सीमंतिनी भाग ४३

सीमंतिनी राजसचे प्रेम स्वीकारेल का?


भाग 43

कोर्टात केस सुरू होऊन आता जवळजवळ आठ महिने झाले होते. सीमंतिनी टेन्शनमध्ये होती कारण दोन महिने होत आले तरी रिमाचा काही निरोप आला नव्हता. सीमंतिनीची सगळी भिस्त तर रिमाच्या साक्षीवरच होती कारण मोहितला मेडिकल करण्यासाठी भाग पडायचे असेल तर रिमा ही एकमेव व्यक्ती आणि तिचा जाब आवश्यक होता पण रिमा मात्र गायब होती. तिचा फोन देखील लागत नव्हता.


सीमंतिनी रोजच्याप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती आणि तिचा फोन वाजला. मोबाईलवर अननोन नंबर फ्लॅश होत होता. तिने फोन उचलला.

तिकडून, “हॅलो! मैं सीमंतिनी से बात कर रही हूँ क्या?” तिकडून आवाज आला.

सीमंतिनी, “ हाँ! आप कौन?” तिने विचारले

“ मैं रिमा बोल रही हूँ रिमा शर्मा!” ती म्हणाली आणि सीमंतिनीचा चेहरा खुलला.

सीमंतिनी,“ रिमा आप दो महीने बाद? आप थी कहाँ? आपका फोन भी नही लग रहा था!” तिने विचारले.

रिमा,“मेरा छोटासा एक्सीडेंट हो गया था। इसलिए मोबाईल भी बंद था। दो महीने मैं बेड रेस्ट पर थी। इसी लिए तुमसे संपर्क हो नही पाया।” तिने सांगितले.

सीमंतिनी,“ अब आप कैसी हैं?”तिने काळजीने विचारले.

रिमा,“ मैं ठीक हूँ अब और तुम्हे मदत करने के लिए भी तैयार हूँ। तुम बस मुझे कब और कहाँ आना है बताओ?” ती म्हणाली.

सीमंतिनी,“ मैं मेरे वकील के पास थोड़ी देर में जावूंगी वही से आपको फोन करती हूँ। आपको वो ही सब कुछ बता देंगी। ठीक है।”ती म्हणाली.
,
रिमा,“ ठीक है।”
★★★

सीमंतिनीने अर्ध्या दिवसाची रजा काढली आणि तिने गवळी मॅडमला फोन करून ती त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचली. सीमंतिनीने गवळी मॅडमला रिमा कोर्टात यायला तयार आहे हे सांगितले.

गवळी मॅडम,“अरे वा सीमा ही तर खूप चांगली बातमी आहे. पण आता इथून पुढे आपल्याला खूप सावध पावले उचलावी लागतील. तू रिमाला फोन कर मी तिच्याशी सविस्तर बोलते.”

सीमंतिनीने रिमाला फोन लावला.

सीमंतिनी,“रिमा आपसे मेरी वकील बात करना चाहती है।” ती म्हणाली

गवळी मॅडम,“ मैं सीमा की वकील हूँ गवळी! तुम हमारी मदत करने के लिए राजी हो इस लिए बहुत शुक्रिया।”त्या म्हणाल्या

रिमा,“ आप शुक्रिया मत कहिए। मुझे भी मोहित को सबक सीखाना ही है।”ती म्हणाली.

गवळी मॅडम,“ ठीक है अब मैं जो बोलने वाली हूँ वो गौर से सुनो! तुम कोर्ट में आनेवाली हो ये किसी को भी पता नही चलना चाहिए। तुम अकेली नही आओगी। किसी समझदार और जिम्मेदार आदमी को लेके आना तुम्हारे साथ। तुम स्टेशन पर पहुँचने से पहले सीमा को फोन करना। वो किसी को भेज देगी उसके साथ तुम वो जहाँ तुम्हे ले जाए वहाँ जाना। सीमा तुम्हे वो किसे भेजेगी उसका फोटो और नाम मोबाईल पर भेज देगी। तुम बुरखा पहनकर कोर्ट में और स्टेशन पर भी आना। हमें हर कदम फूक कर रखना होगा। अपने साथ मोहित और तुम्हारे फोटोज, तू और मोहित अमरीका में एक ही क्लास में एक ही साल पढ़ते थे उसके सबूत और तुम्हारे साथ अमरीका में पढ़नेवाले एक दोस्त को हम फोन करेंगे जो तुम्हारे रिलेशनशिप की गवाही देगा। सीमा तुम्हे कब आना है बता देगी।”तुम समझ गयी ना?” त्या तिला समजावून सांगत होत्या.

रिमा,“ ठीक है। मैं मेंरे मंगेतर को साथ लेकर आउंगी। और मैं समझ गयी आप क्या कहना चाहती है।”ती म्हणाली आणि फोन ठेवला.

गवळी मॅडम,“ सीमा अजून पंधरा दिवसांनी कोर्टाची तारीख आहे. तेंव्हा रिमा हजर हवी. स्टेशनवरून तिला सुखरूप सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची आणि कोर्टात तिला सुखरूप घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आहे. मोहितला जर रिमाबद्दल कळले तर तो काही ही करू शकतो.” त्या म्हणाल्या.

सीमंतिनी,“ बरं मॅडम मी किंवा समीर दादा तिला स्टेशनवर घ्यायला जाऊ आणि सानिकाच्या घरी तिला ठेवण्याची व्यवस्था करते मी!” ती म्हणाली.

गवळी मॅडम,“ नाही सीमा आपल्याला असं करून नाही चालणार कारण तुझ्यावर किंवा समीरवर मोहितने नजर ठेवायला माणसे ठेवली असतील तर आणि सानिकाला मोहित ओळखतो तसेच तिचे घर देखील त्याला माहित आहे ही रिस्क आपण घेऊ शकत नाही. आपल्याला कोणा तिऱ्हाइत पण विश्वासू माणसाकडे हे काम सोपवले पाहिजे. जे मोहितच्या लक्षात येणार नाही.” त्या म्हणाल्या. सीमंतिनी त्यांच्या बोलण्यामुळे विचारात पडली आणि थोडावेळ विचार करून ती म्हणाली.

सीमंतिनी,“ मॅडम असा माणूस आहे माझ्या नजरेत मी भेटते आजच त्याला तो नक्कीच आपल्याला मदत करेल.” ती म्हणाली.

सीमंतिनीने राजसला फोन केला आणि त्याला भेटायला एका कॅफेत बोलावले. राजस त्याच काम सोडून तिथे पोहोचला.

राजस,“ काय मॅडम आज अचानक या गरीब मित्राची आठवण कशी काय झाली?” त्याने हसून विचारले.

सीमंतिनी,“ मला तुझी मदत हवी आहे करशील का?” तिने विचारले.

राजस,“ आप के लिए जान हाजीर है! ओके जोक्स अपार्ट काय मदत हवीय तुला माझी? मी करेन तुला मदत.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“ पंधरा दिवसांनी कोर्टाची तारीख आहे. मोहितची एक्स गर्लफ्रेंड आहे रिमा शर्मा नावाची! मोहित आणि ती रिलेशनशिपमध्ये होते पण मोहित तिच्याशी देखील माझ्यासारखा किंवा त्याही पेक्षा वाईट वागला. ती मोहित इंपोटंट आहे याची एकमेव साक्षीदार आहे. ती कोर्टात या तारखेला मोहित विरुद्ध साक्ष द्यायला येणार आहे पण मोहित माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर नजर ठेवून असू शकतो त्यामुळे मी रिमाला स्टेशनवर घ्यायला नाही जाऊ शकत तसेच तिला माझ्या घरी किंवा माझ्या नातेवाईकांच्या घरी देखील नाही ठेवू शकत. हॉटेलमध्ये ही तिने थांबणे रिस्की आहे कारण मोहित कोणत्या ही थराला जाऊ शकतो म्हणून….” ती पुढे बोलणार तर तिचे बोलणे तोडून राजस बोलू लागला.

राजस,“ म्हणून रिमाला मी स्टेशनवर घ्यायला जावे आणि तिला माझ्या घरी कोर्टात हजर होई पर्यंत ठेवून घेऊन तिला कोर्टात सुरक्षितपणे हजर करावे असे तुला वाटते बरोबर का?” त्याने विचारले.

सीमंतिनी,“ हो तू बरोबर ओळखलेस.” ती म्हणाली.

राजस,“माझ्यावर इतका विश्वास?” त्याने तिला रोखून पाहत विचारले.

सीमंतिनी,“हो माणूस एकदा माणसं ओळखायला चुकू शकतो पण सारखं सारखं नाही चुकू शकत. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.” ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली.

राजस,“ ठीक आहे मी तुझी मदत करायला तयार आहे. रिमाला कोर्टात सुखरूप पोहचवायची जबाबदारी माझी!” तो म्हणाला.

सीमंतिनी,“ थँक्स! तू माझं खूप मोठं टेन्शन कमी केलंस. तुझा आणि माझा एक सेल्फी हवा मला. रिमाला पाठवायला आणि तिचा ही फोटो मी तुला पाठवून देते. तुझा फोन नंबर देखील देते तिला! 25 तारीख आहे कोर्टाची ती 25ला सकाळी येईल मी तिला तसं सांगेनच!” ती म्हणाली.

राजस,“ अरे वा!चक्क सीमा मॅडमला माझ्याबरोबर सेल्फी काढायचा आहे! मला तर बाबा सेलिब्रिटी झाल्याचा फिल येतोय आज!” तो मिश्किलपणे म्हणाला.

सीमंतिनी,“ तू पण ना!” ती हसून त्याच्या हातावर फटका देत म्हणाली. दोघांनी सेल्फी काढला आणि सीमंतिनी निघून गेली. राजस मात्र तिथे बसून होता तो मनात विचार करत होता.

‛सीमा यार आज मला किती आनंद झाला आहे तुला शब्दात नाही सांगता येणार मला! तू माझ्यावर फायनली मनापासून विश्वास ठेवलास. तू मला आवडतेस रादर माझं प्रेम आहे तुझ्यावर पण ते व्यक्त करण्याची योग्य वेळ नाही आली अजून पण ती वेळ येईलच लवकर जेंव्हा मी तुला लग्नाची मागणी घालेन.’ तो स्वतःशीच हसत निघून गेला.

सीमंतिनी राजसचे प्रेम स्वीकारेल का? रिमा कोर्टात सुखरूप पोहोचेल का?

©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all