सख्या हवी तुझी साथ आधाराची...

नवरोबा तुझी हवी हवीशी साथ...

प्रिय....नवरोबा,



दोघांचीही मते वेगळी

न जुळतात सवयी दोघांच्या

तरीही जुळली मने,

एकमेकांच्या आधाराने.....


हो ना... तुम्हाला ही तसंच वाटत असणार ना ???

किती विरुद्ध आपण दोघेही . तुम्ही चटपटीत चुलबुले...हसरे जणु बहार तो हास्याचा....व मी हसरी पण शांत अशी एका चौकटीत असणारी.... तुम्ही रंगतदार ...मैफीलीत भरभरून रंग भरणारे...मैञिच्या राज्यात राज्य करणारे अवलिया...शब्दाला जागणारा...एक सच्चा वचनदार...सहवासाने सगळ्यांना मंञमुग्ध करणारा पारिजातकच जणु .....


खरंतर नवरोबा आपलं ऑरेंज मॉरेज...पण कुठूनही नाही वाटलं बरं का??आजही आठवतो मला तो कादेंपोह्यांचा कार्यक्रम.... किती साधेपणाने पटकन होकार दिलाय तुम्ही...न आठेवेठे न तो ताठरपणा..मनात आलं आवडलं तर होकारावर ठाम असंच....मी अनाथ वडिलांचे छत्र नसलेली ...तसे तुम्ही ही, बहुतेक आपले दुःख समान असल्यानेच तर जोडी बनली असेल का?

तुम्ही तसे देखणेच पण दोघेही वेगळी... ब्लॉक व्हाईट जोडी असे... तुमचे मिञही तसेच म्हणतात...होना..पण रंगरूप ह्या गोष्टी माझ्या साठी महत्वाच्या नव्हत्याच हो ..फक्त मला  साथ हवी होती आधाराची .... आणि ती मिळाली तुमच्यात...

एकमेकांच्या पसंतीने अवघ्या महिन्याभरात उरकला तो आपला लग्न सोहळा... तोही माझ्या दारासमोर... अण्णांच्या इच्छेचा मान ठेवून तूम्ही त्या गावातील घरी लग्न करायला तयार झालात ...येथेच मी धन्य झाले होते... कोणताही मान नाही ,आहे ते ठीक म्हणतं उरकला लग्न सोहळा...ना मला नाराज केलत ना घरच्याना... स्वतः च्या कमाईने शहरात मोठ रिसेप्शन ठेवले.... तुमचीही हौस पूर्ण केली....हौस करावी ती तुम्हीच आगदी मनापासून....जीवन भरभरून कसं जागायचं हे शिकली मी तुमच्या सानिध्यात आल्यावर.... सप्तपदीच्यासाथीने घेतलेला माझा हात... कधीच न सोडण्याचे वचन किती शिताफीने पाळता तुम्ही...दुःखाची झळ मला लागु नयें  म्हणून किती. संकटे एकटे झेलता तुम्ही...त्याचा रागच येतो हं.....मला

एक कर्तबगार, स्वतःच्या पायांवर उभा असणारा, सगळ्यांना मदत करणारा...मोठ्यांप्रती आदर असणारा... संकटांचा हसत हसत सामना करणारा जिवनसाथी कोणाला नको असतो.... माझ्या तर पदरात परमेश्वराने हे दान न मागता दिलेल.... मग गर्वच असेल ना मला....हो खरंच ....!!..म्हणतात ना उंच मान करून जगण्याचा अभिमान आहात तुम्ही माझा...

संसाराची वाट चालतांना किती हो ते संकटे पाठ नाही सोडत आपली .पण तुम्हीच आधार देता मला..."भरभरून जागून घें...मी आहे ना सार निस्तराला...".असेच म्हणता... स्वतः ची घुसमट करून आधार देता कळतं मला ...पण हेही दिवस जातील हि आशाही असते . सकारात्मक असणारे तुम्ही नाही डगमगत पण मला भिती वाटते हो.. .सख्या किती खिंडी लढवल्या तुम्ही,.. माझ्यासाठी त्या अभिमानास्पद... वयाच्या २२वर्षापासून घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे सोपे नव्हे...मीही नविनच पण तुमच्या सोबत चालायचं वचन दिलं होतं ना???... मीही कसं टाळणार बर ते.. एकमेकांच्या साथीने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात.. त्याचंच चांगलं कर्म म्हणा....दोन गोंडस , हुशार व अभिमान असणारी मुले देवाने पदरात टाकलीत....दिवस जात होती...परत दु:खाचा डोंगर कोसळला... जवळचं व्यक्ती व तो आवडता भाऊ गमावलात तुम्ही पण त्यातूनही सावरलात....उभं राहिलात.....हे नाही विसरू शकत मी.

भरपुर कमावलं जीवनात माणसें, संपत्ती व एक चांगलं नाव...किती जणांच्या संसाराला निस्वार्थ मदतही केलीत... सोबत भरभरून जगलेत...पण खरं सांगू का??लोकांनी त्याच भलं बघितलं...ते नाही आवडलं मला... मीही देणार्यातलीच...पण आपल्या वाटी आला तो फक्त एक मनस्ताप...व ह्या मनस्ताप होणारी तुमची ती घालमेल....मला झालेला ञास नाही बघवत तुम्हाला...पण तुम्ही तरी काय करणार .... वेळ काहीतरी शिकवून जाते तसंच असणार.... आपल्याला शिकवायलाच घडत असेल हे सार....

जातील दिवस,

उडेल नवी पहाट,

फक्त संयम धर,

येईल पुन्हा तो काळ...

ह्या वाक्यानुसार चालायचं असच म्हणता ना तुम्ही... तसंच होईल... फक्त सागावी मला मनातली खंत... एकमेकांच्या आधाराने करावी आपणं त्यावर मात... मुलेही घडतील...आपणही जगू सुखात... कारण नवरोबा तु कितीही चिडवलस ना मला तरी जीव अडकला तुझ्या माझ्यात....

एक आदर्श जोडी आपली ...बनली दोघांच्या समंजसपणा ने...

कधीच नाही घडले अघटीत दोघांत....

दोन टोके जरी आपणं दोघें....

पण जीव अडकला एकमेकांत...

सर केली सारी संकटे...

अजुनही आहे हिम्मत आपल्यात...

जगायचं भरभरून दोघांनाही,

पिल्लांसोबत ह्या नंदनवनात.....

सुख दुःख दोन बाजू,

जिवनात येतात आणिक जातात...

वाट काढण्याची ताकद आहेच ना??

दोघांच्याही मनगटात....

हरण्यासाठी नव्हते आपणं,

जीवनात जिंकणे हेच आपल्या हातात....

आर्दश आपला घ्यावा जणाने,

जगायचे आपण त्या नितळ चारित्र्या समान....

मिळाला मला भरपूर आनंद व समाधान,

तुझ्या सोबतच्या संसारात...

आता नाही धन व संपत्तीचा मोह

सख्या हवी फक्त तुझी आधाराची साथ....


           



                                तुमचीच.......

                               चिडकी बायको ☺️


® वैशाली देवरे....

















 ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं