A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionce7ffe44b91c486cdce21ea0772524960137c3c0e2ff41d0d6e594897bebae56e0130ca5): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Sonchafa sungandh priticha
Oct 21, 2020
Love

सोनचाफा- सुगंध प्रितीचा

Read Later
सोनचाफा- सुगंध प्रितीचा

आज पाटीलांच्या अब्रूला धक्का लागणार या विचाराने आप्पा कोलमडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते भर मांडवात कोसळले, लगेचच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू केले गेले पण हे सगळे ज्यांच्यामुळे झाले ते मात्र मांडवातच मान खाली घालून बसले होते, कधी वाटलेही नव्हते आपलीच मुलगी भर मांडवात आपलीच लाज काढेल. कोणाला तोंड दाखवायला जागा उरली नव्हती त्यांना, होईल ते पाहणे असे ठरवून ती मंडळी शांत बसून होती. पण पाटलांची मंडळी खुपच चिडली होती. प्रत्येक जण मुलीच्या आई-वडिलांवर आरोप करत होता शिवीगाळ करत होता घडलेही तसेच होते, जिवाची पाटलांचा मुलगा विराज आणि सुनील माने यांची मुलगी ज्योती यांचे लग्न ठरवलं होतं.आज साखरपुडा आणि उद्या लग्नाचा मुहूर्त होता. सुपारी फोडून नही महिना लोटला होता. पाटील श्रीमंत मंडळी त्यांनी मोठ्या थाटात लग्न करण्याचे नियोजन केले होते.मुलीच्या आई-वडिलांना ही एकुलती एक मुलगी म्हणून भारी पोशाख  दागिने केले होते. एकमेकांना दाखवूनच लग्न ठरवण्यात आले होते. काल रात्री पाटील मंडळींचे व-हाड लग्नमंडपात आले. सकाळपासून सगळीकडे सनईचे सूर वाजू लागले. हॉलमध्ये साखरपुड्याची, हळदी ची तयारी सुरू झाली होती . येणाऱ्या-जाणाऱ्या साठी चहा नाष्ट्याची सोय केली होती. नाश्ता करून अनेक पाहुणे मंडळी साखरपुड्यासाठी मंडपात येऊनही बसली होती. भटजी नि वधूला बोलावण्यास सांगितले. पंधरा-वीस मिनिटे झाले तरी मुलीचा पत्ता नाही  तशी सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. नवरी मुलगी तिच्या खोलीतच नव्हती सकाळपासून,  पण मुलीकडची मंडळी तरीही गप्प बसून होती. हळूहळू सगळ्या मंडपात ही बातमी पसरली. विराजचे आजोबा म्हणजे आप्पा पाटील एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांचा विराज वर खूप जीव होता, त्यांच्या लाडक्या नातवाच्या लग्नातून नवरी मुलगी गायब झाली हे ऐकून त्यांना धक्का बसला आणि छातीत कळा येऊन ते कोसळले.  विराजला पण आपल्या लग्नात असा काही प्रसंग आलेला पाहून थोडा धक्काच बसला होता तो आणि त्याचे मित्र आप्पांना गाडीत घालून दवाखान्यात घेऊन गेले.
     पण जिवाजी पाटील मात्र मोठ्या धीराचा आणि विचारी माणूस होता. पाटील घरातले सगळेजण माने यांच्या घरच्यांवर नातेवाईकांवर शिवीगाळ करत होते. पण जिवाजी पाटील शांत बसून राहिले. आपल्या मुलाचे  मोडलेले लग्न आणि आपल्या वडिलांचा इज्जतीला धक्का लागू नये यासाठी आपण काय करावे या विचारात होते. सुनील माने हा त्यांचा ओळखीचा चांगला माणूस होता. त्यांची मुलगी असे काही करेल हे जिवाजीरावाना ही पटत नव्हते .माने कुटुंब मात्र आता आरोप ऐकून थकले आणि रडू लागले होते. सुनील रावांनी तर जिवाजी पाटलांच्या पायावर आपला फेटा काढून ठेवला आणि नाक घासुन त्यांची माफी मागितली. जिवाजीराव यांनी त्यांना जवळ घेतले, शांत केले आणि मंडपातील सर्व माणसांना एकत्र बोलावून घेतले. सुनील माने यांचा हात आपल्या हाती घेऊन झाल्या प्रसंगात सुनील माने यांची काही चूक नाही तरी त्यांना कोणीही बोल लावू नये असे सगळ्यांना त्यांनी सांगितले. जिवाजीरावांचा शब्द मोडणे कोणालाही शक्य नव्हते. प्रत्येक जण आता शांत झाला होता . जिवाजीरावांनी आलेल्या पै पाहुण्यांना जेवण करून आपापल्या खोलीत जाण्याची विनंती केली. आता मंडपात भटजी , माने , त्यांची बायको,  जिवाजी पाटील आणि त्यांचा खास मित्र रावजी एवढेच उरले होते. जिवाजी पाटील विचार करून म्हणाले, माझ्या विराजचे लग्न हे उद्या ठरलेल्या मुहूर्तावर झाले पाहिजे आणि त्यासाठी आत्तापासूनच हालचाल करावी असे माझे मत आहे. तुमच्या ओळखीत कोणी मुली असतील तर आपण लगेच त्यांच्याकडे जाऊन येऊ घडलेले प्रसंग त्यांच्या कानावर घालून मगच पुढची बोलणी करू. तुम्ही पटापट मुलींची नावे फोन नंबर मिळवून त्यांना फोन करा. त्याप्रमाणे रावजी आणि माने कामाला लागले त्यांच्या ओळखीतल्या मुलींची माहिती ते काढू लागले.जिवाजी पाटील लगेच आपल्या गाडीतून दवाखान्याकडे निघाले. दवाखान्यात विराज आणि त्याचे मित्र आप्पाजवळ थांबले होते लगेच उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर होती . पण आप्पा खूप काळजीत होते .जिवाजीला आलेले पाहताच आप्पांच्या जीवात जीव आला. जिवाजीनी आप्पाना शांत  पडून राहण्यास सांगितले. डॉक्टरांशी बोलून तब्येतीची नीट चौकशी करून ते आपण शेजारी येऊन बसले. अप्पांचे  आता वय झाले होते. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच.  आपल्या नातवाचं लग्न मोडलं हे सहन न झाल्याने ते रडू लागले. तसे जिवाजी यांनी त्यांना जवळ घेतले शांत केले,ते म्हणाले,आप्पा तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या वीराजचे लग्न उद्या ठरलेल्या मुहूर्तावर होणार आहे .तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि लवकर सूनमुख पाहायला उभे राहा. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून विराजने चमकून त्यांच्याकडे पाहिले, हे कसे शक्य आहे? त्याला काहीच कळेना . अप्पांना काय हवे नको ते पाहण्यासाठी विराजच्या मित्रांना थांबायला सांगून ते विराजला घेऊन लग्नमंडपात आले . जिवाजी रावाच्या पत्नी सुशीलाबाई आणि विराज दोघांनाही लग्न मोडण्याचा धक्का बसला होता. तसाच आता उद्याच लग्न कसे करायचे हा प्रश्‍न सतावत होता. पण त्यांच्या मनात काय आहे हे दोघांनाही कळत नव्हते .इतक्यात रावजी काका तिथे आले आणि त्यांनी पाच सहा घरांचे पत्ते आणि माहिती जिवाजी रावांना दिली. जिवाजीरावांनी सुशीलाबाई आणि विराजला मुलींची माहिती दाखवली.भटजीना बोलावून त्यांच्या पत्रिका जुळवून पाहिल्या. यातील तीन मुलींची माहिती आणि पत्रिका विराज च्या पत्रिकेशी जुळत होत्या
  या तीनही घरी रावजी ने फोन करून आम्ही मुलगी पाहायला येतो असे कळवले.जिवाजीरावानी सुशिलाबाई आणि विराजला आपण या तीन मुली पाहून यातील जी मुलगी पसंत पडेल तिच्याशी उद्या लग्न करायचे असे सांगितले.  सुशिलाबाई आपल्या पतीच्या मताशी सहमत होत होत्या ,पण विराजला मात्र काहीच सुचत नव्हते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी तो गोंधळून गेला होता . त्याने पण आपल्या वडिलांच्या मताला संमती दिली आणि ते मुली पाहायला गेले.
 मधुरा ने कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. खूप हुशार, दिसायला सुंदर आणि आई वडिलांची लाडकी मुलगी होती. तिचा धाकटा भाऊ बारावीला गेला होता .तो अभ्यासात हुशार होता. मधुराला  खुप शिकायचे  होते , तर तिचा धाकटा भाऊ रमेशला डॉक्टर व्हायचे होते. पण घरची परिस्थिती बेताची त्यामुळे मधुरा कॉलेजला सुट्ट्या लागल्या बरोबरच जॉब करू लागली होती. खाऊन पिऊन सुखी असले तरी शिक्षणाचा वाढता खर्च त्यांच्या खिशाला परवडणारा नव्हता. मधुराची आई मात्र जास्त शिकलेली नव्हती. तिला वाटायचे मुलीचे लवकर लग्न करून टाकावे. तिला चांगले सासर मिळावे. आत्तापासूनच तिच्या मागे तिच्यासाठी स्थळ पाहत होती आणि त्यातच पाटलांचे स्थळ स्वतःहून चालत आले होते. मधुरा चे वडील राम शिंदे यांना रावजी चा फोन आला तेव्हा ते जरा गोंधळले इतक्या घाईत लग्न करणे त्यांना पसंत नव्हते .पण आलेल्या स्थळाला येऊ नका असे सांगणे ही बरोबर वाटत नव्हते. म्हणून त्यांनी मुलगी पाहण्याचा कार्यक्रमाला होकार दिला. मधुरा नुकतीच जॉब वरून आली होती, आली तशी ओरडतच 
आई बघ ना माझ्या  मैत्रिणी ने मला आवडणारी सोनचाफ्याची फुले आणली आज. मधुरा
हो का आण त्याची वेणी करते तुझ्यासाठी . आई इतक्यात  मधुराच्या बाबांनी तिला पहायला पाहुणे येणार असल्याचे सांगितले. आई-बाबांच्या शब्दा बाहेर कधीही ती जात नव्हती. दुपारचे चार वाजले होते .कोणत्याही क्षणी पाहुणे येतील, म्हणून मधुराची आई मधुराचे आवरू लागली .तर रामभाऊ आणि रमेश घर आवरू लागले होते. इतक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला पाटील सुशिलाबाई आणि विराज गाडीतून उतरले. रावजी काकाही त्यांच्यासोबत होते. त्यांनी दोन्ही कुटुंबांची एकमेकांशी ओळख करून दिली. मधुरा च्या आईने सगळ्यांसाठी चहा ठेवला तसे पाटील म्हणाले. आम्हाला चहा पोहे काही नको .तुम्ही फक्त मुली दाखवा .आम्हाला काही गोष्टी मुलीसमोर तुमच्याशी बोलायचं आहेत तसे मधुराची आई मधुराला घेऊन बाहेर आली. हिरवी साडी नेसलेली गोरीपान मधूरा बाहेर आली. सगळ्यांनी तिला पाहिले हातात दोनच बांगड्या ,लांबसडक केसांची वेणी त्यावर घातलेली सोनचाफ्याची  वेणी, कपाळावर टिकली कानातले मोती आणि गळ्यात मोत्यांची सर कसलाही मेकअप न करता येईल मधुरा खूप छान दिसत होती. तिनेही विराजला पाहिले तोही एक रुबाबदार तरुण दिसत होता .त्याला पाहताक्षणी एक व्यक्ती म्हणून तिला तो आवडला. पण त्याची लग्नाची घाई तिला कळतच नव्हती. पाटलांना ही मुलगी आवडली होती त्यांनी सुशीला बाईंकडे पाहिले. तसे त्यांनी पण आपली पसंती दर्शवली विराजला पण त्यांनी खुणेनेच पुढे बोलायचे का विचारले. त्यांने होकार दिला. पाटलांनी सर्वांना बसायला सांगितले आणि विराज च्या लग्नाच्या सुपारी पासून त्यात सकाळी घडलेल्या प्रसंगाबद्दल सर्व माहिती मधुरा सहित सर्वांना दिली. ते सगळे ऐकून सगळ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली होती. पाटील म्हणाले पोरी माझा मुलगा विराज अस्सल नंबरी सोन आहे त्याच्याकडून कोणताही त्रास तुला होणार नाही. ह्याची आम्ही शाश्वती देतो पण तरीही एका मुलीची लग्नाची स्वप्नं असतात. तेव्हा तुम्ही तुझ्या आई-वडिलांबरोबर चर्चा करून आम्हाला उत्तर द्यावे. फक्त आम्हाला अर्धा तासा मध्ये उत्तर द्या म्हणजे आम्हाला पुढचे विचार करता येईल. घरचे सगळे आपल्या खोलीत गेले त्यांनी रावजी काकांना बोलावून घेतले
 मधुराच्या बाबांनी मधुराला आम्हाला मुलगा पसंत आहे फक्त तुझी इच्छा असेल तरच आपण होकार सांगू असे सांगितले .मधुराला पण मुलगा चांगला वाटला तसेच पूर्ण परिस्थिती विचारात घेऊन तिने नकार द्यायला काहीच कारण नव्हते .शेवटी रावजी काकांशी बोलून त्यांनी पाटलांना होकार कळवला. पाटलाना  खुप आनंद झाला होता त्यांनी सुशिलाबाई ना गाडीतून सामान आणायला सांगितले.  सुशीला बाईंनी मधुराला बोलावून तिची ओटी भरली.लग्नाचा शालू दागदागिने सर्व सामान पाटील स्वतः घेऊन आले होते. विराज आणि मधुरा दोघांना जोडीने देवाला नमस्कार करण्यास सांगितले घरातच विराज ने मधुराला अंगठी घातली आणि सोनचाफ्याच्या सुगंधात त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. मधुरा जीवाजी पाटलांचा पाया पडली तसे त्यांनी तिला जवळ घेतले. आणि म्हणाले तू आमच्या घराण्याची अब्रू वाचवली आहेस .साक्षात लक्ष्मी च्या रूपाने तू आमच्या घरात येत आहे तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. सगळ्यांना सकाळी लवकर लग्नमंडपात येण्यास सांगून पाटील मंडळी निघाली. सकाळ झाली तशी मांडवात सगळीकडे तयारी चालू झाली. सनईचे सूर उमटू लागले जिवाजी पाटील स्वतः तयार होऊन मुलीचा वऱ्हाडाच्या स्वागताला उभे होते. मित्र विराजला तयार करत होते .सुशीला बाई पाहुण्यांचे मानपान पाहत होत्या .रावजी काकाही सकाळीच अप्पांना  आणायला दवाखान्यात गेले होते. लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता .मांडवात पाहुणे मंडळी जमली होती .तितक्यात आप्पा मांडवात आले. पाटलांनी आप्पाची मधुराच्या आई-वडिलांशी ओळख करुन दिली. तितक्यात नवरा नवरी ला बोलवा अशा हाका ऐकून सगळ्यांच्या नजरा नवरा-नवरीच्या स्वागताला उत्सुक झाल्या. मांडवाच्या एका दिशेने स्टेज कडे जायचा रस्ता फुलांनी सजवला होता तिथून शेरवानी घातलेला विराज आणि गर्द जांभळ्या रंगाचा शालू नेसून मधुरा स्टेजवर आले दोघांच्या हातात गुलाबांचे हार देऊन मंगलाष्टका म्हणण्यास सुरुवात केली . शुभमंगल सावधान च्या गजरात नवरा नवरीने एकमेकांना हार घातले.  आणि विराज मधुरा चे लग्न संपन्न झाले , तसे आप्पांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. जेवण खान होऊन पाहुणे मंडळी आपापल्या घरी परतली .मधुराने ही भरल्या डोळ्यांनी आपल्या आई-वडिलांना निरोप दिला. तिच्याबरोबर तिची मैत्रीण राणी पाठराखीण म्हणून येणार होती .मधुरा आणि विराज साठी सजवलेली गाडी आधी देवदर्शन करून मग घरी जाणार होती. त्यात मधुराला आणि राणीला बसवण्यात आले. इकडे पाटील वाडा लाईट ने फुलांनी सजवला होता. सुशिलाबाई आणि त्यांची बहीण सुनेचा स्वागतासाठी औक्षणाचे ताट घेऊन उभ्या होत्या. घरातील नोकर माणसं पाहुणे घरातले सदस्य असे सगळे मिळून चाळीस पन्नास जण वाड्यात स्वागताला उभे होते. इतक्यात त्याची गाडी दारात आली सुशीला बाईंनी दोघं वरून भाकरतुकडा ओवाळून टाकला. सगळेजण दोघांचे स्वागत करत होते. विराज चे मित्र भाऊ-बहीण त्यांची चेष्टा मस्करी करत होते. मधुरा ची मैत्रीण  राणी हे सगळे पाहून खूप खुश होत होती.  सुशीला बाईनी दोघांचे औक्षण केले आणि नव्या सुनेला माप ओलांडून आत येण्यास सांगितले. तसे विराजच्या भाऊबहिणीनी उखाणा घेतल्याशिवाय घरात एन्ट्री नाही असे सांगितले .सगळ्यांनी मधुराला उखाणा घ्यायला सांगितले तिने मनात शब्दांची जुळवाजुळव सुरू केली अचानक लग्न ठरले आणि तिने एकही ऊखाना पाठ केला नव्हता. तरी शब्दांची जुळवाजुळव करून ती उखाणा घेऊ लागली
शिंदे घराण्याची लेक पाटलांची सुन झाली आज. आयुष्यावर माझ्या आता फक्त विराज रावांच राज.
उखाणा ऐकून सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केले. विराज चे मित्र वहिनी वन्स मोर म्हणून ओरडू लागली. आता विराजला उखाणा घ्यायचा होता पण त्यालाही एकही उखाणे येत नव्हता. शेवटी त्याने 
भाजीत भाजी मेथीची मधुरा माझ्या प्रीतीची
हा उखाणा घेतला.  मधुराने माप ओलांडून गृहप्रवेश केला. देवाच्या पाया पडून घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या ते पाया पडू लागले. सगळेजण मधुराला काही ना काही भेटवस्तू देत होते. आशीर्वाद देत होते. मधुराला हे सगळे नवीन आणि खूप छान वाटत होते .तिला आणि राणीला झोपायला एक वेगळी खोली देण्यात आली होती .दोघी रूम मध्ये आल्या तसा इतका वेळ शांत अस लेली राणी बोलायला लागली. मधुराच्या सासरचे लोक तिथं झालेले स्वागत या सगळ्याचा ती भरभरून कौतुक करत होती. दिवसभर दमल्यामुळे दोघींना गप्पा मारता मारता कधी झोप लागली समजलेच नाही. सकाळी मधुरा उठण्या आधीच राणी लवकर उठून खाली गेली होती. वाड्यात नवरा नवरीचे खेळ घेण्याची तयारी सुरू होती. तितक्यात मधुरा खाली आली सगळ्यांसोबत नाश्ता झाल्यानंतर सगळेजण अंगणात जमले. अंगणात जय्यत तयारी केली होती एका मोठ्या भांड्यात दूध भरून ठेवले होते. त्या दोघांना समोरासमोर बसवून त्यांच्यामध्ये दुधाचे भांडे ठेवण्यात आले. त्यात एक अंगठी टाकली आणि जो अंगठी काढेल तो दुसर्यावर राज्य करेल असे सगळे म्हणाले  दोघेही भांड्यात अंगठी शोधू लागले .मित्र विराज विराज म्हणून जोरात ओरडत होते. तर सगळ्या बायका मधुरा च्या नावाने जयघोष करत होत्या आणि शेवटी अंगठी मधुराला सापडली सगळेजण मधुराच्या अजून कौतुक करायला लागले. त्यानंतर नवरा नवरीने एकमेकांना हळद चारायची होती.  विराजने एका हाताने मधुराला हळद चारली पण मधुराला मात्र दोन हातांनी हळद चारायला सांगितली तरी तिला ते जमेना. ती खूप घाबरली होती तिची अवस्था लक्षात घेऊन शेवटी विराज यांनी स्वतः हळदीसाठी तोंड उघडले तसे सगळेजण त्याला तिच्यावरून चिडवू लागले. सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता आणि हे पाहून आप्पा पाटील मनोमन फार सुखावले. खेळ खेळून झाल्यावर त्यांना जेजुरीला देव दर्शनाला जायचे होते घरचे सगळे मंडळी राणी आणि विराज मधुरा असे सगळे दोन गाड्या करून खंडोबाच्या दर्शनाला गेले. तिथे पोहोचेपर्यंत दुपारचे एक वाजून गेले होते उन्हं डोक्यावर आली होती. आता हा गड चढून जाऊन देवदर्शन आणि मग जेवण असे ठरले. देवदर्शनाला जाताना नवऱ्याने नवरीला पहिल्या पाच पायऱ्या उचलून घ्यायचे अशी त्यांची रीत होती त्याप्रमाणे त्याने तिला उचलून घेतले. पण दोघेही एकदम अवघडून गेले होते पाच पायऱ्या चढून गेल्यावर त्याने तिला खाली उतरवले तसे सगळेजण दमलास का इतक्यात ? म्हणून चिडवू लागले. असा खेळीमेळीच्या वातावरणात सगळे जण चालत होते. पण आदल्या दिवशीची दमणूक आणि डोक्यावर  ऊन यामुळे  मधुराला चक्कर आली ती चालता चालता त्याच्या  अंगावर कोसळली.  त्याने तिला उचलून बाजूला घेतले सगळ्यांनी तिला पाणी पाजले तोंडावर पाणी मारल्यामुळे ती शुद्धीवर आली. सुशीला बाई म्हणाल्या आपण जरा वेळ इथेच थांबू आणि मग पुढे जाऊ. मधुरा उन्हाने लाल झाली होती तिला भरपूर घाम फुटला होता.तिची अवस्था पाहून त्याला काय करावे ते सुचेना. बाजूला बसायला सावलीही नव्हती शेवटी त्याने तिला परत एकदा उचलून घेतले आणि दोघे गड चढून वर आले. देवदर्शन घेऊन ते निघाले  तसे पुजारी काकांनी  तिच्या ओटीत नारळ आणि दोन सोनचाफ्याची  फुले घातली . सगळे  आता  सावलीत जाऊन बसले. मधुराला आता बरं वाटत होतं . तिने ओटीतला नारळ सासूबाईकडे दिला आणि  ती फुले केसांत माळली.
सगळ्यांची जेवणे झाली त्यानंतर गडावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला गेला. आजचा पूर्ण दिवस त्यातच गेला. दोघांमध्ये काहीच बोलणे झाले नाही. दुसऱ्या दिवशी पूजा होती आणि त्यांची पहिली रात्र तिला त्याआधी विराजशी बोलायचे होते पण त्यांच्यात संवादच होत नव्हता. सकाळ झाली तशी परत एकदा पुजेची तयारी चालू झाली. राणी मधुराचे आवरून देत होती. मधुराच्या घरचे ही पूजेला आले होते. पूजेला बसण्यासाठी दोघांना बोलवलं मधुरा छान तयार होऊन सोनचाफा वेणी घालून आली. दागदागिने घालून नटलेली आपली लेख पाहून मधुराच्या आई-बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले तर  विराज तिच्याकडे पहातच राहिला ती त्याच्या शेजारी येऊन बसली तसा सोनचाफ्याच्या फुलांचा वास सगळीकडे पसरला त्या फुलांच्या सुवासात आणि सनईच्या सुरात पूजा व्यवस्थीत पार पडली. तीर्थ प्रसादासाठी अनेक पाहुणे मंडळी आली होती .सगळेजण दोघांचे कौतुक करत होते. सगळ्यांच्या पाया पडून पडून मधुरा मात्र जाम वैतागली होती आणि त्यातच पुन्हा एकदा ती चक्कर येऊन पडली. तिला तिच्या रूम मध्ये नेऊन झोपवले. तिची आई तिच्या सोबत होती. अचानक सगळे घडल्यामुळे ती तिची पाळीची तारीख विसरली होती. गेले तीन दिवस सततच्या धावपळीमुळे तिला थकवा आला होता आणि पाळी आली होती सुशीला बाईंनी डॉक्टरांना बोलावले होते त्यांनीही तिला थकवा आला आहे असे सांगून औषधे लिहून दिली.
 सुशिलाबाई तिच्या आईला म्हणाल्या उद्या तुम्ही तिला माहेरी घेऊन जा. तिचा थोडा आराम होऊ देत नंतर इकडे आल्यानंतर आल्यावर त्यांची पहिली रात्र साजरी करूया हे ऐकून मधुराला बरे वाटले. असेही गेल्या चार दिवसात आयुष्यात घडणाऱ्या अनेक आनंदाचे प्रसंग आणि घाबरून सोडणारे प्रसंग आठवून तिचे तिलाच काही समजत नव्हते. तिला विराज मनापासून आवडला होता. पण तरीही शारीरिक मिलनाआधी तिला त्याला जाणून घ्यायचे होते. दुपारच्या जेवणानंतर मधुरा माहेरी जायला निघणार होती .विराज लाही तिच्याशी बोलायचे होते दोघांमधला अवघडलेपणा जात नाही तोपर्यंत नवरा-बायकोच्या नात्याचा विचार करायचा नाही असे त्याने ठरवले. गेला एक महिना तो त्याच्या होणाऱ्या बायकोची फोनवर गप्पा मारत असे .तेव्हा तीही त्याच्याशी भरपूर गप्पा मारायची. पुढची स्वप्न रंगवायची त्यामुळे तिचा स्वभाव त्याला आवडू लागला होता आणि आज अचानक लग्नाच्या दिवशी ती गायब झाली होती. हा धक्का त्याला सहन झाला नव्हता. पण घराण्याची इज्जत आणि ओढवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याने मधुराला पसंत करून लग्न केले. मधुरा दिसायला सुंदर होती त्यालाही ती आवडली होती पण तरीही त्याला तिला जाणून घ्यायचे होते. दोघांच्या मनात सारखेच विचार होते पण त्यांना एकमेकांबरोबर बोलायला वेळच मिळत नव्हता. विराज चा मित्र शशी अगदी जवळचा मित्र होता त्याला विराज बद्दल सगळी माहिती होतं. शेवटी विराजने त्यालाच यावर काय उपाय करायचा? असे विचारले दोघे विचार करू लागले. आज दुपारी ती माहेरी जाणार आणि ती येईल त्या दिवशी त्यांची रात्र असेल त्याआधी दोघांमध्ये बोलणे होणे गरजेचे होते. इतक्यात त्याच्या गर्लफ्रेंडचा म्हणजे प्रिया चा फोन आला. प्रिया चे नाव स्क्रिनवर पाहताच शशीला आयडिया मिळाली त्यांनी घाईने फोन उचलून मी फ्री झाल्यावर फोन करतो असे सांगून फोन ठेवला. विराज काही सुचत नसलेले डोके धरून बसला होता. तसा शशी ओरडला विराज लवकर चल मला आयडिया मिळाली आहे आपण वहिनी साठी नवीन मोबाईल आणू यात तो तिला गिफ्ट कर म्हणजे या चार पाच दिवसात तुम्ही दोघे फोनवर बोलतात आणि तिथेच तुझे मतही तिला सांग. म्हणजे पहिल्या रात्री तिच्या मनात काही गैरसमज निर्माण होणार नाही हे ऐकून विराज खूष झाला. दोघांनी एक नविन मोबाईल घेतला आणि सिम कार्ड घालून चालूही केला. तो  नंबर विराज स्वतःचा फोन मध्ये सेव्ह करत होता तसा शशी त्याला चिडवू लागला ,बघू तरी कोणत्या नावाने नंबर सेव करतोयस? त्या दोघांची चेष्टामस्करी चालू असतानाच मधुरा रूम मध्ये आले तसा शशी तिला वेलकम वहिनी असे म्हणत रूमच्या बाहेर निघून गेला. मधुरा तिथे सामान घेत होती. तिच्या मनात विचार चालू होते आपण विराजला आत्ता सगळे सांगायचे का पण इतक्या कमी वेळात त्याला आपले म्हणणे समजेल का? असे विचार तिच्या मनात येत होते इतक्यात तो तिला हाक मारतो तशी ती भानावर येते. मधुरा हे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले आहे. यात मोबाईल आहे .या चार-पाच दिवसात आपण काही गोष्टी एकमेकांशी बोलूयात एकमेकांना समजून घेऊ यात चालेल ना तुला? तसे मधुरा तिच्याही नकळत लाजली. तिला वाटले जसे काही त्याने तिच्या मनातले भाव चेहऱ्यावरती वाचले. थँक्यू म्हणतच ती रूम मधून बाहेर पडली. शेजारच्या गावातच तिचे माहेर होते त्यामुळे तासाभरातच मधुरा माहेरी पोहोचली. या दोन-तीन दिवसात तिला जणू सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटत होते. नवीन साड्या, दाग दागिने घालून मिरवताना जितका आनंद होत होता तितकीच या सगळ्याची सवय असल्याने ती दमून गेली होती. 
     दुसऱ्या दिवशी मधुरा तिच्या घरचे आणि राणी गप्पा मारत बसल्या होत्या. राणी पाटलांच्या घरच्या गमतीजमती सांगत होती ते ऐकून मधूचे आईवडील खूप खूश झाले. मधुराला चांगलं घर मिळालं या आनंदात होते. तिला दिलेला मोबाईल सगळ्यांना दाखवला. दोघांचा एकदा-दोनदा फोनही झाला. पण सतत तिच्या शेजारी आई-बाबा रमेश असल्यामुळे तिला त्याच्याशी बोलता येत नव्हते. शेवटी दोघे व्हाट्सअप वर चाट करू लागले. दोघांनी आपापली नवरा-बायकोच्या नात्याबद्दलची विचार एकमेकांना सांगितले आणि दोघांची मते सारखे असलेली पाहून त्यांना  पहिल्यांदाच मोकळेपणा जाणवला.  दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला मधुरा पाच सहा दिवस माहेरी होती आणि रजा असल्यामुळे विराज पण घरात निवांत होता या दिवसात दोघेही एकमेकांना जाणून घेत होते.
    विराज खूप हुशार आणि रुबाबदार तरुण होता. त्याची आजी म्हणजे आप्पा पाटील यांची बायको ज्या आता ह्यात नाही त्यांना वाटायचे की, आपल्या मुलांनी खूप शिकावे पण जिवाजी पाटील मात्र रांगडा गडी होते त्यांचा मन शेतीतच रमायचे त्यांनी जेमतेम शिक्षण घेतले आणि शेतीत खूप कष्ट करून आपला माल बाहेरगावी पाठवून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला. गावात शाळा नव्हती ती बांधण्यासाठी पण त्यांनी खूप मदत केली. ते गावचे लाडके सरपंच होते आणि त्यांचा मुलगा विराज तो मात्र आजीसारखा अगदी हुशार. तो भरपूर शिकला त्याने एमबीए केले आणि पुण्यातच चांगल्या कंपनीत तो मोठ्या पोस्टवर अनुभवासाठी जॉइन झाला होता. मधुरा हीसुद्धा हुशार मुलगी होती टी वाय बी कॉम ची परीक्षा दिली होती तिला पुढे जाऊन भरपूर शिकायचे होते. भरपूर शिकून आपल्या आई-वडिलांना आर्थिक हातभार लावायचा होता आणि तिचा होणारा नवरा हा तिच्या आई-वडिलांची मनापासून काळजी घेणारा असावा असे तिला वाटायचे. त्या दोघांची छान मैत्री झाली होती. दोघांचे स्वभाव  एकमेकांना आवडले होते. आज मधुरा चा भाऊ रमेश तिला सोडायला तिच्या सासरी येणार होता. विराज पण खुश होता. ओढवलेले संकट पळून गेले होते आणि त्याच्या आयुष्यात एका छान मैत्रिणीने एन्ट्री घेतल्यामुळे त्याला छान वाटत होते. घरातले सगळे उत्साहाने तिच्या स्वागताची तयारी करत होते. सुशीलाबाईनी गोडाधोडाचे जेवण नाही केले होते. मधुरा आली तिच्यावरुन भाकर तुकडा ओवाळून तिचे स्वागत  केले. घरातले सगळेजण तिच्या भावाची ही मनापासून विचारपूस करत होते. जेवणानंतर रमेश परत घरी गेला आता मधुरा एकटीच होती घरातले पाहुणे मंडळी ही गेले होते. मधुरा वाडा फिरून पाहत होती. चौसोपी वाडा, वाड्यात झोपाळा, समोर छानसे अंगण अंगणात अनेक फुलझाडे होती तिला घर खूपच आवडले. तिन्हीसांजेची वेळ होत आली होती. तिने देवघरात दिवा लावला आणि स्वयंपाक घरात गेली तेवढ्यात दारात वीराजचे मित्र आले होते. सगळेजण अगदी उत्साहाने फुलांच्या टोपल्या भरून घेऊन येत होते. सगळ्यांनी मिळून त्यांची रूम सजवली. सगळे जेवायला बसले. हसत-खेळत गप्पा मारत जेवण झाली तशा सुशिलाबाई मधुराला घेऊन रूम मध्ये गेल्या. त्यांनी तिला शालू नेसवला तिचे छान आवरून तिच्या वेणी वरती सोनचाफ्याची वेणी माळली. खणा नारळाने ओटी भरून तिला तयार केले आणि तिला रूम मध्ये बसून खाली आल्या तिकडे विराजलाही मित्रांनी  छान तयार केले होते सगळे त्याला चिडवतच रूमपर्यत सोडून आले. तो रूम मध्ये येताच मधुरा क्षणभर घाबरली. जरी त्यांच्यात काही घडणार नसले तरी आजूबाजूचे वातावरण त्यांना अस्वस्थ करत होते. विराज रूम मध्ये आला आणि त्यांनी मधुरा कडे पाहिले आणि तो तिच्याकडे पहातच राहिला ती खूप सुंदर दिसत होती तशीच लग्नात दिसत होती अगदी तशीच आणि तिचा केसावरती सोनचाफ्याची वेणी त्या फुलांचा वास सगळीकडे पसरला होता तो भान हरपून तिच्याकडे पाहत होता. त्याचे तसे पाहणे तिलाही सुखावत होते. काही क्षण ते दोघे तसेच उभे होते आणि इतक्यात वीराजच्या मोबाईलची रिंग वाजली तसे दोघे भानावर आले. त्याचे मित्र मुद्दामून त्याला फोन करून सतावत होते. त्याने फोन स्विच ऑफ केला आणि म्हणाला सगळ्यांनी रूम किती छान सजवली आहे 
हो खूपच छान सजवली आहे. मधुरा 
त्याने कपाटातून त्याचे कपडे घेतले आणि तो म्हणाला मी वॉशरूम मध्ये जाऊन कपडे चेंज करतो तोपर्यंत तूही चेंज करून घे. दोघांनी कपडे चेंज केले आणि रूमचा लाईट बंद केला. दोघेजण मस्तपैकी गप्पा मारत बसले. विराज तीला आपल्या शेतीची, साखर कारखान्याची, दुग्ध पदार्थांच्या नवीन फॅक्टरीची माहिती देत होता. अजून एक दीड महिन्याने तो पुण्याला परत कामावर जाणार आहे हेही त्यांनी सांगितले. त्याचे प्लॅन, इतका शिकलेला असूनही परत गावात येऊन गावातच काहीतरी काम करण्याची इच्छा हे पाहून तिला त्याचा खूप अभिमान वाटला. गप्पा मारतच दोघे झोपी गेले. सकाळी लवकर उठून ती खाली आली. नाश्ता ची तयारी करू लागली. आज तिने पहिल्यांदाच काहीतरी करायचे म्हणून गोडाचा शिरा केला होता. तिकडे विराजला जाग आली तशी त्याच्या डोळ्यासमोर रात्रीची मधुरा आली आणि त्याच आनंदात तो उठून बसला. समोरच्या टेबलावर तिची वेणी पाहून त्यांनी ती हातात घेतली त्या फुलांचा मन भरून श्वास घेतला आणि एक वेगळ्याच उत्साहात आणि आनंदात तो उठून बसला. उशीर झालेला पाहून त्यांने लवकर आवरले आणि तो खाली आला.
    मधुरा च्या हातचा शिरा विराजलाही भरपूर आवडला. सगळेजजण  तिचे कौतुक करत होते. विराज ने पण तिचे खूप कौतुक केले. ते ऐकून ती खूप खुश झाली. तशी ती स्वयंपाकात पहिल्यापासूनच सुगरण होती. आता रोज नवीन नवीन पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालणे हा तिचा छंद झाला होता. विराज आता रोज वडिलांबरोबर शेतीची, कारखान्याची कामे पाहायला जात असे. ते जेवायला घरी येईल. जेवण करून परत कारखान्यावर गेले की संध्याकाळी घरी येत असत तोपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ जेवणासाठी छान छान पदार्थ मधुरा बनवायचे आणि ते पदार्थ खाउन सगळे खूप तृप्त झाले की तिला खूप आनंद व्हायचा. आज रावजी काका त्यांच्या मुलासोबत वाड्यावर आले होते त्यांचा मुलगा सूर्या सहा महिने कामासाठी बाहेर गावी गेला होता. तो आज आला तसे दोघे वाड्यावर आले होते. विराज आणि  सुर्या अगदी चांगले मित्र होते. गावात अनेक जण दूध विक्री करायचे पण प्रत्येकाला नीट भाव मिळत नव्हता तेव्हा जीवाजी पाटलांनी दुधापासून इतर पदार्थ बनवण्याच्या फॅक्टरी सुरू करायचे ठरवले. फॅक्टरी सुरू करण्यासाठी सूर्या आणि विराज बाहेर जॉब करून कामाची माहिती घेत होते, अनुभव घेत होते, दुधापासून दही, ताक, श्रीखंड, खवा असे पदार्थ बनवून तो माल शहरात पाठवायची त्यांची योजना होती त्यामुळे गावातल्या अनेकांना रोजगारही मिळणार होता. आता लवकरच विराज परत गावी येऊन फॅक्टरीचे काम पाहणार होता. सूर्या आला तसा त्यांच्या कामाला वेग आला. दोघेही दिवसभर फॅक्टरीच्या कामात व्यस्त होत असे. कोणते डिपार्टमेंट कसे करायचे, तिथले फर्निचर कसे असावे, अगदी छोट्या छोट्या गोष्टी स्वतः लक्ष देऊन करून घेत होते. मधुरा मात्र खूप कंटाळली होती. गेले दहा पंधरा दिवस तिचे आणि वीराजचे काही बोलणे होत नव्हते त्याला ताटात गरम गरम पदार्थ वाढवण्याची उत्सुकता संपून गेली होती. त्याची वाट बघत बसणे, त्याचे जेवण झाल्यानंतर  ती जेवत असे, पण विराज दमलेला असे की त्याला हे काही माहीतच नव्हते. सुशिलाबाई हे रोज पाहत होत्या. आजही विराज आला घाईघाईने जेवला आणि परत सूर्याकडे गेला तोपर्यंत मधुरा ही जेवून झोपायला गेली. विराज घरी आला तेव्हा साडेअकरा वाजत आले होते. सुशिलाबाई त्याची वाट पाहत होत्या. त्यांना पाहून विराजने विचारले, आई तू का जागी राहिलीस माझ्यासाठी. त्या म्हणाल्या आजकाल तू खूप कामात असतो आमच्याशी बोलायला तुला वेळच नाही.
 अग आई फक्त अजून सात आठ दिवस मग मी फ्रि आहे.  आपल्या फॅक्टरीचे उद्घाटन करून मगच मी पुण्याला जाईल असा विचार करत आहे. विराज 
अरे ते सगळं बरोबर आहे. पण आता तुझे लग्न झाले तुझ्यावर मधुराची जबाबदारी आहे. ती रोज तुझी वाट पाहत बसते. तू जेवतो स्मग जेवते. ती खूप कंटाळलेली दिसते आहे. थोडा वेळ तिलाही देत जा. ते ऐकून त्याला आपली चूक समजली. ती आपण जेवल्याशिवाय जेवत नाही हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले. त्या म्हणाल्या अरे ती आपल्या घरात अजून नवीन आहे. तिला तुझ्या सोबतीची गरज आहे. उद्या तू तिला पण काम दाखवायला घेऊन जा. तेवढाच तुमचा एकत्र वेळ जाईल हे ऐकून तो हो म्हणाला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून आडवा झाला. तसं सुशिलाबाई हसून म्हणाल्या अरे तू आता इथे झोपला आणि तीच रूममध्ये जागी राहून तुझी वाट बघत असेल तर? तसा तो हसत उठला आणि झोपायला गेला. मधुरा त्याची वाट पाहून झोपून गेली होती त्याने तिला झोपवून पांघरूण घातले आणि तोही झोपी गेला. सकाळी सकाळी लवकरच त्याने तिला आमच्या सोबत बाहेर चल असे सांगितले. तसे तिने स्वयंपाकाचे काम लवकर उरकून घेतले. सूर्या आणि मधुरा सोबतच फॅक्टरी वर गेले तिथले सगळे काम उरकून सूर्य जेवायला घरी गेला आणि विराज मधुराला घेऊन मळ्या कडे निघाला. खूप वेळ झाला होता मधुराला आता भूक लागली होती. त्यामुळे ती शांत बसून होती अचानक त्याने गाडी थांबवली तो म्हणाला, मधुरा चुकले माझे सॉरी. तशी ती म्हणाली सॉरी काय? मला खरच खूप भूक लागलीये तुम्ही लवकर चला ना. त्यांनी ठीक आहे असे म्हणून हासतच गाडी सुरू केली आणि मळ्यात पोहोचले. मळ्यात एका छान आंब्याच्या झाडाखाली सावलीमध्ये दोघेही जेवायला बसले. तिने दोघांसाठी डबा भरून घेतला होता. डबा काढताच विराज म्हणाला, आज काय स्पेशल केले आहे? तुम्ही खाऊन सांगा कसे आहे ते असे म्हणून तिने जेवण वाढायला घेतले तिने चपाती मेथीची भाजी, पाटवडी रस्सा, गाजरचा हलवा त्याच्यासाठी स्वतः बनवले होते त्यालाही ते सगळे पदार्थ पाहून भुक लागण्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यांनी लगेच एक घास घेऊन तोंडात घालणार इतक्यात त्याला आठवले की आपण तिला विचारलेच नाही. त्याने तो घास तिच्यापुढे धरला तशी ती म्हणाली, नाही नाही आधी तुम्ही खाऊन सांगा कसं झालं मग मी खाईन. तसे विराज पुन्हा एकदा तिला सॉरी म्हणाला.
 अ हो कशासाठी सॉरी म्हणत आहात तुम्ही? मधुरा
 मी गेल्या दहा पंधरा दिवसात खूप चुका केल्यात मला माहिती नव्हतं की माझं जेवण झाल्याशिवाय तू जेवत नाहीत ते .मी तुला एकदाही विचारलं नाही तू जेवलीस का? म्हणून याचा मला खूप वाईट वाटत आहे .
अहो त्यात काय एवढे तसेही नवरा जेवल्याशिवाय बायको कसे जेवणार ?मधुरा 
 ते काही नाही मला यायला उशीर होतो त्यामुळे तू आधी जेवून घेत जा. माझ्यामुळे तुला खूपच उशीर होतो. विराज
 नाही तुम्ही जेवल्या शिवाय मी नाही जेवणार. आई म्हणते नवरा जेवल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला खूप समाधान देतो आणि तुम्ही जेवल्यावर जेव्हा माझा जेवणाचे कौतुक करता तेव्हा मला खूप समाधान मिळते त्यामुळे तुम्ही खा मगच मी खाणार तसा तो ठीक आहे म्हणतो आणि लगेच जेवायला सुरू करतो. 
पाटवडी रस्सा त्याला खूप आवडतो आणि गाजरचा हलवा खाल्ल्यावर तो मुद्दामून तोंड बंद करून बसतो पाच सहा घास खाऊन झाले तरी तो काहीच बोलत नाही तशी ती विचारते तुम्हाला नाही आवडले का? सांगा की कसं झालं जेवण?
 सॉरी मी आता काहीच बोलणार नाही कारण एवढे छान जेवण जेवताना तुझं कौतुक करण्यात वेळ घालवायला मला जमणार नाही आणि तसही तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीयेत आता तू लवकर जेव नाहीतर  मी काही शिल्लक ठेवणार नाही इतका आवडले मला. विराज
तिला खूप आनंद झाला आणि तीही त्याच्यासोबत जेवू लागली. जेवण झाल्यावर दोघेही गप्पा मारत बसले होते. सहज तिचे लक्ष झाडाकडे गेले झाडावर खूप कैर्‍या लागल्या होत्या ती घाईघाईने  उठली आणि तिच्या लक्षात आलं आपण तर साडी नेसली आहे मग झाडावर कसे चढणार?तिला एकदम उठलेल पाहून त्याने विचारलं, काय झालं ?
अहो मला कै-या  हव्यात आम्ही झाडावर चढून खूप कैऱ्या काढायची, पण आज मी साडी नेसली आहे. प्लीज तुम्ही चढून काढता  कैऱ्या. मला खूप आवडतात.
 तो पण लहानपणी झाडावर चढायचा पण एवढ्यात चढला नव्हता मधुराला नाही म्हणणे त्याला योग्य वाटेना. शेवटी तो म्हणतो मी प्रयत्न करून पाहतो आणि झाडावर चढला भरपूर कैऱ्या तोडून तिच्याकडे टाकत होता. ती म्हणाली बस आता भरपूर झाल्या आणि खाली पडलेल्या कैऱ्या गोळ्या करू लागली. तो झाडावर चढला पण उतरताना त्याला अवघड वाटू लागले आणि त्यातच त्याचा तोल गेला झाडावरून तो पडला. त्याचे डोके खालचा दगडावर आपटले. डोक्याला मोठी खूप पडून त्यातून रक्त येऊ लागले होते त्याला पडलेले बघून मधुरा घाबरून जोरात किंचाळली. तिच्या आवाजाने पलीकडच्या शेतात काम करणाऱ्या तीन चार बायका पळतच तिथे आल्या. ती रडत होती तिने त्याच्या डोक्यावर पदर धरून ठेवला होता त्या बायका येताच त्यांच्या मदतीने तिने विराजला गाडीत बसवले आणि त्याला घेऊन गावाजवळ असलेल्या दवाखान्यात आली. तिथे त्याला ॲडमिट करण्यात आले. डोक्याला मार लागल्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. शेतात काम करणाऱ्या बायकांनी पाटलांच्या वाड्यावर त्याला दवाखान्यात नेल्याचे कळवले. मधुराला काहीच सुचत नव्हते तिच्यासोबत कमलाबाई नावाच्या काम करणारे मजूर आले होते. दोघींनी डॉक्टरांना लवकर उपचार करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी त्याला आत नेले तशी मधुरा अजूनच रडू लागली हे सगळं तिच्यामुळे झालं असं तिने कमलाबाई ला सांगितलं. तोपर्यंत सगळेजण दवाखान्यात पोहोचले होते. डॉक्टर त्याला ड्रेसिंग करत होते. त्याच्या डोक्याला सात टक्के पडले होते. इतर ठिकाणी हाताला किरकोळ खरचटले  होते पण डोक्याला मार लागल्यामुळे तो अजून शुद्धीवर आला नव्हता. पाटलांना डॉक्टरांनी काळजी करू नका असे सांगितले. फक्त तो शुद्धीवर आला की आपण पाहू असे सांगितले रात्रीचे नऊ वाजत आले होते अजूनही तो शुद्धीवर आला नव्हता. डॉक्टरांनी सगळ्यांना घरी जायला सांगितले तसे सूर्या म्हणाला तुम्ही सगळे घरी जा मी इथे थांबतो. मधुरा म्हणाली मी पण येथेच थांबणार. शेवटी मधुरा आणी सूर्या दवाखान्यात थांबले. बाकी सगळे जण घरी गेले. सुशिलाबाईनी दोघांना डबा पाठवला होता पण मधुराने एकही घास खाल्ला नाही. सूर्याने जेवण केले आणि तो विराज जवळ जाऊन बसला रात्रीचे बारा वाजत आले होते मधुरा अजूनही रडत होती. सूर्या सकाळपासून कामाने खूप थकला होता तो तिथेच विराजच्या शेजारच्या बेडवर झोपी गेला. मधुरा वीराज जवळच्या खुर्चीवर बसून पेंगू लागली होती. पहाटे तो शुद्धीवर आला तशी तिने लगेच डॉक्टरांना बोलावून घेतले. विराज शुद्धीवर आला पण त्याचे डोके दुखत होते डॉक्टरांनी त्याला परत औषध देऊन झोपायला सांगितले. तो शुद्धीवर आल्यामुळे मधुरालाही बरे वाटले होते. तीही त्याच्या जवळच झोपी गेली. सकाळी डॉक्टर चेक अप ला आले तोपर्यंत तो जागा झाला होता. सूर्याने त्यांना विराजला घरी कधी सोडणार? असे विचारले तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही आज दुपारी यांना घरी घेऊन जाऊ शकता फक्त दोन दिवसांनी ड्रेसिंगला परत यावे लागेल. त्याची तब्येत ओके आहे हे ऐकून सगळ्यांना बरे वाटले. सूर्याने बाहेर जाऊन चहा आणि बिस्किटे घेऊन आला होता. त्याने मधुराला चहा दिला पण मधुराने मात्र चहाही घेतला नाही तसा सूर्या म्हणाला, वहिनी आपल्या माणसाची काळजी घेण्यासाठी आपल्या अंगात ताकद हवी आणि तुम्ही तर काल पासून काहीच खाल्लं नाही. तुम्ही त्यांची काळजी कशी घेणार? त्यावर मधुरा म्हणाली, अहो दुपारी घरी गेले की खाणारच आहे मी, पण आता मात्र काही नको मला त्यावर सूर्या काहीच बोलला नाही. विराज जागा झाला होता मधुराने त्याला उठवून बसवले आणि चहा बिस्किट खाऊ घातले. विराज मधुरा कडे पाहत होता तिचे डोळे रडून रडून सुजलेले होते. त्याने विचारले माझ्यामुळे त्रास झाला ना तुला? त्यावर ती परत रडू लागली आणि तिच्यामुळे हे सगळे घडले म्हणून ती त्याची माफी मागू लागली. तसं त्याने तिला समजावले आणि शांत केले डॉक्टर पुन्हा एकदा त्याच्या चेकअपसाठी आले होते. त्यांनी त्याला नेण्यासाठी परवानगी दिली.  ते दोघं विराजला घेऊन घरी आले
   सूर्याने विराजला त्याच्या रूम मध्ये नेऊन झोपवलं. सुशिलाबाई नी पोरगा बरा झाला म्हणून देवाला नैवेद्य दाखवला. मधुरा पण फ्रेश होऊन जेवणाची ताटं वाढण्याचे तयारी करू लागले. सूर्या दोघे रूममध्ये गप्पा मारत होते इतक्यात सुशिलाबाईनी सगळ्यांना जेवायला बोलावले. विराज उठणार इतक्यात सूर्याने त्याला सांगितले वहिनीने काल दुपारपासून काहीच खाल्ले नाही. मी तुमच्या दोघांचे ताट येथेच पाठवतो तू तिला खायला घाल. खूप नशीबवान आहेस इतकी प्रेमळ बायको तुला मिळाली आहे. सूर्या खाली आला त्याने सांगितले काकू विराज दमलाय.  तो आणि वहिनी वरच हवेतील. आपण जेवू येथे तसे त्यांनी ही दोघांची ताटे घेऊन मधुराला वर पाठवले. तीने रूम मध्ये दोघांची ताटे आणली. विराजने तिला स्वतःच्या हाताने घास भरवला तिनेही तो खाल्ला. दोघेही न बोलताच जेवत होते ती त्याला काही हवे नको ते पहात होती. जेवण झाल्यावर त्याने विचारले तू कालपासून उपाशी का राहिलीस? तशी ती म्हणाली तुम्ही माझ्यामुळे पडलात यामुळे मी घाबरले होते आणि तुम्ही शुद्धीवर हि लवकर येत नव्हता शेवटी देवाला सांगितले तुम्ही शुद्धीवर येतात तेव्हाच जेवण करेन तुम्हाला लवकर बर कर हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले तो म्हणाला इतकी काळजी करतेस माझी. तशी ती त्याला बिलगुन रडू लागली. हो मला काही सुचत सुचतच नव्हते शेवटी आईप्रमाणे मीही केले आई म्हणते नवऱ्याचा आयुष्यासाठी बायकोने उपास करायचा असतो म्हणून मी उपास केला जर तुम्हाला काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. मधुर
 तो तिला थोपटत होता. शांत करत होता. हळु हळु ती शांत झाली आणि आपण त्याचा मिठीत आहोत हे पाहून शहारली त्याचा हात अलगद बाजूला घेऊन ती उभी राहिली आणि जेवणाचे ताट उचलून पटदिशी निघून गेली. त्यालाही ती आपल्या मिठीत होती हे लक्षात आले म्हणून तोही सुखावला आणि मनातच म्हणाला कशा असतात या मुली आपलं सगळं दुसऱ्यासाठी अर्पण करणाऱ्या. पुढचे दोन-तीन दिवस मधुराने आणि सुशीला बाईंनी त्याला कुठेही जाऊ दिले नाही. पूर्ण आराम करायला सांगितला डॉक्टरांकडे जाऊन त्याचे ड्रेसिंग नाही करून आले. तो आता ठणठणीत बरा झाला होता सूर्या, काका ,पाटील फॅक्टरीचे काम करून घेत होते फॅक्टरीची पूर्ण काम होत आले होते. परवा 15 मे रोजी फॅक्टरी उद्घाटन करायचे असे पाटील यांनी सांगितले. सगळे खूप खुश होते आज उद्घाटन करायचे आणि उद्यापासून नवीन स्टाफ ची कामगारांची नेमणूक करायची असे ठरवले होते. सगळेजण उद्घाटनासाठी फॅक्टरी वर गेले मधुराच्या घरचे ही तिथे आले होते. जिवाजी पाटील आणि सुशिलाबाई नी पूजा केली. विराज आणि मधुराला बोलावून त्यांच्या हस्ते फॅक्टरी उद्घाटन करण्यात आले. त्या दोघांनीही पूजा करून रिबीन कापून फॅक्टरीचे उद्घाटन केले. त्यांनी फॅक्टरी ची माहिती गावकऱ्यांना दिली .सूर्याने उद्यापासून कामगारांची निवड करणार असल्याचे सगळ्यांना सांगितले. शेवटी पाटलांनी आज फॅक्टरीचे उद्घाटन आणि विराज च्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला त्याबद्दल सगळ्यांसाठी जेवण ठेवले आहे. सगळ्यानी जेवूनच घरी जावे असे गावकर्‍यांना सांगीतले. तसे विराज आणि मधुरा एकमेकांकडे पाहू लागले. आज आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला हे दोघांच्याही लक्षात नव्हते
    विराज मनात विचार करू लागला कदाचित मधुराच्या लक्षात असेल आजचा दिवस पण आपणच विसरलो. आपण तिच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. काय करावे, तिला काय आवडते, तिला गिफ्ट द्यावे काहीतरी, त्याला समजतच नव्हते तो विचारात असतानाच रमेश तिथे आला. रमेशने त्याचे आणि सूर्याचे अभिनंदन केले आणि तो हळूच म्हणाला भाऊजी उद्या कामगारांची नियुक्ती आहे तेव्हा मी पण आलो तर चालेल का? हे ऐकून विराजला मधुराचे बोलणे आठवले. तो रमेशला म्हणाला, नाही रमेश हे तुझे बारावीचे वर्ष आहे तू कोणतेही काम न करता मन लावून फक्त अभ्यास कर. जर तुला चांगले मार्क्स मिळाले तरच तुला डॉक्टर होता येईल हो ना? तसे चमकून रमेश म्हणाला, तुम्हाला कसे माहिती मला डॉक्टर व्हायचे आहे ते?
 मधुराने सांगितले आहे आणि हे पण सांगितले आहे की शिक्षणाचा खर्च जास्त असल्याने तू काळजीत आहेस. पण अजिबात काळजी करू नकोस मी आणि मधुरा आहोत ना दोघे मिळून तुला सगळी मदत करून तू फक्त चांगला अभ्यास कर.विराज
   भाऊजींचे बोलणे ऐकून रमेशला खूप आनंद झाला . त्याने मनोमन देवाचे आभार मानले आणि तो निघाला संध्याकाळचे पाच वाजत आले होते सगळे घरी गेले. फॅक्टरीमध्ये फक्त विराज, सूर या ,रावजी काका आणि पाटील राहिले होते त्या दोघांनी पाटलांना आणि रावजी काकांना नमस्कार केला तसे पाटील म्हणाले, विराज तुही आता लवकर जॉब सोडून गावी निघून ये. सूर्यालाही तुझी मदत होईल चला आता निघुयात असे म्हणून पाटील निघाले. पण विराज मात्र तिथेच विचार करत उभा होता तेव्हा त्यांनी विचारले तुला काही बोलायचे आहे का? विराज घाबरतच विचारले बाबा जर तुमची परवानगी असेल तर आपल्या फॅक्टरीचा अकाउंट डिपारमेंट मध्ये काम करण्यासाठी एका व्यक्तीचे नाव मी सुचवू का? तसे पाटील म्हणाले हो सांग की कोणी आहे का विश्वासू व्यक्ती. तसे वीराजने मधुरा चे नाव सांगितले. सुनबाई च नाव ऐकून पाटील चमकले आणि म्हणाले सुनबाई नी आपल्याच फॅक्टरीत काम करायचे. त्याच मालकीण आहेत फॅक्टरीच्या. तसा विराज म्हणाला तिला स्वतःहून काम करायची इच्छा आहे तसे तिचे स्वप्नच आहे आणि दुसरीकडे काम करण्यापेक्षा आपल्याच फॅक्टरीत काम केले तर काय हरकत आहे.
विराज चाचरतच म्हणाला तसे पाटील जोरात हसायला लागले अरे पोरा असा घाबरतोस काय? आपल्या घरची लक्ष्मीची पावले आपल्या फॅक्टरीमध्ये स्वतःहून येत असतील तर आमची काहीच ना नाही. पण काय रे अजून किती लोकांचा वशिला लावणार आहेस तू उद्या. असे म्हणतात सगळे जण हासू लागले. तसा तो म्हणाला नाही बाबा मधुराला तर अजून माहितीच नाही की मी तिचे नाव सुचवले आहे ते.
 अरे पण मग तिला नक्की काम करायचा आहे का एकदा तिला विचारा आणि मगच आम्हाला सांगा. पाटील आपल्या घरातील आणि विश्वासू व्यक्तीने जर पैशाचे व्यवहार पाहिले तर चांगलेच आहे बाबांचे मत ऐकून विराज खूष झाला आणि कधी एकदा मधुराला सांगतो असे त्याला झाले. घरी आल्या आल्या तो रूम मध्ये गेला. मधुरा रूम मध्ये गिफ्ट पॅक करत होती ते पाहून तो हळूच परत रूमच्या बाहेर आला आणि गाणं गुणगुणतच रूम मध्ये जाऊ लागला. तसे तिने गिफ्ट आपल्या पाठीमागे हातात लपवले तो आत येताच ती म्हणाली, आज सकाळपासून तुम्ही खूप खुश दिसता. तुमच्या आजच्या यशासाठी मी तुमच्यासाठी एक भेट आणली आहे आणि ती ते गिफ्ट त्याला देते. 
थॅंक्स विराज म्हणाला
 तुम्ही गिफ्ट उघडून पहा मी जेवणाचं बघते असे म्हणून ती निघून गेली. त्याने  गिफ्ट  उघडले आत ब्ल्यू कलर चा मस्त शर्ट होता त्याने तो घालूनही पाहिला त्याच बरोबर एक चिठ्ठी पण होती त्यामध्ये आजच्या यशाबरोबरच तिने त्यांच्या फर्स्ट  मन्थ अनिव्हर्सरी च्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्या शुभेच्छा बघून त्याला ती आयडिया आवडली आणि मग त्यांनी ही एक लिफाफा तयार केला आणि त्या लिफाफे मध्ये त्याने तिला अकाउंट डिपारमेंट मध्ये जॉब मिळाल्याचे लेटर लिहिलेले आणि एका चिठ्ठीवर लग्नाच्या वन मन्थ एनिवर्सरी च्या शुभेच्छा दिल्या आणि तो लिफाफा त्याने तिथे उशीवर ठेवला. इतक्यात सुशीला बाईनी  त्याला जेवायला हाक मारली.  जेवून आल्यावर मुद्दामून त्याने झोपून घेतले. थोड्यावेळाने मधुरा आवरून रूममध्ये आली. उशीवरचा लिफाफा पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने तो उघडला आत 2 कागद होते एका वरती एनिवर्सरी च्या शुभेच्छा होत्या आणि एका मध्ये तिला नोकरी मिळाल्याचे लेटर होते. ते गिफ्ट पाहून ती खूप खुश झाली तिने पटदिशी जाऊन अहो म्हणून त्याला हाक मारली. तो जागा झाला आणि काय झाले म्हणून विचारू लागला तशी ती आनंदाने ओरडत थँक्स फोर गिफ्ट असे म्हणाली.
 तुला खरंच आवडलं हे गिफ्ट. विराज 
हो खूप आवडल आहे. पण मी नोकरी केलेली मामंजी ना चालेल का ? मधुरा
हा आता ते मात्र तुला बाबांनाच विचारावं लागेल. तू असे कर उद्या फॅक्टरीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला ये म्हणजे तेच तुला सांगतील नोकरीबद्दल. विराज
 सकाळी लवकर आवरून सगळेजण फॅक्टरीमध्ये गेले सूर्या आणि विराज कामगारांची माहिती तपासात होते रावजी काका ,पाटील आणि त्यांच्याबरोबर साखर कारखान्यांमध्ये काम करणारे काही अनुभवी व्यक्ती मुलाखती घेण्याचे काम करत होते. खरेदी-विक्री, स्टॉक,अकाउंट अशा अनेक डिपार्टमेंट नुसार वेगवेगळ्या ठिकाणी लागणाऱ्या माणसांची नेमणूक करण्यात येत होती. दुपारच्या जेवणानंतर मधुराही इंटरव्हयू साठी आली. िने चांगला इंटरव्हयू  दिला. पाटलांनी तिला तुमची नेमणूक झाली का नाही हे कळवू असे सांगितले. तशी ती थँक्स म्हणून ऑफिस मधून बाहेर पडली. सायंकाळी सगळी कामे आटपून पाटील, विराज घरी आले. जेवताना सगळे एकत्र बसले होते. तेव्हा पाटलांनी मुलाखतीचा विषय काढला ते म्हणाले, सुनबाई तुम्ही इंटरव्हयू  चांगला दिला. त्यात तुम्ही पासही झाला आहात पण आम्ही तुम्हाला आत्ताच कामावर घेऊ शकत नाही. ते ऐकून विराज चमकला. मधुराही घाबरली. तसे पाटील पुढे म्हणाले आता कुठे तुमच्या लग्नाला एक महिना झाला. तुम्ही दोघे कुठे बाहेरही गेला नाहीत. तेव्हा तुम्ही जरा फिरून या. एक-दोन महिने जाऊदे मंग ऑफिस जॉईन करा. एकदा कामाला सुरुवात झाली कीपरत मोठी सुट्टी मिळणार नाही ते ऐकून मधुरा च्या डोळ्यात पाणी आले. तिने त्यांना वाकून नमस्कार केला.
 बाबा आपल्याला फिरून ये म्हणाले आहे याबद्दल मधुराशी बोलूया असे वीराजणी मनातच ठरवले. फॅक्टरीमध्ये नवीन कामे करताना दिवस भराभर निघून जात होते त्यातच विराजलाही लवकर पुण्याला जायचे होते. तिथल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मग जॉब सोडणे योग्य होते. मधुरा ही जॉब मिळाला म्हणून खूष होती. तिने कम्प्युटर क्लास जॉईन केला होता. कामाच्या दृष्टीने गरजेचे आहे ते शिकून घ्यायचे त्यांनी ठरवले. रोज दिवसभर आपली आपली कामे, रात्री मधुराच्या हातचे छानसे जेवण आणि झोपेपर्यंत मनसोक्त मारले जाणारे गप्पा या दोघांचे दिवस भराभर पळत होते.यात त्यांचे फिरायला जायचे ही राहून गेले होते. दोन दिवसांनी विराजला पुण्याला जायचे होते. त्यासाठी मधुरा त्याची बॅग भरणे, त्याच्यासाठी पदार्थ बनवण्याचे काम करत होती. वीराजही सूर्याला काही हवे नको ते पाहून घेत होता. 
   आज सकाळपासून मधुरा आणि  विराज दोघेही अस्वस्थ झाले होते.  दोघांनाही कळत नव्हते काय होत आहे ते. दुपारच्या जेवणानंतर विराज पुण्याला निघणार होता. मधुरा चे पण कामात लक्ष लागत नव्हते. तो जाणार म्हणून तिला अस्वस्थ वाटत होते. पण तो कामासाठी जाणार होता त्यामुळे त्याला जाऊ नको असे सांगणे योग्य वाटत नव्हते. विराज आपले सामान चेक करत होता तरीही काहीतरी राहिल्यासारखे वाटत होते. त्याच स्थितीत तो गाडीत बसला. सगळ्यांना येतो म्हणून सांगताना त्याने मधुरा कडे पाहिले. तिचा रडवेला चेहरा पाहून त्याला समजले आपले काय राहिले आहे ते. तो लगेच ऑफिसला जॉईन झाला. रजा घेतल्यामुळे भरपूर काम त्याची वाट पाहत होती. पण कामात त्याचे मनच लागत नव्हते. सतत मधुरा ची आठवण येत होती.
    सकाळी उठल्यापासून तिच्या हातचा चहा, तिचा हसरा चेहरा, दिवसभर त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. दोन-तीन वेळा फोन लावायचा विचार मनात आला पण कामांच्या मध्ये फोन करायला वेळच मिळत नव्हता. संध्याकाळी दमून तो घरी आला. घरात पाऊल ठेवताच परत एकदा त्याला तिची आठवण झाली. त्याने लगेच फोन पाहिला तिचे कितीतरी मेसेजेस होते. जे त्याने सकाळपासून पाहिलेच नव्हते. त्याने तिला फोन केला पण तीही फोन उचलत नव्हती. शेवटी त्याने घरच्या फोनवर फोन केला. सुशीला बाईनी फोन उचलला. आईशी थोडावेळ बोलून त्याने मधुरा बद्दल विचारले. तेव्हा ती स्वयंपाक करत होती असे कळले. सर्वांसमोर ती बोलणार नाही म्हणून त्याने फोन ठेवला. कधी एकदा रात्रीचे नऊ वाजतात असे त्याला झाले होते. तो फ्रेश होऊन बाहेर जाऊन जेवण करून आला. थोड्यावेळ इकडे-तिकडे केल्यानंतर बरोबर नऊ वाजता त्यांनी तिला फोन केला. फोन उचलताच तिचा आवाज ऐकून त्याला बरे वाटले. सॉरी मधुरा अगं दिवसभर मी फोन पाहिलाच नाही. खूप काम होते. तुझे मेसेज पाहून तुला फोन केला तेव्हा तुही फोन उचलत नव्हतीस. खरंच सॉरी तू माझ्यावर चिडली नाहीस ना. विराज 
ती पाणावल्या डोळ्यांनी नाही म्हणाली 
मग तू काहीच का बोलत नाहीस? विराज 
तुम्ही बोलायला दिलेच नाही.  तुम्हाला फोन पाहायला वेळच नाही झाला मग काम करायच्या आधीच एकदा फोन करायचा ना. तिचं समजूतदारपणा पाहून त्याला बरे वाटले. तसा तो म्हणाला चुकलं माझं, आता रोज रात्री याच वेळेला आपण फोनवर बोलत जाऊ. तशीही आज तुझी खुप आठवण येत होती मला. जीभ चावतच तो म्हणाला, म्हणजे रोजची घरची सवय आणि आज मी एकटाच आहे त्यामुळे सगळ्यांची खुप आठवण येत होती.
 हो इकडे आई पण सकाळपासून तुमची खूप आठवण काढत होत्या. मधुरा
 एकमेकांशी बोलून दोघांना जरा बरे वाटत होते मग त्यांच्या रोज अशा गप्पा सुरू झाल्या. मधुरा पण मनापासून कम्प्युटरचे शिकून घेत होती. दोघे दिवसभर आपल्या कामात व्यस्त होते पण पावलोपावली त्यांना एकमेकांच्या आठवण येत होती. तिचा कोर्स पण आता दोन-तीन दिवसातच पूर्ण होणार होता. ती कंटाळली होती. सतत काही ना काही कामात ती स्वतःला व्यस्त ठेवू लागली तरीपण कधी एकदा रात्र होईल आणि विराजशी बोलायला मिळेल असे तिला होत असते. एक दिवस सुशिलाबाई च्या मैत्रीण त्यांच्या घरी आल्या होत्या. त्यांच्या सुनेचा म्हणजे राधाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. त्याचे आमंत्रण करायला त्या आल्या होत्या. त्यांची सून मधुराच्या ओळखीची होती. दोघी बारावीपर्यंत एकत्र शिकत होते पण नंतर तिने शिक्षण सोडून दिले. आता दीड वर्ष पूर्ण झाले तिच्या लग्नाला. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. सुशिलाबाई आणि मधुरा दोघी आवरून कार्यक्रमाला गेल्या. राधा खूप छान दिसत होती. हिरवी साडी, अंगावर फुलांचे दागिने घालुन ती फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसली होती. तिच्या गरोदरपणाचे तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. मधुरा आणी सुशिलाबाई तिची ओटी भरायला गेल्या तशी मधुराला पाहून ती खूप खुश झाली. कार्यक्रम झाला तरी माझ्यासाठी थांब. असे तिने मधुराला सांगितले. मधुरा ही हो म्हणून सासुबाई बरोबर बाजूला जाऊन बसली. सुशिलाबाई च्या अनेक ओळखीच्या बायका मैत्रिणी त्यांना भेटत होत्या. त्या सगळ्यांशी मधुराची ओळख करून देत होत्या. प्रत्येकजण मधुराला आता लवकर गोड बातमी दे म्हणून चिडवत होते. सगळ्या बायकांच्या तोंडी मातृत्वाच्या गोष्टी, गरोदरपणाचे डोहाळे याच गप्पा रंगल्या  होत्या.मधुरा चे लक्ष राधाकडे होते. राधाच्या आणि तिच्या नवऱ्याचे वेगवेगळ्या पोज मध्ये फोटोशूट चालू होते. त्यांचे एकमेकांवरचे प्रेम त्यांच्या नजरेतून वाहत होते. ते पाहून मधुराला सतत वीराजची आठवण येत होती. काही क्षण ती स्वतःला आणि विराजला त्या जागी पाहत होती. तितक्यात एक बाई तिला म्हणाली काय मग छोट्या पाटलीन बाई, आता लावा तुम्ही नंबर. तशी मधुरा लाजली. सुशिलाबाई पण विराजच्यावेळी त्यांना काय खावे वाटायचे, काही नाही हे इतरांना सांगत होत्या, त्या सगळ्या बायकांच्या गमतीजमती ऐकून तिला आश्चर्य वाटत होते आणि हसू येत होतं. राधाचे ओटीभरण झाल्यावर राधा मधुराला घेऊन तिच्या रूम मध्ये आली. दोघी खूप दिवसांनी भेटल्या होत्या. एकमेकांची चौकशी करू लागल्या. कॉलेजमधले इतर मैत्रिणींची चौकशी करून झाली. राधा तिला त्यांच्या लग्नाचे फोटो दाखवत होती. दोघांनी फिरायला गेल्यावर चे फोटो दाखवत होती. सगळे फोटो पाहून मधुरा मात्र अस्वस्थ होत होती. राधाच्या गप्पा, तिच्या नवऱ्याचे कौतुक ऐकून मधुराला वाटत होतं की, आपण विराजला नवरेपणा चा हक्क दिला नाही हे चुकत नाही ना? इतके दिवस त्याला जाणून घ्यायचे होते पण आता दोन-तीन महिने होत आले तरी आपण काहीच बोललो नाही. विराज आपल्याला इतके समजून घेतात. आपणही बायकोचं कर्तव्य केलं पाहिजे. तिच्या मनात हेच विचार घोळत होते. राधा ने विचारले काय झाले? तशी ती भानावर आली. काही नाही उशीर होतोय आता. निघते म्हणून ती बाहेर आली. जेवण करून तिने राधाचा निरोप घेतला. रात्री घरी यायला दहा वाजले होते. मधुरा फोन घरीच विसरून आली होती. घरी येताच तिने फोन पाहिला वीराजचे पाच सहा मिस-कॉल दिसले. तशी ती अजुनच वैतागली. तिने त्याला फोन केला आणि सॉरी म्हणाली. तो तिला तिच्या मैत्रिणीबद्दल विचारू लागला तशी ती गप्प झाली. ती काहीच बोलली नाही तेव्हा विराज म्हणाला काय गं काय झालं ?बोल ना. काही नाही जरा दमल्याने वैतागले  मधुरा
का कोणी काही बोललं का तुला? विराज 
हो सगळ्या बायका म्हणत होत्या तुझा नवरा तुला येथेच सोडून का गेला? तुला सोबत का नाही नेले? मधुरा 
मग तू काय म्हणालीस? विराज
 काही नाही म्हणाले ते लवकर देणार आहेत आता. मधुरा हो मी अजून महिनाभरात येणार आहे काळजी करू नकोस. विराज
 हा या कधीही मला काय एकटी राहायची सवयच आहे चला ठेवते मी फोन असे म्हणून तिने फोन रागातच ठेवून दिला. ती रागावली हे त्याला समजले पण काय करावे हेच सुचत नव्हते. तो पण तिला भेटायला व्याकुळ झाला होता. त्याला शांतपणे झोपही लागेना मग त्याने सूर्याला फोन लावला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. सूर्याही जरा घाईत होता. त्यामुळे त्याने फोन ठेवला. त्याने शशीला फोन लावला. शशी पण त्याचा खास मित्र होता. त्याने सहज शशी आणि त्याच्या गर्लफ्रेंड मध्ये काय चालले आहे असे विचारले. तसाच शशी म्हणाला, अरे गुड न्यूज आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. घरचे सगळे लग्नाला तयार आहेत. मी तिला लग्नानंतर कुठे न्यायचे याचा प्लॅन करतोय. तुमचे काय चाललंय? विराज म्हणाला, अरे आम्ही अजून बाहेर गेलोच नाही. आत्ता पुण्यात आहे ना. तसा  शशी हसायला लागला आणि म्हणाला दोघेजण पुण्यात आहात मग कशाला फिरायला जायचे? मज्जा आहे की तुमची. राजाराणी मस्त संसार करत आहे. तसा विराज हसला आणि त्याने थोड्या गप्पा मारून फोन ठेवला. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्यांनी आईला फोन लावला. आप्पांची ,बाबांची चौकशी केल्यावर त्याने आईला सांगितले. मला येथे खूप काम आहे. त्यामुळे आम्हाला इतक्यात बाहेर जाणे शक्य नाही. तर थोडे दिवस मधूराला पुण्याला पाठवून देतेस का? तशा सुशिलाबाई म्हणाल्या कारे बायकोची आठवण यायला लागली वाटत?
आग तसं नाही काही. तिचा पण आता क्लास संपत आलाय ना. म्हणून म्हणलं. विराज 
अरे बाबांना सांगून तिला पुण्याच्या गाडीत बसवून देते कधी पाठवू सांग. सुशिलाबाई
उद्या दुपारच्या गाडीने पाठव म्हणजे मी ऑफिस नंतर तिला घ्यायला जाईल असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी ऑफिसला दांडी टाकायची असे ठरवून तो मनातच उद्याचे प्लॅन बनवत झोपी गेला.
 आजची सकाळ त्याच्यासाठी खूप उत्साही होती. त्याने लवकर उठून चहा केला गाणं गुणगुणत सगळी कामं उरकून शॉपिंगला गेला. आज पहिल्यांदाच तिच्यासाठी शॉपिंग करायला गेला होता. तिथे गेल्यावर मात्र त्याला कोणती साडी घ्यावी हे काही समजेना. शेवटी त्याने तिथल्याच एका लेडीज ला मधुरा चा फोटो दाखवून हिला छान दिसेल अशी साडी आणि त्याला मॅचिंग ज्वेलरी दाखवायला सांगितले. तिने अनेक रंगाच्या साड्या दाखवल्या त्यातून  त्यांने लाल रंगाची ब्रासो डिझायनर साडी घेतली आणि आणखीन एक दोन साडी खरेदी केल्या. नंतर त्यांनी अशीच भरपूर सारी मोगऱ्याची फुले खरेदी केली. खूप वेळ फिरल्यानंतर त्याला तिच्यासाठी एका ठिकाणी सोनचाफ्याची वेणी मिळाली. बाहेरच जेवण करून त्याने त्याच ठिकाणी रात्री साठी जेवण ऑर्डर केले आणि तो घरी आला. घरी येऊन त्यांनी त्यांची रूम थोडीशी डेकोरेट केली. त्याच्या हॉलला जोडून एक छोटीशी बाल्कनी होती. ती साईडने बंदिस्त असली तरी तिला एक छान मोठी खिडकी होती. जिथून त्यांच्या सोसायटीचा खालचा लोन दिसत होता. तिथे त्याने दोघांसाठी डिनरसाठी टेबल लावला. टेबलावरती गुलाबाची फुले ठेवली. प्लेट चमचे मांडून ठेवले तिच्यासाठी केलेली शॉपिंग रूम मध्ये नेऊन ठेवली. हॉलमध्ये तिच्या स्वागतासाठी फुले अंतरली. सहा वाजत आले तसा तो तयार होऊन तिला न्यायला गेला. इकडे मधुराला आई आणि मामंजी नि पुण्याच्या गाडीला बसवून दिले. सोबत दोघांसाठी थोडेफार खायचे पदार्थ येणे पण तिला अचानक विराज कडे का पाठवली हे समजत नव्हते. तिलाही विराजला भेटायचे होते पण काल रात्री तिने रागातच फोन कट केला आणि तेव्हापासून दोघं एकमेकांशी बोललेच नाहीत. तिनेही त्याला फोन केला नाही आणि त्यानेही तिला फोन केला नाही. पुणे जवळ आलं तसं ती राग विसरून त्याच्या भेटीला उत्सुक झाली होती. ती गाडीतून उतरली तिची नजर त्याला शोधू लागली. तसा तो धावतच तिच्याकडे आला एकमेकांना पाहताच दोघांचेही डोळे नकळत पाणावले. तो पण खूप दिवसांनी तिला पाहून हळवा झाला होता. त्याने तिचे सामान घेऊन टॅक्सीमध्ये ठेवले. गाडीत बसल्यावर त्याने विचारले कशी आहेस? तशी ती ठीक आहे. म्हणाली आणि बाहेर पाहू लागली. त्याने गाडी एका हॉटेल जवळ थांबवली. ऑर्डर केलेले पार्सल घेऊन मग ते दोघे घरी आले. त्याने बाहेरच तिला थांबायला सांगितले आणि दार उघडले. तिचे सामान आत नेऊन ठेवले. तो पुन्हा बाहेर आला आणि अचानक त्याने तिला उचलून घेतले आणि तिला घरात नेले तशी ती लाजली. आत येऊन तिने पाहिले हॉलमध्ये त्याने तिच्यासाठीफुले अंथरली होती. ते पाहून ती खूप खुश झाली तिच्या डोळ्यातून अश्रू चे दोन थेंब ओघळले. त्याने हलकेच हाताने तिचे डोळे पुसले आणि विचारले काय झाले? 
तुमची खूप आठवण येत होती मधुरा 
मला पण. विराज 
ऐक आता तू जरा फ्रेशहो आणि आत तुझ्यासाठी कपडे ठेवले आहेत ते घालून तयार हो माझ्यासाठी. ती लगेच आत गेली फ्रेश होऊन त्यांनी आणलेली साडी, दागिने घालताना तिला काहीतरी वेगळेच समाधान मिळत होतं. ती मस्त तयार होती फक्त त्याच्यासाठी. तोपर्यंत विराज ने दोघांसाठी मागवलेले जेवण टेबलवर रेडी केले. ती बाहेर आली त्याने तिचा हात धरुन तिला बाल्कनीमध्ये आणले. मस्त हवेशीर जागा, तिथे सजवलेले टेबल, गुलाबाची फुले हे पाहून ती छान हसली आणि म्हणाली आज काय मला भरपूर सरप्राईज मिळणार आहेत वाटतं. दोघांनी एकमेकांना घास भरवत मस्त जेवण केले. मनसोक्त गप्पा मारल्या. जेवण झाले तशी मधुरा म्हणाली आता आणखीन काही सरप्राईज आहे? त्याने तिला आरशासमोर नेले आणि तिच्यासाठी आणलेली सोनचाफ्याची वेणी तिच्या केसात माळली.त्या फुलांचा सुगंध घेऊन तो म्हणाला, आठवतय तुला मी तुला पहिल्यांदा  पाहिले तेव्हा , लग्नात सुद्धा आणि आपल्या पहिल्या रात्रीही तू अशीच सोनचाफ्याची वेणी घातली होतीस. खुप सुंदर  दिसत होतीस तु. या फुलांप्रमाणे तू माझ्या आयुष्यात सुगंध घेऊन आलीस आणि माझा आयुष्य बदलून गेलं. जे घडते ते देव चांगल्यासाठीच घडवून आणतो हे पटलं मला. नाहीतर तू मला कशी भेटली असती. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्यात कायम मला तुझी सोबत हवी आहे. विराज. माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी कायम तुमच्यासोबत आहे.असे म्हणून मधुरा त्याच्या मिठीत शिरली. सोनचाफ्याचा वास आता घरभर पसरला होता.  विराज  आणि  मधुरा एकमेकांच्या प्रेमात नाहुन निघत होते.
सौ.विद्या रोहित मेटे

Circle Image

Vidya Rohit Mete

House wife

I am Housewife. I like Reading books and Writing story or poems.