स्पर्शबंध १

मायेची ऊब



सौ. वैशाली मंठाळकर
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
विषय: सामाजिक
उपविषय: स्पर्शबंध
टीम सोलापूर..

"श्रेया येत आहेस ना." आर्यन वैतागत वॉच बघत म्हणाला.

"हो झालं.आई, माझी एक मीटिंग आहे. आज श्रेयानला सुट्टी आहे. मी दोन तीन तासात येईल." श्रेया तिची पर्स चेक करत म्हणाली.

"हो का? ठीक ये मी आश्रम मध्ये जाणार आहे.त्याला बरोबर घेऊन जाते. घरी जाताना श्रेयानला घेऊन जा."आर्यन ची आई नंदाताई म्हणाल्या.

"ओके,"श्रेया- आर्यन ऑफीसला निघून गेले.

आर्यन श्रेयाचा पाच वर्षाचा मुलगा श्रेयान, आर्यन चे  आई वडील आणि त्याची आजी ही त्यांची पूर्ण फॅमिली.

"आई आणि श्रेयान आश्रम मध्ये येतात.


"श्रेयान जास्त मस्ती घालू नकोस.आणि खेळताना सांभाळून खेळत जा."नंदाताई.

"ओ हो....आई मी लहान आहे का? मी मोठा झालो आहे." श्रेयान हसत म्हणाला.

श्रेया तिची मीटिंग संपवून आश्रम कडे निघाली.तिच लक्ष रस्त्याच्या कडेला गेले.एक बाई इकडे तिकडे बघत होती. श्रेया ची गाडी थोडी पुढे गेली.तिने मागे वळून बघितले तर तिने हातातलं बाळ खाली ठेवले आणि पळतच गाडीत जाऊन बसली.ती गाडी सुसाट वेगाने टर्न घेऊन निघून ही गेली.

"काका ss! गाडी थांबवा."श्रेया जोरातच ओरडली.

ड्रायव्हर ने जोरात ब्रेक दाबला. "का....काय झालं ?मॅडम!"

"काका , त्या गाडीचा पाठलाग करा."श्रेयाने बोलतच दार उघडले आणि पळतच बाळाच्या दिशेने गेली.नवजात बाळ होते.अजून डोळे ही उघडले नव्हते. श्रेयाच्या काळजात धस्स झाले.तिने पटकन त्या बाळाला उचलले आणि छातीशी कवटाळले. मन भरून आले. हृदयातील कळ डोळ्यातून बाहेर येऊ लागली.तिने बाळाला नीट कुशीत घेतले. दिसायला खूप गोड होते. दुधासारखा रंग, छोटे छोटे हात - पाय, छोटंसं कपाळ , इवलुस नाक , बदामी डोळे ,त्यावर पापण्यांची झालर खूप रेखीव गोंडस चेहरा होता.तिने थोड दुपटे बाजुला करुन मुलगा- मुलगी चेक केले. नाजुकशी बाहुली होती. तिचा कंठ दाटून आला.

"कसली लोक जगात आहेत, छोट्या बाळाला रस्त्याच्या कडेला सोडून जातात."श्रेया मनातच म्हणाली.

"मॅडम, गाडी खूप फास्ट होती.कुठे गेली कळले नाही." ड्रायव्हर पुन्हा जवळ जवळ येत म्हणाला.

"आ...अम्.....आ.. आर्य... नला कॉल करा." श्रेया हुंदका आवरत अडखळत बोलू लागली. तिला घाबरून काहीच सुचत नव्हते.

ड्रायव्हर ने कॉल केला पण आर्यनचा मोबाईल स्विच ऑफ लागत होती.


"सरांचा कॉल लागत नाहीये." ड्रायव्हर.म्हणाला.

"ह... कसं काय?"तिने डोळे पुसले.आणि गाडी जवळ आली तिचा मोबाईल घेऊन कॉल करू लागली.

बाळ आळुखे पिळुखे देत ओठ काढू लागले.तिने पटकन मोबाईल ठेवला.आणि बाळाला शांत करू लागली. बाळाला भूक लागली होती.म्हणून ते अजूनच जोरात रडू लागले.

"मॅडम, आश्रम असल्याने बाळाला इथे सोडून गेले." ड्रायव्हर पुढे आश्रम कडे बघत म्हणाला.

श्रेयाच्या आता लक्षात आले. ती बाळाला घेऊन आश्रम मध्ये आली.

"आई ss!  आई s..."  श्रेया नंदा ताई कडे जात बाळाला दाखवू लागली.

नंदाताई शॉक होऊन बघू लागल्या. त्यांच्या बरोबर आश्रम चा स्टाफ ही श्रेया कडे बघू लागला.एका बाईने श्रेया कडून बाळाला घेतले आणि शांत करू लागली.दुसरी बाई बाळाला दुध आणायला गेली.

"आई,कोणी तरी बेबीला बाहेर रस्त्यावर ठेवून गेले." श्रेया रडतच झालेला प्रकार सांगू लागली.

" दगडाच काळीज असलेली लोक ह्या जगात आहेत म्हणून तर आश्रम आहे." नंदाताई तिला जवळ घेत् बोलू लागल्या.

"आई, तिला ह्या जगात येऊन थोडा वेळच झाला आहे." श्रेया  रडत म्हणाली.

"हो, ग...रडू नकोस. धर पाणी पी." नंदाताई

"ह..." श्रेयाने पाणी पिले.तिच लक्ष सगळ अजूनही बाळावरच होते.तिने असा प्रकार ऐकला होता.पण कधी अनुभवला नव्हता.आणि आज अनुभवला तर तिला त्रास होत होता.पूर्ण अंग थरथरत होते.

बाळ थोड दूध पित ओठ काढत पुन्हा दूध पित होते. श्रेया जवळ गेली.

"इकडे द्या...." श्रेयाने बॉटल हातात घेत बाळाला कुशीत घेतल आणी हळू हळू दूध पिऊ घालू लागली. मायेचा स्पर्श लगेच बाळ ओळखू लागले. तिचा ड्रेस इवलुश्या हातात पकडत हळू हळू डोळे उघडून तिच्या कडे बघू लागले.तिचा चेहरा खुलला तिने त्याच्या डोक्यावर ओठ टेकवत अजून कुशीत घेतें.

"आई....आई..... !!श्रेयान हाक मारत येतो.सगळे श्रेयान कडे बघू लागले.

श्रेयाच्या हातात बाळ बघुन तो एक्साईट होतच पुढे जातो.


"मम्मा s.... बेबी ..." तो मोठयाने बोलला. बाळ लगेच दचकून श्रेयाला बिलगून ओठ काढू लागले.तिने पटकन हात हलवत शांत केले.

"शु शू ss....." श्रेया त्याला डोळ्याने हळू बोल म्हणते.तो लगेच तोंडावर हात ठेवून खुदुखुदू हसू लागला.

"आई,बेबी आहे ... छोट...." श्रेयान हसत नंदा ताईला बिगलतो.

"हम..." नंदा ताई श्रेयानला एका हाताने जवळ घेतात.नजर मात्र श्रेया वर होती. काही वेळातच खूप लगाव लागला होता.

"आई, डॅडा आज लवकर येणार आहे.चल ना."श्रेयान हात ओढत म्हणाला.

"ह... हो..जाऊ,तू गाडीत बस." नंदाताई

"ओके.मम्मा मी बाहेर आहे." श्रेयान बोलून पळतच बाहेर जातो.


"मालती , डॉक्टरला बोलावून बाळाचं चेक अप करून घ्या आणि नीट लक्ष द्या ." नंदा ताई बोलून श्रेया कडे वळल्या.

"श्रेया बाळाला मालती कडे दे.उशीर झाला निघायला हवे."नंदा ताई तिचं लक्ष नाही म्हणून तिच्या खांदयावर हात ठेवत म्हणाल्या.

श्रेयाचा चेहरा उतरला होता.बाळाला सोडून जायची बिलकुल इच्छा नव्हती.

"मॅडम"मालती ने हात पुढे केला.

"ह.. हम..."तिने बाळाला मालती कडे दिले.बाळाने घट्ट तिचा कोट पकडला होता.तिच्या नाजूक हाताची पकड बघून श्रेयाच्या जीवाची घालमेल होऊ लागली.कसली आई असेल. एवढया नाजूक परीला एवढ्या मोठ्या जगात एकट टाकून निघून गेली. जीव कसा तयार झाला असेल.तिच्या डोळ्यातून पाणी येतच होते.

तिने हळूच बाळाच्या चेहऱ्यावर फुंकर मारली.आणि बाळाची पकड सैल झाली. मालती बाळाला घेऊन जात होती. श्रेयाचा जीव वर खाली होऊ लागला.

"आ... आई ...ती लहान आहे आपण घरी घेऊन जाऊया का?"श्रेया श्वास न घेताच पटकन म्हणाली.

"श्रेया असच घरी घेऊन जाता येत नाही.जास्त काळजी करू नकोस.इथे सगळे नीट काळजी घेतील. रडायचं बंद कर. श्रेयान घाबरून जाईल." नंदा ताई तिला समजावतात.

गाडीत पण बाळाचा चेहरा समोर येत होता.श्रेयान दिवसभर काय केले ते सांगत होता.तरी तिच्या कानात फक्त बाळाचा आवाज घुमत होता.


संध्याकाळ झाली होती. श्रेयाच मनच लागत नव्हते.

"मम्मा , डॅडला कॉल कर ना ..." श्रेयान चिड चिड करू लागला.तिच लक्षच नव्हते.


"मम्मा ss...."श्रेयान.

"काय ?पिलू s,"श्रेया वैतागून बघू लागली.

"मम्मा तुझं माझ्याकडे लक्ष नाहीये." तो गाल फुगवून बोलू लागला.

"पिलू s माझं डोकं दुखत आहे." ती बेडवर आडवी होत म्हणाली.

"मम्मा ,तुला बर नाही का?" श्रेयान तिच्या गळ्यावर हात ठेवत काळजीने म्हणाला.

"काय झाले? " मागून आर्यन जवळ येत म्हणाला.

"काही नाही रे. दिवसभर थोडी धावपळ झाल्याने थोड डोक जड वाटत आहे." श्रेया हलक हसून म्हणाली.

"ओह! रेस्ट कर.",तो बोलत फ्रेश होण्यासाठी निघून गेला.

श्रेयान पण आर्यन आला म्हणून व्हिडिओ गेमच्या तयारीत लागला.

"गोलूs ,इथे नको आपण खाली खेळू...."आर्यन टीशर्ट घालत श्रेयानकडे बघत म्हणाला.

"ओके ई!!..."श्रेयान खुश होतच सगळ घेऊन खाली जाऊ लागला.

"श्रेया खाली जाऊ.थोड फ्रेश वाटेल." तो तिचा हात धरत म्हणाला.

"हम"ती उठली आणि सगळे केस गोळा करत वर बांधले.

★★★

क्रमशः

🎭 Series Post

View all