स्टेटस:- भाग 6

Chennai Dairies of Arnav and Shivangi continued

स्टेटस:- भाग 6

सकाळी तिला बरीच उशिरा जाग आली. पाहते तर नुरी अजूनही झोपलेली. तिचे अंग थोडेसे गरम वाटत होते. तिने नुरीला उठवले आणि विचारले काही त्रास होत आहे का?
ती गुंगीत असल्यासारखे नाही म्हणाली. तिने घड्याळात पाहिले तर 9 वाजले होते.
हॉटेल रिसेप्शन ला फोन करून तिने 'डॉक्टर ऑन कॉल' मागवला. काहीच वेळात एक लेडी डॉक्टर तिथे पोचली.
तिने चेक करून सांगितले की थोडा ताप आहे. एक इंजेक्शन आणि जवळच्या काही गोळ्या तिने दिल्या.
तिला भरपूर पाणी प्यायला द्यायला सांगितले.

डॉक्टर गेल्यावर तिने फोन चेक केला तर दादाचा सकाळी फोन येऊन गेला होता.
तिने लगेच त्याला फोन लावला. पहिल्या रिंगलाच फोन उचलला गेला.
"गुड मॉर्निंग दादा"
"गुड मॉर्निंग बच्चा, कशी आहेस तू? काल दिवसभरात बोलली नाहीस एकदा सुद्धा"
"सो सॉरी दादा, काल खूपच बिझी गेला दिवस"
"इट्स ओके...मि. स्वामी ने जागा दाखवल्या का?"
"दादा, सकाळी सकाळी कामाचे विषय नको ना!आल्यावर सांगते ना तुला" ती लाडे लाडे म्हणाली.
दादा त्यावर हसला आणि म्हणाला, "ओके, फक्त नीट आहेस हे कळवत राहा"
"येस दादा, लव यु!  बाय" असे म्हणून तिने फोन ठेवला.

दार उघडून तिने समोरच्या स्वीट कडे नजर टाकली तर तिथे ऑलरेडी DND चा लाईट झळकत होता.
आता अर्णव ला फोन करता येणार नव्हता हे तिच्या लक्षात आले.
तिने मि. स्वामी ना फोन लावला.
"गुड मॉर्निंग मॅडम"
"गुड मॉर्निंग मि. स्वामी. कॅन यु प्लिज कम डाउन टू हॉटेल  चोला"
"येस मॅडम, इन नेक्स्ट हाल्फ अन अवर"
"ओके, प्लिज वेट फॉर मी इन लॉबी. आय विल बी देअर"
तिने फोन ठेऊन पटकन आवरायला घेतले आणि पुढच्या अर्ध्या तासात ती तयार झाली.
नुरी ला झोप लागली होती. तिच्या शेजारी  हॉटेल मधल्या नोट पॅड वर तिने मोठ्या अक्षरात "मी खालती लॉबी रेस्टॉरंट मध्ये आहे, काही लागले तर फोन कर" असे लिहून ती बाहेर पडली.

समोर DND लाईट दिसतच होता.
खालती आली तर एक बारीक, उंच आणि प्युअर मद्रासी दिसणारा एक माणूस हातात डायरी आणि पेन घेऊन तिच्यापाशी आला.
"मॅडम, मी स्वामी"
तिने स्माईल केले आणि म्हणाली "आपण रेस्टॉरंट मध्ये बसूयात."
त्याने मान डोलावली.
काल अर्णव बरोबर 'मद्रास पॅविलियनच्या' ज्या टेबलावर तिने लंच घेतला त्याच तिथे जाऊन अर्णव बसलेल्याच खुर्चीवर ती बसली.
कडक डोसा आणि कॉफी तिने ऑर्डर केली तर स्वामीने इडली सांगितली.

स्वामीचे पूर्ण नाव T रंगनाथ स्वामी असे होते. चेन्नई मध्ये मोठा झालेला हा चेन्नईचा कोपरा कोपरा जाणत होता. बिझनेस एक्सपांशन साठी किती जागा कुठे घेतली तर चांगले राहील हे तो खाता खाता बोलत होता. माणूस व्यवस्थित होता पण शिवांगी त्याच्या कंपनी मध्ये कंटाळायला लागली होती.

तेवढ्यात बोलता बोलता तो एक्स्क्यूज मी म्हणून उठला आणि बाजूने चाललेल्या माणसाला " हॅलो गुड मॉर्निंग सर, व्हेरी ग्लाड टू सी यु हियर" असे कोणाला तरी म्हणाला.
तिने मान वळवून पाहिले तर तो अर्णव होता.
त्याला पाहून तिचा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला.
स्वामी त्याच्याशी बोलत होता आणि ती त्याच्याकडे पाहत होती.
वेल टेलर्ड सूट, पॉलिश केलेले बुट्स आणि क्लीन शेव केलेला तो तिला त्या क्षणी जगातील सर्वात हँडसम व्यक्ती वाटत होता.
त्याच्या बरोबर 4 ते 5 जण होते आणि ते सगळे त्याचे बोलणे व्हायची वाट पाहत होते.
अर्णव चे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो अलगद हसला.
पुढे जाऊन ते समोरच्या एका टेबलावर बसले. अर्णव ने अशी खुर्ची पकडली की त्याला बरोबर शिवांगी दिसावी आणि शिवांगीला तर फक्त  तो आणि तोच दिसत होता.

स्वामी परत खुर्चीवर येऊन बसला. "ही इज मि. अर्णव सिंघानीया. व्हेरी गुड मॅन. मोठा बिझनेसमन आहे. चेन्नई आणि होल साऊथ इंडिया सगळीकडे यांनी आपला बिझनेस स्प्रेड केला आहे. खूप क्रिएटीव्ह आणि स्टील डाऊन टू अर्थ आहे." त्याचे अर्णव बद्दल बोलणे ऐकून तिला मनापासून आनंद झाला.
स्वामी पुढे मेन जागा, हेड लोकेशन, डिस्ट्रिब्युटर्स असे बोलत होता आणि ती फक्त मान डोलवत होती.
तिचे पूर्ण लक्ष अर्णव कडे होते.

तिची आणि अर्णव ची नजरानजर खूप वेळा होत होती आणि ती झाली की ती हळूच हसायची.
अर्णव चे पण बरेच वेळा लक्ष तिच्याकडे जायचे. खरंतर शिवांगी ने कानात डायमंड घातला होता. हॉटेल च्या लाईट्स इफेक्ट्स ने तिने मान डोलावली की तो डायमंड चमकायचा आणि अर्णव चे लक्ष त्या डायमंड कडे जायचे.
त्याच वेळेस त्याने हातात घातलेले घड्याळ सुदधा छान चमकायचे आणि शिवांगीचे लक्ष तिकडे जायचे.
त्या दोघांनाही हे माहिती नव्हते की आपल्या या ऍक्शन ची रिऍक्शन समोरून येत आहे. पण दोघेही ते एकमेकांना बघणे एन्जॉय करत होते.

बहुतेक अर्णव चा ब्रेकफास्ट राहिला होता त्याने पण इडली आणि कॉफी मागवली होती.
त्याच्या टेबलावर इडली पाहून तिने पण इडली आणि कॉफीची ऑर्डर दिली. स्वामी नाही नाही म्हणत असतानाही  तिने बळजबरीने त्याला मैसूर डोसा घ्यायला लावला.
जवळजवळ तास भर त्यांचा हा 'पाहण्याचा' कार्यक्रम चालू होता. इकडे स्वामी ची बडबड सुरू होती.
तेवढ्यात तिचा फोन वाजला. नुरी चा फोन होता. तिला आता बरेच ठीक वाटत होते. शिवांगीने तिला खालती रेस्टॉरंट मध्ये बोलावले.

नुरी खाली आली पण ती फार थकलेली वाटत होती, शिवांगी ने चेक केले तर अंग अजूनही जर कोमट होते.  तिने नुरी ची मि. स्वामी सोबत ओळख करून दिली.

" नुरी तुला औषध घ्यायची आहेत त्यामुळे हलगर्जीपणा चालणार नाही" असे म्हणत  तिने  नुरीला इडली सांबार, एक कडक डोसा आणि आले घातलेला चहा असे थोडे बळेच खायला लावले.

या दरम्यान अर्णव मीटिंग मध्ये असलेल्या लोकांसोबत चर्चा करत बाहेर जायला निघाला तशी ती थोडी खट्टू झाली.  त्याला ते जाणवले आणि त्याने हलकेच डोळ्याने खुणावले की येतो लवकर असे.

नुरीचे खाणेपिणे आटोपले तशी ती स्वामी ला नंतर भेटते असे सांगून तिला स्वीट कडे घेऊन निघाली पण मन मात्र अर्णव भोवती रेंगाळत होते.
तिच्या हालचालींवरून नुरी सगळेच समजली होती पण तिला शिवांगी कडून ऐकायचे होते.

जेमतेम अर्धा तास झाला असेल तर स्वीटची बेल वाजली. तिने जाऊन दार उघडले तर समोर अर्णव हसत उभा होता.
त्याला पाहिल्यावर हिची एकदम कळी खुलली आणि एक्ससाईट होऊन तिथेच उभी राहिली.
दारातच अर्णव तिच्याकडे आणि ती त्याच्याकडे बघत उभे होते.
दार उघडायला गेलेली शिवांगी परत का आली नाही हे बघायला नुरी दरवाज्या पाशी गेली.
तिथे हे दोघे तसेच उभे राहिलेले पाहून तिने मागून जाऊन 
शिवांगीला हलकेच धक्का दिला.
ती पूर्णतः बेसावध होती त्यामुळे धक्क्याने तिला एकदम समोर पडायला झाले. ती पडणार तेवढ्यात तिला कमरेतून हाताचा आधार देऊन अर्णवने सहज पकडले.  पडलेल्या धक्क्याने सावध होत तिने हलकेच पाहिले तर ती अर्णव च्या मिठीत होती.
दोघे  एकमेकांच्या डोळ्यात पूर्णपणे हरवलेले  असताना पाहण्यात नुरी ने "कोण आहे ग शिवांगी?" असे मुद्दामून विचारले तशी त्यांची तंद्री भंगली आणि ते ओशाळून बाजूला झाले पण गालावरील  खट्याळभाव काही लपत नव्हते.
"अर्णव आमच्या स्वीट मध्ये यायचे नाही का तुला?" नुरी ने विचारले.
"येतो येतो" तो हसत म्हणाला.

आतल्या सोफ्यावर तो बसल्यावर त्याने विचारले,
"नुरी काय झाले ग तुला?"
"अरे कालची दगदग भोवली बहुदा, सवय नाही ना. त्यातून आपण रात्री समुद्रात भिजलो ना"
"अच्छा म्हणजे समुद्र बाधला का तुला?"
"प्रत्येकाला थोडीच चेन्नई लाभते" ती शिवांगी कडे हसत हसत म्हणाली.
शिवांगीने तिला डोळ्यांनी दटावले तशी ती अजून हसली.

"औषध घेतले का?आणि आराम कर छान." त्याने सांगितले.
"हो ते तर करेनच!  पण जे होते ते चांगल्यासाठी ना!" मुद्दाम शिवांगी कडे डोळा मारत बघत ती म्हणाली तशी शिवांगी ने आपले डोळे मोठे करून तिला गप्प केले.

त्यांची ही नजरानजर अर्णव एन्जॉय करत होता.
"शिवांगी तू कशाला थांबतेस इथे? अर्णव जा हिला घेऊन तशीही ही मला बोर करते आहे" असे म्हणत हसायला लागली.
"मी बोर करते आहे का?" लटक्या रागाने तिने विचारले. आणि तिला जवळच्या उशीने मारायला लागली.

त्यांचे हे चालू असतानाच अर्णव ने विचारले "मी फ्री झालो आहे, शिवांगी जायचे का? आज चेन्नई एक्सप्लोर करुयात!"
एकदम उत्साहात शिवांगी लहान मुलीसारखी उडी मारून उभी राहिली "हो चल जाऊ यात!"

"10 मिनिटे दे, मी चेंज करून येतो. नुरी काळजी घे " असे म्हणत तो त्याच्या स्वीट कडे गेला.

नुरी ने नजर वळवून पाहिले तर एव्हाना शिवांगी ड्रेस निवडत होती, पुढच्या10 मिनिटात तिने स्वतःचे छान आवरले आणि ती नुरी बाजूला येऊन बसली. नुरी फक्त गालातल्या गालात हसत होती.
मोजून 11 व्या मिनिटाला बेल वाजली.

दार उघडले तर शिवांगी बघतच राहिली! 
फुल्ल कॅज्युअल लूक!
प्लेन व्हाईट ती शर्ट, लिवाईस ची ब्लु जीन्स.  व्हाईट ब्ल्यू कॉम्बिनेशन चे नाईकी चे शूज आणि  त्यात तो आल्यावर येणारा एका उत्तम परफ्यूम घमघमाट!
शिवांगी पण काही कमी नव्हती. तिने पण रेड कलरचा स्लीवलेस टॉप त्यावर डेंनीमचे जॅकेट आणि तशीच ब्लु जीन घातली होती.
दोघेही अगदी आयडियल कपल वाटत होते.
नुरी ला बाय करून ते दोघे खाली आले तर मस्त पांढरी रेंज रोव्हर उभी होती.
त्याने स्वतः ड्राइविंग चा ताबा घेत गाडी रोडवर घेतली.

ती डोळ्यांची पापणी न लवता त्याला न्याहाळत होती त्याला हे जाणवत होते त्याची पण नजर मधून मधून तिला बघत होतीच.
एकमेकांबद्दल प्रचंड ओढ त्यांना जाणवत होती, त्याचा अचानक झालेला हलकासा स्पर्श सुद्धा तिला मोहरून टाकत होता.
हॉटेल चोला मधून गाडी निघाली. अर्णव अश्या पध्दतीने गाडी चालवत होता जसे चेन्नई मधील प्रत्येक रोड त्याला माहिती आहे.  अण्णा सलई मधील काही प्रोमीनंट लोकेशन्स त्यानी तिला दाखवले.
टी नगर, एगमोर आणि अण्णा नगर मधील काही महत्वाच्या गोष्टींची माहिती तो तिला गाडीतूनच देत होता.
त्याच्या बोलण्यातून त्याचा प्रोफेशनॅलिसम दिसत होता.
त्याचे प्रत्येक वाक्य असे होते की मि. स्वामी ने तिला काय सांगितले होते ते ती पूर्णपणे विसरून गेली होती.

आता जवळपास 5 वाजले होते. आता त्याने लांब शहराबाहेर गाडी नेली आणि एके ठिकाणी गाडी पार्क केली.
तिला म्हणाला " तुला सोनेरी किनारा बघायला आवडेल का?".
तिला काही कळले नाही पण त्याच्या सोबत वावरताना ती खूप आनंदून, उत्साहात होती त्यामुळे तिने लगेच हो म्हणून मान डोलावली.
त्याने तिला आत मध्ये नेले तर त्याच्या गेट वर नाव होते " Goldan Beach".
ती आणि तो आत आले, समोर बरीच लोक होती. लहान मुले त्यांच्यासाठीच्या विविध मनोरंजक उपक्रमात गर्क होती.
आत एके ठिकाणी खूप गर्दी वाटली म्हणून पाहिले तर कुठल्यातरी तामिळ पिक्चर चे शूटिंग सुरू होते आणि तिथे तिथला फेमस सुपर स्टार 'सुर्या' शूटिंग करत होता. त्यामुळे त्याला पाहायला भरपूर गर्दी होती.

आणखी पुढे गेले तसं वातावरण बदलले.
हवेची झुळूक येऊ लागली आणि नजरेस पडला तो नावाला सार्थक करणारा गोल्डन किनारा!
ती खूपच आनंदाने समोर पाहत होती.
आज ते पाणी खूप काही बोलत होते. शब्द जणू गौण होऊन त्यांच्यात फुलणारे प्रेम हे ते पाणी एकमेकांना जाणवून देत होते.

"अर्णव, आज मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोहक अशी संध्याकाळ जाणवते आहे."
"का ग?" त्याने मुद्दाम विचारले.
तसे त्याच्या नजरेला नजर देत ती म्हणाली " तुला खरंच माहिती नाही आहे का ते?"
ती लाजून फक्त त्याच्याकडे बघत होती.

त्याने तिच्या हाताला अलगद धरले. तो हात घट्ट पणे पकडला.
त्यावेळेस तिच्या हृदयाची धड धड इतकी प्रचंड वाढली होती की वर सुद्धा बघू शकत नव्हती.
"शिवांगी!"
"....."
"या सोनेरी संध्याकाळी, सोनेरी बीच वर तू एक सोनपरी सारखी दिसत आहेस"
त्याच्या या बोलण्यावर ती खूपच लाजली.
"हे पाणी, हे आकाश, हा सूर्य सगळेच छान आहे आणि त्याही पेक्षा तेजस्वी आहे तुझा चेहरा"
शिवांगी पूर्णपणे निःशब्द झाली होती.
"आज मला पहिल्यांदा वाटत आहे की मी लग्न करावे"
त्याच्या या बोलण्याने तिने त्याच्याकडे बघितले.
त्याला तिच्या डोळ्यात अनेक सुंदर छटा भासत होत्या.

"शिवांगी, तू चेन्नईला येऊन मला जे सरप्राईज दिले त्या साठी मी तुझा कायम ऋणी राहीन. नाहीतर मला कधीच कळले नसते की मला काय हवे आहे ते"
त्याच्या प्रत्येक शब्दाला कानात साठवत ती ते क्षण अनुभवत होती.

त्या सूर्यास्ताच्या वेळी तिच्या केसांवर पडलेला लख्ख प्रकाश आणि त्याच्या चेहऱ्यावर उतरणारे स्पष्ट प्रतिबिंब एकमेकांना त्यांच्या सोनेरी क्षणांची साक्ष देत होते.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all