स्टेटस:- भाग 9

Arab and Shivaji both traveled together in chartered flight

स्टेटस भाग :-9

चेन्नई मागे पडत होते आणि अर्णव तिचे निरीक्षण करत होता, तिने सहज खिडकीतून नजर काढून आत बघितले तर अर्णव तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला " काय! चेन्नई सोडवत नाही आहे का?"
ती पण तेवढेच हसत म्हणाली " चेन्नई सोडवत नाही आहे आणि अजून काही आहे ते पण सोडवत नाहीये."

नुरी हे बोलणे ऐकत होती, खोडकरपणाने ती म्हणाली " मला माहित आहे नक्की काय सोडवत नाही आहे आणि काय हवे आहे ते."
लगेच तिला दटावून शिवांगी डोळे मोठे करत म्हणाली
" शशश! सिक्रेट सिक्रेट . टॉप सिक्रेट"
त्यावर त्या दोघीही हसायला लागल्या.
अर्णव म्हणाला " आज दिवसभर तुम्हाला भेटता आले नाही, काही बोलणे नाही त्याबद्दल सिंसियर ऍपोलॉजिज! पण निवांत गप्पा आता आपल्याला करता येतील."

तेवढ्यात अटेंडन्ट ने फूड ट्रे मध्ये आणले.
छान कॉर्न पॅटिस, काही क्रॉसें होते, मस्त कट करून डेकोरेट केलेले फ्रेश फ्रुट्स, स्ट्रॉबेरी कर्ड, टोस्ट बटर, ऑम्लेटस, ब्लुबेरी पुडिंग, चीझ केक आणि मस्त गरम गरम कॉफी असे सगळे त्याने समोरच्या टेबलावर मांडून ठेवले "
त्या घमघमाटाने त्यांची भूक चाळवली आणि त्यांना आठवले की ब्रेकफास्ट नंतर त्यांनी काही खाल्लेच नाही आहे.  मिटिंग मध्ये असलेल्या अर्णव ने पण काही खाल्ले नसेल हे लक्षात घेऊन त्या सगळ्यांनी खायला घेतले आणि खाता खाता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

अर्णव ने तिला सांगितले की, चेन्नई मधल्या कुठल्या गोष्टी घरी सांगायच्या ज्यामुळे घरी बिझनेस चर्चा होतील आणि त्याने हे पण आवर्जून सांगितले की मि. स्वामी ला सांग की तुला ज्या गोष्टी हव्या आहेत, तू जे पाहिले आहे त्या रिलेटेड त्याच्याकडून सेपरेट प्रपोसल येऊ देत म्हणजे तू त्यांना सुद्धा त्यात इनवोल्व केले असे होईल.

ज्या पद्धतीने अर्णव ने सगळे प्लॅन केले, सांगितले त्याचा शिस्तबद्ध कारभार पाहून शिवांगी जाम खुश झाली. गर्वाने तिने अर्णव कडे बघितले तशी त्यांची नजरानजर झाली तसे दोघेही गालातल्या गालात हसले.

वरती 40000 फुटाच्या हाय अल्टीट्युड वर गेल्यावर पायलट ने त्यांना सीटबेल्ट काढण्यासाठी सांगितले.
तेव्हा अर्णव ने तिला संपूर्ण फ्लाईट दाखवले. त्यातील बेड, सोफा, बाथ घेण्यासाठी असलेल्या सोयी सगळं कसं डोळे दिपवणारे होते आणि त्याच बरोबर फुल्ल सिक्युरिटी प्रूफ ते फ्लाईट खास त्याने कस्टमाईझड करून घेतले होते.

त्याच्या सोबत अगदी मोजके 3 लोक होते बाकीच्यांना त्याने कमर्शियल फ्लाईट ने पाठवले हे लक्षात येत होते. त्या 3 लोकांमध्ये एक अटेंडन्ट, 1 सेक्रेटरी होता आणि तिसरा पायलट. या स्पेशल ट्रीटमेंट मुळे शिवांगी एकदम रॉयल फील करत होती.
तिकडून पुढे जात असताना पायलट ने अनाऊन्स केले की आपण आता तिरुमला डोंगराजवळून जात आहे. उजव्या बाजूला खालती तिरुपती मंदिर तुम्ही पाहू शकता. हे ऐकताच शिवांगी आणि अर्णव दोघांचेही हात अचानक जोडले गेले. दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. एकमेकांची वेवलेंथ छान जुळलेली त्यांना दिसत होती.  त्या प्रवासात एकमेकांच्या सहवासात ते पुन्हा फूड एन्जॉय करू लागले.

खाता खाताच अर्णव म्हणाला" शिवांगी आता यापुढे नक्की काय आणि कसे करायचे हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. मी उद्याच तुझ्या घरी पुन्हा येईल आणि आल्यावर काही गोष्टी डिस्कस करेन.
पण मी एका गोष्टीवर ठाम आहे आणि राहीनसुद्धा की, कोणत्याही परिस्थितीत लग्न हे बडेजाव पध्दतीने न करता, स्टेटस सिम्बॉल न होता, साध्या पद्धतीने आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थित मध्ये करायचं.
माझ्या बोलण्याला तुझी संमती आणि साथ असेल ना? की मी एकटाच तिथे बोलत असेन?"

"अर्णव तू निश्चिन्त राहा,जे तुझ्या मनात आहे तेच माझ्या मनात! आपल्या दोघांनाही जे जसे हवे ते आपण आपल्या मनाने महाबलीपुरामम मध्ये व्यक्त केले आहे. तुला वाटते म्हणण्यापेक्षा आपल्याला जे हवे आहे तेच  आपण करू या, माझ्याकडून काही आणि काही वेगळे  होणार नाही."

तिच्या बोलण्याने अर्णव आश्वस्त झाला.
थोडेसे अवडीनिवडीबाबत, थोड्या मुंबई, थोड्या चेन्नई या गप्पा सुरूच होत्या.
त्यांचे खाणे झाल्यावर अटेंडन्ट ने सगळे आवरून ठेवले.
फ्लाईट थोडे डिसेंड व्हायला सुरुवात झाली होतीच.
तेवढ्यात पायलट ने अनौन्स केले की थोड्याच वेळात आपण जुहू ऐरोड्रम ला पोचत आहोत.
त्यांनी पुन्हा सीटबेल्ट लावले आणि तिने खिडकीतून बाहेर पाहायला सुरुवात केली.
खालती जुई नगरचा फ्लाय ओव्हर दिसला आणि  मुंबई चे चमचमते दिवे बघण्यात ती डूबून गेली.

तिच्याकडे बघून अर्णव म्हणाला " तू सगळीकडे स्वतःला किती सहज सामावतेस ना! मग ते मुंबई असो की चेन्नई?"
"का नाही होणार? मुंबई ही माझी जन्म आणि कर्मभूमी आहे. आणि चेन्नई माझी....."
"प्रेमभूमी!" नूरी हसत म्हणाली.
यावर सगळेच जण हसले.
पायलट ने त्यांचे फ्लाईट अगदी स्मूथली लॅंड केले.
तिथे त्यांना घ्यायला मर्सिडीज बेंझ च्या गाड्या आल्या होत्या. त्यातील एका कार मध्ये नुरी आणि शिवांगी ला बसवून काही बेसिक सूचना देऊन त्याने बाय केले आणि दुसऱ्या गाडीत बसून तो त्याच्या घरी गेला.

त्यांच्या घरी त्या गाडीने सोडल्यावर त्या दोघी घरात आत गेल्या.
आत पोचल्यावर नुरी आणि शिवांगी दादाला भेटल्या, तो सुद्धा शिवांगी येणार म्हणून लवकर आला होता.
त्याला हग करून ती म्हणाली " दादा मिशन चेन्नई सुपर सक्सेसफुल! "

दादा तिचे बोलणे ऐकून मनापासून खुश झाला आणि विचारले की तुमचे सगळे नीट झाले ना? तिथल्या उन्हाचा काही त्रास झाला नाही ना?

त्या म्हणाल्या नाही आणि शिवांगी ने अलगद नुरी कडे बघितले.
नूरी म्हणाली " आम्ही  तिन्ही दिवस मस्त छान फ्रेश होतो. छान मस्त  राहिलो, पाहिले. हॉटेल खूपच भारी होते.
"छान झाले"
" आणि  दादा, मि. स्वामी ने पण मदत केली. त्याला काही रिपोर्ट मागवले आहेत तो उद्या पाठवेलच."शिवांगी पुढे म्हणाली.
नंतर ती आई बाबांना भेटली. बाबांना चेन्नईच्या गमती तिने सांगितल्या.
सगळ्यांनी डिनर टेबलावर गप्पा गोष्टी करत डिनर केला.
नूरी आज घरी चालली होती पण तिला दादा आणि शिवांगी दोघांनी थांबवून घेतले.शिवांगी नंतर नूरी ला घेऊन रूम मध्ये गेली.

शिवांगी ने रूम बंद केली आणि व्हॉटस ऍप वर अर्णव ला व्हिडिओ कॉल लावला.
अर्णव चे नेट बंद होते बहुतेक त्यामुळे फोन फक्त कॉलिंग दाखवत होता पण रिंगिंग दाखवत नव्हता.
तिने तोंड वाकडे करून फोन बेड वर टाकला आणि नूरी ला घेऊन गॅलरीत बसली.
समोरच्या समुद्राकडे पाहत असताना ती नूरी ला म्हणाली,
"नूरी, तुला नाही वाटत का समुद्र -समुद्रात खूप फरक असतो"

"असतो ना. चेन्नईच्या समुद्र हा जास्त प्रेमळ असतो" ती त्याला चिडवत म्हणाली.

"असे बोलणार का आता? असे चिडवणार का मला?" ती मुद्दामून लहान मुले सारखा आवाज काढून म्हणाली.

"नाही ग! आमच्या छोट्याश्या बाळाला आम्ही नाही चिडवणार. आम्ही तर त्याचे गाल ओढणार"
असे म्हणून तिने तिचे गाल ओढायला सुरुवात केली.
तिचे गाल लगेच लाल झाल्यावर, तिने सॉरी म्हणत हळूच शिवांगीच्या गालावरून हात फिरवला.

"सॉरी का म्हणतेस गं?"
"म्हणजे काय, आता हे गाल आमचे नाहीत ना, तुमच्या अर्णव सरांचे आहेत. मग सॉरी म्हणायला नको का? काही झाले तर तुमचे साहेब आम्हाला ओरडतील ना" तिचे चिडवणे चालूच होते.

तिच्या या चिडवण्याला ती तिला मारायला धावली तशी नूरी हसत हसत रूम मध्ये आली.
तिच्या मागोमाग शिवांगी आत आली तर तिच्या मोबाईल चा लाईट तिला ऑन दिसला.
तिने जाऊन पाहिले तर अर्णव चा व्हिडिओ कॉल येऊन गेला होता.
दुसऱ्या क्षणाला तिने लगेच त्याला रिटर्न कॉल लावला.
यावेळेस फोन रिंगिंग झाला.
काही सेकंदात त्याने फोन उचलला.
नाईट टी शर्ट आणि शॉर्टस घातलेला, केस अस्ताव्यस्त होऊन कपाळावर आलेले आणि जांभई देत असलेला तो बराच थकलेला तिच्या मोबाइल स्क्रिन वर दिसला.
त्याच्या या रुपाला पाहून ती हसायला लागली.

"हसतेस काय? मी जोकर दिसतोय का तुला?"
यावर ती अजूनच हसायला लागली.
तो काहीच न बोलता शांत बसला.
तिचे हसणे थांबले आणि परत त्याच्याकडे लक्ष गेले तर तिला परत हसायला आले
शेवटी तो ही हसायला लागला.
दोघांचेही हसणे सुरू असताना नूरीने स्क्रिन मध्ये डोकावले.

"हाय नूरी"
"हाय. काय साहेब, आज झोपणार का नाही?"
"झोपणारच होतो म्हणून नेट बंद केलेले.  एक मेल येणार होता ते आठवले आणि नेट चालू केले ला तेवढ्यात हिचा व्हिडिओ कॉल दिसला. म्हणून फोन केला"

"बरे झाले फोन केलास, नाहीतर माझे काही खरं नव्हते"
"का ग काय झाले?"
" काय होणार? तिला करमत नाही आहे तुझ्याशिवाय. सारखा तुझा जप चालू आहे. रात्री तुझ्या आठवणीने रडायला आले तर कोणी समजवायला हवे म्हणून मला थांबवून ठेवले आहे"
यावर शिवांगी नूरी ला खोटे खोटे मारायला लागली.
अर्णव नुसताच हसत होता.

'हो का ग शिवांगी?"
"नाही रे, ती उगाच चिडवत आहे"
"म्हणजे तुला माझी आठवण नाही येत आहे का?"
"असे मी कुठे म्हणाले?"
"म्हणजे येत आहे"
"असेही मी कुठे म्हणाले"
"ठीक आहे, ठेवतो फोन. बाय"
"अरे अरे! थांब थांब"
"का थांबू?"
"मला तुला सांगायचे आहे काही"
"काय"
"हेच की"
"हेच की काय"
"हेच की मला तुझी.."
"पुढे तर बोल..."
"मला तुझी..."
"हं..."
"मला तुझी ...."
"आता बोल नाहीतर खरंच ठेवेन..."
"मला तुझी.............जांभई देणारी कॅमेरातली तुझी पोज  खूप आवडली."

हे ऐकून त्याने खाडकिनी त्याच्या कपाळावर मारून घेतलेल्याचा आवाज तिला स्पष्ट आला.

त्याच्या या ऍक्शन ने तिने मोठ्याने दिलेल्या हसण्याच्या रिऍकशन चा आवाज त्यालाही स्पष्ट ऐकू आला.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all