स्पर्शबंध २

स्पर्शाची माया
सौ. वैशाली मंठाळकर
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
विषय: सामाजिक
उपविषय: स्पर्शबंध
टीम सोलापूर..

भाग-
"आर्यन आणि श्रेयानचे गेम खेळायचे चालू होते.श्रेया किचनमध्ये होती.थोड्या वेळासाठी दिवसभराच विसरून गेली होती.

नंदाताई, आर्यन आणि मनोहररावांना आजचा आश्रमामधला प्रकार सांगत होत्या. आश्रमात ह्या गोष्टी सारख्या घडत होत्या.त्यांना नवीन नव्हते म्हणून कोणी काही इतकं रिॲक्ट केले नाही.

सगळे जेवायला बसले होते.

"डॅड मम्माने बेबीला हातात घेतले होते. छोटसेच होते."श्रेयान त्याचे हात दाखवत म्हणाला.

आर्यनने हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. श्रेयाच्या डोळ्यासमोर बाळाचा चेहरा आला.लगेच डोळे भरून आले.

"आई, बेबीची मम्मा कुठे आहे?"श्रेयान खाता खाता म्हणाला.

"बेबीची मम्मा बाहेर गेली आहे. काही दिवसांत येईल." नंदाताई त्याला भरवत म्हणाल्या.

"ओहह.... "श्रेयान.

"चल लवकर जेवण कर. उद्या स्कूल आहे." नंदाताई हसून म्हणाल्या.

"आई, आश्रममधून कॉल आला होता का? बेबीला चेक केले?" श्रेया.

"हो, डॉक्टर येऊन गेले.थोडा फिवर आहे कमी होईल." नंदाताई बोलुन रुममध्ये गेल्या.

ती रूममध्ये आली.मन खूप अस्वस्थ झाले होते.काहीच सुचत नव्हते. तान्हुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. छोटया हाताने तिचा ड्रेस पकडला होता.त्याचा स्पर्श अजून ही जाणवत होता.

"श्रेया!", आर्यनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती दचकली.

"हे... कुठल्या विचारात हरवली. ह....." आर्यनने तिला मागून मिठीत घेतले. ती फिरुन त्याच्या कुशीत शिरली.

"श्रेया जास्त विचार करू नकोस.तुझ्यासाठी आजचा अनुभव खूप वेगळा होता. तुला ते बेबी दिसले आणि त्याला घरही मिळाले आहे. मग का विचार करत आहेस?"आर्यन.

" अरे, नवजात बाळ आहे. त्या आईचा जीव कसा तयार झाला?" ती चिडून कंठ दाटून म्हणाली.

"तू असं कोणाला जज करू शकत नाही. आपल्याला पुढच्या व्यक्तीची मजबुरी माहीत नाही." आर्यन तिला समजावत म्हणाला.

"खरंच शेवटी ती पण एक आई आहे.तिचाही जीव तुटत असेल." श्रेया.

"ह....चल... उद्या सकाळी ऑफीसला जाताना बेबीला भेटून जाऊ." आर्यन.

तिचा चेहरा खुलला तिने हुंकार भरला आणि त्याच्या मिठीत विसावली.

★★★

सकाळी श्रेयानला स्कूलमध्ये पाठवले. आर्यन आणि श्रेया ऑफिससाठी रेडी झाले आणि आश्रमच्या दिशेने निघाले. श्रेयाला कधी छोट्या परीला दोन्ही हातात घेऊन कुशित कवटाळून घेते असे वाटत होते.मन अधीर झाले होते. गाडी थांबली. इकडे तिकडे बघत पटकन दरवाजा उघडून आश्रमामध्ये जाऊ लागली. आर्यनला थोडे नवल वाटले पण त्याने त्या गोष्टीला इग्नोर केले. कालपासून तिचा चेहरा बघून वाईट वाटत होते.कधी घरातले काम उरकून कधी बाळाकडे जाऊ अशी तिची ओढ जाणवत होती. आर्यनने गाडी पार्क केली आणि तिच्या मागे निघाला.

\"मालतीताई ....मालतीताई.... बेबी कुठे? "ती अडखळत बोलत इकडे तिकडे शोधू लागली.

"हा.... बाळाला आंघोळ घालत आहे तुम्ही बसा ना ताई."मालतीताई ऑफिसमधला फॅन चालू करत म्हणाल्या.

" बेबीला आंघोळ कुठे घालतात ?" श्रेया ऑफिसबाहेर जात म्हणाली.मालतीताई थोड्याशा गोंधळून बघू लागल्या.

"मॅडम, त्या रूममध्ये. "मालतीताई इशारा करत बोलल्या.ती धावतच निघाली.

एक बाई बाळाला तेलाने मालिश करत होती आणि तिचे ओठ काढून रडणे चालू होते. तिला बघुन श्रेया खुदकन हसली.
खूप काही मिळाल्याचा आनंद दिसत होता. "मावशी थोडे हळू लहान आहे." श्रेयाला तिचे रडणे बघवत नव्हते.

"अहो बाई ,अशीच असत्यात समदी लहान पोरं. त्यांना तर त्याल नको ना काय बी नको." मावशी हसत बडबड करत त्या बाळाला मालिश करत होती.

मावशीने त्या बाळाला उचलले आणि बाथरूममध्ये घेऊन गेली. हळू पायावर झोपवून आंघोळ घालू लागली. .पांढर्‍या कपड्यात बाळाला गुंडाळले. तिने पटकन हात पुढे केले आणि कुशीत घेतले. श्रेयाचा स्पर्श होताच बाळ डोळे अलगद उघडून तिच्याकडे बघत होते. हळूच अंगठा चोकत ओठ काढू लागले.

"हो...ना..ना...ना ,ओले ओले नाना.... माझ्या पिल्लूला काय झाले ,काय झाले माझ्या बाबुला...." श्रेया बाळाला बाहेर घेऊन येत बेडवर बसली.

"मावशी दुधाची बॉटल आहे ना तिला भूक लागली आहे ."श्रेयाने बाईकडे बघून सांगितले आणि मांडीवर बाळाला झोपवून मांडी हलवू लागली.

"श्रेया कुठेय?"आर्यन मालतीताईंना बघून इकडे तिकडे बघत विचारू लागला. त्याला कळलंच नाही आश्रमामध्ये आत आल्यावर कुठे गेली.

"सर ,त्या बाळाला आंघोळ घालत होते ना. त्या रूममध्ये आहेत या तुम्हाला दाखवते ."मालतीताई.

आर्यन विचार करत त्यांच्या मागे चालू लागला रूममध्ये येवून बघतो तर, श्रेया मांडीवर बाळाला घेऊन बसली होती. त्याला बॉटलने दूध पिऊ घालत बोबड्या भाषेत बोलत होती. त्याने टाईम बघितला लेट होत होता.

आर्यन बाळासमोर आला आणि थोडा झुकून बाळाशी गप्पा मारू लागला." हे पिल्लू ...."त्याने तिच्या गालाला हात लावला.

तिने लगेच ओठ काढले .श्रेया हसू लागली .

"आर्यन खूप झोप आली आहे. आता काहीच बोलू नको."
श्रेया मांडी हलवत म्हणाली.

"खूप क्युट आहे." आर्यन भावुक होत म्हणाला. खूप छान दिसत होती आणि आताच आंघोळ करून आली तर बेबी सोपचा सुगंध तिथे सर्वत्र पसरला होता.

"हो ना, मला पण खूप आवडली. किती सुंदर निरागस आहे!" बोलताना श्रेयाचे मन दाटून आले.

"श्रेया आपल्याला लेट होत आहे.बाळाला मावशीकडे दे." तो तिचे आल्यापासून सगळे हावभाव टिपत होता पण त्याला त्या गोष्टीला वाव द्यायचा नव्हता.

तसा तिचा चेहरा उतरला. तिला सोडून जाऊ वाटत नव्हते.

सौ. वैशाली मंठाळकर
क्रमश:
—--------------सौ. वैशाली मंठाळकर

—--------------

🎭 Series Post

View all