Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

स्पर्शबंध ४

Read Later
स्पर्शबंध ४
सौ. वैशाली मंठाळकर
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
विषय: सामाजिक
उपविषय: स्पर्शबंध
टीम सोलापूर..
"श्रेया ,आई बरोबर बोलत आहे. बाळाची काळजी करू नकोस.तिलाही छान घर मिळून जाईल." नंदाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

श्रेया शांत झाली.ती रूममध्ये गेली.आर्यन गॅलरीत बसून विचारात हरवला होता.श्रेयाने त्याच्या शेजारी बसून खांद्यावर डोके ठेवले.

"श्रेया आपण दुसरा चान्स घेतला नाही.म्हणून तुझ्या डोक्यात आले का? बट ट्रस्ट मी. सेंकड चान्स घेऊन तुला गमवायचे नाहीये."आर्यन दुरवर बघत म्हणाला.

"आर्यन त्याचा आणि ह्या गोष्टीचा काहीच संबंध नाहीये.माझी खूप इच्छा होती.पण तुझी काळजी सुद्धा मला माहित आहे. माझ्या जिवापेक्षा तुला काहीच नकोय.आपल बाळ आहे ह्यातच आपण दोघे समाधानी आहोत.पण काल त्या बेबीला हातात घेतले तेंव्हा असेच वाटत होते की माझे आणि तिचे काही तरी मागच्या जन्मीचे नाते असणार.तिचा तो निरागस स्पर्श अजून मला जाणवत आहे. आपण त्या बाळाला दत्तक घेऊन तिला श्रेयानसारखे वाढवू.त्यालाही एक बहिण मिळेल. आपल्या दोघांना मुलीचे सुख मिळेल ."श्रेया त्याला समजावत म्हणाली.

"श्रेया हे सगळे इझी नाहीये. तुझे करिअर, श्रेयान आहे. आपल्याला स्वतः ला वेळ मिळत नाही.पूर्ण लाइफ डिस्टर्ब होईल." आर्यन.

"मी अश्या वेळी प्रेग्नेंट राहिले असते तर तू हाच विचार केला असता का?"श्रेया.

आर्यन निरुत्तर झाला.तिच्या जीवाला काही धोका नसता तर त्यांनी अजून एक चान्स घेतला असता आणि श्रेयानच्या वेळेस जेवढा खुश होता. तेवढा आताही झाला असता.

"श्रेया खरचं खुप अवघड आहे."तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.

"आर्यन तू साथ दे ना. सगळेच सोप्पे होईल रे." ती भावुक होत म्हणाली.
"दुसरा प्रश्न .... कधी असं होणार नाही पण तरीही शेवटी सगळ्या बाजूंनी विचार करून हा प्रश्न मांडत आहे आणि त्याचे उत्तर मला हवं आहे." नंदाताई एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या.श्रेया डोळ्यानेच हुंकार भरत होती.

"उद्याचा दिवस कसा निघेल कोणीच सांगू शकत नाही उद्या पुढे जाऊन तुमच्या दोघांमध्ये काही बिनसले .वेगळे राहण्याचा तुम्ही कधी विचार केला .तेव्हा तू कोणाला निवडणार श्रेयानला का दत्तक बाळाला ?" नंदाताई.

श्रेया आर्यन एकमेकांकडे बघू लागले ."आई असं कधीच होणार नाही. तुलाही माहीत आहे. तू हा प्रश्न कसा विचारू शकतेस?"आर्यन थोडा चिडून म्हणाला.

"आर्यन मला तुमच्या प्रेमावर कधीच डाउट आला नाहीये आणि येणारही नाहीये. पण माझ्यासाठी ह्याचे उत्तर हवे. शेवटी दत्तक घेतलेल्या बाळामध्ये आणि पोटच्या बाळामध्ये निवड करणे खूप सोप्पे असते.कधी पुढे जाऊन तुम्ही वेगळे झालात. तुझ्याकडे एक बाळ, तिच्याकडे एक बाळ तुम्ही दोघांनी ठरवले.तेव्हा श्रेया कोणाला जवळ करणार ? आपण तर इतकी वर्षे ओळखून आहोत. एक मिनिट ती श्रेयानला नजरेआड करत नाही. त्याच्या बाबतीत किती पजेसिव आहे सगळं आपल्याला ठाऊक आहे .हा प्रश्न पहिला माझ्या डोक्यात आलाच होता. पुढे जाऊन श्रेयान आणि बेबीच पटलं नाही . त्यांच्यात काही वाद झाला तर ती कोणाची बाजू घेणार? पूढे सांगू शकत नाही कशी परिस्थिती निर्माण होईल ते ? मी अशा केसेस बघितल्या आहेत.पहिले मुल होत नाही म्हणून घेऊन जातात.काही वर्षानी त्यांना स्वतःच बाळ झाल्यावर दत्तक बाळाचे खूप हाल करतात.आपण सगळ्या बाजूंनी विचार करायला हवा ना. तुम्हाला काय वाटते?" नंदाताई बोलत मनोहररावांनाकडे बघत होत्या.

"बरोबर बोलतेय नंदा, ज्यांना मुलं नसतात तेव्हा ते मुलं दत्तक घेतात आणि तू जे बोलते तसेही कधी कधी होते. आणि तुम्हाला एक बाळ आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दत्तक घेण्याचा विचार करत आहात. म्हणून थोडा विचार करावा लागतो." मनोहरराव इतका वेळ शांत बसले होते ते बोलले.

"बरोबर बोलत आहे नंदा ,श्रेया या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय तर पुढचा निर्णय होऊ शकत नाही." आजी श्रेयाकडे बघून म्हणाली.

श्रेया विचारात पडली होती. काय उत्तर द्यायचं आणि उत्तर कसं द्यायचं . ती श्रेयानला सोडू शकत नव्हती आणि बाळालाही नाही. मधल्यामध्ये तिचे मरण होत होते.कोणाची बाजू घेणार ती? दोन्ही पोटचे गोळे असले तर हा प्रश्न आलाच नसता .पण एक दत्तक आणि एक पोटचे बाळ प्रश्न वेगळा होता.
"विचार कर श्रेया आणि मग बोल असं लगेच प्रश्नांची उत्तरे देऊ नकोस ."नंदाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत निघून गेल्या.

श्रेया सुन्न होऊन तिच्या रूमकडे निघाली. उत्तर तिला द्यावेच लागणार होते .पण येथे श्रेयानचा प्रश्न होता तिला दोघांपैकी एकाला निवडायचे होते. मगच त्याच्यावरच आईचा निर्णय होणार होता.

"श्रेया काय विचार करतेस? आईने प्रश्न मांडला असे कधी आपल्यात होणारच नाहीये .आपण इतकी वर्षे एकत्र आहोत ."आर्यन मागून येऊन तिला समजावत म्हणाला.

"आर्यन माहित आहे आपल्यात असे होणारच नाहीये काळ्या दगडावरची रेष आहे. पण आईच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल ना. प्रश्नही बरोबर आहे. दोन्ही प्रश्नांचे उत्तर मला बरोबर द्यावे लागतील त्याच्यावरच निर्णय होईल."ती विचार करत म्हणाली.

"हो ग, पण या प्रश्नाचे उत्तर तू काय म्हणून निवडणार.मनातून सांगितले तरी कोणी विश्वास ठेवणारच नाही. ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे." तो रेस्टलेस होत म्हणाला.

संध्याकाळी श्रेया खाली येऊन आईच्या रूममध्ये गेली.

"आई." तिने दारात उभारून हाक मारली.

"ये ना ..."नंदाताई. श्रेया आत येऊन त्यांच्या शेजारी बसली.

"काय ठरवले?" नंदाताई.

"आई, माझ्यासाठी दोन्ही मुले मला सेम आहेत. मग ते दत्तक घेतलेल मुल असो किंवा माझ्या रक्ताचे असो. जो बरोबर असेल त्याची बाजू मी घेईन आणि मी बोलायचे म्हणून बोलत नाहीये तुमचाही मुद्दा मला पटला आहे. शेवटी तुम्ही काही तरी विचार करूनच हा प्रश्न मांडला आहे आणि माझा निर्णय झाला आहे. पूढे जाऊन अशी परिस्तिथी निर्माण झाली तर ....तर...मी पहिले बेबीला निवडेल आणि मी हे लीगली लिहून देते.आज
काल बोलण्यावर कमी आणि कागदांवर विश्वास असतो. "श्रेया कागद समोर धरून विश्वासाने म्हणाली.
नंदाताई हलक्या हसल्या.त्यांनी कागद घेतले आणि तिच्या समोर फाडले.

"तू माझ्या परीक्षेत पास झालीस. आणि तुला बाळासाठी तुझे करिअर सोडायची गरज नाही .आपण सगळे मिळून तिला मोठे करु.जेव्हा तू बाळाला घेऊन बसली होतीस तेंव्हाच तुझे मन मला ओळखता आले होते.आपण बाळाला दत्तक घेऊ आणि भविष्यात तू दोघांना समान वागणूक देशील." नंदाताई .

श्रेयाने मानेने होकर देत त्यांना मिठी मारली. खूप मोठा आनंद झाला होता.

सगळे आश्रमामध्ये जाऊन बाळाला घरी घेऊन आले. पूर्ण घर फुलांनी सजवले होते.

"मम्मा, मला पण सिस्टर आहे ये…" श्रेयान उड्या मारतच घरभर फिरत होता.पूर्ण घर आनंदाने भरले होते.

"श्रेया नाव ठरवले का?" आजी हसून म्हणाल्या.

"हो."तिने पाळण्यातून बाळाला उचलून घेतले. मायेने बेबीला थोडे वर उचलून कानात नाव सांगितले.

"मम्मा ! मला सांग ना...." श्रेयान एक्साईट होत म्हणाला.

"श्रेया- आर्यनचा श्रेयान तशी ही आमची आर्या.... उम्हंमम्..." श्रेया बाळाच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली.

आर्यन तिला भरल्या डोळ्यांनी पाहत होता.त्यांची फॅमिली पूर्ण झाली होती.त्याने श्रेयानला उचलुन घेतले आणि एका हाताने श्रेयाला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले.


सौ. वैशाली मंठाळकर
समाप्त….

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishu

Writer

I Am Housewife

//