सीमंतिनी भाग ४५

सीमंतिनी आणि राजसची प्रेमकथा इथेच संपणार होती का?


कोर्ट सुटले. सीमंतिनीचा चेहरा पडलेला होता. ती थोडी अपसेट वाटत होती. गवळी मॅडम आणि बाकी सगळे बाहेर पडले.

गवळी मॅडम,“ सीमा इतकं अपसेट होण्यासारखं काही ही झालेलं नाही. राणे जे म्हणले तुझ्याबद्दल तो फक्त एक डावपेच होता पण रिमा कोर्टात आल्यामुळे मोहितला मेडिकल टेस्ट आता द्यावी लागणार आहे आणि तो नपुंसक आहे. त्याने तुला फसवले हे सिद्ध होईल. आपण लढाई जवळजवळ जिंकलो आहोत फक्त एक पाऊल आणि जीत आपलीच आहे. त्यामुळे उलट तुला तर खुश व्हायला हवं.” त्या तिला समजावत म्हणाल्या.

सीमंतिनी,“ हो मॅडम तुमचं बरोबर आहे. रिमा आप की वज़ह से ही आज सब कुछ संभव हो पाया है। आपका शुक्रिया मैं कैसे करूँ पता नही। आप मेरे घर चलिए ना!”ती नम्रपणे म्हणाली.

रिमा,“ शुक्रगुजार होने की कोई जरूरत नहीं। मुझे भी मोहित को सबक सिखाना था। मैं अगली तारीख को आउंगी ना तब तुम्हारे घर जरूर आउंगी अभी मुझे निकलना होगा। मेरी और असीम की शादी पंधरह दिनों में है। तो बहुत सारी तैयारी भी करनी है। ये मेरी शादी का कार्ड आर.जे. को भी दिया है। तुम और आर.जे. जरुन आना। अगर तुम्हे बुरा ना लगे तो एक बात कहुँ?” तिने विचारले.

सीमंतिनी,“ कहिए ना।” ती हसून म्हणाली.

रिमा,“ सीमा आर.जे. तुमसे प्यार करता है।” ती म्हणाली आणि सीमंतिनी थोडी दचकली.

सीमंतिनी,“ उसने आप से ऐसा कुछ कहा क्या?”तिने विचारले.

रिमा,“ नही मैंने उसकी आँखों में तुम्हारे लिए वो प्यार वो कशिश देखी है। आर.जे. अच्छा लड़का है। हो सके तो अपनी पछली जिंदगी की कड़वी यादें भुलाकर उसके साथ नई जिंदगी सुरु करो। ठीक है मैं चलती हूँ अगली तारीख को जरूर आउंगी लेकिन उससे पहले मेरी शादी में मिलेंगे।”ती म्हणाली.

सीमंतिनी,“ हाँ जरूर।” ती हसून म्हणाली आणि रिमा निघून गेली.


सीमंतिनी मात्र रिमाच्या बोलण्यामुळे विचारात पडली. राजस त्याचे काम आहे म्हणून कोर्टातून लगेच निघून गेला होता. सीमंतिनी त्याचे आभार ही मानू शकली नाही आणि रिमाने तर त्याच्याबद्दल नवीनच सांगितले होते.

‛ राजसचे माझ्यावर प्रेम असेल? शक्य नाही. तो माझा चांगला मित्र आहे. रिमाचा गैरसमज झाला असावा काही तरी! त्याने मला इतकी मदत केली त्याचे आभार मानायचे राहिले आहेत. परवा रविवार आहे त्याला भेटायला बोलवून त्याचे आभार मानावेत. तो होता म्हणून सगळं शक्य झालं.’

ती या विचारात घरी गेली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली. तर तिला एच. आर मॅनेजर पाटील यांनी बोलावून घेतले. सीमंतिनी त्यांच्या केबीनमध्ये गेली.

सीमंतिनी,“ मे आय कम इन सर?”तिने विचारले.

पाटील,“ वो एस कम इन यंग लेडी! या बसा!” ते म्हणाले.

सीमंतिनी,“ सर तुम्ही बोलावलेत मला?” तिने विचारले.

पाटील,“ हो! तसेच काम आहे सीमंतिनी! तुझ्यासाठी एक ऑफर आहे माझ्याकडे तू त्या योग्यतेची आहेस म्हणून फस्ट प्रेफरेंस तुला!” ते म्हणाले.

सीमंतिनी,“ कसली ऑफर सर?” तिने उत्सुकतेने विचारले.

पाटील,“ आपली कंपनी इंग्लंडमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू करत आहे तर तिथे अकाउंट मॅनेजरची जागा आहे आणि हेड ऑफिसने ती ऑफर तुला देऊ केली आहे. यु आर द मोस्ट डिजरव्हिंग कॅण्डीडेट!” ते म्हणाले.

सीमंतिनी,“ थँक्स सर थँक्यू सो मच! पण असं अचानक..” ती पुढे बोलणार तर सरांनी तिचे बोलणेमध्येच तोडले आणि ते बोलू लागले.

पाटील,“ रिलॅक्स! तुला लगेच उद्याच नाही जायचे आणि ही ऑफर आहे सक्ती नाही. तू आठ दिवस विचार करून मग सांग दोन महिन्यांनंतर जायचे आहे. जायचे की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल.” ते म्हणाले.

सीमंतिनी,“ बरं सर मी तुम्हांला विचार करून सांगेन.” ती म्हणाले.

तिच्या मनात पाटील सरांनी दिलेल्या ऑफरचा विचार घोळत होता.
‛ ऑफर चांगलीच आहे असं ही केसचा निकाल लागल्यावर मी मोकळीच होईन. इथे असं ही माझ्यासाठी काय आहे? उगीच समीरदादाच्या संसारात अडचण त्यापेक्षा आई-बाबांना ही घेऊन जाईन माझ्याबरोबर! तरी आत्ताच घरी नको सांगायला अजून पूर्ण विचार करू मग सांगू. सीमा तुझ्यासाठी ही चांगली ऑफर आहे. काळ्या भूतकाळापासून दूर जण्याची! पाहू आणखीन सानिका आणि राजसचा सल्ला घेऊ.’

★★★

आज रविवार होता. सीमंतिनीने सानिका आणि राजसबरोबर बाहेर लंचचा प्लॅन बनवला होता. असं ही तिला राजसचे आभार मानायचेच होते. ती छान तयार होऊन सानिकाकडे गेली आणि मग लंचसाठी दोघी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचल्या. राजस थोड्याच वेळात तिथे पोहोचला. जेवणाची ऑर्डर सीमंतिनीने दिली आणि जेवण करत ती बोलू लागली.

सीमंतिनी,“ तुमच्या दोघांना मला आणखीन एक चांगली बातमी द्यायची आहे आणि तुमच्या दोघांचा सल्ला ही हवा आहे तत्पूर्वी राजस थँक्स तुझ्यामुळे रिमा कोर्टात सुरक्षितपणे पोहोचली आणि कोर्टाने मेडिकल चेकअपची ऑर्डर दिली.”

राजस,“ मोठे लोक म्हणून गेले आहेत मॅडम दोस्ती में नो सॉरी नो थॅंक्यु!अरे पण चांगली बातमी काय आहे ते तरी सांग आधी?” तो म्हणाला.

सीमंतिनी,“ आमची कंपनी इंग्लंडमध्ये नवीन ब्रँच उघडत आहे तर मला तिथे अकाउंट मॅनेजर म्हणून जाण्याची ऑफर आली आहे. असं ही इथे माझे काय आहे! मी विचार करत होते की ती ऑफर स्वीकारावी. माझ्या काळ्या भूतकाळापासून मला सुटका मिळेल. तुमच्या दोघांचे मत काय?” तिने विचारले आणि राजसचा चेहरा खर्रर्रकन उतरला.

सानिका,“ तुझ्या करिअरच्या दृष्टीने ही चांगली संधी आहे पण सीमा तुझ्या पर्सनल लाईफचे काय? पुढच्या दोन ते तीन महिन्यात तुझा घटस्फोट होईल आणि कायदेशीर दृष्ट्या तू मुक्त होशील. मला वाटते तू त्यानंतर तुझ्या लग्नाचा विचार करावास आणि इंग्लंडला जाऊन ते शक्य होणार नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी व्हायला हव्यात सीमा!” ती म्हणाली.

सीमंतिनी,“ एका लग्नाचा असा अनुभव घेऊन मला इतक्यात पुन्हा लग्नाचा विचार करायचा नाही सानिका!मी जाणार आहे इंग्लंडला!” ती निश्चयाने म्हणाली.

राजस,“ तुझं आयुष्य आहे तू तुझ्या मनाने ते जगावस. मला माहित आहे ही ती योग्य वेळ नाही. मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत होतो पण तू जर अब्रॉडला जाण्याचा निर्णय घेत असशील तर मला ही गोष्ट आजच बोलावी लागेल. सीमा माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.” तो एका श्वासात बोलून मोकळा झाला.

सीमंतिनी,“ काय? म्हणजे रिमा खरं बोलत होती मीच तिच्यावर विश्वास नाही ठेवला. राजस मी तुला माझा चांगला मित्र समजत होते आणि तू हे सगळं..”ती थोड्या रागानेच म्हणाली.

राजस,“ मला आयुष्यभर तुझा चांगला मित्र, सखा सोबती म्हणून राहायचे आहे सीमा! खरं तर तुझ्यातली आग तुझ्यातली जिद्द आणि तुझे सुंदर मन पाहून मी तुझ्या प्रेमात कधी पडलो माझं मला सुद्धा कळले नाही. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे सीमा!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

सीमंतिनी,“ हो का? एका डिव्होर्सी मुलीच्या प्रेमात तुझ्यासारख्या मुलाने पडणे म्हणजे जरा जास्तच वाटत नाही का रे तुला? तुझं प्रेम माझ्यावर आहे की मी केस जिंकल्यावर मला मोहितकडून जी करोडो रुपयांची नुकसान भरपाई मिळेल त्याच्यावर आहे?” तिने त्याला रोखून पाहत कडवटपणे विचारले.

सानिका,“ सीमा तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का?” तिने रागाने विचारले.

राजस,“ नाही सानिका बोलू दे ना तिला! तू मला इतक्या महिन्यांच्या मैत्रीत इतकच ओळखलेस? ठीक आहे तुला असं वाटत तर आज काय आत्तापासून मी तुझा मित्र नाही मग बाकी गोष्टी तर लांबच! मी तुला इथून पुढे कधीच त्रास देणार नाही. गुड बाय!” तो पाणावलेले डोळे पुसत पण रागाने म्हणाला आणि निघून गेला.

सानिका,“सीमा तू जे काही राजसशी वागलीस ते मला आवडलेलं नाही. मूर्ख आहेस तू! सावर स्वतःला आयुष्यात आलेल्या एका कटू अनुभवावरून स्वतःच सगळं आयुष्य कटू करून घेऊ नकोस.” ती रागाने म्हणाली आणि निघून गेली.

सीमंतिनी आणि राजस दोघांची प्रेम कथा इथेच संपणार होती का?
©स्वामिनी चौगुले











🎭 Series Post

View all