Dec 05, 2021
कविता

सोबती

Read Later
सोबती

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

जन्मला तू एकटा,

आणि जाणारही एकटा....

या येण्या आणि जाण्याच्या प्रदीर्घ प्रवासात,

किती  आणि कोण असतील तुझे सोबती?

जिंकशील तेव्हा असतील सोबती,

हसशील तेव्हा असतील सोबती,

यशाच्या शिखरावर मिळतील  सोबती,

व्यसनात साथही देतील सोबती,

मरशील तेव्हा खांदा देतील सोबती...

पण.... 

रडशील तेव्हा असतील का सोबती?

हरलास कधी तर येतील का सोबती?

होशील उध्वस्त जेव्हा, अडखळून पडशील जेव्हा

धावत येतील का कुणी सोबती?

आजवर मदतीला धावलास ज्यांच्या,

गरजेला तुझ्या येतील का तेच सोबती?

तू आलास एकटा आणि जाणारही एकटाच!

मित्रा या जीवनाच्या प्रवासाचा,

तूच हो  तुझाच एकमेव खरा सोबती.....
पॅड

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anita Fernandes

Teacher

आव्हानांना आव्हान देणारी, कठिणला सोप्प करणारी, नकारला होकार बनवणारी, माझ्या आई आणि बाबांची लाडकी, दादाची चिडकी... मी .. अनिता...