Feb 24, 2024
वैचारिक

सापशिडीचा खेळ

Read Later
सापशिडीचा खेळ
सापशिडीच्या खेळात जेव्हा आपल्याला शिडी मिळते तेव्हा आपण आहे त्या ठिकाणापासून खुप पुढे आणि लवकर जातो.त्यामुळे आपल्याला खुप आनंद होतो आणि असे करता करता आपण  इच्छित ठिकाणी पोहचतो  आणि आपण खेळ जिंकतो.आपल्या प्रतिस्पर्धकापेक्षा आपण लवकर खेळ जिंकलो याचा आनंद वेगळाचं!
याउलट,आपण खेळ जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आपल्या मार्गात साप आला तर आपण खाली येतो आणि आपला प्रतिस्पर्धी खेळ जिंकतो,आपल्याला खुप वाईट वाटते.
 आयुष्याच्या  खेळात आपल्याला सापही भेटतात आणि शिडी ही भेटतात. आपल्या आयुष्यात आपल्या चांगल्या कामांना, गुणांना वाव देणारे,आपले चांगले होत रहावे यासाठी मदत करणारे, शुभेच्छा देणारे, आपले मार्गदर्शक म्हणजेच आपली \"शिडी\"होय.म्हणजे आपण म्हणतो की,\"माझ्या आयुष्यात यांच्या मुळे मी इथपर्यंत पोहचले,मी यशाची पायरी चढू शकले\" एखादी व्यक्ती, प्रसंग ,घटना ,आपल्यातील गुण ,त्यावेळेची परिस्थिती आणि आपण घेतलेला निर्णय हे आपल्यासाठी शिडी ठरु शकतात ज्यामुळे आपली प्रगती होते आणि यश गाठतो.
आपल्या यशात आपले गुण,परिश्रम तर असतात पण आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करणारे अनेक मदतीचे हात असतात. ज्यामुळे आपले काम लवकर आणि सहज होते.जसे काही हितचिंतक असतात तसे  काही विरोधक,प्रतिस्पर्धी, टीकाकार पण असतात. जे आपल्या मार्गात अडसर निर्माण करतात म्हणजे आपण आपले ध्येय गाठू शकणार नाही. अशा वेळी आपण ठरवायचे की अशा लोकांच्या वागणुकीचा वाईट अर्थ न काढता आपण \"शिडी\" म्हणून वापर करावा. आपल्यातील  दुर्गुण, कमतरता दूर करून आपल्या कार्यावर विश्वास ठेवून अधिक जोमाने काम करावे आणि अपेक्षित ध्येय संपादन करावे.
आपल्या आयुष्यात नेहमीच शिडी येईल असे नाही तर काही वेळेस साप ही वेगवेगळ्या रूपात येतात .
आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती, आपले प्रतिस्पर्धी, टीकाकार, आपल्यातील कमकुवतपणा, आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या,आर्थिक, शारीरिक समस्या आणि तसेच जगात घडणाऱ्या अनेक घटना ही वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करतात.
उदा. सध्या कोरोना हा अनेकांच्या आयुष्यात सापाचे काम करीत आहे.
एखाद्या साठी असलेली शिडी ही कदाचित दुसऱ्या साठी साप ही असू शकते आणि एखाद्या च्या आयुष्यात असलेला साप हा दुसऱ्या कोणासाठी शिडी ठरु शकतो.म्हणजे प्रत्येकाचे साप आणि शिडी वेगवेगळे असू शकतात आणि प्रत्येक जण त्याचा कसा वापर करून घेतो त्यानुसार आयुष्य घडत जाते.
काही साप म्हणजे संकटे ही अचानक, अनपेक्षित असतात पण काही साप आपल्या आयुष्यात कोणीतरी मुद्दाम आणतात आणि अशी कामे अनेकदा आपले जवळचे व्यक्तीच करीत असतात.
कधी कधी आपण ही कळत नकळत कोणाच्या तरी आयुष्यात सापाचे किंवा शिडीचे काम करीत असतो.प्रत्येकाला चं वाटत असते की आपल्या आयुष्यात साप येऊचं नये ,शिडी येत रहावी आणि आपण खेळ जिंकावा ,हार कोणालाचं मान्य नसते.
सापशिडीच्या खेळात जसे फासे पडतात आणि आपण हरतो किंवा जिंकतो तसेचं आयुष्यात ही आपल्या बाजुचे फासे चांगले पडले तर पुढे जातो आणि चांगले नाही पडले तर वाट्याला दुःख येते .
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//