Jan 23, 2022
सामाजिक

सौभाग्यवती 7

Read Later
सौभाग्यवती 7

आपण मागील भागात पाहिले की सागरच्या मृत्यू नंतर सुमन पूर्ण कोलमडून गेली होती.. सुमनचे आईबाबा तिला पुनर्विवाहाविषयी विचारतात.. ती साफ नकार देते.. सुमनने तिच्या सासरीच राहण्याचा निर्णय घेतला.. आता पुढे..

सागरच्या मृत्यू नंतर लगेचच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.. त्यामुळे सगळे घरच कोलमडून गेले.. त्यानंतर कोणी सुमनशी व्यवस्थित वागत नव्हते.. सुमनची सासू तर तिला अपशकुनी, पांढर्या पायाची म्हणून सारखं हिणवत असे.. उठता बसता टोचून बोलत असे.. एका पाठोपाठ एकाच गिळत आहे.. औदसा कुठली.. असेही ती बोलत होती.. पण सुमन एक शब्दही उलटून बोलत नव्हती..

एक दिवस सुमन आणि तिच्या दोन्ही मुली.. इतकेच घरी होते.. सुमनची सासू आणि जाऊ दोघीही काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.. सुमन तिच्या कामात व्यस्त होती.. तिचे काम लवकर आवरून मुलींना घ्यायचं असा विचार तिच्या मनात चालू होता.. त्यासाठी ती भराभर आवरत होती..

इतक्यात तिचा दिर मागून आला आणि तिचा हात पकडला.. सुमन खूप घाबरली.. आणि सावधपणे तिने त्याचा हात झटकून ती बाजूला झाली.. आता ती आणखीनच सावध झाली.. आणि मुलींना आपल्या जवळ ओढले..

"काय झालं?? घाबरतेस का?? घाबरू नकोस.." दिर

"चला ग मुलींनो.." असे म्हणून ती मुलींना घेऊन जात असते.. इतक्यात तो आवडतो..

"माझं ऐक.. मी तुला आणि तुझ्या मुलींना सुखात ठेवेन.." दिर

"तुम्ही काय बोलताय कळतय का??" सुमन

"हो.. कळतय की.. मी तुला जे हवे ते देईन.. फक्त एका अटीवर.." दिर
बाहेरच्या मोकाट लांडग्यापासून वाचायचे कसे?? हा प्रश्न असतानाच घरातल्या लांडग्यांची चांगलीच शेफारली होती.. त्यातून तिला कसे वाचवायचे?? ती कसे काय करणार?? असा प्रश्न येतोच..

"अहो मी तुमची वहिनी आहे.. भावाची बायको.. असा विचार सोडा.. तुमची बायको आहे.. सुखाने संसार करा.." असे एक ना अनेक गोष्टी तिने त्याला समजावून सांगितल्या.. पण त्याला काही पटेल तर ना.. त्यात तो दारूच्या नशेत होता.. त्यामुळे त्याला दुसरं काही दिसतंच नव्हतं.. वासनेची पट्टी डोळ्यावर असल्याने त्याला नाती पण समजत नव्हती..

तो तिच्या जवळ येत असलेले बघून सुमनने फ्लाॅवर पाॅटने त्याच्या डोक्यात मारली.. तो नशेत असल्यामुळे तिथेच पडला.. मग सुमन रूममध्ये जाऊन तिची बॅग भरते.. तिचं सगळं सामान घेते.. आणि मुलींना घेऊन घराला बाहेरून कडी घालून निघून जाते.. कायमची..

सुमन तिच्या माहेरी जाते.. ती गेल्यावर तिची सासू आणि जाऊ दोघीही घरी येतात.. तोपर्यंत सुमनचा दिर पडलेलाच असतो.. घरात सुमनही कोठे दिसत नाही.. त्यांना थोडाफार अंदाज येतो.. पण त्या सुमनला शोधायचा प्रयत्न करत नाहीत.. औदसा घरातून गेली बरं झालं असे त्या म्हणत होत्या..

इकडे सुमनच्या माहेरी ती अचानक आली म्हणून तिचे आईबाबा खूप घाबरले.. पण तिने त्यांना काहीच सांगितले नाही.. ती त्यांचा मान राखण्यासाठी तिथे आली आहे असे सांगितले.. सुमन आता तिच्या माहेरी राहू लागली..

काही दिवसांनी सुमनचे बाबा हार्ट अटॅकने गेले आणि काही वर्षांनी तिची आई.. आता सुमन एकटी पडली होती.. तिला कोणीच आधार द्यायला नव्हतं.. ती पूर्णपणे कोलमडून गेली होती.. घरी तिचा भाऊ वहिनी आणि त्यांची मुलेही होती.. सगळं व्यवस्थित होईल असा विचार करत असतानाच एक दिवस तिचा भाऊ ऑफिसला गेल्यावर तिची वहिनी तिच्या आईला फोनवर सांगत होती..
"अगं आई, काम करणारा एकटा आणि खाणारी तोंडे जास्त.. त्या एकट्याने किती म्हणून करायचं ग.. आमचा पण संसार आहे की नाही.. काम करून करून किती हाल होत आहेत त्यांचे.. काय करायचं सांग बघू आता.." वहिनीचे हे वाक्य तिच्या कानावर पडतात.. आणि ती मनातून ढासळली..

आता इथे राहून काही उपयोग नाही असे तिला जाणवले.. ती खूप निराश झाली.. तरीही तिने मनाशी ठरवलं की आता कुणाच्या जीवावर रहायचं नाही.. आपला भार आपणच उचलायचा.. कितीही काहीही झाले तरी कुणाच्या दारात जायचे नाही.. आपण कायम स्वाभिमानी रहायचे ठरवले.. आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे.. कुबड्यांचा आधार घेण्यापेक्षा स्वावलंबी जीवन कधीही श्रेष्ठच..

मग सुमन तिचे सामान घेऊन जायला निघाली.. ती जाताना तिचा भाऊ तिला अडवतो..
"अगं सुमन, कुठे चाललीस? आमचं काही चुकलं का??" भाऊ

"नाही रे दादा, उलट आईबाबांच्या नंतर तुच तर सहारा आहेस.. पण असे किती दिवस मी कुबड्या घेऊन चालणार.. एक ना एक दिवस माझं मला हात पाय हालवावे लागेलच ना.." सुमन

"अगं पण काय गरज आहे?? मी आहे ना.. आणि तू कुठे जाणार?? बाहेरचं जग खूप वाईट आहे.. त्यात तुला कुणाचा आधार नाही.. कसे करणार तू??" भाऊ

"अरे पाण्यात पडले की हातपाय हलवायलाच लागतं आणि माणूस आपोआप पोहायला शिकतोच.. बघू काय होतंय ते??" सुमन

"तू ऐकणारच नाहीस का??" भाऊ

"तसे समज.." सुमन

"बरं ठिक आहे.. पण कधीही गरज लागली तर हा भाऊ कायम तुझ्या पाठीशी आहे.." भाऊ

"हो रे.. बरं निघते आता.." असे म्हणून सुमन घराबाहेर पडते.. कायमची.. स्वावलंबी बनण्यासाठी..

दोन्ही मुलींना घेऊन ती एका भाड्याच्या घरात रहायला आली.. तिथून ती नोकरीच्या शोधात बाहेर पडली.. आता मुली पण थोड्या मोठ्या झाल्या होत्या.. त्यामुळे त्या घरी राहू शकत होत्या.. काही दिवसांनी सुमनला नोकरी मिळाली.. ती आता नोकरीला जाऊ लागली.. तिने मुलींनाही शाळेत घातले.. सुमनच्या मुली हळूहळू शिकू लागल्या.. तिला महिन्याला पगार मिळत गेला.. ती खर्चाबरोबरच बचतही करू लागली..

तिच्या शेजारी राहणारी मीना काकू सुमनला खूप माया करायची.. त्या काकूला मुली नसल्याने त्या सुमनलाच मुलगी मानत असत.. सुमनच्या जडणघडणीत त्यांचाही मोलाचा वाटा आहे..

हळूहळू सुमन रूळत होती.. सगळं व्यवस्थित चालू होतं.. मुली पण आता मोठ्या होत होत्या.. सुमनने स्वतःचा एक फ्लॅट विकत घेतला.. ती नविन सोसायटीत राहायला गेली.. तिथे गेल्यावर ती तिचे काम भले ती भले असेच चालू होते.. ती इतर बायकांमध्ये मिसळत नव्हती.. त्यामुळे बायका तिला नावं ठेवत असत.. त्यांना एक नविनच चर्चेला विषय मिळाला होता..
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..