Feb 23, 2024
नारीवादी

समजूतदार नवरा

Read Later
समजूतदार नवरा
जितके माझे आणि माझ्या वडिलांचे पटायचे तितके आईचे आणि माझे कधी पटलेच नाही. आईसोबत संस्काराचे धडे, स्वयंपाकाचे धडे, पाहुणचार, आगत्य, शिष्टाचार, भावंडांसोबत कसे वागायचे, आजीला कसे समजून घ्यायचे, अभ्यास कसा असावा यावर नेहमी संवाद कमी वाद जास्त होत. उठसुठ चुका काढणारी म्हणून आईचा राग येतो मला. बर हे झाल्यावर मोठी म्हणून घरातल्या कामाची जबाबदारी कोणाची तर माझी, मोठ्या भावाची लहान बहीण म्हणून जबाबदारी कोणाची तर माझी, छोट्या बहिणीची मोठी बहीण म्हणून जबाबदारी कोणाची तर माझी, यात माझी खूप गळचेपी होत आणि हे सगळे एकाच वेळी माझ्या माथी मारले जायचे.

खरे तर तिचे बरोबर होते, आणि खरे तर माझेही बरोबर होते. यात मात्र माझी बाजू घेताना बाबांची खूप ओढाताण होत असे, बहीण भाऊ मात्र निश्चिंत असत, घाला फक्त मलाच बसे, मधली ना मी त्यामुळे मीच sandwich होत असे.☺️

पण एक खरंय बाबा मला माझ्या कामात खूप मदत करायचे, तेच बाजू घ्याचे, बाजू मांडायचे आणि मी कुठे कशी चुकते हे पण मला सांगायचे. बाबा माझे best friend होते. कधी छोटे कधी मोठा pocket money देणारे माझे वडील होते. आई गावाला गेली की मग मज्जाच मज्जा असे, कधी बाबा बाहेरून खायला मागवत तर कधी ते मला मदत म्हणून घरातील कामाचा भार हलका करत. त्यांना माहित असायचे शाळेतून दमून आली की हिच्यात काही त्राण राहणार नाही. आल्या आल्या पाणी मग चहा घेतो आम्ही दोघे बाप लेक. चहा झाला की मग मस्त स्वयंपाक पोळी भाजी सोप्यात सोपी बटाटा कायमच असे आणि तेही adjust करून घेत, ते दिवस खूप सुंदर होते हे नक्की.

एकदा अशीच मी कॉलेज मधून उशीरा आले आणि जेवायला काहीच नाही हे पाहून वडील म्हणाले, आज यांना सगळ्यांना छान गोडाचा शिरा करून surprise देतो मी. आईने एका डब्यात साबुदाण्याचे पीठ ठेवले होते आणि ते फक्त मलाच माहित होते. बाबांना माहीत नसल्याने त्यांनी ते पीठ रवा समजून त्याचा शिरा केला अगदी सर्व जिन्नस टाकून, केशर, बदाम, मनुके, काजू भरपूर तूप आणि शिरा आम्ही येण्याच्या आधी करून ठेवला, छान सगळ्यांना प्रत्येकाच्या plates मध्ये ठेवून.☺️

शिरा गरम होता तेव्हा सहज चमच्यात येत होता, पण जसा तो थंड झाला तसा तो गोळा झाला होता, त्याला छान पिवळा कलर आला होता.☺️ तो जवळपास रबरासारखा झाला होता, तुटत नव्हता. तरी बाबांना खूश होतांना पाहून आम्ही सगळ्यांनी तो शिरा खाल्ला ,पण बाबांना कळले होते की शिरा नेहमीसारखा नाही, मग हा रबरी झाला कसा, मग कळले की तो साबुदाण्याच्या पिठाचा शिरा होता☺️ कधी त्या दिवसांची आणि बाबांच्या या प्रेमाची आठवण आली की आम्ही सगळेच हसत असतो, या रबरी शिऱ्याला आठवून.
 
मी एकदा वडिलांना म्हणाले बाबा तुम्ही किती केले आमच्यासाठी माझ्या पाठीशी कायम ढाल बनून उभे होता. तुमच्यासारखे माझ्या आयुष्यात असे कोणी होणे नाही हो बाबा. तेव्हा बाबा हसत म्हणाले, "अगं तुझा नवरा ही असाच मिळो तुला, मग बघा बाबांना विसरून जाशील ", आणि माझ्या डोळ्यात पाणीच आले.

"बाबा सगळं जग एकीकडे आणि तुम्ही तुमचे प्रेम एकीकडे ,तुम्हाला विसरणे म्हणजे मी मला विसरण्यासारखे असेल. नवरा जर तुमच्यासारखा समजूतदार नसेल तर खूप अवघड होईल जगणे. तुम्ही जसे आहात तसा तो जर नसला तर मी तर पूरती बावरून जाईल. तुमच्या सोबत असण्याची जी सवय झाली आहे, ती तिथेही कायम असावी तोही माझी साथ मित्रा सारखी देणारा असावा "

खूप वर्षांनी मला बाबांच्या त्या शब्दांची आठवण झाली. जेव्हा मी एकदा election duty संपवून रात्री १ ला घरी आले आणि बघते तर काय, मला भूक लागली असणार हे पाहून आहोंनी खिचडी लावली होती कुकरला आणि त्यात काजू ,वांगे,बटाटे, शेंगदाणे आणि बदामही टाकले होते. खूप खूप बरं वाटलं होतं की खरंच बाबांचे शब्द खरे होते. जणू बाबा म्हणत होते तसा नवरा लाभला होता मला. माझी काळजी घेणारा, बाजू घेणारा, जीव लावणारा.

 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//