Jan 19, 2021
नारीवादी

क्षमाशील ती

Read Later
क्षमाशील ती

आज तो तिला दुसर्‍या मुलासोबत केलेल्या मैत्री वरून खुप काही सुनावत होता. पण तिला काही फरकच पडत नव्हता. कारण तिच्या दृष्टीने तिची दुसऱ्या मुलासोबत असलेली मैत्री ही निखळ होती. ते नुसते चॅटवर ते पण कधीतरी बोलायचे. भेटण्याचा विषय तिच्या आणि त्या दुसर्‍या मुलाच्या मनाला शिवला देखील नव्हता कारण त्यांच्या मनात तसे काही नव्हतेच.

चुक नसताना देखील त्याचे वारंवार स्पष्टीकरण मागणे, दोघांसोबत केलेल्या चॅटची तुलना करणे, तिला असह्य होऊ लागले. 

आजपासून आपला मार्ग वेगळा एवढे बोलून ती त्याचे स्पष्टीकरण ऐकण्यास देखील न थांबता तेथून निघाली, कारण तिने त्याचे एक अफेयर, एक मैत्रीण जिला तो कायम एकटा फिरण्यासाठी सोबत हवा असायचा,बाकिच्या छोट्या मोठ्या चूका हे सगळे विसरून त्याला मोठ्या मनाने माफ केले होते.

 

टिप: स्त्रियांनी इतके पण क्षमाशील असू नये कि पुरुषांनी त्यांच्या ह्या गुणाचा दुरुपयोग करावा.