स्पेशल चाईल्ड

This blog gives information on the topic of Special Child

स्पेशल चाईल्ड

मनुष्य जन्म हा खूप योनी मधून गेल्यावर मिळतो असे मनुष्य जन्म हा खूप योनी मधून गेल्यावर मिळतो असे म्हणतात. कोणी याला पुण्यकर्माचे फळ म्हणतात तर कोणी एक त्या आत्म्याचे नवीन रूप.
जन्माला येणारा प्रत्येक जीव हा आपलें असे एक अस्तित्व घेऊन जन्माला येते. जेंडर प्रमाणे म्हणत नाही मी पण साधारणपणे सुदृढ असे आपण म्हणतो.
त्याला मग नैसगिर्क रित्या जे दिसाईन त्या सृष्टीनिर्मात्याने दिले ते म्हणजे दोन कान, दोन डोळे,दोन हातपाय,एक नाक, त्या चेहऱ्यावर एक जीवनी हातापायाला पाच पाच अशी प्रत्येकी दहा बोटे असे.
हे बाह्य झाले आणि याच देहात असते ते सगळ्यांचे कंट्रोलर म्हणजे मेंदू आणि जे जीवन असण्याचे प्रतीक दाखवते ते एक हृदय!
साधारणपणे मूल जन्माला आल्यावर हे सगळे तपासले जाते जे खूप नॉर्मल आहे मग त्या बाळाची शुश्रूषा सुरू होते. पण सगळीच बाळे जन्माला येताना नॉर्मल असतात का?
तर याचे उत्तर आहे नाही असे.

बरेचदा काही बाळ जन्माला येताना काही व्यंग घेऊन जन्माला येतात  कोणी मूकबधिर असतात तर कोणी थोडी बुद्धीने व्यंग. त्यांना म्हणतात स्पेसिएल चाईल्ड!
साधारणपणे आपल्या समाजात अशी मुलं जन्माला आली की घरचे तर नाराज होतातच पण समाजात सुद्धा त्यांना कमी लेखले जाते! बरेचदा समवयस्क मुलांमध्ये हिनवले जाते.
पण हे योग्य आहे का?

प्रत्येकाला जे जन्मतः मिळते ते जरी त्यांच्या आईवडिलांकडुन मिळत असले तरीही खुप आशा गोष्टी आहेत की आपण ज्याला 'गॉड गिफ्टेड' म्हणतो.
कोणाला येणारे व्यंग हे काही अपघाताने येते तर कोणाला काही आणखी कारणाने पण त्याला जवाबदार ते स्वतः नक्कीच नसतात. जसा एका नॉर्मल बाळाला जगायचं अधिकार असतो तो त्या बाळाला सुद्धा आहेच ना?

त्यांचं ते हसणं, त्यांचं वागणं हे खरंच खूप निरागस असते. या जगातल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा त्या स्वार्थी आशा वागणुकीची त्यांना हवाच नसते. मग तो निरागसपणा आपण अनुभवायला हवा आणि त्यांच ते हसू फुलवायला हवे.

आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की अशा मुलांसाठी काही वेगळे उपक्रम राबवले जातात. काही शाळा असतात,काही संस्था असतात ज्या त्यांना आणखी काही वेगळे शिकवतात. हा उपक्रम खरच खूप कौतुकास्पद आहे.

प्रत्येकाकडे काही न काही कला ही असतेच.त्या कलेला ओळखणे त्या जोपासणे आणि त्यांना वाव देणे हे खूप जिकीरीचे काम आहे. पण ते होणे पण तितकेच गरजेचे आहे.

 आपण या आयुष्याचे, या समाजाचे देणेकरी लागतो मग आपण सगळ्यांनी मिळून ह्यात काहीतरी सहभाग हा घेतला पाहिजे असे मला वाटते.

बरेचदा असे अनुभवले आहे की एखादे मूल असते ज्याला ऐकायला येत नाही बोलतादेखील येत नाही पण त्याचा मेंदू हा प्रचंड तल्लख असतो आणि त्याही परिस्थितीत तो आयुष्य आनंदाने आणि यासहणे पुढे नेतो त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी भाषा आहे.

ज्यांना डोळ्याने दिसत नाही ते ब्रेल लिपीच्या साहाय्याने अभ्यास करून आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.
हात नसलेला सुद्धा एक उत्तम चित्रकार आहे तर ज्याला पाय नाहीत असा प्रसिद्ध धावपटूही आहे.
निसर्गाने जे कमी दिले त्यावर मात करत ते पुढे जायला बघतात मग आपण का मागे असावे?
ज्या मुलांना बुद्धी ही थोडी कमी आहे ज्यांना आपण स्पेसिएल चाईल्ड असे संबोधतो. त्यांच्याकडे पण आपल्यासारखे मन आहे भावना आहेत आणि ईच्छा सुद्धा आहेत. फरक इतकाच की त्यांना ते सहजरित्या व्यक्त करता येत नाही! मग आपण त्यांना मदत करू शकतो ना!

जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच त्याच्याबद्दल एक आपुलकीची, समानतेची भावना शिकवली तर नक्कीच समाजातील विचारपद्धतीत फरक पडेल हे नक्की.

आपल्याला सगळे नीट मिळाले याचे ऋणी समजून त्यांच्यासाठी काही करावे ही आपली जवाबदारी आपण समजूयात.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे यांच्या पालकांच्या मनाचा आपण प्रकर्षांने विचार केला पाहिजे. कुणालाच आवडत नाही की आपल्या मुलाला काही म्हणलेले किंवा कोणी नावे ठेवलेली.
त्यामुळे आपण या बाबतीत खूप संवेदनशील राहायला पाहिजे.

अश्या मुलांच्या पालकांच्या बाबतीत आपण सुज्ञ बनून त्यांच्या मनातील भावनेला कायमच सांभाळले पाहिजे.
अशी मुले खूप निरागस असतात कारण ही सगळी तर देवा घरची फुले आहेत.

आपल्या मनातील या विचाराला प्रज्वलित करूयात आणि स्पेशल मुलांना आपल्या योग्य वागण्याने जास्त स्पेशल फिलिंग देऊयात!

पटतंय ना?

फोटो गुगल वरून साभार

©®अमित मेढेकर