सोयीचं नातं-3

सोयीचं नातं
आजीने जसा हा विषय काढला होता तसं श्रिया आणि तिच्या आई वडिलांनी साफ नकार दिलेला. आजीला काहीही करता आलं नाही, श्रियाचं लग्न थाटामाटात अरुणसोबत झालं.

तिकडे तिच्या आतेभावाने सुद्धा एक मुलगी पाहून लग्न केलं, पण त्याच्या टुकार वागण्याने ती दोन महिन्यातच सोडून गेली. घटस्पोटाचा अर्ज करून त्यांची काही महिन्यातच फारकत झाली.

श्रिया माहेरी आल्यावर मात्र आता आजीला आयतं कोलीत मिळालं. आपला नातू तिकडे असा घटस्फोटित आणि इकडे श्रिया माहेरी आलेली. श्रियाला तिच्या नवऱ्याबद्दल भडकवून तिला पटकन मोकळं करून आपल्या नातवासोबत लग्न लावून द्यावं असा तिने चंग बांधला.

तिकडे आत्याला आशा लागली, श्रिया सून म्हणून येईल, आपल्या मुलाला आणि त्याच्या चुकांना पोटात घालायला हक्काचं माणूस मिळेल या आशेवर आत्या आजीच्या संपर्कात राहू लागली.

"जगात इतके नवरे पाहिले पण अरुण सारखा हरामी नाही पाहिला, आणि त्याची आई माणूस आहे की हैवान? सुनेला अशी वागणूक देतात का??"

श्रिया अश्या मनस्थितीत होती की तिला आजीचं सगळं बोलणं पटू लागलं. ती आजीच्या जवळ जाऊ लागली. आजीचा डाव होताच की आधी हिला मोकळं करायचं आणि मग हळूच नातवाशी लग्न करायला भाग पाडायचं..श्रियाला आजीच्या या हेतूची कल्पनाच नव्हती.

श्रियाचे आई वडील तिच्याशी बोलायला आले, तिला समजावलं..

"हे बघ बाळा, प्रत्येक घरात खटके उडतच असतात...पण म्हणून संसार मोडायचा नसतो. तुझ्या सासूबाईंची चूक तर आहेच, पण संसार नवऱ्यासोबत करायचा असतो. अरुण बाबत तुझी काही तक्रार आहे का? तो तुला कशाला रोखतो का? तुला मानसिक शारीरिक त्रास देतो का?"

श्रियाने विचार केला, अरुण खरंच चांगला होता... केवळ आणि केवळ सासूबाई मध्ये आल्याने त्यांच्यात खटके पडत होते. पण सासूबाईंचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा आणि ती परत जायला नाहीच म्हणायची.

एकदा आईने श्रियाला आणि आजीला बोलताना पाहिलं, आईच्या लक्षात आलं की आजी श्रियाला तिच्या सासरच्यांबद्दल भडकवत आहे. आईला आजीचा हेतू लगेच लक्षात आला. आईने श्रियाला बाजूला घेतलं आणि समजवलं,

🎭 Series Post

View all