Login

कच्च वय आणि ती

Related With Child marriage

कच्च्या वयात बांधलेल्या कच्च्या रेशीमगाठी,
खरंच कधी पक्क्या होतील का...??
परंपरेच्या नावावर उमलणाऱ्या कळ्यांना कुस्करून टाकणे,
सदा असेच चालू राहील का...??

एकदा आपल्यासोबत झालेल्या अन्यायाची पुनरावृत्ती
आपल्या बाहुलीवर करण्यास हाथ तरी लोकांचे कसे धजावतात...??
एका जीवनाची राखरांगोळी केल्याचे पाप माथी घेऊन,
कन्यादानाचे कोणते पुण्य लोक कमवितात...??

एवढे सोस घेतल्यावर खरंच परत ती आई,
मुलीला जन्माला येऊ देणार का...??
अनपेक्षितपणे जन्मास आलेली ही परंपरा,
अशीच आपल्यासोबत पुढे चालत राहणार का...??

- Sweety-Aishwarya Deshmukh.