Login

उरातील हुंदका..❤️❤️

A Short Blog On Emotions


उगा तुटतो मी आतून तुला समजून घेताना...
डोळ्यातून फक्त पाणी येत नाही मुसुमुसू रडताना...!!

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी येतं.आपण प्रत्येकालाच समजून घेत नाही. आणि प्रत्येकाला समजून घेणारे असही फारच दुर्मिळ...! इथे प्रत्येकाला समजून घेता येत नाही ते शक्य असलं तरीही. पण आपण आपल्या परिने जेवढं शक्य होईल तितकं एखाद्याला समजून घेण्याचा खूप प्रयत्न करतो.अनेकदा ती व्यक्ती आपल्या हृदयातील हक्काची सुखद जागा असते.त्या व्यक्तीशी आपण भांडतो , तिला रडवतो , रडता रडता हसवतोही...इतकच नाही तर त्या व्यक्तीच्या डोळ्यातील न दिसणारं पाणीसुद्धा आपण आपल्या हाताच्या प्रांजळ स्पर्शाने पुसतो.आईच्या कुशीत घट्ट बिलगून झोपतो तसच त्या व्यक्तीला तितक्याच मायेने कुशीत घेतो , डोक्यावरून , पाठीवरून प्रेमाचा हात फिरवतो.


पण...........पण एक दिवस अशी वेळ येते की त्याच आपल्या हृदयातल्या व्यक्तीला समजून घेणं आपल्याला फार कठीण जातं.त्या व्यक्तीचं वागणच समजेनासं होतं.कोणता गोंधळ , कोणतं काहूर त्यांच्या मनात माजलेल असतं काहीच कळायला मार्ग नसतो.ती व्यक्ती बोलायची थांबते , एखाद्या कवितेवर निःशब्द अशी दाद द्यावी तशी ती व्यक्ती तर कायमचीच निःशब्द होऊन जाते. अशावेळी आपल्या मनाची घालमेल किती विचीत्र चाललेली असते हे प्रत्येकाला माहीतच असेल.का येते अशी अंगाचा थरकाप उडवणारी वेळ आपल्यावर......?

क्रमशः 

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे

🎭 Series Post

View all