स्पर्धा माणुसकीची

Spardha


अग श्रेया बाळा तू तिला अजिबात मदत करू नकोस.. तुला फक्त जिंकण्याकडे लक्ष द्यायचे आहे, बाकी धावताना कोणी पडले तरी चालेल तू मात्र लक्ष द्यायचे नाही...
एक आई आपल्या मुलीला स्पर्धेत कसे जिंकायचे हे सांगत होती..

शिक्षक... अहो मुलीला चांगले शिक्षण द्या, सांगा स्पर्धा ही निकोप हवी हे मान्य आहे पण माणुसकीला डावलून नको......आणि तसे ही स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी...द्वेष निर्माण करण्यासाठी नाही...

त्या आईने त्या शिक्षेकेच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाहीच पण उलट मुलीला ही लक्ष देऊ दिले नाही....

ही आई मुलीला जेव्हा हे संस्कार देत होती तेव्हा इतर मुलींनी ते संस्कार नकळत अंगिकारले आणि त्यांनी ही मनोमन ठरवले...कोणी ही पडो..कोणाला आपली गरज लागो आपण ही स्पर्धेच्या मध्ये न थांबता पळत रहायचे...आपल्याला ही जिंकायचे हेच ध्येय आहे.. ती ट्रॉफी मिळावी हेच लक्ष आहे...

झाले मग काय आता स्पर्धा अटी तटीची होणार होती....त्यात टीचर चे म्हणणे ऐकणारी एकच मुलगी होती...तिनेच त्यांचे संस्कार अंगिकारले..आणि तिने स्पर्धेला सुरुवात केली..


इकडे स्पर्धा सुरू झाली मुली पळायला लागल्या..त्यात त्या आईच्या मुलीला पळता पळता ठेच लागली आणि जाऊन दगडावर खूप जोरात पडली आणि तिला खूप लागले..रक्त निघत होते...ती सगळ्यांना मदतीला बोलवत होती...पण इतर कोणी मुली थांबल्या नाहीत..करणं त्यांनी तिच्या आईचे संस्कार कळत न कळत ऐकले होते आणि म्हणूनच त्यांनी ठरवले होते आपण ही तिला मदत करायची नाही...कारण आपल्याला ती ट्रॉफी हवी आहे...


गम्मत कशी आपण आपल्या मुलांना जे संस्कार देतो तेच संस्कार कोणी तरी अंगिकारते आणि त्याचा अवलंब करत असते हे आपल्या गावी नसते... आणि मग त्या चुकीच्या दिलेल्या संस्कारांचे परिणाम आपल्या ला ही भोगावे लागतील हे माहीत नसते.. आणि तसेच झाले...
हे चुकीचे संस्कार आणि त्याचे बीज इतर मुलींनी ही आपल्या मनात रुजवले...

श्रेयाला मध्येच ठेच लागली पण कोणी ही तिची मदत केली नाही... ती किती तरी विनवण्या करत होती...पण तिच्या सोबत स्पर्धेत असलेल्या मैत्रिणी थांबल्या नाहीत...तरी तिला कळत नव्हते की ह्या आपल्याला मदत का करत नाहीत... एकीला तिने विचारले, "अग तू तर माझी बेस्ट friend आहेस तू तरी थांब.."

ती friend म्हणाली ,"अग तुझ्याच तर आईने सांगितले होते ना ,किती ही बेस्ट friend असो, ती पडली, तिला लागले आणि ती थांब म्हणाली तरी तू मात्र थांबायचे नाही, तू तुझे ध्येय विसरायचे नाही..तू थांबली की तुझी ट्रॉफी तू गमावलीस समज...मग तू मागे राहशील...आणि ते होऊ देता कामा नये...मग मी ही काकुंचे ऐकले आणि म्हणून मी ही थांबणार कोणासाठी मग ती किती ही बेस्ट friend असो..., मला माझी स्पर्धा महत्वाची आहे.. ट्रॉफी महत्वाची आहे.....मग मी का थांबू तुझ्यासाठी..मी का मागे राहू.."


त्या मैत्रिणीच्या बोलण्यावर तिला आठवले ,आपल्याच आईने आपल्याला हे असे सांगितले होते, पण ती विसरली होती की आपल्यावर ही अशी वेळ येऊ शकते.. आपली मुलगी ही पडू शकते, तिला ही कोणाची मदत लागू शकते...मग जर तिला मदत लागली तर इतरांकडून आपण का मदतीची अपेक्षा करावी...मग त्यांनी ही का मदत करावी... का त्यांनी मला मदत करताना मागे रहावे...


तितक्यात सगळ्यात मागे पडलेली सिद्धी हळूहळू पळत होती, तिला स्पर्धेत कधीच जिंकता आले नव्हते.. पण तरी ती आवर्जून भाग घेत असत..तिला श्रेया खाली पडलेली दिसली..ती खूप रडत होती...पण तिला तिच्या पुढे गेलेल्या कोणत्याच मैत्रिणीने मदत केली नव्हती..

सिद्धी हळूहळू पुढे धाप टाकत तिच्या कडे आली आणि तिने तिला हात धरून उठवले आणि तिला बाजूला बसवले...कोणाकडून तरी पाणी मागवून तिला पाणी दिले...थोडा वेळ थांबून तिने श्रेयाचा हात पकडला आणि तिला पकडून घेऊ येत होती..

श्रेयाला तिने पकडले होते कारण ती चालू शकत नव्हती...तिने सगळा आपला बोज सिद्धीवर टाकला होता. लांबून येणाऱ्या दोघींना पाहून श्रेयाची आई बघत होती...तिला काही कळत नव्हते हे नेमके काय आहे... तिला आधीच श्रेयाचा खूप राग आला होता कारण तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या पुढे जिंकत आल्या होत्या आणि ही मागे पडली होती...आणि मी जे सांगितले त्याच्या अगदी विरुद्ध वागली होती..किती ही सांगा ती आपला चांगुलपणा सोडणार नाही हे माहीत होते.. म्हणूनच तिला मी लाख बजावून सांगितले तरी तिने माती खाल्ली आणि त्या सिद्धीला मदत केली आणि मागे पडली..मूर्ख कुठची...समाज सेवा करत बसली..आणि हारली त्या सिद्धीमुळे...

त्या दोघी आता सगळ्यांच्या दिशेने चालत आल्या तशी श्रेयाची आई तिला बघून खूप चिडली...ते पाहून श्रेयाला खूप रडू आले..एकीकडे पायाची वेदना तिला उभे राहू देत नव्हती...आणि एकीकडे सिद्धीने अजून ही तिला मोकळे सोडले नव्हते..तिला तिच्या वेदना समजत होत्या.. परंतु तिच्या आईला त्याचे काहीच वाटत नव्हते.. तिला वाटले की सिद्धीला लागले आहे आणि ती पडली आहे आणि आपल्या मुलीने तिला मदत केली..आणि म्हणून आईने तिला काय झाले कसे झाले हे ही साधे नाही विचारले......


श्रेया आता आईला जोरात ओरडली.. आई तुला कळत कसे नाही, सिद्धीला लागले नाही तुझ्या लेकीला लागले आहे आणि तुझी लेक खाली ठेच लागून पडली आहे...आणि तुझ्या संस्कारा प्रमाणे माझ्याच मैत्रिणी मला मदतीला आल्या नाहीत.. आणि सिद्धीला माझी दया आली आणि ती मला मदतीला आली.. ती माझे ओझे घेऊन इथपर्यंत आली...तिला स्पर्धेपेक्षा मी महत्वाची वाटले... आज ती जिंकणार होती पण तिला वाटले इथून मागे ही मी कितीदा हारले होते ह्या वेळी ही सही.. पण मी माझ्या मैत्रिणीला मदत करणार...आणि तू समजतेस की मी तिला मदत करून स्पर्धा हारले... आणि तू साधे विचारले ही नाहीस काय झाले का तू तिला धरून आणले आहेस...


आईला आता आपल्या लेकीला लागलेली जबर ठेच पाहून दुःख झाले, आणि तिने तिला हात दिला, आणि बसवले...सिद्धी ची माफी मागितली, आणि तिचे खूप खूप धन्यवाद मानले..
माझे संस्कार खूप चुकीचे होते म्हणून ते फिरून माझ्याच नशिबात आले... मी समजायला हवे होते स्पर्धा निकोप हवी होती...मदतीची हवी होती...


हे प्रकरण पाहून टीचर पुढे आली आणि तिने सिद्धी चे खूप कौतुक केले,तिला शाबासकी दिली.. तिच्या ह्या चांगुलपणा बद्दल प्रिंसिपल यांना ही सांगितले... सिद्धीच्या ह्या गुणांचे सगळीकडे खूप कौतुक झाले.... ज्यांनी स्पर्धा जिंकली तिला बक्षिस न देता ह्या वेळी हे खास बक्षीस सिद्धीला देण्यात आले....


कथा कशी वाटली ...
त्यात शिकण्यासारखे असे बरेच होते असे वाटते का...