बोधकथा
"स्पीड"
दीप्तीचा काल रिझल्ट आला ती नववीतून दहावीत गेली.
घरी आई बाबा वाट पाहत होते. छान पास झाली म्हणून आईने देवा समोर प्रसाद ठेवला.
पण ह्या सगळ्यात दीप्ती काही खुश दिसत नव्हती,तिचा नंबर घसरला होता.
घरी आई बाबा वाट पाहत होते. छान पास झाली म्हणून आईने देवा समोर प्रसाद ठेवला.
पण ह्या सगळ्यात दीप्ती काही खुश दिसत नव्हती,तिचा नंबर घसरला होता.
बाबांनी मार्कशीट पाहिली. "रिझल्ट छान आहे .
पुढच्या वर्षी बोर्डाची दहावीची परीक्षा आहे तेव्हा आताअभ्यासाकरताजास्त वेळ दे असे म्हणाले.
पुढच्या वर्षी बोर्डाची दहावीची परीक्षा आहे तेव्हा आताअभ्यासाकरताजास्त वेळ दे असे म्हणाले.
"पण बाबा मी तर खूप अभ्यास करते हो".
यावर बाबा काहीच बोलले नाही.
दीप्ती एक हुशार मुलगी आहे तिला अभ्यासाबरोबर ड्रॉइंग आणि गाण्याची हीआवड आहे.
अगदी केजी च्या वर्गापासून पहिल्या तीन मध्ये पास होतआली आहे .
पण सहावी नंतर तिचा नंबर हळूहळू घसरतो आहे.
अगदी केजी च्या वर्गापासून पहिल्या तीन मध्ये पास होतआली आहे .
पण सहावी नंतर तिचा नंबर हळूहळू घसरतो आहे.
रात्री दिप्ती चे आई व बाबा आपसात बोलत होते ."खरंतर दीप्ती हुशार आहे पण नेमकं काय होत आहे कळत नाही.
"हो पण तिला आता जास्त वेळ अभ्यासासाठी ठेवायला हवा".
तेच मी सांगत असते पण तिचं म्हणणं मी करते खूप वेळ.
" मी तिला खूप वेळ देते, आई म्हणाली.
तेच मी सांगत असते पण तिचं म्हणणं मी करते खूप वेळ.
" मी तिला खूप वेळ देते, आई म्हणाली.
"असू दे मी समजावेन तिला--पण जरा वेगळ्या पद्धतीने "बाबा म्हणाले.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असूनही दीप्ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली
"बाबा चलायचं ना तुम्ही मला स्कुटी शिकवणार होता ना सुट्ट्यांमध्ये?"
"बाबा चलायचं ना तुम्ही मला स्कुटी शिकवणार होता ना सुट्ट्यांमध्ये?"
\" हो तर,\"चल!
दीप्ती खूप आनंदात निघाली सुरुवातीला ती बाबांच्या मागे बसली.
बाबा स्कूटी वरून तिला समजावू लागले "हे बघ दिपू-- हा लाईट, हा ब्रेक, हा एक्सलेटर यांनी स्पीड कमी व जास्त करायची ,हा साईड स्टॅन्ड.
हो बाबा ,तिला खूप उत्साह वाटत होता
बाबा स्कूटी वरून तिला समजावू लागले "हे बघ दिपू-- हा लाईट, हा ब्रेक, हा एक्सलेटर यांनी स्पीड कमी व जास्त करायची ,हा साईड स्टॅन्ड.
हो बाबा ,तिला खूप उत्साह वाटत होता
\"घे आता तू चालव\".
"हो हो करत दिप्ती स्कुटी वर पुढे बसली बाबा तिच्या मागे".
सुरुवातीला एका मोकळ्या मैदानात तीन चार चक्कर लावले सराव होण्याकरता .
आता आपण एका पुलाकडे जाऊया, तिथे फार गर्दी नसते .
खरंच ?दीप्ती नेउत्साहाने स्कुटी पुलाकडे वळवली काही वेळ तर स्कुटी पूल चढली पण मग ती मागे मागे जाऊ लागली.
बाबांनी प्रसंगावधान ठेवून पटकन ब्रेक लावला.
दिप्ती ने परत प्रयत्न केला पण स्कुटी पुढे जातच नव्हती.
" बाबा स्कुटी पुढे का जात नाही मागे मागे का येते?"
"बघ बेटा-- पुढे चढआहे आणि आपण त्याच स्पीड मध्ये आहोत. चढ चढायला गाडी ची स्पीड वाढवायला एक्सलेटर वाढवावा लागेल ना तरच गाडी पूल चढेल..

."कळलं का मी काय सांगतोय"? दीप्तीने हळूहळू एक्सलेटर वाढवला तशी स्कुटी फुल चढू लागली.
फुल चढून वर गेल्यावर बाबांनी तिला विचारले
मी तुला काय समजावतोय ते कळले का?
हे चढ आणि एक्सेलेटर च गणित ऐकून दीप्तीला लक्षात आले कि, दहावीच्या परीक्षे करता ही तिला अभ्यासाचा एक्सेलेटर वाढवावा लागेल तेव्हाच अपेक्षित परिणाम म्हणजेच दहावीचा गड ती जिंकू शकेल.
------------------------------------------