बोलके डोळे तुझे
करती मनाला अबोल
नकळे कसा मग जातो
या मनाचा तोल.....
करती मनाला अबोल
नकळे कसा मग जातो
या मनाचा तोल.....
शब्दांत शब्द गुंफून मी
होते कशी निःशब्द...
पाहताना तुला मन
माझे होई स्तब्ध...
अंतरी ही वाजतो
मग प्रेमाचा तो पावा
स्वप्नी, अंगणी येतो
मम पाखरांचा थवा...
साद घालूनी तुला क्षणाला
वेड लागे माझ्या मनाला
दारी नाचूदे मयुराला
फुलवुनी तो मोरपिसारा
मनी दाटेल या मग
आठवणींचा तो पसारा...
खुलवतो मनाला तो
वेडा मोरपंख,
अन् क्षणी वाजवतो तो
निःशब्द शब्दांचा
नादमय शंख....
- हर्षदा नंदकुमार पिंपळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा