A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session3d0a7b9daa3fef70beef33d192a17e02ee5afe379c6a29902398d08dfaff85224a8f29a5): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

SPICE IT UP Part - 5
Oct 30, 2020
स्पर्धा

थोडासा तडका - भाग ५

Read Later
थोडासा तडका - भाग ५

भाग - १ - थोडासा तडका - १
भाग - २ - थोडासा तडका - २
भाग - ३ - थोडासा तडका - ३
भाग - ४ - थोडासा तडका - ४

थोडासा तडका - भाग -

अंकित आज ऑफिसमधून लवकरच निघाला होता.
त्याने उर्वीला अगदी वेगळ्या ठिकाणी बोलावलं, आज त्याचा कामाचा तसा मूड नव्हता, त्याची फेवरेट जागा होती ती. संथ तलाव, पांढरे शुभ्र राजहंस जोड्यानी फिरत होते, बजुला हिरवीगार टेकडी.
उर्वी - किती सुंदर आहे ही जागा मी आजपर्यंत अशा ठिकाणी कधीच नाही आले.
अंकित आज शांत होता.
उर्वी - तु आज एवढा शांत का आहेस, कधी पाहिलं नाही असं तुला.
अंकित - माहिती नाही.
उर्वी - तुला आजवर कोणीच कशी नाही आवडली
त्यावर त्याला हसु आलं.
अंकित - काय करू मला आवडेल अशी कधी भेटलीच नाही. सगळ्या मुलींना एका साच्यातलं आयुष्य हवं असतं जॉब, फ्लॅट, सिक्युरिटी. मला असं यांत्रिक आयुष्य जगणारी नको आहे. 
उर्वी ते ऐकुन चमकलीच, किती पटतात आमचे विचार.
उर्वी - तरीही एखादी तरी आवडली असेल न.
अंकित - तु शोध ना तुझासारखीच कोणी
उर्वी - काय..?
अंकित - आय मीन तुझी बहिण असेल तर.
उर्वी ला त्याच्या बोलण्याचा कल जाणवला होता, आणि तिलाही कुठेतरी ते सुखावल होतं.
बराच वेळ दोघंही शांत होते.
उर्वी - अंकित माझावर काही अन्याय नाही होत आहे रे. मला जे वाटत आहे ते चुक आहे. 
अंकित - अन्याय तुझावर होत नाहीये तु स्वतःवर करत आहेस, बंदिस्त आयुष्य जगणे हा न्याय तर नाही ना..?
मूलभूत गरजा पुर्ण करणे, श्वास घेणे म्हणजे जगणे का..?
उर्वी - पण असा विचार माझा मनात येणे म्हणजे मी साकेत चा विश्वासघात करत नाहीये का..? 
अंकित तिच्या डोळ्यात बघत नकळत तिचा हात हातात घेतो, तिलाही तो सोडवत नाही.
अंकित - हे बघ उर्वी, मला असं वाटतं आपण आपल्या मनानुसार जर आयुष्य जगु शकत नसेल तर अस बंधन जास्त काळ टिकू शकत नाही आणि जबरदस्ती ने खेचलं तरी तुम्ही दोघंही सुखी नाही राहु शकत.
मी तुला फोर्स नाही करत पण एकदा मनातुन विचार कर तू खरंच साकेत सोबत आनंदी आहेस का.
उर्वी - माहीत नाही, मी कन्फ्युज आहे
अंकित - तू हवा तेवढा वेळ घे मला घाई नाही, तोवर मी तुझा चांगला मित्र बनुन वागेल. आणि तुझा नकार असेल तर तुझ्या आयुष्यातून निघूनही जाईल.
दोघे घरी जायला निघतात.
उर्वीला काय करावं काहीही सुचत नाही ती तशीच न जेवता बेड वर पडून असते. साकेत कधी तिच्या बाजुला आला तिला कळलं ही नाही.
साकेत - बर वाटत नाहीये का, जेवली पण नाही..?
उर्वी - नाही, थोड ए‌ग्झर्शन झालंय, झोपले की वाटेल बर.
साकेत - ओके. गुड नाईट
उर्वी रात्रभर जागी होती तिला काहीच सुचत नव्हते काय करावं, सकाळी कधीतरी तिला झोप लागली.
साकेत तिला न उठवताच निघाला, थकवा असेल कदाचित समजुन.
अंकितच्या फोन ने तिला जाग आली, पण तिने उचलला नाही. दिवसभर रूम मधेच पडून होती, अंकितचे फोन चालुच होते शेवटी तिने दुपारी त्याचा फोन उचलला.
अंकित - काय मॅडम किती बिझी. ऑफिसला आहेस का, येऊ मी.
उर्वी - नाही अरे घरीच आहे, आज नको भेटायला नंतर भेटू.
अंकित - असं का म्हणत आहेस काही प्रॉब्लेम झाला का, मी घरी येतो.
उर्वी - नको अंकित प्लीज हे बरोबर नाही.
अंकित - उर्वी आपण चुकीचं काहीही केलेलं नाहीये. तुझी मनस्थिती ठीक नाही दिसत आहे, मला आत्ताच भेटायचंय, मी येत आहे.
थोड्याच वेळात दराची बेल वाजते, उर्वी नाईलाजाने दार उघडते, उर्वीची कंडीशन खुप खराब दिसते, रात्रभर जागली हे स्पष्ट लक्षात येतं अंकित च्या.
अंकित - मी तुला कालच सांगितलं होतं माझी कसलीही जबरदस्ती नाही, हवं असेल तर मी आत्ता लगेच तुझ्या आयुष्यातून निघून जातो पण तु असा स्वतःला त्रास देऊ नकोस. मी खरंच खुप ञास देत आहे अम् सॉरी, निघतो मी.
तो वळताच उर्वीने मागुन त्याला मिठी मारली.
उर्वी - मी तुझपासून नाही स्वतःपासूनच पळत होते पण आता शक्य नाही. मला स्वतःला मान्य करावं लागेल, साकेतला जाणीव करून देण्याचा खुप प्रयत्न केला मी पण तो दगड झालंय अता वेळ ही निघुन गेली आहे, आपण लगेच सांगु त्याला, मला आता ओझ नकोय.
अंकित - ठीक आहे मी थांबतो तो येईपर्यंत, आजच सांगु.
दोघंही बाल्कनीमध्ये बसुन राहतात, साकेत बेल वाजवतो, अंकित हॉल मध्ये येतो.
साकेत - अरे अंकित आज घरी बसून काम चालु आहे का.
उर्वी - साकेत थोड बोलायचय आम्हाला, प्लीज बस इथे.
साकेत थोडा गोंधळतो.


क्रमशः

शुध्दलेखनातील चुकांबद्दल क्षमस्व.
पुढचा व अंतिम भाग उद्या प्रकाशित केला जाईल.
कथेला प्रतिक्रिया जरूर कळवा.