स्टेटस भाग:- 8

Shivangi was on cloud nine after got propose from Arnav

स्टेटस:- भाग 8

तो संपूर्ण परिसर निर्मनुष्य झाल्यावर अर्णव ला ही लक्षात आले की आपण आता हॉटेल ला परत जावे. शिवांगी चा मात्र काही तिथून पाय निघत नव्हता.
ऑलरेडी तिला चेन्नई खूप वेगळ्या अर्थाने भासत होते आणि महाबलीपुरम तर तिच्या दृष्टीने एकदम उत्कृष्ठ ठरले होते.

ती म्हणाली "अर्णव आज आपण इथेच थांबू यात का? आज रात्रभर छान बोलू यात इथे ,आजचा दिवस आपल्याकडे आहे, उद्या तसेही आपल्याला परत जायचे आहे."

अर्णव चकित नजरेने तिच्याकडे बघत होता. त्याने आजूबाजूला पाहिले तर एक वॉचमन होता जो सगळ्यांना बाहेर काढत होता.
तसे ते दोघे उठले आणि शोर टेम्पल च्या मागील बाजूकडे निघाले. तो म्हणाला " हे युनेस्को हेरिटेज आहे, इथे काही नियम आहेत जे आपण बदलायचा प्रयत्न करायला नको. थोडा वेळ बसू यात मग परत निघू."

ती  त्याच्यासोबत चालू लागली.
तिने नजर फिरवली तशी त्या शोर टेम्पल जवळ आवाजाच्या पलीकडे दिसत होते तो फक्त मोठा समुद्र आणि तेवढाच भव्य वाटणारा शेजारी चालत असणारा अर्णव!

तिला या क्षणाला मोरपिसा सारखे हलकं वाटत होते आणि मनात एकच वाटत होते की आपण इथेच आणि इथेच थांबावे , कायमचे!

ती अर्णव ला म्हणाली " अर्णव काय विचार आहे पुढे कसे करायचे? काय करू शकतो आपण?"

तोच विचार मघापासून अर्णव करत  होता, त्याला लग्न करायचे होते पण त्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचा बडेजाव नको होता हे निश्चित.
पण यासाठी दोघांच्याही घरच्यांना कसे कनविन्स करायचे ? अर्णव ने काही ठोकताळे बांधले आणि म्हणाला " आपण मुंबईला जाऊ तेव्हा या विषयावर चर्चा करूयात. आज तरी माझ्याकडे या विषयावर काही उत्तर नाही आहे."

यावर शिवांगीने सुद्धा मान डोलावली आणि म्हणाली,
" बघूया आपण काहीतरी मार्ग काढुया. कारण दोघांच्याही दृष्टीने सगळ्यात मोठी गोष्ट होती की घरच्यांना हे  सांगणे की, हे लग्न आम्हाला मोठया प्रमाणात नको आहे तर साध्या पद्धतीने हवे आहे.
कुठल्याही प्रकारे त्यांना हे लग्न 'स्टेटस' साठी, कॉन्टॅक्टस साठी,  बडेजावसाठी नाही, तर दोन जीवांसाठी हवे होते. आणि असे लग्न हे दोन्ही घरांच्या दृष्टीने अशक्य वाटत होते. पण तरीही ती दोघे या बाबतीत फर्म होते.

तिकडून चालत जाताना रात्री शिवांगी ला जेवढे महाबलीपुरम दिसले तेवढे पाहीले.
ती दगडांवरची शिल्पकला, तो एका टोकावरती उभा असलेला गोल दगड आणि अनेक मंदिरांचा समूह.
हे सगळे पाहत असताना ती प्रफुल्लित होत होती आणि या सगळ्या ऐतिहासिक वस्तूंच्या साक्षीने या जागी आपण लग्न करणार आहोत या भावनेने उत्तेजित सुद्धा होत होती.

दोघे पार्किंग ला पोचले तसे तिने अर्णव ला सांगितले मला गाडी चालवायची आहे. त्याने लगेच त्याच्या हातातली की तिच्या हातात दिली.
त्याने पार्किंग च्या इथून काही स्नॅक्स घेतले आणि तो गाडीत बसला.
तिने पण सफाईने रेंज रोव्हर तिथून बाहेर काढून ECR ला लावली.
छान दिसत होती ती गाडी चालवताना.
तिला पाहून त्याने विचारले, "मी तुझा एक फोटो काढला तर चालेल का शिवांगी?"
"अरे विचारतोस काय? गाडी चालवताना काढायचा आहे का थांबून?"
"नाही असाच! अगदी नॅचरल. एकच काढायचा आहे, फक्त माझ्याकडेच ठेवायला."
त्याच्या या बोलण्यावर ती लाजली.
त्याने त्याच्या आयफोनवर लेन्स सेटिंग्ज वापरून मस्त फोटो काढला आणि त्याच्या फोनच्या वॉलपेपरला ठेवला.
त्याने गाडीला ब्लुटूथ कनेक्ट केला आणि सगळी किशोर कुमार ची गाणी लावायला सुरुवात केली.

तो निवांत रस्ता, ते रोमँटिक वातावरण, ती अर्णवची सोबत आणि ती किशोरची गाणी...एका सुखद संध्याकाळी शिवांगीला अजून काय हवे होते.
एकीकडे गाडीत तो घेतलेले स्नॅक्स तिला देत होता त्यामुळे त्यांचे खाणे सुद्धा गाडीतच सुरू होते.
त्या 50 किमी च्या प्रवासाला त्यांनी 1 तासात कव्हर करून ते दोघे हॉटेल ला पोचले.

रात्री हॉटेल ला परतल्यावर अर्णव म्हणाला  " आज तू लवकर झोप कारण उद्या शेवटचा दिवस आहे आणि तुला स्वामी बरोबर तुझे काम पण उरकायचे आहे.

कुठल्याही परिस्थिती मध्ये मला सुद्धा माझी सगळी कामे पूर्ण करावी लागतील. आजच्या सगळ्या मिटिंगस मी कॅन्सल केल्या आहेत त्यामुळे उद्या काम करावेच लागेल."

ती त्याला गुडनाईट करून झोपायला गेली. की कार्ड ने दरवाजा उघडल्यावर तिने आत रूम मध्ये डोकावून पाहिले तर नुरी आधीच झोपली होती.
ती सुद्धा झोपायला गेली पण अर्णव ने सांगून सुद्धा शिवांगीला झोप येणे अवघड होते.
तिच्या डोक्यामध्ये तो क्षण सतत आणि सतत आठवत होता.
अर्णव काय बोलला, कसं बोलला. त्याने किती सहज केलेले प्रपोज. त्यानंतर तो घालवलेला प्वेळ तिला आठवत होता आणि त्यातच उशिरा कधीतरी तिला झोप लागली.

रात्री उशिरा झोपून सुद्धा सकाळी मात्र तिला लवकर जाग आली. तिने पाहिले तर सकाळचे साडे सहा वाजले होते. सगळ्यात पाहिले तिने दादाला मेसेज केला. सगळे व्यवस्थित आहे आणि आज रात्री मुंबईला येऊ असे तिने सांगितले.
नंतर तिने नुरीला उठवले. ती उठल्यावर तिने नुरीला घट्ट हग केले.
नुरी म्हणाली " काय झाले? मी ठीक आहे ग, काळजी नसावी"
तिचे बोलणे ऐकून ती हसायला लागली आणि तिने समोर बसून नुरीला सगळे सविस्तर सांगितले तसे नुरी पण खूप आनंदित झाली. तिलाही खूप छान वाटले.
हे असे होणार हे नुरीला माहीत होते आणि म्हणूनच तिने त्या दोघांना स्पेस दिली होती.
चेन्नई ला आलो याचे सार्थक झाले असे तिला वाटले, शिवांगीचा आनंद तर गगनात मावत नाही हे तिच्या वागण्यावरून दिसत होते.

दोघींच्या गप्पा चालू होत्या. शिवांगीने एक्सप्रेसो मशीन वापरून दोघींसाठी छान कॉफी केली. 
सकाळी आठ वाजता स्वीट ची बेल वाजली, अर्णव असेल या अपेक्षेने तिने धावत जाऊन दार उघडले तर अर्णव च्या ऐवजी त्याचा एक माणूस होता.
त्याने हातामधील एक पॅकेट तिला दिले आणि तिला तो नमस्ते करून निघून गेला.
त्याचे पॅकिंग छान होते.
ती आत आली आणि तिने नुरीला ते कार्ड दाखवले.
तिने लगेच ते कार्ड उघडायला लावले तेव्हा तिला दिसले  की अर्णव ने त्यात एक मेसेज लिहिला होता " थँक्स फॉर एव्हरीथिंग" आणि त्या खाली लिहिले एक इंविटेशन होते की तुम्ही दोघी आज माझ्याबरोबर चार्टर्ड फ्लाईट ने मुंबईला चला तेव्हा आपण निवांत बोलूयात.

शिवांगी अर्णव सोबत चार्टर्ड फ्लाईटने चेन्नई ते मुंबई प्रवास करायचा म्हणून खूप खुश झाली.
आज दिवसभरामध्ये तिची सुद्धा सगळी कामे होणे अपेक्षित होते.
तिला हे ही माहिती होते की गेल्या दोन दिवसांमध्ये अर्णव ची बरीच कामे खोळंबली होती. शिवांगी च्या येण्याने आणि त्या मिळालेल्या सरप्राईज ने त्याने बऱ्याच मीटिंग कॅन्सल केल्या होत्या त्यामुळे तो आज बीझी असणार हे नक्की होते.

शिवांगी ने मि. स्वामी ना एक रिपोर्ट जनरेट करायला सांगितला ज्यात कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची, कुठले महत्वाचे लोकेशन,  कुठले सेकंड प्रायोरिटी वाले याची लिस्ट बनवायला सांगितले.
याच्या पलीकडे जाऊन आपण चेन्नई मध्ये काय बघितले याची कल्पना देऊन त्याची सॉफ्ट कॉपी सुद्धा करायला सांगितली.
हे सगळे करून तिने नुरीला बघण्यासाठी एकदा डॉक्टर ला बोलावले. डॉक्टर ने सगळं एकदम नॉर्मल असल्याचे सांगितले.
तेवढ्यात त्यांच्यासाठी स्वीट रूम मध्येच भला मोठा ब्रेकफास्ट आला.

संपूर्ण व्हाईट कटलरी, काचेच्या डिशेस, लांब काटे आणि साधे चमचे, मोठाले पांढरे शुभ्र कप्स खूपच छान दिसत होते. अर्थातच तो ब्रेकफास्ट अर्णव ने पाठवला होता. त्याबरोबरच एक मेसेज होता त्यामध्ये  लिहिले होते की 11.30 वाजेपर्यंत तयार राहा. त्यांनी ब्रेकफास्ट करायला सुरुवात केली पण त्यातले अनेक आयटमस् खाता खाता त्या दोघी दमून गेल्या.
मग दोघींनी आपले आवरून घेतले आणि तयार होऊन बसल्या तेवढ्यात अर्णव कडून एक माणूस त्या दोघींना घेण्यासाठी आला.

आज पार्किंग मध्ये BMW ची X5 उभी होती. त्यात बसल्यावर ड्रायव्हर त्यांना टी नगर मधील 'सुंदरी सिल्कस'  या दुकानात घेऊन गेला.

तिथे आत गेल्यावर दुकानाचा मॅनेजर एका छान स्माईल चेहऱ्यावर ठेऊन त्यांच्या समोर आला आणि म्हणाला, "तुम्हाला पूर्ण वेळ मी अटेंड करणार आहे तश्या खास ऑर्डर आहेत मला. तुम्हाला जे हवे ते तुम्ही खरेदी करा"
त्या मागे अर्णव आहे हे त्या दोघींना कळलेच होते. त्याने उत्तमोत्तम सिल्क च्या साड्या दाखवल्या तेव्हा तिने स्वतःसाठी एक, नूरीसाठी, आई  आणि वहिनी साठी  सुद्धा काही खरेदी केली.

तिथून झाल्यावर गाडी त्यांना श्रीकृष्ण स्वीटस ला घेऊन गेली. साजूक तुपातील मस्त म्हैसूर पाक त्यांनी तिथून घेतला.

त्यांनतर गाडी सारवानाच्या शॉप ला गेली.
तिथेही काही वेगळा अनुभव नव्हता. तिथल्या मॅनेजर ने सगळे 8 मजल्याचे शॉप त्यांना स्वतः फिरून दाखवले.
त्यातील काही प्रसिद्ध आणि महत्वाच्या गोष्टी त्यांनी घेतल्या.
चेन्नई ला येऊन शॉपिंग कुठे डोक्यात नव्हती त्यामुळे ती यासाठी पूर्ण तयार नव्हती पण आजचा अनुभव खूपच वेगळा होता.
आज दिवसभरातून अर्णव चा फोन पण आला नव्हता पण कुठेतरी मनातून ती शांत होती की काल जे काही  अनुभवले ते सर्व काही लवकरच मिळणार आहे.

बरोबर 4 वाजता शिवांगीचा फोन वाजला ,फोन अननोन नंबर वरून होता, तो फोन उचलल्यावर कळले की तो अर्णव च्या सेक्रेटरी चा होता आणि बरोबर 6 वाजता अर्णव ने हॉटेल वर तयार राहायला सांगितले आहे. तिथूनच गाडी डायरेक्ट एअरपोर्ट ला जाणार आहे. हे ऐकल्यावर तिने खरेदी आटोपती घेतली आणि 5 पर्यंत त्या त्यांच्या स्वीट ला परत आल्या.
त्यांनी सगळे आवरून ठेवले आणि बरोबर 6 वाजता त्या अर्णव यायची वाट पाहत होत्या.
सकाळी 8 ला सुरू  झालेले DND चा लाईट संध्याकाळी 6 पर्यंत तसाच होता.
अर्णव तर दिसला नाही पण सगळे निरोप तो त्यांच्या माणसांना सतत देत होता. तो जेवला की नाही जेवला हे सुद्धा तिला माहीत नव्हते पण तिची पूर्ण खबरबात तो काम करत असताना सुद्धा घेत होता.
लागोपाठ मिटिंगस करून आज त्याला सर्व कामे पूर्ण करायची होती.

संध्याकाळी 6. 15 ला दिवसभराचा दमलेला, थकलेला अर्णव तिला दिसला. त्याच्या गेस्टना सोडायला तो बाहेर आला होता.  त्याला पाहून ती मनातून खूप उतेजीत झाली. तिच्या डोळ्यात एक चमक होती.  अर्णव ने गेस्ट ना सी ऑफ करून तिच्याकडे पाहिले आणि तिला एक छान स्माईल देत म्हणाला,
" मोजून 15 मिनिटात आपण निघू."

तो परत स्वीट रूम मध्ये गेला आणि बरोबर 15 मिनिटात तो बाहेर आला.
आता तो बराच फ्रेश वाटत होता. त्याने तिघांसाठी तिथे कॉफी मागवली होती.
कॉफी घेत घेत तो दिवस कसा गेला हे त्या दोघींशी  बोलत होता.

सात वाजता त्याच्या सेक्रेटरीने आत येऊन सगळे तयार आहे असे सांगितले.
ते सगळे जण निघाले.
खालती 3 गाड्या उभ्या होत्या. त्यातल्या रोल्स रॉयस गाडीचा दरवाजा अर्णव ने खास तिच्यासाठी उघडला.
त्याला थँक्स म्हणून ती गाडीत बसली. दुसऱ्या बाजूने तो येऊन बसला आणि नुरी पुढे बसली.
सगळ्या गाड्या एअरपोर्टला निघाल्या.
गाडीत नुरी आणि अर्णव दोघे बोलत होते. शिवांगी मात्र चेन्नई ला डोळ्यात साठवत होती.

चेन्नईच्या विमानतळाच्या स्पेशल प्रिविलेज गेट मधून त्या गाड्या आत गेल्या.
तिथे आत एक सुपर व्हाईट कलरचे फ्लाईट दिसत होते ज्यावर लाल मोठ्या अक्षरात 'सिंघानिया'ज' असे लिहिले होते.
गाड्या थांबल्या तिथे रेड कार्पोरेट टाकले होते. ते उतरल्यावर पायलट स्वतः अर्णव पाशी आला आणि त्याने एकदम कडक शेकहँड त्याच्या बरोबर केले.
त्या दोघींचे पण स्वागत करून छोट्याश्या पायऱ्यांच्या जिन्याने तो सगळ्यांना आत घेऊन गेला.

आतली सजावट पाहून त्या दोघी चकित झाल्या.
मस्त राउंडेड सोफा, भल्या मोठ्या लेदर चेयर्स, आतमध्ये एक बेड आणि बाथ आणि वॉशरूम एवढे सगळे आत होते.
अर्णव एका चेयर वर बसला. त्याच्या समोर शिवांगी आणि तिच्या शेजारी नुरी बसली.
अटेंडन्ट ने त्यांच्या समोर काही सॉफ्ट ड्रिंक्स ठेवले आणि फ्लाईट रिलेटेड बेसिक सूचना दिल्या.

सगळ्या सोयीने सुसज्ज असलेल्या त्या फ्लाईट ने टेक ऑफ केले आणि शिवांगीने खिडकीतून खालती नजर टाकली. तिला खालती चमचमणारया दिव्यांचे चेन्नई दिसले. त्या शहराला सोडून जात असताना  ती खिडकीतूनच अलगद पणे बोलली,

"माझ्या लाडक्या चेन्नई, मी लवकरच येईन या जागेवर, तुझ्या पाशी.  अर्णव आणि मी जे एकमेकांना प्रॉमिस केले आहे ते पूर्ण करायला आमची स्वप्ने साकार करायला" ती मनातल्या मनात या शहराशी बोलत होती आणि अर्णव तिचे भाव टिपत होता.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all