Jan 26, 2022
नारीवादी

स्टेटस

Read Later
स्टेटस

स्टेटस 
प्रसंग पहिला :
ऑफिस टी ब्रेक मध्ये निशाचे कलीग पियुष आणि केशव चहा पिताना, "omg ! निशा... "
"काय झालं केशव?"
"हे बघ निशाचे स्टेटस."
"बापरे काय दिसतेय मॅडम. ऑफिसमध्ये तर सलवार सूट मधे सती सावित्री बनून फिरते आणि बाहेर.. "
"बाहेर बिपाशा, कतरीना."
"पण तू नाही बघितलं का? काय हॉट दिसतेय ती, नी लेंग्थ वन पीस मध्ये.. "
"आपला नंबर सेव्ह नाही केला आहे मॅडमने."
"अरे मग काय झालं? स्क्रीन शॉट काढून पाठवतो तुला आणि आपल्या ग्रुपमध्येही (डोळे मिचकावून ) टाकतो."
"खरंच ! मग तर मज्जा येईल."
आता पुढे निशाचा फोटो ग्रुप मधे गेल्यावर कुठे कुठे, कोणा कोणाला शेयर झाला असेल आणि त्यावर काय काय टीका टिपणी झाली असेल ते मी सांगण्याची गरज नाही. 

प्रसंग दुसरा :
निशा तिच्या मैत्रिणीला गीताला मार्केटमध्ये भेटते. 
"हाय निशा, कशी आहेस?"
"छान, तू?"
"मीही छान आहे."
"गीता मग स्टेटसला सुविचार टाकणं का बंद केलंस तू अचानक."
"आता काय सांगू यार!"
"काय झालं?"
"माझा बॉस मी टाकलेल्या प्रत्येक स्टेटसबद्दल खोदून खोदून विचारतो. त्याला वाटतं कि मी ते सुविचार त्याला टोमणा म्हणून टाकते. माझ्या स्टेटस वरून मला जज करतो. डोक्याला ताप. म्हणून म्हटलं नको बाबा, त्याच्याशी कोण रोज डोकं लावेल."
"हो तेही आहेच." निशाचा चेहरा पडला. 
"काय झालं निशा? काही प्रॉब्लेम आहे का?" 
"अगं म्हणजे आहेही आणि नाहीही."
"कोड्यात काय बोलते?  सरळ सांग."
"अगं माझा तो फोटो आठवतो का 2-3 दिवस आधी स्टेटसला लावलेला."
"अच्छा तो, ज्यात तू एकदम hotti दिसत होतीस. कोणी म्हणणारच नाही कि तू 2 लेकरांची माय आहेस. खूप छान छान कमेंट आले असतील तुला तर त्यावर. मग नाराज का आहेस?"
"मला बोलू देशील का?"
"आपण चहा घ्यायला बसू. तू सांग आरामात."
"हो चालेल." दोघीही हॉटेलमध्ये चहा घ्यायला बसतात. "बोल आता."
"अगं तो फोटो पूर्ण ऑफिसमध्ये पसरला. कळत नाही कसा? माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर ऑफिसचे काहीच नंबर सेव्ह आहेत. मला केशववर शंका आहे. पण त्यांना विचारलं तर मॅटर आणखी वाढेल. म्हणतील मीच आधी असा फोटो स्टेटसला लावला आणि मीच इशू क्रिएट करतेय. पण मी तर फक्त माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला दाखवण्यासाठी  लावला होता स्टेटसला. मीही ठरवलं आता यापुढे स्टेटसला अजिबात फोटो नाही लावायचे."
"हो गं ! हे व्हाट्सअप हाताळणंही डोक्याला ताप. मी तर डिलीटच करायचं ठरवलं होतं. पण ऑफिसची अर्ध्या पेक्षा जास्त कामं या व्हाट्सअपवर चालतात म्हणून नाही डिलीट केलं."
"मी बसू का तुमच्यासोबत ?"
एक 50-55 वर्षाची पण जीन्स टी शर्ट घातलेल्या बाईने त्यांना विचारलं. निशा आणि गीता काय बोलावं म्हणून कॉन्फयुज झाल्यात हे पाहून ती बाई स्वतःच बसली.
"सॉरी मी हे असं इंटरप्ट करतेय. मी तुमचं व्हाट्सअप / स्टेटस बद्दलच संभाषण ऐकलं. आजकाल सोशल मीडियामुळे आपली संपूर्ण लाईफ ही सोशल झाली आहे. प्रायव्हसी टिकवून ठेवणं कठीण आहे आणि काहींना तर अटेंशन हवं असतं म्हणून ते पर्सनल लाईफ फेसबुक, व्हाट्सअप सारख्या साईटवर ओपन करतात. आणि मग काहींना नको त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण मी हे नक्कीच सांगेल कि मुली हे सगळं टाळू शकतात."
"म्हणजे सोशल मीडियापासून दूर राहा असंच म्हणायचं ना तुम्हाला."
"नाही गं ! ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहेत." चहाचा घोट घेऊन, "व्हाट्सअप स्टेटस सेटिंग मधे तिन ऑप्शन असतात. बघ. ओपन कर व्हाट्सअप स्टेटस."
"कुठे?"
"ते वर कोपऱ्यात तिन टिम्ब / ठिपके आहेत ना त्यावर क्लिक कर."
"अरे हो, 
My contacts 
My contacts except.. 
Only share with.. "
"यातलं only share with माझं फेव्हरेट आहे. कारण आपण कितीतरी नवीन लोकांना भेटतो. ऑनलाईन कारभारामुळे त्यांचे नंबर सेव्ह करतो. किराणा शॉप वाला, दूधवाला, भाजीवाली, प्लम्बर, ऑफिसची लोकं... लिस्ट मोठी आहे. त्यांना सगळ्यांना विनाकारण आपलं स्टेटस दाखवायची काय गरज?  असं मला वाटतं."
"अगदी बरोब्बर मॅडम."
"हो ना. चला जाते मी. माझ्या ड्युटीवर जायची वेळ झाली."
"काय करता तुम्ही?"
"मी पोलीस वायरलेस सर्व्हिसमध्ये आहे."
"खरंच !"
"हो गं मुलींनो. या स्टेटस मॅटर मुळे खूप गुन्हे होतात बरं. म्हणूनच तुमचं संभाषण ऐकून राहवलं नाही. घाबरू नका पण सांभाळून राहा."
"हो आम्ही आताच सेटिंग चेंज करतो." निशा आणि गीता एकसुरात बोलल्या. 
....... 
आपण आपल्या व्हाट्सअप स्टेटसला काय लावावं ही नक्कीच आपली चॉईस असावी पण ते कोणाला दाखवावं हेही आपण विचार करून ठरवायला हवं. 

धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you