स्पाय

एका गृप्तहेराची थरारक कथा

शशक :ही शंभर शब्दात कथा लिहायचा एक कथा प्रकार आहे.त्यात लिहलेली माझी कथा पुनर्जन्म ह्या विषयावर आहे.


नीलय आणि अनय दोघे तंतोतंत दिसणारे जुळे भाऊ. दोघेही हुशार आणि धाडशी स्वभावाचे होते.

अनयला रॉ ऑफिसर म्हणुन नोकरी लागली आणि अनय आपल्या खास मिशनसाठी घरापासुन दुर निघुन गेला. ह्याची माहीती फक्त नीलयलाच होती.

अचानक नीलयला अनयच्या सिनियर लोकांनी बोलावून घेतलं. नीलय तिकडे पोहचल्यावर त्याला अनयची डेडबॉडी दिसली. त्यांनी सांगितलं, नीलयने अनयची जागा घेऊन मिशन पुर्ण करावं अशी अनयची शेवटची इच्छा होती कारण अनयच्या अचानक गायब होण्याने मिशनमधील बाकी लोकांवरतीही संकट येणार होतं. 

नीलय भावाची डेडीबॉडी पाहुन दुखी झाला तरी अनयची इच्छा म्हणुन नीलयने अनयची जागा घेतली आणि नीलय म्हणुन अनयचा मृतदेह त्यांच्या कुंटुंबाकडे पोहचवला गेला, अश्याप्रकारे ऩीलयचा अनय म्हणुन पुनर्जन्म झाला.