स्टेटस भाग 7

Arnav purposely took shivangi to a place where he always found the peace

स्टेटस भाग:-7

दोघेही गोल्डन बीच वरच्या सुवर्ण छटा अनुभवत एकमेकांच्या सहवासात निःशब्द बसले होते.
तेवढयात शिवांगी चा फोन वाजला. तिने स्क्रीन कडे बघितले तर नुरी चे नाव दिसले. तिने झटकन फोन उचलून तिला विचारले,

" नुरी बरे आहे ना तुला? काही त्रास होतोय का? मी येऊ का? का तुला इथे यायला गाडी पाठवू?"

"अगं, थांब थांब! किती प्रश्न विचारतेस. मी एकदम टकाटक आहे. मी तुला फोन या करता केला की मला अर्णव ला थँक्स म्हणायचे आहेत"
"अर्णव ला थँक्स? का ग?"
"म्हणजे तुला माहिती नाही का काही?"
"नाही. सांग तर काय!"

"अगं, तुम्ही गेल्यापासून दर अर्ध्या तासात कोणीतरी येऊन माझी चौकशी करून जात आहे. सतत काहीतरी आणून देत आहे. आत्तापर्यंत चार नारळ पाणी, व्हेजिटेबल्स सुप्स, साजूक तुपातला म्हैसूर पाक, ड्रायफ्रूट डिश, वेगवेगळे फ्रुटस आणि आता भला मोठा रोज बुके सुद्धा आणला आहे ज्यावर 'गेट वेल सून' असे लिहिले आहे. त्याची माणसे इतकी काळजी घेत आहेत माझी की मला वाटते आहे या हॉटेलची मी मालकीण आहे.
आता सकाळचे डॉक्टर पण परत येऊन गेले आणि ऑर्डरली सुद्धा डिनर ची ऑर्डर घ्यायला आला आहे. तू माझी काळजी करू नकोस आणि अगदी निवांत ये...पण, रियली ही इज ग्रेट. कुठे आहे तो..दे जरा त्याला फोन"

तिने अर्णव च्या हातात फोन दिला. तो फोनवर बोलत असताना ती त्याच्याकडे फक्त बघत होती आणि त्याला बघत असतानाच एका क्षणाला तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलेच. त्याचे फोनवर बोलणे झाल्यावर शिवांगी कडे पाहिले तर ती त्याला  " थँक यु" असे भावनिक होऊन म्हणाली.
त्याने नाही म्हणून मान डोलावली आणि  तिच्या डोळ्यातुन येणाऱ्या पाण्याला त्याच्या बोटाने अलगद टिपुन ते हवेत उडवून टाकले.

"तुझ्या डोळ्यात आनंदाने किंवा दुःखाने मला कधीच पाणी नको आहे. जमेल का एवढे?"
"तुझ्यासाठी काहीपण जमेल" ती मस्त हसत म्हणाली.
यावर तो ही हसला.

"चला मॅडम, चेन्नई मधील माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे. येताय ना?"
"अजून आवडती जागा? भारीच की!
"यायचंय ना?"
"म्हणजे काय! चलो चलो लवकर चलो"
तिचे बोलणे ऐकून त्याला हसायला आले.
ते दोघेही पार्किंग पाशी आले.
त्याने गाडीच्या की ने सेन्टर लॉक ओपन केले आणि ते दोघेही गाडीत शिरले.

"शिवांगी आता आपण ज्या रूट ने चाललो आहे त्याला ECR म्हणजे ईस्ट कोस्ट रूट म्हणतात.
समुद्राच्या बाजूने जाणारा हा रोड आणि इथला निसर्ग जेवढा अनुभवता येईल तेवढा अनुभव"

त्याच्या या बोलण्यावर तिने AC बंद करून टाकला आणि गाडीच्या काचा ओपन केल्या.
त्याने हसत तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, "आपल्याला इथून 35 किमी जायचे आहे. हा रोड आपण 30 मिनिटात पार करू. बघ काय पाहता येत आहे ते"

तिने गाडीच्या बाहेर हात काढला आणि सगळे गार वारे प्यायला लागली. त्याची रेंज रोव्हर आता मस्त स्पीड ने चालली होती आणि गाडीत भरपूर वारे येत होते.
त्या थंडगार हवेने ते दोघेही एकदम फ्रेश झाले.
तेवढ्यात त्याने गाडीचे रुफ ओपन केले आणि शिवांगी ला उभे राहयाला सांगितले. तिने असे कधी केले नव्हते.
पण तो म्हणत आहे तर, थोडा त्याचा आधार घेत, थोडे गाडीला धरत ती उभे राहिली.

छता वरून डोके बाहेर काढून समोर दिसणारा रस्ता आणि बाजूला असलेला समुद्र तिला बेभान करत होता.
गाडीचा स्पीड, तो अंधुक झालेला प्रकाश आणि थंडगार हवा अफाट कॉम्बिनेशन होते.
ती आनंदाने जोरात ओरडायला लागली. तिचे ओरडणे ऐकून त्याला गंमत वाटली.

थोड्या वेळ अश्या पद्धतीने ड्राईव्ह केल्यावर त्याने गाडी बाजूला घेऊन तिला डोअर वर बसायला सांगितले.
असे काही बसता येते हे तिला माहीतच नव्हते. त्याने डोअर लॉक आहेत असे तिला सांगितले आणि काचा खालती घेतल्यामुळे तू डोअर वर बसून पूर्ण बाहेर बघू शकतेस हे दाखवले.
तिला हात  आतल्या अप हँडल ला घट्ट धरायला लावून अगदी 20 च्या स्पीड ने गाडी चालवायला घेतली.
हा अनुभव अजूनच थ्रिलिंग होता. ती अतिआनंदाने मस्त ओरडत होती.
अर्णव ने त्याच्या डाव्या हाताने तिच्या पायाला धरले होते आणि तो बराच सावध राहून गाडी चालवत होता पण ती मात्र प्रचंड खुश होती.
अजून गंमत म्हणून त्याने समोर रोड वर कोणी नाही हे पाहून थोडी झिग झ्याग गाडी चालवली आणि तिचा हॅपिनेस हा आभाळाला पोचला.

थोडे ऍडवेंचर करून झाल्यावर त्याने तिला आत बसवले
ती त्या पूर्ण एक्सपिरियन्स ने अक्षरशः गाडीत सुद्धा उड्या मारत होती.

एकदम स्मूथली गाडी चालवत तो तिला एके ठिकाणी घेऊन आला.
गाडी पार्क केली आणि एकदम ती म्हणाली,
"महाबलीपुरम"
"येस"
"ओह वॉव! मी ऐकले आहे या बद्दल. हे युनेस्को हेरिटेज आहे ना"
"अगदी बरोबर. हिस्ट्री आणि जॉग्रफी पक्के आहे की तुझे" तिला चिडवत तो म्हणाला.
"ए मी स्कुल टॉपर होते त्यामुळे मला आठवतंय" ती तेवढ्याच फर्मली ती म्हणाली.

बराच अंधार झाला होता त्यामुळे काही बघता येणार नव्हते पण अर्णव ची पावले ही बरोबर पडत होती.
ती त्याच्या बरोबर चालत असताना आजूबाजूला असलेल्या स्टॉल्स कडे पाहत होती.
काही दगडी वस्तू, संगमरवरी कलाकुसर आणि बरोबर असलेल्या ब्रॉंझ चे स्टेचूज तिचे लक्ष वेधून घेत होते.

तिथल्याच असलेल्या एका स्टॉल मधील छोटया संगमरवरी हत्तीला तिने हातात घेतले आणि ते ती निरखून पाहायला लागली.
ती थांबली पाहून अर्णव पण थांबला. त्याने घ्यायचे का असे विचारले.
तिला तो हत्ती तिच्यासाठी नाही तर अर्णव ला गिफ्ट द्यायचा होता त्यामुळे त्याने विचारल्यावर ती नाही म्हणाली.

ते तसेच पूढे चालत गेले. ती आजूबाजूच्या सगळ्या शिल्पकलेला जेवढे पाहता येतील तेवढे पाहत होती.
चालायचा एक रस्ता डावीकडून पुढे गेलेला होता.
अर्णव त्या रस्त्यावरून चालायला लागला. एका अनामिक ओढीने शिवांगी त्याच्या मागे जात होती.
आणि अचानक तो थांबला आणि त्याने तिला बघायला सांगितले.

अंधाराचा निळसर प्रकाश समोरच्या ढगांत उतरलेला होता. त्या पार्श्वभूमीवर समोर दिसणारा बे ऑफ बंगाल आज जास्तच खळाळत होता आणि त्याही पेक्षा नजरबंद  करणारे एक मंदिर समोर दिसत होते.
ग्रॅनाईट चे भक्कम बांधकाम असलेले हे मंदिर पाहून शिवांगी स्तिमित झाली.
ती पुढे गेली आणि नाव वाचले.."शोर टेम्पल"

तिने अर्णव कडे पाहिले. एक अनामिक शांतता आणि समाधान तिला अर्णव च्या चेहऱ्यावर दिसत होते.
तो तिला घेऊन आत मंदिरात गेला. शिवाच्या त्या रुपाला त्या दोघांनी मनापासून नमस्कार केला.
दर्शन घेऊन तो मंदिराच्या मागच्या बाजूला गेला. तिथे एक आडवा दगड होता त्यावर तो बसला आणि बाजूला शिवांगी ला बसवले.

समोर उसळणाऱ्या लाटा त्या दोघांना मंत्रमुग्ध करत होत्या.
काही क्षण गेल्यावर तो तिला म्हणाला, "माझ्या साठी हे आवडते ठिकाण का आहे माहिती आहे?"
तिने नाही म्हणून मान डोलावली.
"मला पंचमहाभूतामधील चार तत्वे इथे सापडतात. आकाश, जल, वायू, पृथ्वी. सोबत देवाचा आशीर्वाद इथे मिळतो. जी शांतता मनाला भावते तो इथेच आहे. निसर्गाचे सुंदर रूप इथे सर्वत्र आहे आणि याच ठिकाणी मला पवित्र अग्नी निर्माण करून माझ्या सोलमेट बरोबर सात फेरे घ्यायचे आहेत.

त्याच्या या बोलण्यावर पूर्णपणे चकित झालेली शिवांगी फक्त त्याच्याकडे बघत होती.

"मला लग्न या गोष्टीवर खूप काही जीव नव्हता, पण जेव्हा तुम्हाला योग्य साथीदार मिळतो तेव्हा लग्न,आयुष्य आणि तुमची स्वप्ने ही खरंच वाटायला लागतात. "

तिचे पूर्ण लक्ष त्याच्या बोलण्याकडे होते.

"तुला भेटल्यावर मला जाणवले शिवांगी माझे आयुष्य का  अपूर्ण होते आणि तुझ्या येण्याने मला किती पूर्णत्व मिळाले आहे."

तो दगडावरून खाली उतरला आणि त्याने अलगद तिचा हात हातात घेतला.
"शिवांगी, माझ्या या आवडत्या ठिकाणी, जी व्यक्ती मला आवडते तिला माझ्या मनातील सगळ्यात आवडती गोष्ट सांगायला जात आहे.

त्याचे हे बोलणे ऐकून तिची धडधड खूप वाढली होती.

"शिवांगी, हा माझा पूर्ण जन्म मला तुला द्यायचा आहे. मला तूला माझी बनवायचे आहे.
कायमसाठी.
माझ्याबरोबर तुझे पूर्ण आयुष्य घालवशील का?

शिवांगी, माझ्याशी लग्न करशील?"

त्याच्या प्रत्येक शब्दाने मोहरलेली शिवांगी काही रिएकॅशन देण्याच्या पलीकडे गेली होती. तिने तिचे डोळे मिटले आणि त्याच्या हातांना घट्ट पकडून ठेवले.
दोन क्षण असेच गेल्यावर तिने डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली,

"अर्णव, मला तू बेहद्द आवडतोस. मी तुझ्या याच वाक्याची वाट पाहत मुंबई वरून चेन्नईला आले आहे.
मी तुझीच आहे. कायमस्वरूपी फक्त तुझीच आहे."

"मॅरी मी अर्णव"
असे म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली.

त्याच्या हृदयाचे ठोके त्याला ती ऐकत होती आणि तिच्या केसांचा सुगंध तो घेत होता.
काही न बोलता त्याच स्थितीत ते उभे होते.

"शिवांगी, मला या मंदिरात लग्न करायचे आहे"
"टू स्टेटस मधल्या अर्जुन कपूर आणि आलिया भट यांच्या प्रमाणे"
"ओहो, तेच हे लोकेशन तू ओळखलेस तर"
"म्हणजे काय, रात्री नेटफ्लिक्स पाहत असते मी"
"ते फिल्म प्रमाणे नाही, पण मला कुठलाही बडेजाव नकोय. मोजक्या लोकांसोबत, साध्या पण विधीयुक्त पद्धतीने मला लग्न करायचे आहे."

"अगदी माझ्या मनातले बोललास अर्णव. मला सुद्धा 'बिग फॅट इंडियन वेडिंग' नकोय. आपण इथेच लग्न करूयात"

"आपल्या घरच्यांना बरेच समजावे लागेल आणि ते मानतील असेही नाही बरं का"

"आपण करूयात ते अर्णव. नक्की करूयात" असे म्हणत तिने त्याचा हात घट्ट पकडला.

"या समुद्र आणि देवाच्या साक्षीने मी तुला एक गोष्ट सांगू शिवांगी?"

"हो..सांग ना"

"तू मला पूर्णपणे समजून घेतेस आणि हीच तुझी क्वालिटी पुढे जाऊन माझी शक्ती बनेल"

त्याच्या या बोलण्यावर तिने त्याला खूप गोड स्माईल दिली.

"मी काय म्हणतो शिवांगी?"

"काय?"

"आपण स्वामी आणि नुरी यांना इथे बोलावून घेऊयात का?"

"का रे?"

"लग्नाला दोन साक्षीदार लागतात ना! आत्ताच उरकून टाकूयात लग्न!"

त्याच्या डोक्यातील खट्याळ भाव पाहून तिला तो मजा करत आहे हे कळले आणि तेवढ्याच लटक्या रागाने ती त्याला पकडायला धावली.
ती पकडायला येत आहे पाहून तो जोरात पळायला लागला.
तो पुढे आणि ती मागे असे त्या दोघांचे चालु होते.

एका भावी वर आणि वधूचा हा प्रेमळ खेळ पाहून मंदिरातील देव पण स्मितहास्य करत होता.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all