Oct 21, 2020
स्पर्धा

स्पर्धा परीक्षा एक संघर्ष

Read Later
स्पर्धा परीक्षा एक संघर्ष

आज अभ्यासिकेतील सर्व मूलं मुली खूप खुश आणि धावपळीत होते त्याचे कारण पण तसे खास होते ते म्हणजे एका महिलेचा म्हणजे रुपलीचा  होणारा सत्कार जिने सर्व गोष्टी सांभाळून बँक अधिकारी पद मिळवले होते व सत्कारासाठी मुख्य पाहुने म्हणजे रुपालिचे सासूसासरे व मिस्टर
          आज पण आठवतो तो दिवस

     ""आज जरा उशीर च झाला लायब्ररी मध्ये पोचायला धावपळ करत पोचली व जागा मिळाली त्याचे समाधान  लाभले तस अभ्यासिके मध्ये बऱ्याच मुली अभ्यासा साठी येत असल्याने जागा मिळवण्याची देखील स्पर्धा च आहे असे म्हंटले तरी काही वावगे ठरणार नाही.
     अश्या प्रकारे जागा मिळाल्यावर अभ्यासाचा एक टप्पा झाला तेव्हा दिसले अनेक नवीन मुली काही लग्न झालेल्या महिला  अभ्यासिकेत ऍडमिशन घेन्या साठी आलेल्या होत्या.. दुसऱ्या दिवशी नवीन आलेल्या महिला मुलींची संख्या वाढली त्याच प्रकारे जागेसाठी देखील आता स्पर्धक निर्माण झाले पण सर्वांचं एकच ध्येय असल्याने सर्वांनी सोबत पुढे जाणे एकमेकांच्या हिताचे होते त्यामुळे सर्व जणी ऍडजस्ट करून दाटीवाटीने बसू लागल्या..
   त्यात  काही  लग्न  झालेल्या महिला तसे महिला च म्हणता येणार नाही कारण त्यातल्या अनेक  मुलींची लग्न  त्यांची स्वप्न बाजूला ठेऊन  घरच्यांनी लवकर च करून दिलेले असल्याने आज त्या महिला म्हणून का होईना पण आपले स्वप्न पूर्ण व्हावे ह्या हेतूने अभ्यासिकेत येत होत्या.. काही दिवसात त्यांची ओळख झाली.     कोणी लहान मुलाना घरी ठेऊन, काही नव विवाहित मुली घरकाम आवरून, एकच उद्देशाने अभ्यासिकेत येत होत्या ते म्हणजे स्वतःच राहिलेलं स्वप्न, सरकारी नोकरी मिळवणे स्वतःच्या पायावर उभे राहणे हा एकच उद्देश
   एके दिवशी असेच अभ्यास करतांना रुपालीकडे लक्ष गेले तर डोके पुस्तकात परंतु डोळे अश्रूंनी भरलेले ..काय करावे सुचेना विचारावे कि नाही अशी मनाची द्वंद्व स्थिती झाली शेवटी थोडा वेळात न राहवून जेवणाच्या बहाण्याने बाहेर बोलवून स्पष्ट् च विचारले ,मात्र ती काही बोलेना पण खूप आग्रह केल्यावर तिचा अश्रूंचा बांध फुटला व ती हमसून रडू लागली ... तिला मन मोकळे रडू दिल्यावर ती सांगू लागली ते ऐकून मात्र खूप वाईट वाटले
  ती सांगू लागली तिने एवढे शिक्षण घेतले तर ते म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, सक्षम होण्यासाठी मात्र घरच्यांनी डिग्री पूर्ण होताच लग्ना चे ठरवले.तेथे तिचे चालले नाही आणि मुलगा पण शिकलेला असल्याने  तिने आढेवेढे न घेता होकार दिला..पण एका अटीवर ते म्हणजे  पुढचं शिकण्यास परवानगी आणि नंतर जॉब..नवऱ्या ने देखील आपल्याच संसारासाठी आहे असे म्हणून होकार पटकन होकार दिला.
       काही दिवसात लग्न झाले लग्ना नंतर काही दिवस घरी घालवल्यावर सर्व रुटीन व्यवस्थित बसल्यावर तिने नवऱ्या जवळ तिचा विचार बोलावून दाखवला तो म्हणजे पुढे बँकिंग चा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवावी.. कारण तिला गाणिताची आवड असल्याने,महिलेला ती नोकरी सोयीस्कर असल्याने तिने सर्व विचारा अंती हा निर्णय घेतला होता.. तिच्या नवऱ्याने देखील  होकार दिला.. पण आता प्रश्न होता सासरच्या मंडळींचा.. पण दोघांना वाटले की घरचे हो म्हणतील म्हणून ते निवांत होते.
     दुसऱ्या दिवशी त्त्यांनी त्यांचा विचार घरी बोलावून दाखवला सासरे हो म्हणताच सासू बाईंनी सुनावले कीं अजिबात नाही घरकाम कोण करणार ,आल्या गेल्या पाहुण्यांच कोण बघणार। मला आता काम होत नाही वगैरे वगैरे... यातून एकच की सासुबाईंचा स्पष्ट नकार होता...रुपलीने आता आशेने नवऱ्याकडे बघितले पण तो हि शांत.तो आईच्या शब्दा बाहेर नव्हता ..आता मात्र रुपाली ला खूप राग आला ती तावतावात रूम मध्ये गेली... तिच्या नवऱ्याने तिला समजावले कि आपण काहीतरी मार्ग काढू पण कधी हा तिचा प्रश्न ज्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते ...असेच काही दिवस घरी जात होते... एके दिवशी रुपाली लवकर उठली.. सर्व काम आवरून तयार झाली व सरळ ऐकवले मी घरातील सर्व काम आवरून 10 ते 6 अभ्यासिकेत जाणार..कारण घरी एवडा वेळ अभ्यासला मिळणार च नव्हता.. कारण सासूबाईंना आवडत च नसे तिने पुस्तक घेऊन बसणे,...  त्याचं एकच कीं बाईने घरातील काम  वगैरेआवरावे दिवसभर ..हे अभ्यास नोकरी बाई ने केलीच पाहिजे असे नाही... पण त्यांचे विचार आणि सुनेच्या विचारात जमीन अस्मानाचा फरक होता ..ती निघताच घरात एकच गोंधळ सुरु झाला ...मला न विचारता माझ्या परवानगी शिवाय जाते च कशी.. पण ध्येयाने पछाडलेली रुपाली ऐकेल तरी कशी... कारण ती तिचे कर्त्यव्य सांभाळून तीचं ध्येय गाठणार होती .. त्या दिवशी घरात पूर्ण वातावरण ढवळून निघाले...कोणी कोणाशी बोलेना रुपाली आपल्या वेळेत येऊन सर्व स्वयंपाक आवरून सर्वांना बळजबरी जेवायला वाढले... पण सासु बाई तोऱ्यात च होत्या... असेच दिवसामागुन दिवस कसे तरी जात होते...रुपाली आपला अभ्यास घरातील कर्तव्य यात अजिबात कसूर ठेवत नव्हती. तिच्या नवऱ्याचा आणि सासर्ऱ्यांचा तिला छुपा पाठिंबा होता..त्या बळावर तिला अभ्यासाला हुरूप येत होता व तीने काही दिवसात परीक्षेचा पहिला टप्पा पार केला...अत्यंत अवघड अश्या परीक्षेत तीने प्रथम टप्पा पार केला हि खूप मोठी गोष्ट होती..पण अजून प्रमुख उद्दीदष्ट गाठायचे होते ..तिचा जोरात अभ्यास सुरू होता ....सासूबाईंच्या कोणत्याही वागण्याचा ती परिणाम करून घेत नव्हती... पण आज खूप दिवसात अचानक ती रडली कारण तिला दुसरा टप्पा गाठण्यासाठी अधिक मेहनतीची गरज असतांना सासू बाईंचे अनेक नाटक सुरु झाले ..
     एवढे दिवस झाले अभ्यास,,आज काय उशीर च झाला,कधी काय हे नाही नीट केले ते नाही केले....यामुळे ती आता मानसिक खचत चालली होती....नवऱ्याचा पाठिंबा होता पण तो उघडपणे आईला बोलहीं शकत नव्हता...त्यामुळे तिची सर्व परिस्थिती संभाळतांना दमछाक होत होती...मुख्य परीक्षा आता तोंडावर असल्याने तिला जास्त अभ्यास एकाग्रतेची गरज होती व सासू बाईच्या अश्या वागण्याने ती दुःखी होऊन आज तिचा बांध फुटला व ती पुस्तक वाचत वाचता  रडू लागली.. तिची सर्व कहाणी ऐकून मैत्रिणींना देखील दुःख झाले व आपल्याला एव्हडी  मोकळीक असून आपला अभ्यास रुपाली पेक्षा कमी यामुळे त्यानां स्वतःची लाज देखील वाटली..पण त्या क्षणी सर्वांनी तिला पाठबळ दिले,मानसिक आधार दिला व ती पास होऊ शकते याबाबद्दल तिच्या अभ्यासावर विश्वास दाखवून रुपाली च मानिसक दडपण दूर केले..
      आता रुपाली जोमाने घर अभ्यास सर्व नीट सांभाळत होती .... अभ्यासाची वेळ वाढून तिचा जोरदार अभ्यास चालू। होता..काहीच दिवसात तिची मुख्य परिक्षा पार झाली ती मुलाखतीला पात्र झाली काहीच दिवसात मुलाखत झाली,. व तिला पूर्ण विश्वास होता आपण पास होणार...आपण अधिकारी होणार आणि काहीच दिवसात निकाल आला ती अधिकारी झाली....तिचा पेपर ला फोटो आला आता मात्र सासूबाईंना स्वतःच्या वागण्याची लाज वाटली  तिने सर्व जबाबदाऱ्या पार पाडून  अधिकारी झाली इतके यश कौतुक मिळवले याचा खूप आनंद झाला व त्यांना देखील पटले आज मुलींनी शिकून फक्त चूल आणि मूल पेक्षा घरातील जबाबदाऱ्या संभाळून जर आपलं स्वप्न, ध्येय पूर्ण केले तर त्याच सर्वांना च कौतुक राहील
( कथा काल्पनिक असून वास्तवाशी संबंध नाही..)