिल्यावर डॉक्टरांचे हृदय एकदम भरून आले. आणि या शास्त्रज्ञाच्या अचाट स्मरणशक्तीने त्या थक्क झाल्या.
हजारो लोकांमध्ये ज्यांची केवळ एक सेकंदच भेट झाली असेल अशा व्यक्तीला पंधरा वर्षांनी अचूक ओळखणं, आणि तिची विचारपूस करणं हा खरोखरच बुद्धीमत्तेचा उच्चतम अविष्कार होता.
अशा महान शास्त्रज्ञाला माझा प्रणाम !!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा