Login

एक बिघडलेली पाककला

U Tube वरती रेसिपी पाहून तयार केलेला पदार्थ आणि त्यामुळे झालेली गंमत
???????

एक बिघडलेली पाककला

स्वयपाक घर आणि मी यांच नातं अगदी कामपुरतच आहे. रोजचा स्वयंपाक करावा , आवरावे आणि कधीकधी इडली, डोसा ,वडा असे पदार्थ करावे इतपत सुगरण पणा अंगी आहे पण यापुढे जाऊन काही मिठाई चे प्रकार करून पाहण्याची कधी हिम्मत केली नव्हती.
पण मोकळा वेळ मिळाला आणि सोबतीला कोणी असेल तर असे प्रयोग करून बघण्याचा मोह कधीकधी आवारात नाही. असेच एकदा मी, माझी ननंद आणि पकाकलेची आवड असणारी भाची एकत्र आलो होतो. सगळी कामे आवरून झाली. योगायोगाने घरात फक्त तिघीच होतो. आणि मग काय आमच्या सुगरण भाचीला मूड आला काहीतरी नवीन करून बघण्याचा.. झालं... u tube वर बऱ्याच पाककृती शोधली आणि पदार्थ ठरलासोनपापडी दचकलात न? मी तर उडलेच पण भाचीचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून माझी भीती सरली आणि लहारो से डर कर नौका पार नही होती...कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती"  म्हणत मी हि कामाला लागले..
साहित्याची जमवाजमव झाली आणि प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली. सोपं होतं सगळं फक्त मैदा तुपात चांगला भाजयचा आणि साखरेचा पाक करून त्यात मैदा टाकायचा. इतकंच आणि सोन पापडी तयार!!! आम्ही तर बाहेरच्या ऑर्डर घेऊन मिठाई च दुकानच बंद पडण्याची स्वप्न बघत होतो. इतक्या कमी खर्चिक पदार्थाला आपण जास्त पैसे मोजतो म्हणून स्वतः चा राग देखील आला. पण आता यापुढे आपणच सोन पापडी तयार करायची म्हणत कामाला सुरुवात केली. साजूक तुपावर मैदा भाजून घेतला , मस्त घमघमाट सुटला त्याचा ,, चला एक पायरी पूर्ण झाली. आता काय पाक झाला कि तयारच सोन पापडी...
परत परत व्हिडिओ बघून एकदाच तिघींनी  मिळून-एकतारी पाक तयार केला. त्यात म्हणे डिंकासारखा कसलातरी पदार्थ टाकायचा होता. भाची माझी गुणाची तिने तो पदार्थ आधीच आणून ठेवला होता. मग प्रमाण ठरल्याप्रमाणे पाकात तो टाकला आणि हो एकच अट होती कि पाकात चिकट पदार्थ टाकला कि लगेच चमचे, सुरी वापरून दोऱ्या पडायच्या पाकात घातलेल्या मैद्याच्या. हं यात काय मोठं असं वाटून आम्ही हातात आयुधं  (सुरी, काटे)घेऊन सज्ज झालो. ताईंनी पाकात मैदा टाकला त्याबरोबर मी आणि भाची मिळून मैद्याच्या दोऱ्या करायला सुरुवात केली ... मध्ये पातेले ठेवलेले आणि आम्ही दोघी जोरजोरात मैदा ओढतो आहोत..जोर लागा के...हं हं जमतंय, अजून थोडा जोर लावा.... असं एकमेकांना म्हणत धीर देत आम्हीसोनपापडीला सुरुवात केली पण छे! काहिकेल्या दोऱ्या होईनात!! हात दुखायची वेळ आली पण सोन पापडीच्या दोऱ्याना आमची काही दया येत नव्हती.. "झालं झालं थोडं राहिलं" , म्हणत ताई आमचा आत्मविश्वास वाढवत होत्या. आता सुरी, काटे, चमचा यांच्या मदतीला स्क्रू ड्रायव्हर, सळ्या, छोटे गज देखील आले पण  काय मिठाई वाल्याचा शाप चांगलाच लागला. आणि पाक थंड झाला तरी सोनपापडी मात्र रुसून बसली.. शाप तर लागणारच ना आम्ही तर मिठाई वाल्या चे शॉपच बंद करायला निघालो होतो न....
पण हं आम्हीही काही हार मानांर्यापैकी नव्हतो बर का! आम्ही त्याची सोन वडी केली पण इथेही दैवाने साथ सोडली आणि सोन वडी जरा जास्तचकडक  झाली.
आता या बिघडलेल्या *सोन पापडी कि सोन वडी* चं काय करायचं असा विचार आम्हाला पडला पण आमच्या ताई मात्र खरंच सुगरण. त्यांनी ती वडी खलबतत्यात घालून बारीक केली, दूध गरम केले आणि ती बारीक पावडर दुधात घालून त्याचे सोन लाडू तयार केले.
आणि एका बिघडलेल्या पदार्थापासून आम्ही-बी घडवला एक नवा पदार्थ.....
आवडल्यास सोन लाडू नक्की तयार करून बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा
??????
????????????????
गीतांजली सचिन