स्नेहानुबंध भाग 125

कथा एका सात्विक प्रेमाची
अनुभूती,“ हो मला कळतंय सगळं पण तुम्ही अधिराशी अजून किती दिवस अबोला धरणार आहात? बिचारी किती दिवस झालं तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतेय.” तिने विचारलं.

स्नेहांकीत,“ तुला आजकाल ना माझ्यापेक्षा त्याचीच काळजी असते अनु! तिने मझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलं ती तिची चूक नाही का? तुला आणि आदीला सुद्धा हे माहीत होतं पण तुम्ही ही मला सांगितलं नाही. खरं तर तुम्हा दोघांना ही शिक्षा मिळायला हवी.” तो तोंड फुगवून बोलत होता.

अनुभूती,“ असं काय बोलताय ओ! मला तुमची काळजी सगळ्यात जास्त आहे रादर त्या दोघांना ही. आधीच तुम्हाला त्या भांडणाचा किती त्रास झाला तुम्हाला अजून त्रास हाऊ नये म्हणून आम्ही अधिराने प्रेम प्रकरण तुमच्यापासून लपवले. तुम्हाला मी सांगणार होते. तुमचा मूड पाहून पण त्याच्या आधीच तुम्हाला नको त्या प्रकारे कळलं हे.” ती त्याला समजावत म्हणाली.

स्नेहांकीत,“ हो ना काही बोलायला गेलं की माझ्या तब्बेतीचे कारण तुमच्याकडे तयार असते. आणि मी अधिराला कधी माफ कारेन हे मला ही माहीत नाही. तिने माझा विश्वास तोडला आहे. आणि तू मला त्यासाठी फोर्स करणार नाहीस.” तो म्हणाला.

अनुभूती,“ बरं तुम्हाला हवं तसं वागा मी नाही बोलणार काही.” ती म्हणाली.

★★★★

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळे सकाळी नाश्त्याच्या वेळी एकत्र आले होते. तेंव्हा अगत्य बोलू लागला.

अगत्य,“ भाई पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे.”

स्नेहांकीत,“ हो आहे माझ्या लक्षात मग त्यात काय विशेष आहे. दर वर्षी घरगुती पध्दतीने आपण साजरा करतो तसा तो करायचा.” तो सहज म्हणाला.

अगत्य,“ नाही या वर्षी आणि पुढे ही दर वर्षी आपण ग्रँड पार्टी देणार आहोत. भाई हा तुझा दुसरा जन्म आहे. तू आम्हाला देवाच्या कृपेने परत मिळाला आहेस म्हणून इथून पुढे तुझ्या वाढदिवसाचे आपण ग्रँड सेलिब्रेशन करणार आहोत.”

स्नेहांकीत,“ काही गरज नाही.”

अगत्य,“ मला काही माहीत नाही आपण पार्टी देत आहोत. मी गेस्ट लिस्ट तयार करायला घेतली आहे.अधिरा, वहिनी तुमची गेस्ट लिस्ट तयार करून मला व्हॉट्स ऍप करा. मी आज ऑफिसमध्ये जताना इंव्हीटेशन कार्ड छापायला टाकतो. ते उद्या संध्याकाळी मिळतील. बाकी व्हेन्यू आणि मेन्यू आज रात्रीच्या जेवणाच्या वेळी आपण डिस्कशन करू.”

स्नेहांकीत,“ या घरात माझ्या बोलण्याला आणि मला किंमतच राहिली नाही.” तो तोंड फुगवून म्हणाला आणि उठला.

अनुभूती,“ कुठं निघालात? बसा आणि तो नाश्ता संपवा आधी. त्यांना वाटतंय ना तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करावा तर तुमचे तोंड फुगायाची गरज काय? एक तर मार्केटमध्ये तुमच्या तब्बेती विषयी आणि तुमच्या विषयी अफवा पसरत आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये आणि बाहेर कुठेच दिसत नाही त्यामुळे लोकं काही ही बोलतात. ही पार्टी ठेवली तर तुम्ही आता बरे आहात आणि पुन्हा लवकरच ऑफिसमध्ये येणार अर्थात मार्केटमध्ये येणार हे लोकांना कळेल आणि त्यांची तोंड बंद होतील. दुसरं अगत्यने जरी बिझनेस व्यवस्थित सांभाळला असला तरी तुम्ही नाही म्हणून काही जुने क्लायंट काम द्यायला कचरत आहेत असं रमण दादा सांगत होते. तुम्ही या निमित्ताने लोकांच्या समोर आलात तर पुन्हा लोकांचा विश्वास बसेल ना? आणि या सगळ्या बिझनेसच्या गोष्टी आता मी सांगायच्या का तुम्हाला? नुसतं आपलं मला किंमत नाही मला सांगतील नाही म्हणून रडत राहायचं. नुसता ड्रामा सुरू असतो आजकाल!” ती रागाने तणतणत होती.

अगत्य,“ भाई तुझा वाढदिवस सेब्रिट करणे यामागे भावनिक कारण तर आहेच पण वहिनी म्हणते तसं प्रॅक्टिकल कारण देखील आहे. मी तुला हेच सांगणार होतो तर तू ऐकूनच घेत नव्हतास. आणि काय रे सारखं आपलं मला किंमत नाही म्हणून ओरडत असतोस. हो नाही तुला किंमत कारण तू आमच्यासाठी अमूल्य आहेस. मला माहीत आहे या अधिराचा राग तू काढत आहेस. तुझ्या आणि त्या प्रीतमुळे होतंय हे सगळं अधिरा!” तो चिडून म्हणाला.

अनुभूती,“ अगत्य खबरदार पुन्हा असं काही म्हणशील तर त्या दोघांच्या इथं काही संबंध नाही. तसं तर चूक तुझी देखील आहे. तुला आधीच माहीत होतं ना यांच्याबद्दल तर मग का नाही तेंव्हाच सांगितलंस? आणि अधिराने प्रेम केलं आहे गुन्हा नाही. तिला सारखं सारखं कोणीही गुन्हेगारासारखं बोलायचं नाही. मी चालवून घेणार नाही ते. तू तयारी सुरू कर पार्टीची आणि रमण दादांना घेऊन ये संध्याकाळी डिस्कशन करायला.” ती म्हणाली. स्नेहांकीत काही न बोलता निघून गेला.

अधिरा,“ भाई निघून गेला की वहिनी. तो हो नाही काहीच म्हणाला नाही.” ती काळजीने म्हणाली.

अनुभूती,“ नाश्ता संपला आहे आणि तोंड बंद आहे म्हणजे त्यांची मूक सहमती आहे. इतकं पण कळत नाही तुला! आता तोंडावर पडल्यावर कोणत्या तोंडाने थांबणार ते?” ती हसून म्हणाली. चला आता तयारीला लागा.”

अगत्य,“ भाईला तूच गप्प करू शकतेस वहिनी तो घरात बसून नुसता ड्रामा किंग होत चालला आहे. आणि द्या शॉपिंगला जाऊया आपण.” तो म्हणाला.

अधिरा,“ वहिनी प्रीतने भाईसाठी तीन चार कोट डिझाइन करून ठेवले आहेत. मी आधीच त्याला सांगितलं होतं की भाईचा वाढदिवस आहे तर तो म्हणाला की तो भाईसाठी सूट डिझाइन करेल. उद्या भाईला घेऊन आपण जाऊया ना त्याच्या फॅशन हाऊसमध्ये!” ती मस्का मारत म्हणाली.

अगत्य,“ ओ हो भाईवर इंप्रेशन मारण्याचा आणखीन एक चान्स हवा आहे.” तो थोडे मिचकावून तिसकास हसत म्हणाला.

अधिरा,“ सांग ना वहिनी याला.”

अनुभूती,“ तुम्ही गप्प बसा दोघे आणि आदी जास्त नाही बोलायचं हा अधिराला. हो अधिरा आपण जाऊ उद्या त्याच्या फॅशन हाऊसमध्ये.” ती म्हणाली आणि अधिरा खुश झाली. दोघे ही त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेले.

अनुभूतीला ही कॉलेजला जायचं होतं म्हणून ती बेडरूममध्ये आवरायला गेली तर स्नेहांकीत फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याने फोन संपवला आणि अनुभूतीकडे दुर्लक्ष करत हो लॅपटॉप घेऊन बसला. अनुभूतीच्या ते लक्षात आले पण ती आवरून कॉलेजला निघाली.

अनुभूती,“ जेवण वेळेवर करा आणि औषध नीट घ्या.”

स्नेहांकीत,“ काही गरज नाही माझी इतकी काळजी घ्यायची. त्या माकडांसमोर मला नाही नाही ते बोलतेस.” तो तोंड वाकडं करून म्हणाला.

अनुभूती,“ काय तुम्ही लहान मुलासारखं वागता हो? बरं सॉरी मी नाही बोलणार आता असं. आता तुमची ती किलर स्माईल येऊ दे ना! म्हणजे माझा दिवस छान जाईल.” ती त्याच्या जवळ बसत म्हणाली.

स्नेहांकीत,“काही गरज नाही सॉरी म्हणायची माझंच चुकलं. आय एम सॉरी.” तो हसून म्हणाला.

अनुभूती,“ राहू दे तुमचं सॉरी आता ना तुम्हाला ऑफिसला पाठवायला हवं घरात बसून तुम्ही ड्रामा किंग होत आहेत. बट आय लव यु. बरं मी येते संध्याकाळी पाच वाजता येते.”

स्नेहांकीत,“ लव यु स्वीट हार्ट आणि जा. पण लवकर ये मला करमत नाही.” तो म्हणाला.

अनुभूती,“ हो.” ती हसून म्हणाली आणि निघून गेली.

★★★★

दुसऱ्या दिवशी अनुभूतीने स्नेहांकीतला शॉपिंगला जाण्यासाठी तयार केलं. दोघे तयार होऊन खाली आले तर अधिरा आणि अगत्य तयार होऊन त्यांचीच वाट पाहत होते.

अगत्य,“ चला.” मी ड्रायव्हिंग करतो आज उगीच ड्रायव्हरला कशाला न्यायचं.” तो म्हणाला.

स्नेहांकीत पुढे बसणार तर अगत्य त्याला म्हणाला.

अगत्य,“ भाई मागे वहिनी जवळ बसायचं.” तो हसून म्हणाला.

स्नेहांकीत,“ आद्या तू दिवसेंदिवस निर्लज्ज होत चालला आहेस.”

अगत्य,“ आता मी काय निर्लज्जपणा केला?”

अनुभूती,“ झालं पुन्हा तुमचं सुरू? साहेब या ना मागे. अधिरा किती वेळची उभी आहे.” ती म्हणाला आणि स्नेहांकीत अनुभूती जवळ जाऊन बसला.

अगत्यने गाडी एका मोठ्या मॉलच्या बाहेर उभी केली.

स्नेहांकीत,“ हा आपला नेहमीचा मॉल नाही आदी! एक मिनटं या मॉलमध्ये ग्लोबल फॅशन हाऊसच्या दोन फॉवलर आहेत. एक स्पेशल डिझायनर कपड्यांचे शॉप आहे. आणि एक त्यांच्या फॅक्टरीमधून कपडे येतात त्याचे शॉप आहे. बरोबर का?” त्याने विचारलं.


स्नेहांकीत गुरुप्रीतच्या फॅशन हाऊसमध्ये जाईल का?


सणाचे दिवस असल्याने भाग टाकायला लेट होत आहे त्या बद्दल क्षमस्व!
©स्वामिनी चौगुले


🎭 Series Post

View all