Oct 29, 2020
स्पर्धा

थोडासा तडका - भाग ६ (अंतिम - संपूर्ण)

Read Later
थोडासा तडका - भाग ६ (अंतिम - संपूर्ण)

भाग - १ - थोडासा तडका - १
भाग - २ - थोडासा तडका - २
भाग - ३ - थोडासा तडका - ३
भाग - ४ - थोडासा तडका - ४
भाग - ५ - थोडासा तडका - ५

थोडासा तडका - भाग - (अंतिम-संपूर्ण)

दोघंही बाल्कनीमध्ये बसुन राहतात, साकेत बेल वाजवतो, अंकित हॉल मध्ये येतो.
साकेत - अरे अंकित आज घरी बसून काम चालु आहे का.
उर्वी - साकेत थोड बोलायचय आम्हाला, प्लीज बस इथे.
साकेत थोडा गोंधळतो.
उर्वी - मी खूप प्रयत्न केले आपल्या नात्यासाठी पण मला ते टिकवण आता शक्य नाही.
स्पष्टच बोलते, मी आणि अंकित...
म्हणजे, आय होप यू गॉट इट.
आपल्या यांत्रिक रिलेशन मधे तसही काही अर्थ राहिलाच नव्हता.
ती अंकितचा हात धरून निघते, दारातून त्याला वळुन बघते व कायमची पाठ फिरवते.

*****---****

साकेत उठ..
उठ ना साकेत ९ वाजलेत, ऑफिस नाही का..
एरवी तर अलार्म च्या आधी उठतो आज काय मशीन बिघडलंय तुझ..
आवर लवकर मीटिंग आहे न...
साकेतला काही सुचतच नाही काय चालु आहे तो पार घामाघूम झालेला असतो. 
उर्वी - काय झालं रे बर वाटत नाहीये का
साकेत - तु... तु.. इथे कशी, गेली नाही का..
उर्वी - मी कुठे जाणार होती, काय बोतोयस तू, स्वप्न बघितलं का..?
साकेत - नाही तो अंकित...
उर्वी - कोण तो तुझा काल आलेला मित्र का, त्याच काय...?
चालवलं का त्याने काल फार तुला पान खाल्ल्यावर?
साकेत भानावर येतो, ते सगळं स्वप्न होत तर अंकित कालच पहिल्यांदा येऊन गेला बस..
हुश श श ...
उर्वीचं आवरन चालू असते, साकेत तिचा हात धरुन बाजुला बसवतो व घट्ट मिठीत घेतो.
साकेत - तु मला कधी सोडुन नाही जाणार न ग प्लीज, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, सांग ना प्लीज
उर्वी - साकेत काय झालंय अचानक तुला, बायको आहे मी तुझी, प्रेम केलंय तुझ्यावर, अस का विचारत आहेस..?
साकेत - मझ वागणं नाही आवडत न तुला हल्ली.
उर्वी - म्हणून काय प्रेम कमी होत का वेडोबा, कामं असतील, सद्याची फेज गेली की होईल नीट सगळं, आणि तसही मला जे वाटतं तेच योग्य असेल असंही नाही न.
असं का विचारत आहेस पण तू अचानक, काय झालं.
संकेत - काही नाही
उर्वी उठायला निघते, अरे किती उशीर झालाय लेट मार्क लागेल उठ.
साकेत लगेच तिला स्वतःकडे ओढुन घेतो, काय हे यांत्रसरख काम चालु आहे माणूस आहे न तू.
उर्वी - हे तू म्हणत आहे
साकेत - हो मीच, आणि आपण आत्ता निवांत अस बाल्कनी मध्ये चहा पिणार आहोत, कारण मी ऑफिसला दांडी मारणार आहे आणि तूही.
उर्वी - हे खरंच घडतंय न, माझं स्वप्न तर नाही...?
साकेत - स्वप्न नको म्हणु प्लीज.
उर्वी - तू सांगणार आहेस का काय झालं..?
साकेत - सांगतो तू हो पुढे मी चहा घेऊन येतो.
साकेत दोघांसाठी चहा घेऊन येतो आणि थोड चाचरतच तिला स्वप्न सांगतो..
उर्वी ला खुप हसु येत
उर्वी - वेडा आहेस का तु, अस होऊ तरी शकते का, आणि त्यावर तु एवढा घबरलास की चक्क सुट्टी टाकली.
एवढंच ओळखलं का तु मला, नवीन एका अकर्षणासाठी मी तुला सोडेल.
साकेत - सॉरी उर्वी मला तसा नव्हतं म्हणायचं, आणि मी त्यासाठी सुट्टी नाही घेतली, मला खरंच रियलाईझ झालं की तु म्हणतेस तशे छोटे मोठे बदल करणं खरंच आवश्यक आहे.
आणि तु सोडणार जरी नाही तरी आपल्या नात्यातला गोडवा तर मझामुळे जाईलच ना, म्हणून आजपासूनच सुरुवात केली.
उर्वी - वाह क्या बात है. थॅ॑क यू माझा पूर्वीचा साकेत परत दिल्या बद्दल.
साकेत - ही तर बस सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या.
उर्वी - आज साठी एवढंच ठीक आहे चक्कर येईल मला.
साकेत - बस का, एक काम कर मस्त चहा घेऊन ये तोवर मी माझा प्लॅन करतो, आणि हो अद्रक घालशील तेवढंच
थोडासा तडका.
उर्वी - जो हुकुम सरकार.

साकेत उर्वीला १ वीक ची सुट्टी घ्यायला लावतो, मनसोक्त भटकंती करतात मॉल, मुव्ही, ट्रेकिंग. त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच ते रिसॉर्ट. आणि त्यानी स्वप्नात बघितलेल्या जागा सुद्धा, दोघंही त्या ठिकाणांवर जाऊन खुप हसतात. आणि त्या तलाव व टेकडी च्या ठिकाणी पोचतात.
साकेत - उर्वी आज हसत आहे पण त्यादिवशी माझी काय अवस्था झाली होती काय सांगु.
उर्वी -  वेडा आहेस कारे तु, काहीही झालं तरी आपल्या आयुष्यात मी असं कधीही घडु नाही प्रॉमिस करते.
साकेत - मी सुद्धा.

त्यांची सुट्टी संपली होती, एक वेगळाच उत्साह आला होता दोघातही, दुसऱ्यादिवशी नवीन जोमाने काम कण्यासाठी.
संध्याकाळी लवकरच दोघे घरी पोचतात फ्रेश होऊन हॉल मध्ये चहा घेतात. तोच साकेतला अंकितचा फोन येतो, साकेत थोडा दाचकतोच.
उर्वीला मात्र हसु येत.
अंकित - हाय साकेत काय चालु आहे..?
साकेत - काही नाही असच बसुन अहो, बोल ना.
अंकित - बर मी आज स्वतःच मला तुझा कडे इनव्हाइट केलंय, मी जेवणाच पार्सल घेऊन येतो, एक सरप्राइज आहे, बर ठेवतो बाय.
साकेत - अरे हो ऐक तर.
अंकित फोन कटही करतो, उर्वी अजूनही गालात हसत असते.
साकेत - तो संध्याकाळी घरी येणार आहे, काहीतरी सरप्राइज आहे म्हणे. आणि तु का हसत आहेस
उर्वी - तु का असा गोंधळला आहेस, स्वप्न होत ते, बाहेर ये आता त्याच्यातुन.
साकेत - हो बरोबर आहे तुझ, मी उगाच फार ताण घेत आहे.
थोड्या वेळाने बेल वाजते दारात अंकित आणि एक मुलगी असते.
अंकित - सरप्राइज.. मीट माय वुड बी वाइफ कियारा.
उर्वी - अरे वा, अभिनंदन, या न आतमध्ये.
साकेत - अभिनंदन, बोथ ऑफ यु.
अंकित - धन्यवाद, अरे त्याच दिवशी सांगणार होतो पण कीयारा बँगलोर वरून यायची होती म्हटलं प्रत्यक्षच भेटऊ.
चौघांच्याही मस्त गप्पा जमतात, कियारा लवकरच कंफर्टेबल होते, साकेतला आता स्वतःचा स्वप्नावर हसु येत, अधुन मधुन उर्वी त्याला नजरेने चिडवते. 
सगळे वीकेंडचा छोटासा प्लॅन ही ठरवतात.
कियारा - उर्वी अगं दाल गरमच आहे, पुन्हा का बर गॅस वर ठेवत आहे.
उर्वी व साकेत एकमेकांकडे बघुन हसतात
उर्वी - काही नाही ग
थोडासा तडका...

समाप्त..

शुध्दलेखनातील चुकांबद्दल क्षमस्व.
कथेला प्रतिक्रिया जरूर कळवा.