शाळेची व्यथा
फळा म्हणाला खडू ला
काय झाला असा गुन्हा
वर्ग सारा सुना सुना
नाही ऐकली बडबड गीते
मैदानावरचे खेळही रिते
अबोल साऱ्या वर्गखोल्या
काय झाला असा गुन्हा
वर्ग सारा सुना सुना
वही ,पाटी ,पुस्तकांसाठी
दप्तराचा जीव अधीरला
रिकाम्या बाकड्या चा
मुलांसाठी श्वास कोंडला
वाचनालय ,प्रयोगशाळा
संगीताचा कक्षही गुदमरला
खुंटी वरच्या घंटीचा आता
आवाजही रडवा झाला
जून जुलै उजाडला
पावसालाही आता
चांगलाच जोर चढला
छत्र्या, रेनकोट, पावसाळी जोड्यांचा
मित्रांसाठी जीव आसुसला