सीमंतिनी भाग १४

गोष्ट एका सीमंतिनीची जिने सीमोल्लंघन केले.


भाग 14
मोहित आठ दिवसांनी परत आला. त्याची फ्लाईट दुपारीच होती. तो घरी आला आणि झोपून गेला. संध्याकाळच्या वेळी तो सीमंतिनीला आणायला तिच्या माहेरी गेला. सीमंतिनीच्या आईने आणि वहिनीने दोघांना जेवल्या शिवाय घरी सोडले नाही. दोघे नऊ वाजता घरी आले. मोहित चेंज करून आला आणि सीमंतिनी चेंज करायला गेली. ती नाईट गाऊन घालून येऊन बेडवर बसली. मोहित लॅपटॉपवर त्याचे काही काम करत होता. सीमंतिनी मात्र आता अधीर झाली होती. तिला मोहितच्या मिठीत कधी शिरते असे झाले होते. ती बसून मोहितकडे पाहत होती आणि मोहितचे लक्ष तिच्याकडे गेले. मोकळे लांब सडक सोडलेले केस!आत्ताच फ्रेश होऊन आल्यामुळे गुलबा सारखी टवटवीत! कमनीय बांधा आणि नाईट गाऊन मधून दिसणारे तिचे उभार!

तो तिला पाहत राहिला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने लॅपटॉप बाजुला ठेवून दिला. तिला जवळ ओढले. त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि त्याचे ओठ मानेवरून खाली खाली येत गेले. ती त्याच्या स्पर्शाने शहारली. त्याला प्रतिसाद देऊ लागली. त्याच्या ओठांची साखर पेरणी तिच्या सर्वांगावर होत होती आणि ती कधी मोहरत होती तर कधी शाहरत होती. आज आयुष्यात पहिल्यांदाच ती पुरुषाचा स्पर्श अनुभवत होती. तिची इतक्या दिवसांपासूनची तहान आज हळूहळू भागत होती. मोहितच्या स्पर्शाने आणि हलकासा चावा घेण्याने तिच्या तोंडून अस्फुट हुंकार निघत होते. ती ही तिच्या हातांनी त्याला उत्तेजित करत होती. त्याचे हात आणि ओठ तिच्या सर्वांगावर फिरत होते. दोघांचे कपडे तर केंव्हाच गळून पडले होते. आता ती अतुरली होती त्या परमोच्च सुखाचा आनंद घेण्यासाठी!त्याच्या स्पर्शाने होणारी तिची मासळी सारखी तडफड आणि त्याचं तिला आणखीन उत्तेजित करणं. ती अधीर झाली होती सुखाच्या परमोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी आणि मोहित तिला घेऊन तिथं पर्यंत पोहोचणार पण अचानक तो थांबला. तिला काही तरी चुकत आहे याचा अंदाज आला होता. मोहित शेवटच्या क्षणी ज्या आवेगात यायला हवा होता तो आवेग अचानक सरून गेला. दोघे ही त्या परमोच्च क्षणा पर्यंत पोहोचू शकले नाहीत. मोहित ताडकन उठला आणि बाथरूममध्ये निघून गेला. ती मात्र अपूर्णच राहिली तडफडत! तो आला आणि तिच्याशी एक शब्द देखील न बोलता झोपला.

सीमंतिनी,“ मोहित अहो अचानक काय झाले तुम्हाला?परमोच्च क्षणापर्यंत पोहोचलात आणि अचानक …” ती पुढे बोलायची थांबली.


मोहित मात्र शांतच होता जणू तिचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यानंतर देखील तिने त्याला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काहीच न बोलता झोपून गेला.

सीमंतिनी मात्र तळमळत राहिली. तिची भडकलेली आग विजलीच नाही. ती नदीच्या किनाऱ्यापर्यंत आली तिच्या ओंजळीत पाणी ही आले पण ते ओठांपर्यंत न जाता, तिची ओंजळ रीती झाली होती. ती एकटीच तडफडत होती. तिची घुसमट होत होती. कोणी तरी उंच कड्यापर्यंत येऊन ढकलून द्यावे अशी अवस्था तिची झाली होती. तिला मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास होत होते. कारण ती पूर्ण उत्तेजित झाली होती आणि तिची उत्तेजना न शमवताच मोहित अचानक बाजूला झाला होता. तिच्या अंगाची लाहीलाही तर होतच होती पण मन सुद्धा होरपळून निघत होते आणि ज्या व्यक्तीमुळे तिची अवस्था अशी झाली तो मात्र खुशाल झोपून गेला होता. सीमंतिनी बेडला टेकून पाय पोटात घेऊन बराच वेळ बेचैन होऊन बसून राहिली. शेवटी ती उठली आणि बाथरूममध्ये गेली. तिने थंड पाण्याचे शॉवर सुरू केले. त्यात ती मनसोक्त भिजली तेंव्हा कुठे तिला बरं वाटलं. ती कपडे घालून येऊन मोहितच्या शेजारी झोपली पण पहाटे खूप उशिरा तिला झोप लागली.

तिला मोहितचा प्रचंड राग आला होता.त्याच्यामुळे तिचा अपेक्षा भंग झाला म्हणून नाही तर तो तिला अर्धवट आणि अपूर्ण सोडून खुशाल झोपून गेला होता म्हणून तिने त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच बोलला नाही म्हणून! तिला होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास त्याला जाणवला सुद्धा नाही म्हणून! ती सकाळी उठली. तिचे आवरले आणि खाली निघाली. मोहित उठला होता. त्याने तिला अडवले.

मोहित,“ सीमा माझं एकदा ऐकून तरी घे!” तो आर्जवी स्वरात म्हणाला.

सीमंतिनीने मात्र त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. ती तिथून निघून जाऊ लागली.मोहितने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले.

सीमंतिनी,“ मोहित सोडा मला! मला तुमच्याशी एक शब्द ही बोलायचा नाही.” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत रागाने तणतणत होती.

मोहित,“ मला माहित आहे माझ्यामुळे तुझा काल अपेक्षा भंग झाला आहे पण काल काय झाले मलाच कळले नाही; सीमा आय एम सॉरी!आजकाल कामाचा खूप ट्रेस आहे माझ्यावर थोडं समजून घे ना मला!” तो तिला समजावत होता.

सीमंतिनी,“ मला राग माझा अपेक्षा भंग झाला म्हणून नाही आला तर तुम्ही त्यानंतर जे वागलात त्याचा आला आहे. पुरुषांना जसा अर्धवट संभोगाचा त्रास होतो तसा स्त्रियांना देखील होतो मोहित. तुम्ही काल मला सुखाच्या शिखरापर्यंत नेलेत आणि तिथून खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर माझ्याकडे एकदा ही वळून न पाहता तुम्ही सरळ येऊन झोपून टाकले. मी किती वेळा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्हीं मात्र साफ दुर्लक्ष केले माझ्याकडे. माझी मात्र मानसिक आणि शारीरिक ससेहोलपट झाली. जी तुमच्या गावी देखील नव्हती.” ती पुन्हा रागाने तणतणत होती.

मोहित,“ सॉरी सीमा अगं मला इतकं गिल्ट आलं की तुझ्या नजरेला नजर देखील द्यायचं सोड पण तुझ्याकडे पहायचं देखील धाडस मला झाले नाही म्हणून मी तसा वागलो.” तो खाली मान घालून म्हणाला.

सीमंतिनी,“ मोहित मी समजू शकते तुम्ही इतका मोठा बिझनेस चालवता. सतत फिरतीवर असता. तुम्हांला ट्रेस येत असणार आणि काल त्यामुळे ही कदाचित तुम्ही स्वतःला आणि मला ही सॅटीसफाईड करू शकला नाहीत पण त्यानंतर मला तुमच्या सहवासाची तुमच्या मिठीची गरज होती शांत होण्यासाठी पण तुम्ही मात्र..” ती पुढे बोलणार तर मोहितने तिचे बोलणेमध्येच तोडले आणि तो बोलू लागला.

मोहित,“ सॉरी! मला खरं तर तुझी तडफड कळायला हवी होती सीमा पण मी स्वतःच्याच गिल्टमध्ये गुरफटून गेलो. इथून पुढे मी माझ्याकडून असं काही घडणार नाही याची काळजी मी घेईन.” तो तिचा हात धरून म्हणाला.

सीमंतिनी,“ बरं ठीक आहे. इतकं सॉरी म्हणायची गरज नाही.होईल हळूहळू सगळं ठीक आणि इतका कामाचा ट्रेस घेत नका जाऊ तुम्ही! एखादी डिल हातातून गेली तर तुम्ही लगेच गरीब नाही होणार मोहित!मी कायम तुमच्या बरोबर आहे.” ती त्याच्या हातावर दुसरा हात ठेवत म्हणाली.

मोहित,“ म्हणजे तुझा राग गेला ना?” तो तिला जवळ ओढत हसून म्हणाला.

सीमंतिनी,“ आता लिहून देऊ का?” ती मिश्किलपणे म्हणाली.


मोहित,“मी संध्याकाळी लवकर घरी येईन. आज डिनरला जाऊ आणि हो शॉपिंग देखील करू. तुला साडी कॅरी करता येत नाही. पायऱ्यावरून पडलीस. किती घाबरलो होतो मी! तर तुला ड्रेस घेऊन येऊ काही पंजाबी सूट आणि काही मला आवडतात तसे वेस्टर्न कपडे.” तो तिला डोळे मिचकावून जवळ ओढत म्हणाला.

सीमंतिनी,“ठीक आहे मी बसते आवरून आणि आता साडी नाही नेसणार मी जास्त! ती स्वतःला सोडवून घेत लाजून म्हणाली.

मोहित,“ बाय द व्हे सीमा! तू हॉट आहेस काल अनुभवलं मी!” तो तिला आणखीन जवळ ओढून बोलत होता.

सीमंतिनी,“सोडा बरं मोहित! तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का?” ती लाजून नजर झुकवून बोलत होती.

मोहित,“ ऑफिसला तर जायचं आहे. बरं मी आवरतो आणि हो संध्याकाळी तयार रहा.” तो हसून म्हणाला आणि निघून गेला.

सीमंतिनीला मोहितचा आलेला राग गेला होता.मोहित संध्याकाळी ठरल्यावेळी आला.तो आणि सीमंतिनी बाहेर पडले. मोहितने सीमंतिनीसाठी महागडे आणि खूप सुंदर असे कपडे खरेदी केले. त्याच बरोबर त्या ड्रेसेसेला मॅचिंग सॅंडल आणि ज्यूलरी देखील! उच्ची परफ्युम आणि बरंच काही. सीमंतिनी नको म्हणत असताना देखील त्याने तिच्या आई आणि वहिनीसाठी देखील साड्या खरेदी केल्या तसेच तिचा भाचा बंटीसाठी महागडी इलेक्ट्रॉनिक खेळणी! अशी बरीच खरेदी करून दोघे एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले. तिथे दोघांनी डिनर केले. सीमंतिनी मोहितच्या अशा वागण्याने खुश होती. तिला बाकी सगळ्या गोष्टी पेक्षा मोहितचा वेळ त्याचा सहवास हवा होता. जो तिला आज बऱ्याच दिवसांनी मिळाला होता.


पण ती ज्या सुखासाठी असुसली होती ते सुख सतत तिच्यापासून दूर पळत होते.मोहितला कामाचा इतका ट्रेस असेल का की ज्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिगत वैवाहिक आयुष्यावर देखील होत होता? पुढे काय घडणार होते?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all