सापसिडी ( भाग -२) जलद लेखन

A sad incident in a happy family.



कथा पुढे-

सापसिडी (भाग -२)

लेखिका - स्वाती बालूरकर, सखी


आठवणी जणू समोर पुन्हा मूर्त होत होत्या. . 

दोघंही मुलं  अशी खेळण्यात रमलेली पाहून अरूण म्हणायचे. . . 


"मी खरच लकी आहे संजू. . देवाचा लाडका आहे. . बघ ना सगळं माझ्या मनासारखं.  भरभरून देतोय तो!

तुझ्यासारखी बायको , लग्नानंतर दोन वर्षात स्वतःचा बंगला, ३ वर्षात गाडी!

 लग्नानंतर चार वर्षांनी आपण  बाळ प्लॅन केलं अन देवाने काय केलं.?   इतकी सुंदर गोड लेकरं दिली. . जुळी! ते पण एक मुलगा अन एक मुलगी! ठरवून सुद्धा हे घडत नाही बघ.  कसे एकमेकांशी खेळतात दोघे. . ?भांडण नाही की काही नाही!  आपल्याच खेळात रमतात. .बाहेरचे मित्र संवंगडी कुणीच लागत नाही त्यांना. . "


तिने मुलांना पुन्हा कौतुकाने पाहिलं. . 


अन्वय -अनन्या. . कसली गोंडस पोरं आहेत. . आता तिला वाटलं की. . एकदा आपल्या नजरेने व एकदा अरूणच्या नजरेने मुलांकडं पाहिलं तर किती सुख मिऴतंय. . आणि काही वेळापूर्वी मीच  स्वतःला संपवण्यासाठी गच्चीवर गेले होते.  एक उडी अन सगळं दुख मिटेल असं वाटलं होतं. . जणू अरून खुणावत होते. . अंधारात ये म्हणून!  . पण जर अर्चनाताईंनी धरलं नसतं तर?.  तर ही. . निरागस लेकरं अनाथच झाली असती. . आत्ताच. .  कालपण . . .  तर बाबा लांब गावाला गेलाय असं सांगितलंय त्यांना. . . . भाबड्यांनी विश्वास ठेवला!


संजना खूप विचारात, आठवणीत हरवून  निस्तेज चेहर्‍यांने रडून, सुजलेल्या बारीक डोळ्यांनी भूतकाळ आठवत होती. 


अर्चनाने आणून ठेवलेल्या चहाचे सुद्धा भान तिला नव्हते.


एवढ्यात भाचीने फोन आणून दिला


 "मामी. . फोन. . अमेरिकेतून. . बोल ना गं . . मी नाही म्हणाले पण खूप रिक्वेस्ट करतीय ती!"


" कोण आहे? . . "


" शीतल तुझी मैत्रिण  म्हणे. . "


संजनाने फोन घेतला पण तोंडातून शब्द निघत नव्हता.


" हॅलो. . हॅलो. . संजू. . आर यू देअर.  .? "


"(हुंदका). . हं"


"अगं काय ऐकतीय मी हे? तुझ्या दादाने फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून कळाले. . कसं शक्य आहे. . लास्ट वीकमधे तर मी बोलले ना जिजूंशी?. . अगं कसं.  . काय झालं हे?"


"हं शीतल काय करू गं मी आता. . ? अरूण गेले मी आता कसं जगू?"


"काय झालं ते सांग ना गं . . संजू मोकळी हो गं. . बोल . . तिथे असते तर पळत आले असते ना . . इथून मला कळायला हवं. . कालपासून डोळ्याला डोळा नाही. आपलं कपल गेट टूगेदर झालं तेव्हा सगळ्यांनी अमेझिंग कपल . . मेड फॉर इच अदर म्हणून केवढं गौरवलं गं तुम्हाला. . पण हे असं अचानक?" शीतलचा बांध सुटला. 


" अग आमची बारावी वेडिंग अॅनिवर्सरी झाली ना तेव्हा वेळ नव्हता गं ! मग जोडून सुट्टी होती ना ४ दिवसांची. . तर आम्ही एका बाहेरच्या रिसोर्ट ला गेलो होतो. . तिथेच. . . ?" रडू आवरेना.


" अॅक्सीडेंट. . की हार्ट अटॅक?"


" अगं तुझा विश्वास बसणार नाही. . सर्पदंशाने. . गेले गं ते?" संजनाला तो क्षण समोर पुन्हा पुन्हा घडल्यासारखा वाटला.


"काऽय? साप चावल्याने गेले.  कसे काय?. . पण?"


"अगं दोघच गेलो होतो आम्ही २ दिवस स्टे करण्यासाठी. . मुलांना अर्चनाताईंकडे सोडलं होतं. .मस्स्त  रिसोर्टवर एक मुक्काम केला . दुसर्‍या  दिवशी लग्नाचा वाढ दिवस होता खूप एंजॉय केलं गं शीतू पण ते शेवटचं होतं हे कुठे माहित होतं?. . "


क्रमशः


लेखिका - ©® स्वाती बालूरकर, सखी
पुनः प्रकाशन दिनांक -१३.१२. २०२२

🎭 Series Post

View all