सॉरी बेटा

अशा परिस्थितीत काम पण सुचत नव्हतं तिला. कसं बसं तासाभरात काम आवरलं. आरव अजून पण झोपलेला होता. घड्याळात बघितलं तर एक वाजत आला होता. आरवने आज तिची एकदम दमछाट केली होती. सकाळपासून नुसता ताप झाला होता डोक्याला. म्हणून जरा निवांत सोफ्यात बसली न बसली की तोच तिचा फोन वाजला. किचन मध्ये जाऊन तिने फोन बघितला आणि चेहेऱ्यावर एक छोटीशी स्माईल आली. विक्रमचा फोन होता. त्याचा राग शांत झाला नाही हे तिच्या लगेच लक्षात आलं.

छाया आज खूप उदास होती, सतत तिची चीड चीड होत होती. काल नवऱ्याशी खूप भांडणं झालं होतं तिचं. कारणं अगदी शुल्लक होतं. पण म्हणतात ना " बात का बतंडग बनते देर नाही लागती." अगदी तसंच झालं. 



त्यामुळे तिचं मन कशातच लागतं नव्हतं. त्यात विक्रम म्हणजे तिचा नवरा आज तिच्याशी न बोलताच आणि तिने सकाळीच उठून तयार करून ठेवलेला डब्बा न घेताच निघून गेला. त्याचं तिला खूप वाईट वाटतं होतं. 

कसा काय वागू शकतो हा असा? मला सुद्धा वाईट वाटलं त्याच्या बोलण्याच पण तरी मी उठून केलाच ना डब्बा. आणि बोलले सुद्धा त्याच्याशी. छाया तिच्याच विचारात होती तोच आरव उठला. आरव म्हणजे छाया आणि विक्रमचा चार वर्षांचा मुलगा. 



आरव खूप लाडका होता दोघांचा पण. एकदम गुणी बाळ. पण आज काय झालं होतं काय माहित? आरव आज खूपच त्रास देत होता. उठल्यापासून रडा रड सुरू होती त्याची. जेवायचं नाही, अंघोळ नको, खेळायला नको. छाया चहा घेत होती तर तीला चहा सुद्धा घेऊ दिला नव्हता.  



त्यात काम वाढवत होता. दूध दिलं तर ते सांडवल, काहीतरी करून काही खाल्लं पाहिजे ह्या हेतूने छायाने त्याला त्याच्या आवडीचे फ्राईज करून दिले तर त्यात सुद्धा पण पाणी टाकून दिलं. असे सगळे उद्योग सुरू होते आज आरवचे. 



कालच भांडणं, त्यात विक्रम आज न बोलता आणि डब्बा न घेताच गेला होता. ह्या सगळ्यात भर ती आरवची, कधी त्रास देत नव्हता तो, पण आज इतका त्रास देत होता की तिला काही सुचत नव्हतं. त्यामुळे आज दुपार होत आली तरी छायाने काहीच खाल्लं नव्हतं, साधं पाणी सुद्धा प्यायली नव्हती. त्यामुळे तिची अजूनच चीड चीड झाली होती. 



शेवटी छाया आरवला घेऊन जरा बाहेर गेली. थोडावेळ त्याला पार्क मध्ये खेळवून घरी आली. तरी आरव आज काही ऐकत नव्हतं. पण खेळल्यामुळे तो थकला होता. नुसतं दूध पिऊन झोपी गेला. 



त्या नंतर छायाने विक्रमला फोन केला. पण त्यानी फोन उचलला नाही. कामात असेल आशी स्वतःची समजूत काढत छाया कामाला लागली. आज सगळं काम बाकी होतं तिचं. आरव झोपला होता तेवढ्यावेळेत तिला कामं आवरायची होती. एका बाजूला कामं सुरु होती तर दुसऱ्याबाजूला विचार चक्र सुरू होतं. 




अशा परिस्थितीत काम पण सुचत नव्हतं तिला. कसं बसं तासाभरात काम आवरलं. आरव अजून पण झोपलेला होता. घड्याळात बघितलं तर एक वाजत आला होता. आरवने आज तिची एकदम दमछाट केली होती. सकाळपासून नुसता ताप झाला होता डोक्याला. म्हणून जरा निवांत सोफ्यात बसली न बसली की तोच तिचा फोन वाजला. किचन मध्ये जाऊन तिने फोन बघितला आणि चेहेऱ्यावर एक छोटीशी स्माईल आली. विक्रमचा फोन होता. त्याचा राग शांत झाला नाही हे तिच्या लगेच लक्षात आलं. 


" जेवलास का?" छाया बोलत होती.


" नाही आता करेल." विक्रम


" डब्बा तयार होता. घेऊन का गेला नाहीस?" छायाने परत प्रश्र्न केला.


"आज ऑफिस कलिग्स सोबत आहे लंच." विक्रमने उत्तरं दिलं



" अरे मग सांगायचं ना आधी मला. मी बनवलं नसतं सकाळी. आणि उगाच काळजी करत होते मी.". छाया त्यांच्यातला तणाव दूर करण्याचा प्रयत्न करत होती.



" विसरलो मी. चल काम आहे मला बाय." विक्रमने तुटक बोलत त्यानी फोन ठेवला. 



नंतर तिने उभ्यानीच पटकन एक पोळी आणि भाजी खाल्ली. पाणी पितच होती की आरव उठला. 



लाडी गोडी लावून तिने त्याला खाऊ घातलं पण तरी तो हवा तसा जेवलाच नाही. खूपच त्रास देत होता. थोड्यावेळाने तिने त्याच्या आवडीचे स्ट्रोबरी स्मूदी बनवली. पण तो ती सुद्धा अर्धीच प्यायला. पण आता त्याला स्ट्रॉबेरी खायची होती म्हणून तिने, तिच्या साठी बनवलेली स्ट्रॉबेरी स्मूदी टेबल वर ठेवली आणि त्याला स्ट्रॉबेरीज कट करून दिल्या. एक घोट पाणी प्यायचे म्हणून ती परत किचन मध्ये गेली. 



किचन मधून येताना तिला आरव त्या स्मूदीच्या ग्लासमध्ये अगदी मनगटा पर्यंत हात घालताना दिसला. आता मात्र तिची सहन शक्ती संपली ती एकदम चिडली. जागेवरून तिने जोरात आवाज दिला " आरव" तिच्या ओरडण्याने आरव एकदम घाबरला आणि त्यांनी गलासातून हात बाहेर काढला. छाया धावतच आरव जवळ गेली. त्याच्या हाताला पकडुन ओढतच त्याला बाथरूम मध्ये घेऊन गेली. 

पाण्यानी त्याचे हात धुतले. पण तिचा राग अनावर झाला होता. काल पासूनची तिची झालेले चीड चीड आणि त्यात आरवने सकाळ पासून दिलेला त्रास सगळं एकत्र झालं आणि आरव वर बरसल. छायाने आरवला चांगल्या तीन चार चपटा मारल्या. बिचाऱ्याच्या गालावर व्रण उमटले. तो रडत होता. तिला सुद्धा वाईट वाटतं होतं. पण आता नाही शिस्त लावली तर लागणार नाही हेच तिला वाटत होतं.




थोड्यावेळाने छाया शांत झाली. तिने आरवला अजून जवळ घेतलं नव्हतं पण त्याला उरलेली स्ट्रॉबेरी खायला सांगितले. आणि स्वतः तो स्मूदी ग्लास घेत हळू हळू पित होती. स्मूदी जवळ जवळ संपत आली होती तोच तिला तळाची काहीतरी दिसलं.



" अरे हे स्ट्रॉबेरी चे तुकडे कुठून आली यात. मी तर टाकले नव्हते.?"



 तिला आता काही वेळा पूर्वी घडलेली घटना डोळ्यांपुढे आली. तिने हळूच आरव कडे बघितलं. बिचारा निमूटपणे स्ट्रॉबेरी खत होता.



" आरव तू टाकलीस यात स्ट्रॉबेरी?"... छाया जरा जड आवाजात बोलत होती.



आरव ने छाया कडे बघितलं. त्याचे डोळे पाण्यानी भरले होते. तो काहीच बोलला नाही फक्त होकारअर्थी मान हलवली.



आता छायाने उठून त्याला घेतलं आणि सोफ्यातच मांडीवर घेऊन बसली. त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली,



" मग मला सांगितलं का नाहीस?"



 आरवने छायाला घट्ट मिठी मारली.



 "तू मला विचारलंच नाहीस मम्मा." आरवचे डोळे पाण्यानी अजूनच डबडबले होते.



"मग तू हात का घातलास ग्लास मध्ये? ती वर ठेऊ शकत होतास ना?" छाया अजूनच रडवेली झाली होती.



"मला तुला सरप्राइज द्यायचं होतं." आणि आता हमसून रडू लागला. 



आता छाया ला स्वतः चाच राग येत होता. एवढ्याशा पिल्लाला मारलं शिस्त तर एक बहाना होतं पण खरं तर सगळा राग त्याच्यावर काढला आपण. ह्याची तिला जाणीव झाली. 



आरवला उराशी घेऊन खूप रडली. दोघे माय लेक रडत होते. एकमेकांचे डोळे पुसत सावरत होते. छाया आरवच्या गलाचे मुके घेत होती तिथेच तर मारलं होतं तिने त्याला. आणि परत परत " सॉरी बेटा" म्हणत होती. नंतर तिने त्यातली स्ट्रॉबेरी आरावला खाऊ घातली. आणि तितक्याच प्रेमाने आरवने तिला खाऊ घातली.



पण छाया मनात स्वतः ला कोसत होती, " इतकी कशी मी निष्ठुर झाले? एकदा सुद्धा लेकराला विचारलं नाही की का केलंस असं? लहान आहे तो त्याला काय कळतं काय चांगल काय वाईट.? त्याचा हेतू किती निर्मळ होता. काय झालं असतं जास्तीत जास्त ? स्मूदी सांडली असती, माझं काम वाढलं असतं इतकचं.



नाही छाया परत असं करायचं नाही. एकदा जर मुलांच्या मनात भीती बसली तर ते आपल्याशी मोकळं कधीच बोलत नाहीत. असं वागून आपण आरवच्या मनातून उतरून जाऊ, त्याचा विश्वास गमावून बसू. आणि मग तो आपल्या पासून गोष्टी लपवायला लागेल. आपला त्रास एका बाजूला ठेऊन आरवला समजून घेत जा." छाया स्वतः शी बोलत होती.



त्या दिवसा नंतर छायाने कधीच अशी चूक केली नाही. आरवने कितीही मोठी चूक केलेली असली तरी आधी तिचा प्रश्न हाच असायचा की "का केलं असं?"




धन्यवाद




तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका.