"मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
"बोला. काय बोलायचं आहे ते लवकर बोला." सौदामिनी म्हणाली.
"इथे नको. मला कुठेतरी बाहेर भेटशील? म्हणजे बागेत वगैरे. तिथे निवांत गप्पा मारता येतील." राजन असे म्हणताच सौदामिनीने पुन्हा एक तिरका कटाक्ष टाकला.
"गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. काही महत्त्वाचे असेल तर बोला. नाहीतर तुम्ही जाऊ शकता." सौदामिनी जवळ जवळ राजनवर खेकसलीच.
"नाही. म्हणजे मला महत्वाचेच बोलायचे आहे; पण इथे नको बाहेर कुठेतरी बोलू." राजन म्हणाला.
सौदामिनीने बराच वेळ विचार करून शेवटी राजनला होकार दिला.
"ठिक आहे. आज संध्याकाळी नेहरू बागेत येईन. तिथे बोला जे बोलायचे आहे ते." सौदामिनी म्हणाली. \"शेवटी हा काय थोडीच चांगलं बोलणार आहे. पण ऐकनाच तर नाईलाजास्तव भेटायलाच हवे.\" सौदामिनी पुन्हा मनात म्हणाली.
"ठिक आहे. आज संध्याकाळी नेहरू बागेत येईन. तिथे बोला जे बोलायचे आहे ते." सौदामिनी म्हणाली. \"शेवटी हा काय थोडीच चांगलं बोलणार आहे. पण ऐकनाच तर नाईलाजास्तव भेटायलाच हवे.\" सौदामिनी पुन्हा मनात म्हणाली.
"आज नको. आपण रविवारी भेटूया." राजन म्हणाला.
"रविवारी का? मला रविवारी वेळ नाही. आज भेटायचं तर भेटा नाहीतर राहू दे." सौदामिनी म्हणाली.
"नको ना. प्लीज रविवारी भेटूया ना." राजन खूपच विनवणी करू लागला. त्यामुळे सौदामिनीला ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता.
"ठिक आहे. रविवारी तर रविवारी भेटू. पण वेळेत यायचं. मी जास्त वेळ वाट पाहणार नाही. थोडा जरी उशीर झाला तरी मी लगेच जाणार. तेव्हा वेळेत या. ठिक चार वाजता." सौदामिनी म्हणाली.
"ठिक आहे." म्हणून राजन जाऊ लागला. थोडा पुढे गेला असेल तोच पुन्हा वळून मागे आला.
"आता आणखी काय?" सौदामिनी वैतागून म्हणाली.
"आता आणखी काय?" सौदामिनी वैतागून म्हणाली.
"ते रविवारी येताना ही वर्दी घालून येऊ नकोस. एखादी सुंदर साडी नेसून ये. प्लीज." राजन म्हणाला.
"ते माझे मी पाहते. तुम्ही जा आता. उगीच माझं डोकं खाऊ नका." सौदामिनी ओरडली. तेव्हा राजनने काढता पाय घेतला.
राजन त्याच्या ऑफिसमध्ये गेला. सुट्टी होऊन बराच वेळ झाला होता त्यामुळे तो लगेच कामाला लागला. ऑफिस सुटल्यानंतर राजन सौदामिनीच्याच विचारत होता. त्याला सौदामिनी शिवाय दुसरे काही सुचत नव्हते. जे काही सत्य आहे ते तो शोधून काढणार होता. ते शोधून काढल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हते. कधी एकदा रविवार येतोय आणि कधी एकदा सौदामिनीला भेटतोय असे त्याला वाटत होते. तो सौदामिनीला भेटण्यास अधीर झाला होता. घरी गेल्यावर रात्रभर त्याला झोप लागली नाही. सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा सरकत होता.
\"मी कुठे चुकलो? मी कुठे कमी पडलो? सौदामिनी कुठे चुकली.\" या सगळ्या गोष्टींचा विचार करत तो बसला होता.
दोन दिवसांनी रविवार होता. पण त्याला ते दोन दिवस दोन वर्षांसमान वाटत होते. सौदामिनीला भेटण्याची त्याला ओढ लागली होती. तिच्या प्रेमामुळे नव्हे, तर सत्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याला तिला भेटण्याची घाई झाली होती. शिवाय इतक्या दिवसांनी तिला नेहमीच्या वेशात पाहण्यासाठी तो उत्सुक होता. त्याने ते दोन दिवस कसेतरी घालवले.
अखेर रविवारचा दिवस उजाडला. राजन खूपच आनंदात होता. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आता तो चार कधी वाजतील यासाठी घड्याळाकडे नजर लावून होता. वारंवार तो घड्याळाकडे पाहत होता. आजचा दिवस खूप मोठा आहे का? असेही त्याच्या मनात येऊन गेले. तो एक वाजताच घरातून निघाला. उगीच उशीर नको म्हणून तो लवकरच निघाला होता. आता त्याच्याकडे एक त्याची गाडी होती. त्याने स्वतःच्या पगारातून ती घेतली होती. गाडीवरून तो साधारण दीड तासात पोहोचू शकला असता. म्हणजेच घरातून दोन अडीच वाजता निघाला असता तरी चालले असते, पण सौदामिनीने अगदीच बजावले होते की उशीर झाला की निघून जाईल. या भीतीने तो तीन तास आधीच घरातून निघाला.
ठरल्याप्रमाणे राजन एक तास आधीच नेहरू बागेत पोहोचला. तिथे जाऊन तो सौदामिनीची वाट पाहू लागला. एक तास तो तिची वाट पाहत तो बसला होता. बरोबर चार वाजता सौदामिनी त्या बागेत आली. ती आज गुलाबी रंगाची साडी नेसून आली होती. ती साडी तिला खूपच सुंदर दिसत होती. तिने केस मोकळे सोडून गुलाबी रंगाची छोटी पिन घातली होती. कानात मॅचिंगचे झुमके आणि हातात बांगड्या घातल्या होत्या. आधीच्या रूपातील सौदामिनीला पाहून राजन भारावून गेला. या साडीमध्ये ती आधीपेक्षा खूप सुंदर दिसत होती. राजन तिच्याकडे पाहत उभा राहिला. सौदामिनी अगदी त्याच्याजवळ येऊन उभा राहिली तरीदेखील तो तिच्याकडेच पाहत होता.
"हॅलो, काय पाहताय? तुम्ही काही बोलणार होता ना?" सौदामिनी म्हणाली.
"हो. तू आलीस. खरंच खूप थॅन्क्यू. तू येशील असे वाटले नव्हते. पण आता आलीस तर मला मी स्वप्नात आहे असे वाटत आहे." राजन म्हणाला. सौदामिनी आल्याच्या आनंदाने तो भारावून गेला होता.
"मग आता जाऊ का?" सौदामिनी शांतपणे म्हणाली.
"नको नको. ऐक ना. बसून बोलूयात." राजन म्हणाला.
"हो." म्हणून सौदामिनी बाकावर जाऊन बसली. तिच्यापाठोपाठ राजनदेखील तिच्या शेजारी जाऊन बसला. राजन बसल्यावर सौदामिनी लगेच बाजूला सरकून बसली. जरी शेजारी बसलेली व्यक्ती तिचा नवरा होता तरी आता त्यांच्यात ते नाते शिल्लक नव्हते. म्हणून सौदामिनी बाजूला सरकून बसली.
"कशी आहेस?" राजन म्हणाला.
"मी मस्त आहे." सौदामिनी म्हणाली.
"कसे आलात?" सौदामिनी पुन्हा म्हणाली.
"माझ्या बायकोसोबत आलोय." राजन शांतपणे म्हणाला. त्याच्या या वाक्याने सौदामिनीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. \"राजनची बायको? याचा अर्थ त्यांनी लग्न केलंय? कसे शक्य आहे? यांची इच्छा नसली तरी यांची आई स्वस्थ बसणारी नव्हती. तिनेच फोर्स केला असेल.\" सौदामिनीच्या मनात कालवाकालव सुरू होती.
"मग ती कुठे आहे?" सौदामिनी म्हणाली.
"ती म्हणजे कोण?" राजन म्हणाला.
"तुमची दुसरी बायको." सौदामिनी ओरडून म्हणाली.
"ती बाहेर उभी आहे." राजन पुन्हा शांतपणे म्हणाला.
"मग तिला इथे आणायचं ना. बाहेर का ठेवलंत?" सौदामिनी नाराजीच्या सुरात म्हणाली.
"उगीच कशाला त्रास? कोणीतरी ओरडेल म्हणून आणलो नाही." राजन म्हणाला.
"त्रास कसला? तिलाही आपल्यातलं बोलणं समजू दे ना." सौदामिनी म्हणाली.
"तिला काय कळणार आहे?" राजन म्हणाला.
"तिला आपल्या लग्नाबद्दल माहित आहे का?" सौदामिनी म्हणाली.
"तिला सांगून काय उपयोग? तो विषय सोड. मला दुसरं महत्त्वाचं बोलायचं आहे." राजन म्हणाला.
"आता बोलण्यासारखं काही शिल्लक आहे का?" सौदामिनी म्हणाली.
"अजून तितका उशीर झाला नाही." राजन म्हणाला.
"हे तुम्ही बोलताय? किती निर्लज्ज आहात." सौदामिनी म्हणाली.
"अरे, आधी बोलूयात तरी. की आत्ताच वाद घालत बसतेस." राजन म्हणाला.
"कायदा माझ्या हातात आहे. हवे तर मी तुम्हाला शिक्षा देऊ शकते." सौदामिनी म्हणाली.
"काय करायचं ते कर? पण आधी माझ्या प्रश्नाची उत्तरं दे." राजन म्हणाला.
"बोला." सौदामिनी म्हणाली.
"तुझ्यात आणि अमरमध्ये नेमके कोणतं नातं आहे?" राजन म्हणाला.
"तुम्ही ते पडताळून न पाहता मला घरातून हकलून लावलेत. आता कशाला हवं आहे?" सौदामिनी रागातच म्हणाली.
"तेव्हाची चूक आता सुधारणार आहे." राजन म्हणाला.
"वेळ निघून गेल्यावर." सौदामिनी म्हणाली.
"अजूनही तितका वेळ गेला नाही. फक्त पाच वर्षांचा दुरावा होता तो लवकरच संपेल जर तू माझ्या प्रश्नाची उत्तरे दिलीस तर." राजन म्हणाला.
"ठिक आहे. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन. बोला." सौदामिनी शांतपणे म्हणाली.
"तुझ्या आणि अमरमध्ये नेमके कोणतं नातं आहे?" राजन म्हणाला.
यापुढे काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा