सोनिया

Soniya


सोनिया


आदेश ने जणू कुठून तरी एक छोटं से मांजरीचे पिल्लू घरात आणले आणि तो ते पिल्लू घेऊन शेजारच्या आजीच्या घरी घेऊन पळतच गेला.. आदेश पळत का गेला कुठे गेला, ते ही ते मांजरीचे पिल्लू घेऊन ...काय हा मुलगा काहीच कसे समजत नाही त्याला... कधी अक्कल यायची त्याला...नुसता डोक्याला ताप वाढवतो..

तशी आदेश ची आई त्याच्या पाठी मागे हातातील काम सोडून धावत गेली..

तोपर्यंत आदेश मुळे आजीच्या घरात घुसला...आणि त्याने ते छोटेसे पिल्लू आजीला दिले... तशी ते पिल्लू पाहून आजी एकदम घाबरली...ती ही आदेश ला बोलू लागली..

आदेश बाळ तू हे पिल्लू का आणलेस माझ्या घरात,आधी त्याला बाहेर घेऊन जा बघू..मला भीती वाटते रे खूप..जा तू ही निघ इथून, कुठून ते घाण पिल्लू आणले रे.. सगळे घर घाण करून ठेवेल हे...आजी आदेश वर खूप रागावली होती


अग आजी काल तू म्हणत होती की तू घरी एकटी असतेस, तुला खूप भीती वाटते..तुझ्या सोबत कोणी नसते...कोणी तरी असले असते तर तुझे मन रमले असते...आणि सोनिया असती तर आधार वाटला असता..मग ही बघ ही सोनिया..आता ही तुला सोबत करेन...ही तुझ्या सोबत राहील...मग तुला कधीच एकटे वाटणार नाही.. ना तुला कसली भीती वाटेल..तू हिच्या सोबत खेळ..तिला ही कोणी नाही अगदी तुझ्यासारखे..

आदेश चे हे बोलणे ऐकून आई ही विस्मय करत होती..आजीला ला आदेशाचा हेतू समजला.. ह्या बाल मनाला जे कळले ते तिच्या मुलीला सोनियाला कळले नाही... ती ह्या आजीला एकटीला सोडून परदेशी निघून गेली...तर आजी तिच्या मुलीबद्दल / सोनिया / बद्दल बोलतांना आदेश ने ऐकले होते... आणि त्याला वाटले आजी सोनिया ह्या मांजरी बद्दल बोलत होती..

त्याला आजीचे एकटेपण दूर करायचे होते..म्हणून त्याने बाहेर फिरत असलेल्या मांजरीला सोनिया हे नाव दिले होते..आणि तिला आजीच्या सोबतीला म्हणून आणले होते..

ही कृती पाहून आजीच्या डोळ्यात पाणी आले होते.. कधी जे मोठ्यांना कळत नाही ते ह्या लहान मुलांना कळते.. आईने आदेशाला त्याच्या ह्या चांगल्या कामाबद्दल एक मोठे chocolate दिले होते... तर आजीने दोघांना/ आदेश ला आणि त्या मांजरीला/ गोड दूध दिली होती...


पूर्ण हेतू जाणून घेतल्याशिवाय कोणाला ही उगाच चुकीचे ठरवू नका...