स्टेटस भाग 1

A story between a boy and a girl of 2 rich families

स्टेटस:- भाग 1

आज अर्णव ला पाहायला शिवांगी येणार होती. अर्णव म्हणजे शहरातील प्रसिद्ध सिंघानिया ग्रुप यांचा मुलगा आणि शिवांगी म्हणजे तेवढीच तुल्यबळ असणारे बजाज ग्रुप यांची मुलगी. खरं तर हे दोन्ही घराणे एकत्र येणे हे बिझनेस च्या दृष्टीने, गुडविल च्या दृष्टीने सगळ्याच बाबतीत चांगले होणार होते.
पण का कुणास ठाऊक अर्णव चा लग्नावर फार असा काही जीव नव्हता आणि शिवांगी चा सुद्धा! 

अर्णव च्या घरातील शानदार हॉल मध्ये शिवांगी ची फॅमिली येऊन पोहचली. 
आलिशान गाड्यांमधून उतरलेली शिवांगी ची फॅमिली, प्रचंड सुंदर दिसणारी शिवांगी असे सगळे जण आतमध्ये आले. 
एका भल्या मोठ्या झुंबराखाली छानसा पांढऱ्या रंगाचा गोलाकार सोफा मांडला होता. 
त्या सोफ्यावर ती सगळी फॅमिली बसली. 
खूप उत्सुकपणे आणि शानदार असे त्यांचे स्वागत सिंघानिया फॅमिली ने केले. 
बजाज फॅमिली कडून 6 लोक आले होते आणि सिंघानीया फॅमिली कडून जवळपास 8 लोक घरात होते.

 शिवांगी बसली, त्या श्रीमंतीचे कोणालाच अप्रूप नव्हते कारण दोन्ही घराणे समान श्रीमंत होती. 
शिवांगी बसल्यावर तिच्याकडे थक्क होऊन सगळे बघत होती. इतकी सुंदर, इतकी गोरीपान, इतकी छान आणि नीटनेटकी आलेली ती सगळ्यांचे चित्त खेचून घेत होती. ती जर सिंघानिया फॅमिली ची सून झाली तर फारच छान होणार होते.

थोड्या वेळाने अर्णव खाली आला. छान ग्रे कलरचा सूट घातलेला अर्णव सुद्धा तितकाच छान दिसत होता. गोरापान रंग, चेहऱ्यावरअजिबात फॅट नाही, दिसणारी जॉ लाईन, त्याची ती कमावलेली बॉडी, ग्रीक शिल्पप्रमाणे कोरलेला चेहरा आणि त्यावर सालस असे भाव!
खाली आल्यावर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले  आणि स्माईल केले, दोघांनाही एकत्र बसण्यासाठी सांगितले तसे ते दोघेही गॅलरी मध्ये गेले.

तिथे पोचल्यावर संपूर्ण सभ्यतेने अर्णव शिवांगीशी बोलत होता. 10 मिनिटे बोलून झाल्यावर तो म्हणाला,
"शिवांगी खरं सांगायचं तर मला लग्न या विषयात अजिबात रुची नाही आहे."
ते ऐकल्यावर शिवांगी मनापासून खुश झाली आणि म्हणाली " अर्णव अगदी खरं सांगते मलाही लग्न करण्यात अजिबात ईच्छा नाही. पण हे घराणं, त्यांची प्रतिष्ठा यांचे बिझनेस या सगळ्यामुळे आज आपण भेटत आहोत."
"आपण काही दिवस मित्र म्हणून राहू यात का?पटलं तर बघू यात नंतर!" तो म्हणाला.
ती म्हणाली " चालेल काही हरकत नाही!"

थोड्यावेळाने तो दोघे एकत्र आले, सगळे जण त्यांच्याकडे अपेक्षेने बघत होती. शिवांगी ने जाहीर केलं,
" मी आणि अर्णव ने ठरवले आहे की काही दिवस आम्ही मित्र म्हणून राहू. जमलं तर ठीक आहे नाही तर नाही."
ते ऐकून सगळ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आले पण फॅमिली मोठ्या होत्या त्यामुळे कोणाला त्यात काही वावगं अस वाटलं नाही. 

तो दिवस निघून गेल्यावर काही दिवसाने शिवांगी च्या फोन वर अर्णव चा कॉल आला,
 "हाय! आज भेटायला जमेल का? मी ताज ला चाललो आहे. तुला वेळ असेल तर आपण भेटुयात ताज कॅफे ला!"
शिवांगी म्हणाली" मी बांद्रा ला आहे! तुला जमत असेल तर ये इकडे आपण गाडीतून जाता-जाता बोलू यात!"
अर्णव खरं तर फोर्ट ला होता, तिथून बांद्रा ला जाणे त्याला उलटे पडले असते पण तो काही बोलला नाही.
ड्रायव्हर ने गाडी काढली, तर तो म्हणाला "तू थांब इथेच, आज गाडी मी चालवतो."

ड्राईव्ह करत तो बांद्रा ला पोहचला.
बांद्रा ला एका मोठया बुटीक च्या उदघाटनासाठी शिवांगी आली होती. 
तो गाडीतून उतरला नाही आणि शांतपणे वाट पाहत बसला.
शिवांगी ने त्याला मेसेज केला " कुठे आहेस?"
" बाहेर वाट बघतो आहे" त्याने रिप्लाय केला.

ती धावतपळत बाहेर आली आणि तिने त्याच्या गाडीत एन्ट्री केली. दोघेही जण त्याच्या गाडीतून निघाले. 
दोघेही शांतच होते, बांद्रा रिक्लेमेशन वरून सी लिंकला कनेक्ट झाल्यावर तिने एकदा बाजूच्या समुद्राकडे पाहिले...
तिला समुद्राकडे पाहायला फार आवडायचे. तिच्या मलबार हिलच्या बंगल्यातून समुद्राकडे पाहणे हा तिचा आवडता छंद होता.
 त्याने  वरळी सी फेस वरून पुढे जाऊन यु टर्न घेऊन गाडी लोटस च्या इथुन वळवली आणि पुढे ऍनी बेझंट रोड ने पुढे निघाला. 
ती काहीच बोलत नव्हती जणू मुंबई पहिल्यांदा पहात होती असे तिचे भाव होते.
त्याची रेंज रोव्हर पुढे जात असताना तो सहजच थांबला आणि म्हणाला " ताज ला गेलेच पाहिजे का? इतकं हाय स्टाईल लाईफ जगलंच पाहिले का?"

ती म्हणाली " मला हे जगायचं नाही म्हणून तर मी हे लग्न करण्यासाठी वेळ घेतला!"
तिचे बोलणे ऐकून तो एकदम चपापला!
" म्हणजे?" 
" आता हेच बघ ना आपल्याला भेटवले तेच मुळी दोन व्यक्ती म्हणून नाही तर सगळ्या फॅमिली स्टेटस च्या अवडंबरसहित! 
सगळ्यांना बिझनेस स्टेटस पॉईंट ऑफ व्यू गोष्टी हव्यात.  तू आणि मी असे दोन वेगळे जीव या पेक्षा आयुष्यात असलेला स्टेटस सांभाळणे असे आयुष्य आपल्याला जगावे लागणार असे नाही का वाटले तुला? 
त्याही पलीकडे हे त्यांच्या प्रमाणे व्हावे! आपण तसे जगावे! ही अशी बंधन पाळावीत हे मला नाही रे जमणार."

तो शांतपणे ऐकत होता. जणू काही ती आरसा बनून त्याला वाचत होती आणि बोलत होती. 

" मला ना मी म्हणून जगायला आवडेल! साधं सिम्पल आयुष्य ज्यात भरपूर प्रेम आणि कोणतेही अवडंबर नाही" ती आपल्याच नादात बोलत होती.

तिचे विचार ऐकून तो प्रभावीत होत होता. तिला जाणून घ्यावे असे त्याला मनापासुन वाटत होते.

 ती शांतपणे बाहेर बघत होती तो म्हणाला  " खरोखर चे फेंड्स का?" मिश्किल हसत त्याने हात पुढे केला.
ती फक्त गोड हसली आणि त्याच्या हातात हात दिला.

ताज चा प्लॅन कॅन्सल करून भुलेश्वर च्या जवळ दोघे छानशा एक छोट्याश्या कॉफी शॉप ला थांबले.
दोघेही मस्त कॉफी प्यायले, थोड्याफार आवडीनिवडीबाबत आणि बाकी काही जनरल विषयांवर अशा भरपूर गप्पा झाल्या  आणि  ते निघाले.
 त्याने तिला तिच्या घरी ड्रॉप केले, पुन्हा भेटू म्हणून तो आपल्या मार्गाने निघाला.

आज दोघांनाही बरेच फ्री वाटत होते आणि कुठेतरी  नकळत काहीतरी धागा जोडल्या जात होता.
 रात्री झोपण्यापूर्वी सवयीप्रमाणे त्याने मोबाईल चेक केला तर ती ऑनलाइन दिसत होती. मेसेज करू का नको या विचारात तो असतानाच अचानक त्याच्याच मोबाईल वर तिचा मेसेज डिस्प्ले झाला.
"हाय!"
"हाय" त्याने रिप्लाय केला.
"झोपला नाहीस?"
"नाही, जस्ट थोडं काम होत ते संपवलं आता नेहमीप्रमाणे थोडं म्युझिक ऐकायचे मग झोपेन!"
"वॉव! तुला पण म्युझिक आवडते?" 
" हो म्हणजे काही जुनी गाणी आहेत पण मला आवडतात ती गाणी मी ऐकतो. 
दिवसभराचे विचार, व्याप यातून फ्री व्हायला गरजेचे असते आणि आवड पण आहेच" तो म्हणाला.
"कोणती गाणी रे?"
"काही किशोर कुमारची! काही रफी ची...
 90 च्या दशकातील काही...जे जसे वाटेल त्याप्रमाणे."
"ग्रेट! मला पण इंडियन म्युझिकच आवडते."
"छान."
"बरं तू एन्जॉय कर, मी झोपते सकाळी लवकर उठायची सवय आहे मला. गुड नाईट."
"गुड नाईट" तो ही म्हणाला आणि एक गोड स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली.

ती पण मनाशीच काहीतरी कळात असल्यासारखे अलगद हसत झोपायचा प्रयत्न करत होती पण आज झोप लागतच नव्ह्ती ! 
त्याच्यासोबत झालेल्या गप्पा, तो घालवलेला वेळ, तिला आठवत होता. 
पुन्हा मोबाईलला बघितले तर तो ऑनलाइन दिसला. मेसेज करू का परत हा विचार करता करता कधीतरी उशिरा ती झोपली.
 
एरवी दररोज सकाळी 5.30 ला उठणारी ती आज 7 वाजायला आले तरी रूम मधून बाहेर आली नाही म्हणून तिच्या दादाने डोअर नॉक केले आणि लॅच फिरवून दार उघडले तर ती शांतपणे झोपली होती.
तिचा छानसा गोड चेहरा आज जास्तीच तेजस्वी दिसत होता. 

तिचे गोड हसू बघून तोही हसला आणि तिच्या खोड्या काढायला म्हणून त्याने तिला मोबाईल ला रिंग दिली. 
जसे तिने डोळे उघडले तसे दादा ने "गुड मॉर्निंग" म्हणाला! समोर  दादा म्हणून ती दचकली आणि बघते तर बाहेर बरेच उजाडले होते. 

पटकन उठून बसत " गुड मॉर्निंग" म्हणाली तर 7 वाजलेले. 
असे कसे झाले हा प्रश्न तिला ही पडला आणि दादाच्या मिश्किल हसण्यात पण तिला दिसला. 
काही न बोलता "येतेच पटकन" म्हणत ती वॉश रूम ला शिरली.
तेवढ्यात तिच्या 'ऍपल' ला एक मेसेज नोटिफिकेशन आले.
दादा ने जस्ट लांबून पाहिले तर अर्णव चा "गुड मॉर्निंग" मेसेज दिसत होता.
ते बघून एका समाधानाने हसत तो रूम बाहेर गेला.

पटापट आवरून ती खाली आली, आता सगळे काहीतरी विचारणार हे तिला पक्के माहीत होते. काय बोलावे या विचारात ती डायनिंग टेबल ला आली तर आज सगळे तिच्याकडे काही गुन्हा झाला का की काय अश्या प्रकारे बघत होते.

"सॉरी काल ते जरा रात्री उशिरा पर्यंत वाचत होते त्यामुळे झोप लागली" ती म्हणाली.

दादा हसत म्हणाला" हो ना, लास्ट सीन 1. 51 मिनिटे असे दिसले मला".

काही न बोलता तिने ब्रेकफास्ट केला.
डायनिंग टेबलावर आज जरा शांतता जास्त भासली...
तेवढ्यात तिचा फोन वाजला.
" नुरी..10 मिनिटात तुला फोन करते म्हणून तिने फोन ठेवला...
 ब्रेकफास्ट झाल्यावर ती काम आहे असे म्हणत घराबाहेर पडली.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all