स्टेटस भाग 4

Shivaji reached to chennai to surprise Arnav

स्टेटस:- भाग 4 "सरप्राईज!" मिश्किल हसत ती म्हणाली. स्वतःवर, डोळ्यावर विश्वास बसत नसलेला तो अजूनही आ वासून बघत होता. "ए हॅलो! भूत बघितल्या सारखे काय बघत आहेस मला?" त्याला हलकासा धक्का देत ती म्हणाली. "ओ येस! पण तू इथे? I mean, इथे कशी? कधी?" "हाहा हा हा" ती फक्त छान हसली... तो अजूनही ब्लँक होता... "तू म्हणालास ना की तू चेन्नई मध्ये बिझी आहेस 3 दिवस. मग मी पण माझे चेन्नई चे काम प्लॅन केले." आतापर्यंत अनभिज्ञ असलेली नुरी जी लांबून फक्त बघत होती आता कुठे तिची ट्यूब पेटली. तिने फक्त एक लूक दिला शिवांगी ला आणि तिथून मुद्दामुन तिला धक्का देऊन निघून गेली. ते बघून शिवांगी मोठमोठ्याने हसायला लागली. "कोण आहे ती मुलगी? का धक्का दिला तुला?" न कळलेला तो तिला विचारत होता. "अरे ती माझी मैत्रीण नुरी! तिला काही न सांगता मी इथे घेऊन आले म्हणून ती रिऍक्ट झाली. डोन्ट वरी." "अग हो पण तू इथे कशी काय?" "वो लंबी कहानि है | आपको बाद मे बताउंगी| लंच झाले का?" "थोडेसे खाणे मीटिंग मध्ये झाले पण पूर्ण नाही झाले..." "चल मग! नुरी शी तुझी ओळख करून देते. तिच्या बरोबर स्वीट पाशी जात असताना त्याने त्याच्या लोकांना आणि सिक्युरिटीला कॉन्टॅक्ट करुन जेवण करून घ्यायला सांगितले. ती की कार्ड लावून स्वीट च्या आत शिरली तर तो स्वीट च्या बाहेरच थांबला आत काही येईना. ते पाहून तिने नुरी ला बाहेरच बोलावले आणि तिघेही एकत्र 'मद्रास पॅविलियन नावाच्या रेस्टॉरंटला गेले. तिथले सगळेच लोक अर्णव ला ओळखत होते. त्यामुळे त्यांची एकदम शाही बडदास्त होती. "ही माझी मैत्रीण नुरी! आम्ही स्कुल पासून सोबत आहोत. माझी बेस्ट फ्रेंड!" "हाय नुरी!" तो म्हणाला. "नुरी हा अर्णव! अर्णव सिघानिया, माझा नवीन फ्रेंड!" शिवांगी म्हणाली. "हाय अर्णव! शिवांगी क्वचितच कोणी असेल जे या हँडसम हंक ला ओळखत नसेल. छान आहे तुझा नवीन फ्रेंड" तिने शिवांगी ला हळूच डोळा मारला पण ते अर्णव च्या नजरेतून सुटले नाही. त्याने काही दिसले नाही असे दाखवले "ग्रेट! म्हणजे तू याला ओळखतेस?" "अग पर्सनल असे नाही ग! पण 'अर्णव सिघानिया' काही छोटी हस्ती नाही की ज्याला कोणी असे ओळखत नाही. बिझनेस टायकून आहे हा! तुझ्या सोबत भेटले म्हणून अर्णव असे म्हणेन नाहीतर याला लोक सर म्हणूनच ओळखतात." तिच्या या बोलण्याने तो मात्र अवघडला. काय बोलावे न कळून त्याने मेनू कार्ड त्या दोघींकडे सरकावले. "गर्ल्स! काय ऑर्डर करायचे?" त्याने विचारले. "तुझा चॉईस छान आहे, तू जे घेशील तेच मला ऑर्डर कर! नुरी तुझे बोल?" "ओहो ! म्हणजे चॉईस पण माहीत झाला आहे तर मग मलाही तेच ऑर्डर कर. बघू दे मला ही चॉईस" तिला कोपराने मारत नुरी म्हणाली. अर्णव ने ऍवेकडो सूप, बेकड व्हेजिटेबल्स, स्पेशल दही वडा, स्टार्टर प्लॅटर्स, पनीर लाजवाब, गार्लिक नान, प्रॉन्स राईस आणि साऊथ इंडियन कॉफी छानसा मेनू ऑर्डर केला. तो मेनू पाहून त्या दोघी सॉलिड खुश झाल्या. त्याची टेस्ट जबरदस्त होती हे नक्कीच. त्या दोघींच्या काही कॉलेज आठवणी, त्यातील किस्से, गमती जमती, असे सांगत हसत बोलत त्यांचे लंच आटोपले. अर्णव नुरी शी सुदधा छान मोकळेपणाने बोलत होता आणि नुरी सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाली होती. त्या दोघांचे वागणे बोलणे चेहऱ्यावरील आनंद, उत्साह नुरी छान नोटीस करत होती. कुठेतरी पाणी मुरतंय तिला लगेच कळले होते. "सो मॅडम, तुमचे काय ठरले आहे? काय प्रयोजन आहे चेन्नईला येण्याचे?" अर्णव ने विचारले. "तुला कळले नाही!" डोळे मोठे करून नुरी चिडवत म्हणाली. तसं तिला फटकारात शिवांगी म्हणाली " अरे बिझनेस एक्सपांशन चा प्लॅन आहे त्यासाठी आले आहे. बघते काय ठरत आहे ते. तसे 3 दिवस आहेतच त्यामुळे काहीतरी प्लॅन होईल नक्की." "ग्रेट! भेटू मग संध्याकाळी. मला आता भेटायला काही लोक येणार आहेत त्यांच्या बरोबर एक मीटिंग आहे आता थोड्या वेळात" तो म्हणाला. "येस भेटुयात!" शिवांगी म्हणाली. त्याने बिलावर साईन केली आणि तो फोनवर बोलत रेस्टॉरंट मधून बाहेर पडला. त्या दोघी तिथेच रेंगाळल्या. "ओ माय गॉड! शिवांगी कसला आहे तो! सुपर हँडसम, वेल मॅनर्ड आणि पर्फेक्ट बिझिनेसमन...तू सिरीयस आहेस ना नक्की मी माझ्या बद्दल बोलू?" तिने खट्याळ पणे विचारले. तिला हलकासा फटका मारत शिवांगी म्हणाली, "या साठी आणले आहे का तुला इथे?" यावर दोघी मोठ्याने हसल्या. "काय प्लॅन आहे तुझा आता?" नुरी ने विचारले. "चल जरा वेळ झोप काढू. रात्री पण झोप झाली नाही आहे. नाहीतरी त्याची वाट पाहण्याशिवाय आता आपण काय करू शकतो. आपण पहिल्यांदा चेन्नईला येत आहोत. तिच्या हो मध्ये हो मिसळत दोघी स्वीट ला पोचल्या. स्वीट तसा बराच मोठा होता. नुरी आतमध्ये बेडवर झोपायला गेली तर शिवांगी ने सोफ्यावरच अंग टाकले आणि तिथेच झोपून गेली. किती वेळ झाला ते कळले नाही पण बऱ्याच वेळ स्वीटची बेल वाजत होती. नुरी आतून बाहेर आली तर शिवांगी प्रचंड गाढ झोपेत होती. तिने दरवाजा उघडला तर बाहेर एक सुटा बुटातील माणूस उभा होता. "गुड ईव्ह मॅडम" "गुड ईव्ह" "मॅडम, अर्णव सरांनी खालती गाडी ठेवली आहे तुम्हाला डायरेक्ट नुगंमबक्कम ला भेटतील" "कुठे भेटतील?" "नुगंमबक्कम...एग्मोर च्या आधी" "ओके" "गाडी नंबर 6543 ब्लु कलर मर्सिडीज S 630 खालती उभी आहे ती तुम्हाला तिथे घेऊन जाईल" तिने मान डोलावली आणि आत येऊन शिवांगीला उठवले. शिवांगी इतकी झोपेत होती की तिला काय नुरी काय बोलते आहे हे कळलेच नाही. शेवटी तिने अर्णव नाव दोनदा मोठ्याने घेतले तशी ती खाडकीनी जागी झाली. नुरीने निरोप सांगितला तशी तीची झोप पूर्ण उडाली. दोघी पटापट तयार व्हायला गेल्या. मोजून 20 मिनिटात दोघी एकदम फ्रेश, नवीन कपडे घालून तयार होत्या. स्वीट लॉक करून त्या लिफ्ट ने खालती आल्या. लॉबी मध्ये एक माणूस उभा होता. त्याने त्या दोघींना त्यांच्या मागे यायला सांगितले. बाहेर पोर्च मध्ये ब्लु कलर मर्सिडीज उभी होती तिचे दार उघडून त्या दोघींना आत बसवले. ड्रायव्हर ऑलरेडी कॅप घालून आतमध्ये बसून तयार होताच. त्या माणसाने ह्या दोघींना आत बसवल्यावर तो वळून निघून गेला आणि ड्रायव्हर ने एकदम स्मूथली गाडी हॉटेल बाहेर काढली. "किती झोपलो आपण नुरी" "बघ ना, कळलेच नाही" "अर्णव दिवसभर काम करत होता आणि आता पण आपल्याला भेटायला तिकडे तयार असेल आणि आपण बघ मस्त झोपा काढतोय" "तुझ्या दादाला कळेल की आपण काहीच काम नाही करत आहोत तेव्हा काय म्हणेल तो?" "नाही ग, असे नाही होणार. मी अर्णव ला विचारायचे ठरवले आहे की चेन्नईला कसा बिझिनेस प्लॅन आऊट करता येईल. तो बऱ्याच वेळेला येत असतो इथे" "हं... आता कुठे बोलावले आहे ग त्याने? " "इथली नावे तर मला पण नाही माहिती पण काहीतरी प्लॅन असेल त्याचा नक्की" "फोन करून विचार ना त्याला?" "नको... आपण चाललोच आहे तिथे ...कळेलच...उगाच मीटिंग मध्ये असेल तर डिस्टर्ब नको...जाऊदे..." "आठ वाजलेत शिवांगी...भूक पण लागली आहे" "त्याला भेटल्यावर तो नेईल तिथे आपण खाऊयात" त्यांचे हे बोलणे चालू असतानाच एके ठिकाणी गाडी ड्रायव्हर ने थांबवली. गाडीतूनच त्या दोघी बाहेर बघत असताना एकदम समोरून आवाज आला. "गुड एव्हीनिंग गर्ल्स" त्यांनी एकदम दचकून बघितले तर कॅप काढून ड्रायव्हरच्या रूपातील अर्णव त्यांच्याकडे पाहून हसत होता. "अर्णव तू?" तिने थक्क होत विचारले.. "का? सरप्राईज फक्त तू देऊ शकतेस का?" "नाही, म्हणजे हो, म्हणजे नाही" तिचा उडालेला गोंधळ पाहून तो हसायला लागला. नुरी लवकर सावरली पण ती पण सरप्राईज होती. "आशा आहे, या ड्रायव्हरने गाडी व्यवस्थित चालवली आहे" यावर सगळेच हसले. त्याने इंडिपेंडन्स पार्क च्या इथे गाडी पार्क केली. तिथून ते तिघेही अपोलो हॉस्पिटल च्या जवळ असलेल्या फेमस चाट स्पॉट ला आले. "शिवांगी तुला आठवते मी तुला म्हणालेलो की मला स्टेटस बाजूला ठेऊन काही गोष्टी करायला आवडतात, तेव्हा तू म्हणलेलीस की तुला सुद्धा तेच आवडते...मी तेच करायला चाललो आहे पण तुला आवडणार नसेल तर सांग, समोर ताज कोरोमंडल आहे तिथे आपण जाऊयात." "बिलकुल नाही अर्णव, तू जे करशील तेच मला करायला आवडेल आणि नुरी आणि माझी चॉईस सेम आजे त्यामुळे तिला पण काही वेगळे वाटणार नाही" "अबसोल्यूटली" नुरी म्हणाली. तो त्यादोघींना घेऊन तिथे पोचला...भरपूर गर्दी होती. त्याने एका माणसाकडे जाऊन तिखट पाणीपुरी ऑर्डर केली. ती गरमागरम रगडा वाली पाणीपुरी खाताना सगळ्यांना तिखट लागले आणि तोंड व भाजले पण ती मजा खूप वेगळी होती. "और दो, और दो " असे करत त्यांनी मस्त ताव पाणीपुरी वर मारला. शिवांगी खूप गोरी आणि नाजूक होती त्यामुळे तिचे नाक लगेच लाल झाले. रुमालाने पुसत ती ते खाणे एन्जॉय करत होती. ते झाल्यावर तो म्हणाला, "चला आता एका ठिकाणी." "कुठे" हा प्रश्न तिने विचारायचे नाही असे ठरवले होते. तिकडून चालत चालत ते मुरुगन इडली शॉप ला आले. एका सीट आऊट वर बसून त्याने 3 ईडली, डोसा आणि रस्सम भात अशी ऑर्डर केली. त्या दोघी फक्त पाहत होत्या. थोड्याच वेळात समोर 3 भल्या मोठ्या केळ्यांच्या पानावरती 2 इडल्या, 1 डोसा, 1 वडा , चार प्रकारच्या चटण्या, सांबार ,रस्सम आणि भात आला होता. "चमचा नसतो इथे हाताने खायचे असते" तो तया दोघींना म्हणाला. नंतर त्याने स्वतः हाताने भात फोडून त्यावर गरम रस्सम ओतले आणि मस्तपैकी भाताचे गोळे करून खायला लागला. त्याचे ते खाणे बघून त्या दोघींना हसायला आले पण तो हे करतोय तर आपणही हे करूयात असे करून त्यांनी पण हाताने ते खायला सुरुवात केली. तो भरलेला हात, त्यावरून घसरणारे रस्सम आणि सांबरचे ओघळ, ती अप्रतिम चव त्या दोघींचे दिलखुश झाले. मन आणि पोट एकावेळी भरण्याची किमया त्या अन्नात होती त्यामुळे ते खाऊन सगळेच तृप्त झाल्या. हात बेसिन ला धुवून त्याने बिल पे केले आणि तिथून एक रिक्षा बोलावली. "मरिना बीच" त्याने रिक्षावाल्याला सांगितले. या दोघी कधीच रिक्षात बसल्या नव्हत्या पण अर्णव ने त्यांना खूप सहजपणे कम्फर्टेबल केले. त्यांची रिक्षा 13 किमी असलेल्या मरिना बीच ला पोचली. जबरदस्त मोठा पसरलेला मरिना बीच आणि त्याच्या पुढे अंधारात समोर खळाळत असणारा समुद्र आज शिवांगीला तिच्याशी काही बोलत आहे असे वाटत होते. मुंबई च्या समुद्रापेक्षा काहीतरी वेगळेपण चेन्नईच्या समुद्रात तिला जाणवत होते. क्रमशः ©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all