मला भावलेल्या सिंधूताई सपकाळ

Things I Felt About Sindhu Tai Sapkal
मला भावलेल्या सिंधूताई सपकाळ
    
    अनाथांची माय, अवघ्या महाराष्ट्राच्या ' माई ' आदरणीय सिंधूताई सपकाळ यांचे काल दु:खद निधन झाले.
      
त्या नेहमी म्हणत - बाई नाही तर काही नाही. स्त्री ही आपल्या आयुष्यात आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा विविध भूमिका बजावते. स्त्री प्रसंगी पुरूषाचा आधार, प्रेरणा ठरते. स्त्री शिवाय जीवनाला खरंच अर्थ नाही.

      पूर्वी ' अस्सल पाहुणे, इरसाल नमुने ' या कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सिंधूताईंची मुलाखत घेताना मुली ज्या पद्धतीचे फॅशनेबल कपडे परिधान करतात त्याबद्दल त्यांचे काय मत आहे अशा आशयाचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर आता मला शब्दशः आठवत नाही. सिंधूताईंना ते बरोबर वाटत नव्हते ; पण म्हणून त्यांनी आवेशात आई-वडिलांनी मुलीच्या कानफटात लगावले पाहिजे किंवा धर्माचा, संस्कृतीचा अपमान करतात असे काही उद्गार काढले नाहीत. उलट अत्यंत मृदू स्वरात शांतपणे आपलं मत मांडलं. 
खरंतर त्यांच्या मताशी जरी मी Agree करीत नसलो ( मुळात या विषयावर विचार करण्याइतका काही मी mature नाही ) तरी त्यांची मत मांडण्याची पद्धत मला खूप भावली. आईने आपल्या मुलाला त्याचं भलं-बुरं समजवावं इतक्या मायाळूपणे, प्रेमाने त्यांनी मुलींना संदेश दिला. त्यामुळे माझ्या मनातील त्यांच्या विषयी आदर आधिकच वाढला.

त्यांच्या बोलण्यात नेहमी मृदूता, प्रेमळपणा असायचा. राहणी अगदी साधी होती. साधसं लुगडं त्या नेसलेल्या असायच्या. 

त्यांचे विचार, ते व्यक्त करण्याची पद्धत, बोलणं, राहणीमान सगळं काही आदर्श असं होतं. अशा आदरणीय सिंधूताईंना भावपूर्ण आदरांजली

@ प्रथमेश काटे