सोयीचं नातं-4 अंतिम

सोयीचं नातं
"आजीच्या बोलण्याला बळी पडू नकोस, आजीचा हेतू आहे की तुला लग्नातुन मोकळं करायचं आणि तुझ्या आतेभावाच्या गळ्यात मारायचं.."

श्रियाला ते पटत नव्हतं, कारण इतक्यात तिच्या बोलण्याला दुजोरा देणारी फक्त तिची आजी असल्याने तिला तीच जवळची वाटू लागलेली.

आईला आता भीती वाटू लागली होती. मग आईनेच मार्ग काढला,

आईने अरुणला बोलावलं आणि समजावलं,

"हे बघा अरुण, तुमच्या या वागण्याचा माझ्या मुलीला खूप त्रास झालाय, तुमच्या आईच्या बोलण्याने ती मानसिक त्रासातून जातेय, याची कल्पना आहे का तुम्हाला??"

"आई माझीही तीच अवस्था आहे, पण तुम्हीच सांगा आई आणि बायको यात एकीला जरी झुकतं माप दिलं तर दुसरी रागावते, तुम्हीच सांगा, तुमच्या मुलाने तुम्हाला दुखावलं तर चालेल का? आणि नवऱ्याने दुखावलं तर कसं वाटेल?"

श्रियाच्या आईला अरुणचा समजूतदारपणा आवडला, आईने त्याला सल्ला दिला..

"तुम्ही आईला ठणकावून सांगा की माझी बायको जॉब करेल, घरातल्या कामांना बाया लावून देतो.. आणि श्रियालाही सांगा की माझ्या आईशी उद्धटपणे वागायचं नाही.."

"ती कधी उद्धटपणे वागलीच नाही, माझी आईच..."

अरुण थांबला, त्याला जाणीव होती...त्याने माफीही मागितली.

"अरुण, तुम्ही खरंच प्रामाणिक आहात म्हणून तुमची चूक कबूल करताय...पण अजून एक संकट आहे.."

असं म्हणत आईने अरुणला आजीच्या हेतूबद्दल सांगितलं... अरुणला धक्का बसला...

"श्रियाचं आयुष्य मी असं बरबाद होऊ देणार नाही..."

असं म्हणत तो श्रियाकडे गेला, त्याने रीतसर माफी मागितली. यापुढे असं होणार नाही अशी हमी दिली.

शेवटी नवरा बायकोच ते, एक होणारच...श्रिया आनंदाने सासरी परतली. अरुण ने त्याच्या आईला ताकीद देऊन ठेवली असल्याने आईचं नाक खुपसनं बंद झालं आणि दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला.

कधी कधी दोन लोकांचं लग्न केवळ समाजाच्या अथवा वैयक्तिक स्वार्थापोटी लावून देण्याचा प्रयत्न होतो. त्यातही खास करून स्त्रियांचा आपल्या मुलीच्या संसाराकडे ओढा जास्त. मुला मुलींनी वेळीच सावध झालेले बरे.

समाप्त

🎭 Series Post

View all