Jan 23, 2022
सामाजिक

सौभाग्यवती 4

Read Later
सौभाग्यवती 4

आपण मागील भागात पाहिले की सागर आणि सुमनची मैत्री छान खुलत होती.. त्यांनी स्नेहसंमेलनात नवरा बायकोचा रोल केला होता.. सागरला नोकरी मिळते आणि तो सुमनला प्रपोज करतो.. सुमनचा पण होकार मिळतो.. आता पुढे..

आज सकाळी सागर लवकरच उठला.. कारण त्याला ऑफिसला जायच्या आधी सुमनच्या बाबांना भेटायचं होतं.. सुमनला लग्नासाठी मागणी घालायची होती.. त्यांना सगळं सांगूनच मग तो त्याच्या घरी सांगणार होता..

दोन्ही घरची आर्थिक परिस्थिती सारखीच होती.. मध्यमवर्गीय होते.. सागर निर्व्यसनी आणि एक होतकरू मुलगा होता.. काहीतरी करून दाखवायची जिद्द होती त्याच्यात.. त्यामुळेच तर तो सुमनला आवडत होता..

सागर त्याच सगळं आवरून सुमनच्या घरी जायला निघाला.. सागर सुमनच्या घरी गेल्यावर तिच्या बाबांची परवानगी घेऊन आत जाऊन बसतो..
"कोण आपण??" सुमनचे बाबा

"नमस्कार.. मी सागर.. नोकरी करतो.. मला चांगला पगार आहे.. घरी आईबाबा भाऊ वहिनी आणि मी असा परिवार आहे.." सागर त्याची माहिती देतो..

"हं मग.." सुमनचे बाबा

"माझं तुमच्या मुलीवर सुमनवर खूप प्रेम आहे.. तिच्याशी लग्न करायचं आहे.. त्यासाठी मी मागणी घालायला आलो आहे.." सागर

"काय?? तुझी हिम्मत कशी झाली?? माझ्या घरी येऊन मला हे बोलायची.." सुमनचे बाबा

"अहो काका, माझं ऐकून तरी घ्या.." सागर

"मला काही एक ऐकायचं नाही.. चालता हो माझ्या घरातून.." म्हणून त्यांनी सागरला अक्षरशः हाकलून दिले.. आणि सुमनला घराबाहेर पडायचे नाही अशी ताकिद दिली.. झालं आता पुढे काय?? असा प्रश्न निर्माण झाला..

पण सागर गप्प बसणारा नव्हताच.. त्याने त्याच्या घरी सुमनबद्दल सगळं सांगितलं.. त्याच्या घरी काहीच अडचण नव्हती.. मग त्याने मेघनाला हाताशी घेऊन सुमनला एक चिठ्ठी पाठवली..

प्रिय सुमन.. जर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील आणि माझ्याशी लग्न करणार असशील तर तू माझ्यासोबत ये.. मी तुला कसलाही धोका देणार नाही.. तुला फुलासारख जपेन.. तुझ्या आई बाबांची काळजी करू नकोस.. लग्न झाल्यावर थोड्या दिवसांनी त्यांचा राग निवळेल.. मग ते आपलं नातं मान्य करतील.. जर तुझा होकार असेल तर मेघना सांगेल त्याप्रमाणे तू कर..

ही चिठ्ठी वाचून सुमन विचार करू लागली.. एकीकडे तिचे आत्ताचे प्रेम आणि दुसरीकडे ज्यांनी जन्म दिला त्या जन्मदात्याचे प्रेम.. काय करावं काहीच कळेना.. रात्रभर तिला झोप नाही.. फक्त आईवडीलांचा आणि सागरचा विचार तिच्या मनात घोळत राहिला..

सकाळी ती थोडी झोपली.. पण परत लगेच उठली.. रात्रभर जागरण झाल्यामुळे तिला पित्त झाले होते.. त्यामुळे तिला थोडी चक्कर येऊ लागली.. औषध घेऊनही फरक पडेना म्हणून ती नुसता पडून राहिली.. थोड्या वेळाने तिचे बाबा येतात..
"काय झालं बाळ?? बरं वाटतं नाही का??" सुमनचे बाबा

"हो.. बाबा.. थोडं पित्त झालंय.." सुमन

"गोळ्या घेतल्यास ना.. आता आराम कर.. म्हणजे तुला बरं वाटेल.." सुमनचे बाबा

"हो बाबा.." सुमन
सुमनचे बाबा जात असतात.. तेवढ्यात सुमनने परत हाक मारली.. "बाबा.."

"बोल बाळ.." सुमनचे बाबा

"मी तुमच्या मनाविरुद्ध काही करणार नाही.. मला तुम्ही हवे आहात.. पण......" असे म्हणून सुमन रडू लागली..

"मला माहित आहे बाळा.. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे.. मला हेही माहिती आहे की तुझे त्या मुलावरही खूप प्रेम आहे.." सुमनचे बाबा

"हो बाबा.. प्लीज माझं ऐकाल.." सुमन

"हो.. मी तुझं त्या मुलाशी लग्न करून देणार आहे.. मी त्याची सगळी माहिती काढली आहे.. तो मुलगा खरंच चांगला आहे.. तुझ्यासाठी योग्य आहे.. तू त्याच्यासोबत खूश राहशील.." सुमनचे बाबा

"काय??" सुमन

"हो.. त्यांना बोलणी करायला बोलव.. आम्ही तयार आहोत म्हणून सांग.." सुमनचे बाबा

"हो बाबा.." सुमन

सुमन सागर आणि त्यांच्या घरच्यांना बोलावते.. त्याच्या घरचे सगळे येतात.. लग्नाची बोलणी करतात.. मग काय लग्न ठरत.. आणि सुपारी फुटते..

सुमनच्या हातावर सागरच्या नावची मेहंदी लागते.. मेहंदीचा रंग छान खुलून येतो.. त्यातूनच सागरचे प्रेम म्हणून सगळे सुमनला चिडवू लागतात.. आणि सुमन हळूच लाजू लागते..

नवरी नटली हळद लागली.. सुमन सागरची सौभाग्यवती होण्यासाठी तयार झाली.. त्या भरजरी शालूमध्ये तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते.. त्यात हिरवा चूडा म्हणजे सौंदर्यात आणखीच भर.. सुमन नवरीच्या रूपात सुंदर दिसत होती.. जणू स्वर्गातील अप्सराच.. सगळे तिच्याकडे बघतच होते.. सागरची पण अवस्था काही निराळी नसते.. तो तर आणखीनच तिच्या प्रेमात पडला..

सात फेरे झाले.. दोघांनीही सात जन्म एकत्र राहण्याचे जणू वचनच दिलं होतं.. त्या सात फेरीत एकमेकांच्या साथीने सारं आयुष्य घालवायचं वचन दिलं होतं.. एकमेकांना आनंदात ठेवण्यासाठी, सुखदुःखात सहभागी होण्यासाठी, प्रेमाचे नाते टिकवण्यासाठी त्यांनी वचन घेतलं होतं..

लग्न व्यवस्थित पार पडले.. आणि सुमन आता सौभाग्यवती सुमन झाली.. सागरची सौभाग्यवती.. सर्वांनी तिला सौभाग्यवती भव म्हणून आशिर्वाद दिले.. सुमन आणि सागरचे स्वप्न आज पूर्ण झाले.. त्यांच्या नात्याला एक नाव मिळाले.. नवरा आणि बायकोच नातं.. एक विश्वासाच.. अखंड सौभाग्याच.. जे कधीच कोणीच तोडू न शकणार असे नातं..
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..