स्टेटस भाग 3

Story of two individuals who are from tich families and keen to know each others

स्टेटस:- भाग 3

दादाच्या या बोलण्याने तिच्या दिवसभराच्या आनंदावर पाणी फिरवले. 'आयुष्य काय स्टेटस वर अवलंबून असते का? ह्या स्टेटस ला तर मी कंटाळले आहे. जावे का कुठेतरी लांब निघून? काही नको मला.' तिच्या मनात  असे बंडखोर विचार चालू होते.
तिच्या रूम मधील गॅलरीत तिने एक छोटी बाग तयार केली होती. तिथल्याच एका सीटआऊट वर ती बसली आणि अंधारात दिसणाऱ्या समुद्राकडे पहात राहिली.
त्या लाटांचा आवाज आणि तो अथांग पसरलेला समुद्र, त्यावरील वाहणारा वारा तिच्या मनातील विचारांना अजून आणि अजून वेगळी दिशा देत होता. 
आत्तापर्यंत तिला एकटे वाटल्यावर समुद्र हाच तिचा जिवाभावाचा साथी होता ज्याच्याशी ती तासनतास बोलत असे. पण आज समुद्राकडे पाहून सुद्धा तिचं मन भरत नव्हते.तिच्या विचारांना जाणणारा कोणी एक या मुंबईतच आहे असे तिचा आतला आवाज तिला आतून सांगत होते. 

"काय करावे आजपण त्याला फोन करावा का? एवढा उतावीळपणा ठीक नाही, आज समुद्राशीचच बोलावे!
शेवटी कंटाळून तिने वॉलमाउंट LED TV वर netflix ऑन केले आणि ट्रेंडिंग मुव्हीस कुठल्या हे सर्च करत होती.
ट्रेंडिंग मध्ये तिला कुठलाच बरा वाटलं नाही म्हणून तिने रिमोट वर 'जब वि मेट'असे टाइप केले आणि ते पाहत बसली. बघता बघता ती इतकी हरखून गेली की बाजूचा ठेवलेला मोबाईल हा सायलेंट वर असून फ्लॅश होत आहे हे पण तिला कळले नाही. 

शेवटी तिथेच तिला झोप लागली, बहुतेक दिवसभराचा थकवा सगळा तिला आलेला. रूम मध्ये ऑटोमॅटिक लाईट होते रात्री 11 वाजता सगळे लाईट बंद होऊन फक्त नाईट लॅम्प सुरू व्हायचा.
मध्यरात्री तिला जाग आली तेव्हा क्षणभर तिला कळलेच नाही की आपण काय करतोय आणि कुठे आहोत!
तिने हातातल्या 'फिटबीट' कडे बघितले तर 3 वाजले होते.  जस्ट मोबाईल हातात घेतला तर स्क्रीन वर 13 मिस कॉल! 2 दादा चे,3 वहिनीचे , 2 नुरीचे आणि 6  मिस कॉल्स अर्णव चे!

तिने जास्ती विचार न करता त्याच वेळेला अर्णव ला फोन लावला तर यावेळी तिसऱ्या रिंग ला फोन उचलल्या गेला.
" तू अजून जागा आहेस?" तिने चकित होऊन विचारले.
"नाही अर्धवट झोपेत आहे" तो जांभई देत म्हणाला.
त्याचे उत्तर ऐकून ती हसायला लागली, "अरे तुझे सहा मिस कॉल पाहिले आणि वाटले काय झाले म्हणून मी फोन केला".

" ओह येस!अग आज तू गाडी आणलीस ना, माझं व्हॅलेट आणि ipad तुझ्या गाडीतच राहिले आहे. 
मला सकाळी 9 वाजता मीटिंग साठी लागेल म्हणून तुला फोन करत होतो. तू सकाळी ड्रायव्हर बरोबर पाठवून देशील का?"

"हो नक्की देईन, त्यात काय विशेष!मला वाटले काहीतरी वेगळे असेल म्हणून तू फोन केला."
"वेगळे म्हणजे?"
"वेगळे म्हणजे आपण एकत्र घालवलेल्या दिवसाबद्दल काहीतरी असेल म्हणून!"
"ओह! आय सी"
"उद्या संध्याकाळी भेटशील? पोस्ट ऑफिस अव्हर्स?"
"नाही ग, पुढचे तीन दिवस मी चेन्नईला जातो आहे म्हणून तर सकाळी 9 ची मीटिंग करून 11 ला जुहू एरोड्रम ला पोचायचे आहे."
"तुझ्या चार्टर्ड फ्लाईट मध्ये जागा आहे का एक?"
"ऑलरेडी आम्ही 6 लोक आहोत. का ग?"
"काही नाही रे,जस्ट गंमत!"
"हम्म"
"चेन्नई ला कुठे उतरणार आहेस तू?"
"ग्रँड चोला!"
"ओके ! तुझ्याकडे बरोबर सकाळी 8 वाजता गाडी येईल. झोप आता मी आधीच तुझी झोपमोड केली आहे."
"येस गुड नाईट"
"गुड नाईट" म्हणून तिने फोन कट केला.

तिची बऱ्यापैकी झोप झाल्याने ती फ्रेश होती आणि आतातर झोप उडलीच होती. पाच मिनिटे ती तशीच विचारात झोपली होती आणि एकदम उठली. 
लगेचच खाली आली.  खाली तिकडच्या कोपऱ्यात मोठी रूम दादा आणि वहिनीची होती. तिने दरवाज्यावर हलकेच नॉक केले पण आतून काही आवाज आला नाही.
दोन मिनिटे वाट पाहून ती किचन मध्ये शिरली.

किचन मध्ये एक्सप्रेसो मशीन लावले होते ते प्रेस करून तिने हॉट कॉफी घेतली. 
पाचव्या नंबरच्या फ्रीज मध्ये तिला चीझ क्यूब मिळाले, त्यातले 2 चीझ क्यूब आणि कॉफी घेऊन ती बाहेर सोफ्यावर बसली.
घड्याळात आत्ता कुठे चार वाजत होते...
काहितरी प्लॅन करत ती तिथेच बसून राहिली.
घरातील नोकरांना पहाटे 5 वाजता जाग आली. ताईसाहेबांना तिथे बघून सगळे चकित झाले "काही हवे का"असे त्यांनी  विचारले.
रात्री जेवण झाले नव्हते त्यामुळे भूक तर लागली होतीच पण अंघोळ केल्याशिवाय कसे खायचे म्ह्णून तिने हलकेच मान हलवून "नाही" म्हटले.

आज सगळ्यांचे आवरून व्हायच्या आतच ती स्वतःचे आवरून खालती आली. दादा जसा रूम मधून बाहेर आला तसं त्याला गाठून म्हणाली " गुड मॉर्निंग दादा. काल तू मला कॉल केलेला होतास?"
"बच्चा तू रात्री न जेवता झोपलास, मी तुला जेवायला बोलावत होतो."
"हो ना, आता सॉलिड भूक लागली! चल ना ब्रेकफास्ट करू यात".

ऑम्लेटस, टोस्ट बटर, कॉर्न फ्लेक्स, कॉफी, फ्रेश फ्रुट, मफीन्स, बेक बीन्स असा भला मोठा ब्रेकफास्ट तिथे मांडला होता. 
ब्रेकफास्ट करताना गप्पा चालू होत्या तेवढ्यात ती म्हणाली " दादा आपल्या कंपनीचे एक एक्सटेन्शन चेन्नईला असावे असे तू मला दोन तीन वेळा म्हणालास ना?"
"हो अग खूप महत्त्वाची सिटी आहे ती! तिथे आपले एक तरी युनिट असावे"
"म्हणूनच मला वाटते आहे की मी चेन्नईला जाऊन यावे."
"एकदम अचानक?"
"हो नवीन संधी पण क्रिएट होईल आणि 2 दिवस मुंबई बाहेर पण जाईन!"
"अच्छा! मुंबई बाहेर जायचे आहे का आमच्या बच्चाला?"
"येस"
" कधी जायचे आहे मग?"
"आजच जाते!"
"अगं पण तिथे तुझ्या कोणी ओळखीचे नाही आहे, इतक्या शॉर्ट नोटिस वर तुला सगळे डिटेल्स कसे फाईंड आऊट होणार?"
"डोन्ट वरी दादा! मी नुरीला बरोबर घेऊन जाते आहे."
"ठीक आहे तुला तिथे मि.स्वामी भेटतील जे आपले जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांचा नंबर मी तुला देतो.
"ग्रेट"
" आणि तुझं ट्रॅव्हलिंग आणि राहायचे काय?"
"ते मी मॅनेज करेल! डोन्ट वरी"
"ओके. नीट जा, टेक केअर!"
त्याला हग करून आनंदात ती तिच्या रूम कडे पळाली.चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता आणि मन तर आधीच प्रवासाला निघाले होते.
तिने ड्रायव्हर ला सांगून अर्णव चे व्हॅलेट आणि Ipad दोन्ही बरोबर सकाळी 8 ला मिळेल या बेताने पोचवायची व्यवस्था केली.

मुंबईच्या 'विस्तारा' फ्लाईट ने चेन्नई च्या तिरुसूलाम इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती लॅंड केले आणि  बिझनेस क्लास मधून ती आणि नुरी बाहेर पडली.
मि. स्वामींनी Q7 पाठवली होती त्यात बसून ती डायरेक्ट ग्रँड चिला ला पोहचली. 

रिसेप्शन ला पोचून तिने अर्णव सिंघनिया ने चेक इन केले आहे का याची चौकशी केली.
समोरच्या लेडी ने येस असे उत्तर दिले. 
त्याच्या शेजारी किंवा समोरच स्वीट तिने मागितला तसे तिला देण्यात आल्यानंतर ती तिच्या स्वीट ला पोचली.

 बरोबर असलेल्या नुरीला आतापर्यत काय सुरू आहे हे काहीच कळत नव्हते. सकाळी शिवांगी चा फोन येतो काय, लगेच ती चेन्नई ला जायचे असे सांगते काय. दोन तासात तिच्या समोर शिवांगीची गाडी थांबते काय आणि दोघी आत्ता चेन्नईला पोचतात के!
 तिची उत्सुकता तशीच ताणून धरत शिवांगी ने अर्णव च्या स्वीट वर स्टेटस चेक केला तर त्यावर DND लिहिले होते.

DND चा स्टेटस नॉर्मल होईपर्यंत ती तिच्या स्वीट मध्ये वाट पाहत बसली. काही वेळाने स्वीट चे दार उघडले आणि त्यातून सुटाबुटातील 4 ते 5 लोक बाहेर पडले.
सोबत अर्णव पण होता.
अर्णव त्यांना सोडायला लिफ्ट च्या दारापर्यंत गेला. 
त्यांना बाय करुन तो मागे वळला तर त्याच्या समोर शिवांगी हसत उभी होती. 
तिला पाहून एक सेकंड काहीच न कळलेला तो दुसऱ्या क्षणाला एकदम म्हणाला " शिवांगी तू इथे?"

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all