संघर्षाची ठिणगी

लेख


हाती घेऊन तलवार विरोधाची
संघर्षाची वाट मिळाली पुढे जाण्याची

आयुष्य एक संघर्ष. नव्हे माणसाचा जन्म होताच संघर्ष होतो जगण्याचा. तान्ह्या जीवाला भूक लागली की तो संघर्ष करतो म्हणजे टाहो फोडतो. प्रत्येक जण इथे संघर्ष करतोच करतो. ह्दयाची धडधड थांबेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत माणूस जगण्यासाठी संघर्ष करत असतो. येणारी नवीन पहाट पहाण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो.
महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा सिंहाचा वाटा होता. पण, स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांना संघर्ष करावाच लागला.
श्रीमंत माणसाला अजून अजून पैसा मिळावा म्हणून संघर्ष करतो. तर गरीब माणूस एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करतो.
या चराचरातील प्रत्येक जीवजंतू देखील संघर्ष करतो. या निसर्गाचा एक नियमच आहे. की‌ अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजेच संघर्ष हा कायम आहेच.
कोशातून बाहेर पडून जगण्यासाठी संघर्ष करणारा एवढासा जीव. पण, त्याला माहित नसते की तो क्षणिक आनंद आपल्याला मृत्यूच्या दारात उभे करत आहे.
असे म्हणतात पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. पण, ज्याला पोहता येत नाही. तो काही मुद्दामहून पाण्यात उडी मारत नाही. पण, जगण्यासाठी संघर्ष मात्र नक्कीच करतो.

अशीच एक घटना.

रखमाचे हात पटापट चालत होते. केर काढून स्वयंपाकाला लागायचे होते. कारण, घरी कोणीतरी वाटत होते. दोन वर्षांच्या बाळाला बाजूला खेळायला ठेवून पोटाची खळगी भरण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. कारण, तिचा नवरा आजारपणामुळे सतत झोपून होता. मग त्याची काळजी , औषध पाणी करूनच कामासाठी ती संघर्ष करीत होती.
पैसा कमावून स्वतःचा संसार पैलतीरावर नेण्यासाठी तिचा संघर्ष चालू होता. म्हणजेच काय तर सामान्य माणूस स्वतः च्या गरजा भागविण्यासाठी सतत संघर्षाची वाटचाल करीत असतो.

कोणी वचर्स्व गाजवण्यासाठी हिटलरशाहीचा वापर करून संघर्ष करतो आणि संघर्षाची ठिणगी पडायला सुरुवात होते. कुटुंब असो किंवा समाज कोणत्या‌ ना कोणत्या कारणाने संघर्ष हा निर्माण होतोच.


©®अश्विनी मिश्रीकोटकर