A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session3d0a7b9daa3fef70beef33d192a17e022c1b879bdfaa56777704c55cab88f133761e9436): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

SPICE IT UP Part - 4
Oct 30, 2020
स्पर्धा

थोडासा तडका - भाग ४

Read Later
थोडासा तडका - भाग ४

भाग - १ - थोडासा तडका - भाग १
भाग - २ - थोडासा तडका - भाग २
भाग - ३ - थोडासा तडका - भाग ३

थोडासा तडका - भाग - ४

आज सकाळी उर्वी खुप उत्साहात होती, एक नवीन लहर तिच्यात संचारली होती. वॉक वरून आल्यावर आपल्याच धुंदीत गुणगुणत दिनक्रम चालु होता. काल अंकितच्या जगण्याच्या दृष्टिकोनावर ती इंप्रेस झाली होती, तिलाही आपल्या आयुष्यात त्या गोष्टी हव्या होत्या, त्यासाठी तिने प्रयत्न करायचं ठरवलं होतं. साकेत नी इन्वाॅल्व व्हायचं की नाही हे तिने त्याच्यावर सोडलं होतं. काल बराच उशीर झाल्याने आज साकेतला थकवा आला होता पण मीटी॑ग्ज लाईन अप असल्याने लगेच आवरलं. 
उर्वी ऑफिसला पोचली सगळी कामं आणि मीटी॑ग्ज लवकर उरकल्या, तिचा छान शॉपिंगला जायचा मूड झाला, मधुराला घरी जायचं असल्यामुळे ती एकटीच मॉल मधे गेली, तोच अंकित मॉल मधुन बाहेर येत होता.
अंकित - उर्वी... हाय सचं स्मॉल वर्ल्ड.
उर्वी - हॅलो.. अंकित, झाली तुझी शॉपिंग.
अंकित - हो अग, बोअर होत होत म्हटलं जरा आपली स्टाईल बदलावी.
उर्वी - म्हणजे...?
अंकित - म्हणजे मला एकाच स्टाईल चे कपडे नेहमी घालायला अवडत नाही, आय मीन याच ब्रँड चे, त्याच कलर चे, जस मोस्टली लोकांचा पेहराव नेहमी तसाच असतो. मला बदल करत रहाव वाटतं, परस्नॅलिटी मधे एक नवीन चमक येते.
उर्वी - ओह नाइस.
उर्वीनी स्वतःकडे बघितलं तिलाही लक्षात आलं आपण कॉलेज नंतर जवळपास एकाच प्रकारचे कपडे घालतो, लाँग कुर्ती किंवा ड्रेस, फार तर फार पार्टीमध्ये वनपिस. आज तिने मस्त अशे लाँग स्कर्ट, पटियाला आणि टी शर्ट घेतले, कार्ड मुद्दाम साकेतच वापरलं, त्या कारणाने तो विचारेल तरी काय घेतलं.
पण विचारेल तो साकेत कसला घरी आल्यावर तो जेऊन झोपायच्या तयारीत. न राहुन तिनेच म्हटलं, 'मी आज खुप शॉपिंग केली '.
साकेत - हो मेसेज बघितला मी
उर्वी - विचार तरी काय केलं ते.
साकेत - मी कधी हिशोब विचारलाय का तुला
उर्वी - अरे हिशोब नाही पण काय आणल ते म्हणत आहे
साकेत - अच्छा, सांग न काय आणल
उर्वी - थांब दाखवतेच
उर्वी उत्साहात सगळं दाखवत होती, साकेत नी छान आहे एवढं म्हणून आटोपलं
उर्वी - अरे आज मी मॉल जात होती तेव्हा अंकित भेटला निघताना, ॲकचुली त्याच बोलण ऐकुनच मे जरा माझी ड्रेसिंग स्टाइल बदलली.
साकेत तोवर घोरायला सुद्धा लागला होता. उर्वीला त्याच्या वागण्याचा राग कमी कंटाळा जास्त येत होता.
उर्वीचे तिच्या रूटीन मधे छोटे मोठे नवीन प्रयोग करणं चालू होते. मेडिटेशन, कविता वाचन, कधी खाली सोसायटी मधील लोकांशी गप्पा मारणे, वीकेंड ला स्विमिंग, व्याख्यानाला जाणे, तर कधी कॉलेज मधे फेरफटका. पण एकटं किती करणार मधुरा लाही तिचा व्याप असल्याने ती कधी कधीच सोबत असे.
एक दिवस अचानक तिला अंकितचा कॉल आला.
अंकित - हाय उर्वी सॉरी तुझ्या परस्पर मी साकेत कडून तुझा नंबर घेतला, पण कामच तसं होत.
उर्वी - का रे लग्न वगरे ठरलय का..?
अंकित - हा हा... नाही ग आमच्या कुठे नशिबात हवी तशी, तुच शोधुन देशील हवं तर.
उर्वी - हो नक्की
अंकित - ॲकचुली जरा ऑफिशियल काम होत, आमच्या ऑफिस मध्ये वर्क लोड वाढलाय सो काही प्रोजेक्ट आम्हाला आउटसोर्सिंग ला दिलेय, म्हटलं तुझी फर्म आहेच, चालेल का तुला..?
उर्वी - हो अरे चालेल ना. मी येऊ तुमच्या ऑफिसला ऑर आमच्या इथे कोनाला पाठवलं तरी चालेल.
अंकित - कोणी कशाला मीच येतो की, तेवढ्याच आपल्या गप्पा होतील.
उर्वी - हो ये ना, कधी पण ये, मी अड्रेस मेसेज करते.
अंकित - तु लंच केलास का..?
उर्वी - नाही अजुन, बस टिफीनच हातात घेतलाय.
अंकित - एक काम कर तो टिफीन मला दे मी रात्री खाईन आणि आत्ता आपण रेसटॉरंट मध्ये भेटू.
उर्वी - काहीतरी काय तु पण, निघ तु तुझ झालं की.
अंकित अर्ध्या तासात ऑफिसला पोचला, मधुरा सुद्धा त्याला भेटुन इंप्रेस झाली तिघेही लंचला जाऊन आले व प्रोजेक्ट बद्दल रेगुलर बोलणं आटोपलं.
अंकित - तुमची काम करण्याची पद्धत खरंच खुप छान वाटली मला, पहिल्याच मीटिंग मधे किती डिटेल प्लॅन झाला. खरंच यू बोथ रॉक. लवकरच तुमची कंपनी आमच्यासारख्या॑ना कामावर ठेवेल, माझी पोस्ट राखुन ठेव बर.
उर्वी - पुरे आता किती चढवणार.
मधुरा - चला मी निघते, घरी थोड काम आहे तुम्ही हवं तर बाकी बोलणं करून घ्या, मी नंतर कॅच अप करेन.
मधुरा निघाल्यावर त्या दोघांनाही जरा आळसच आला म्हणुन उर्वी ने चहा/कॉफी मगवायची का विचारलं
अंकित - अरे बाहेरच जाऊयात, त्या टपरी वर बरीच गर्दी दिसली, पाय पण मोकळे होतील.
दोघंही बाहेर निघाले
अंकित - सॉरी मी खुपचं घाई करत आहे का कामाची, त्याच काय झालं सध्या टार्गेट खुप हाय एन्ड ला आहेत, आणि मला व माझ्या टीमला जास्त लवकर पूर्ण करायचं आहे.
उर्वी - का रे नेक्स्ट हॉलिडे का..?
अंकित - येस्स.. रोड ट्रीप टू लदाख काही टीम मेंबर्स पण असतील, तुम्ही दोघंही या ना मजा येईल १५ दिवसात येऊ परत
उर्वी - बघु साकेत ला विचारते एकदा, त्याच्या सुट्टीच कठीण असतं जरा. 
आणि घाईच एवढं काही नाही होईल लवकरच सध्या आमचे प्रोजेक्ट तशे कंप्लीशनलाच आहेत.
अंकित - ओके मग भेटू लवकरच, नेक्स्ट मीटिंग साठी कॉल करशील. बाय द वें नाइस ड्रेस, लाँग स्कर्ट छान दिसतो तुला.
उर्वी - थॅ॑क्स. (माझा पूर्ण अटायार चेंज झालेला साकेत च्या लक्षातही नाही आलं एवढ्या दिवसात आणि याला दोन भेटीत कळलं)
८ दिवसात प्रोजेक्टची फर्स्ट स्टेज आली, उर्वीने अंकितला मीटिंग साठी बोलावलं, मधुरा काही दिवस सुट्टीवर होती. 
अंकितने उर्वीला त्यांच्या ऑफिस मीटिंग होतात त्या रिसॉर्ट मधे बोलावलं, खुप सुंदर वातावरण होत तिथे मोठी झाडे छोटंसं तळ, तिला खुप फ्रेश वाटत होत तिथे.अंकितला उर्वीच्या कामाची पद्धत खुप आवडली, इतरांपेक्षा वेगळी आणि फास्ट होती.
फर्स्ट स्टेज नंतर काम थोड कॉम्प्लेक्स होत, मधुरा सुट्टीवर असल्याने उर्वीला सगळ करायचं होत, अंकितने मॉर्निंग शिफ्ट घेतली होती व दुपारनंतर उर्वीची मदत करत होता, दोघांचं बॉ॑डींग खुप छान जमत होत, वाटतच नव्हतं त्यांची नवीनच ओळख झालेली.
इकडे साकेत आणि उर्वीच बोलणं अगदीच जुजबी झालं होत‌. अधीतरी एकमेकांशी दैनंदिन संभाषण होत पान आता तेही तोडकच. साकेतला वाटलं तिचा वर्क लोड वाढल्याने असेल. तसही त्याचे टार्गेट पण जवळ होते, ते पुर्ण झाल्यावर त्याला वाटलं एखादा हॉलिडे प्लॅन करावा का?
अंकित आणि उर्वीच काम खुप वेगळ्या पद्धतीने चालु होत. अंकित तिला दरवेळेस नवीन ठिकाणी मीटिंग साठी बोलवत कधी रिसॉर्ट, कॅफे, गेम झोन, पार्क. मनमोकळ्या गप्पा मारत त्यांचं काम मस्त चालु होत.
अंकितला उर्वीच्या सगळ्याच गोष्टी अट्रॅक्ट करत होत्या तीचऺ छोट्या छोट्या गोष्टी ऑबजर्व करून अप्रिशीएट करणं, तिचा ड्रेसिंग सेन्स, निखळ बोलण्याची पद्धत.
न कळत दोघंही एकमेकांकडे आकर्षित होत होते.

क्रमशः

शुध्दलेखनातील चुकांबद्दल क्षमस्व.
पुढचा भाग संध्याकाळी प्रकाशित केला जाईल.
कथेला प्रतिक्रिया जरूर कळवा.