सीमंतिनी भाग ४२

रिमा कोर्टात येईल का?
सीमंतिनी रिमाच बोलणं ऐकून स्तिमित होती. ती मनातच विचार करत होती.

‛ इतक्या मोठ्या घरातील मुलगी! इतका करोडोंचा बिझनेस तरी देखील मोहितसारख्या माणसाचा आत्याचार तिने इतके दिवस सहन केला. एखादी डॉक्टरने सांगितले की तो नपुंसक आहे तेंव्हाच त्याला सोडून गेली असती पण हिने मोहितची साथ नाही सोडली आणि तो कर्मदरिद्री मोहित तिची देखील कदर करू शकला नाही. त्याने माझ्याच नाही तर रिमाच्या देखील स्त्रीत्वाची विटंबना केली. रिमाच्या खऱ्या प्रेमाची अवहेलना केली.’ ती हा सगळा विचार करत होती आणि रिमाच्या बोलण्याने भानावर आली.

रिमा,“ यही सोच रही हो ना कि मेरी जैसी मॉडर्न और अमीर लड़की मोहित जैसे आदमी का इतकने दिनों तक
अत्याचार कैसे सह सकती है?”

सीमंतिनी,“ सच कहूँ तो हाँ!।यही सोच रही थी मैं!”

रिमा,“ तुम्हे जब प्यार होगा ना तब ये बातें समझ में आएंगी। मैंने मोहित से सच्चे दिल से प्यार किया था। छोड़ो ना जो बीत गई सो बीत गयी। तुम्हे पता है सच्चा प्यार क्या होता है दो सालों में मैंने असीम से सिखा है। प्यार सिर्फ हक जताना नही होता बल्कि एकदूसरे का खयाल रखना सम्मान करना होता है। ये मेरा कार्ड हैं इस पर मेरा पर्सनल मोबाइल नंबर है। तुम्हारा मोबाईल नंबर भी मुझे दो। मैं तुम्हे कल बता दूँगी की मैं तुम्हे मदत कर सकती हूँ कि नहीं।” ती कार्ड देत म्हणाली आणि तिने सीमंतिनीने तिचा सांगितलेला मोबाईल नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये फीड करून घेतला

सीमंतिनी,“ ठीक है।” ती म्हणाली. रिमा निघून गेली.

सानिका,“ सीमा अगं आपली भिस्त पूर्णपणे या रिमावर आहे पण ही तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला विचारून सांगते म्हणाली आणि तो नाही म्हणाला तर?” तिने विचारले.

सीमंतिनी,“ सानु मी रिमाच्या डोळ्यात तिच्या होणाऱ्या नवऱ्या विषयी विश्वास पाहिला आहे. त्याच रिमावर प्रेम असेल तर तो नक्की स्वतः हुन रिमाला कोर्टात घेऊन येईल बघ तू!मला विश्वास आहे रिमाला तिचा होणारा नवरा नक्कीच घेऊन येईल कोर्टात!” ती म्हणाली आणि सानिका काहीच बोलली नाही.
★★★★

सीमंतिनी आणि सानिका ठरल्याप्रमाणे परत आल्या. सीमंतिनीने गवळी मॅडमला इंदौरमध्ये काय घडले. रिमा काय म्हणाली याची सविस्तर माहिती दिली. एक महिना होत आला होता आणि कोर्टाची तारीख जवळ आली होती पण रिमाचा फोन अजून सीमंतिनीला आला नव्हता. रिमा तिची मदत करेल ही सीमंतिनीची आशा आता हळूहळू मावळत चालली होती. या तारखेला कोर्टातून वेळ मागून घ्यायचा असे तिने आणि गवळी मॅडमनी ठरवले होते पण पुढे काय करावे हा प्रश्न दोघींना देखील सतावत होता कारण असंच जर सुरू राहीले तर त्या मोहितवरचे आरोप सिद्धच करू शकणार नव्हत्या.

कोर्टाची तारीख होती आणि गवळी मॅडमनी आणखीन वेळ मागून घेतला. राणेनी त्याला विरोध केला पण कोर्टाने गवळी मॅडमला वेळ देऊ केला होता. आज देखील राजस कोर्टात हजर होता पण सीमंतिनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. गवळी मॅडमबरोबर ती कोर्टातून बाहेर पडली तर तिला राजस रोडच्या त्या बाजूला मोहितबरोबर कुठे तरी जाताना दिसला. सीमंतिनीला शंका आली की कदाचित राजसला मोहितनेच पाठवले असावे म्हणून तिने तोंडाला स्कार्प बांधला आणि दोघांपासून सुरक्षित अंतर ठेवून त्यांचा पाठलाग करत राहिली. दोघे ही एका गार्डनमध्ये पोहोचले आणि त्यांच्या मागे सीमंतिनी!

राजस,“ सर तुमचे माझ्याकडे असे काय काम आहे की तुम्ही मला इथे घेऊन आला आहात?” त्याने विचारले.

मोहित,“मला माहित आहे तू सीमाचा इंटरव्ह्यूव घ्यायला तिच्या मागे फिरत आहेस. तू जर तिच्या विषयी मी सांगेन ते तुझ्या चॅनलवर दाखवलेस तर तू म्हणशील तितके पैसे तुला मी देईन.” तो म्हणाला.

राजस,“ सॉरी सर मी पत्रकार आहे आणि लोकांसमोर सत्य आणणे माझे काम आहे. तुम्हांला जर वाटत असेल की पैशासाठी मी माझ्या पेशाशी बेईमानी करेन तर तुमचा गैरसमज आहे तो!” तो म्हणाला.

मोहित,“तू आणि तुझ्यासारखे इमानदार पत्रकार बाप रे! तुला काय वाटते की तू नाही म्हणालास तर मला दुसरं कोणी भेटणार नाही?” तो त्याला कुत्सितपणे पाहत म्हणाला.

राजस,“ भेटला कोणी तर करून घ्या ना त्याच्याकडून तुमचं काम!” तो म्हणाला आणि मोहित रागाने निघून गेला.

सीमंतिनी तिथे जवळच झाडाच्या मागे लपून दोघांचे बोलणे ऐकत होती. मोहित गेला आणि ती ही निघणार तर तिचा हात कोणी तरी जोरात ओढला आणि ती जोरात ओढली गेली. तिने घाबरून पाहिले तर राजस होता.

राजस,“ काय मॅडम? असं कोणाच बोलणे चोरून ऐकू नये. बॅड मॅनर्स!” तो हसून म्हणाला. सीमंतिनीने चेहऱ्यावरचा स्कार्प सोडला आणि ती म्हणाली.

सीमंतिनी,“ म्हणजे तुम्हाला माहीत होतं मी तुमचा पाठलाग करत आहे? मोहित आणि तुमचा जाणून बुजून केलेला हा ड्रामा तर नव्हता?” तिने त्याला पाहत विचारले.

राजस,“ अच्छा? एक तर दुसऱ्याचा पाठलाग करायचा. दुसऱ्याचे बोलणे चोरून ऐकायचे आणि दुसऱ्यावर आरोप करायचे. असेल ड्रामे करून मला काय ऑस्कर मिळवायचा आहे का? तुम्हाला नाही द्यायचा इंटरव्ह्यूव तर ठीक आहे ना! पण कमीत कमी असले बिनबुडाचे आरोप लावू नका.” तो रागाने म्हणाला आणि निघून जाऊ लागला.

सीमंतिनी,“ सॉरी! माझं चुकलंच थोडं! ज्या माणसावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्यानेच माझा विश्वासघात केला त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवायला वेळ लागतो.” ती आवंढा गिळत म्हणाली.

राजस,“ मी समजू शकतो. आता कमीत कमी फ्रेंड तर बनू शकतो का आपण?” तो हात पुढे करत म्हणाला आणि सीमंतिनीने ही तिचा हात पुढे गेला.

सीमंतिनी,“ चला कॉफी घेऊयात का मग?” तिने विचारले.

राजस,“ पण आजची ट्रीट माझ्याकडून आणि मला अरे तुरे केले तरी चालेल मी काय इतका ही मोठा नाही तुमच्यापेक्षा!” तो म्हणाला.

सीमंतिनी,“बरं आणि मला ही तू म्हणले तर चालेल.”

दोघे ही जवळच असलेल्या कॅफेमध्ये गेले. राजसने ऑर्डर दिली.

राजस,“ सीमंतिनी मोहित खूप चलाख आहे. तो तुला सहजासहजी जिंकू देणार नाही.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“ माहीत आहे मला पण मी ही त्याला असं सहजासहजी सोडणार नाही. त्याने मला फसवले आहे.” ती ठामपणे म्हणले.

राजस,“ दॅट्स अ स्प्रिरीड! तू नक्कीच जिंकशील ही लढाई!पण तुझ्यासारखी हुशार मुलगी मोहितच्या जळ्यात अडकली कशी?” त्याने विचारले.

सीमंतिनी,“मोहितचे स्थळ मला एका मॅरेज ब्युरोमधून आले होते. माझ्या आईला इतके श्रीमंत स्थळ घालवायचे नव्हते माझी लग्नाची इच्छा नसताना देखील तिने मला तयार केले लग्नाला! बघा-बघी झाली आणि दोन्हीकडून पसंती ही झाली. बाबा आणि दादाने त्याची चौकशी केली तर आक्षेपार्ह काहीच आढळले नाही. मोहित ही लग्नाआधी माझ्याशी छान वागला. महागडे गिफ्ट्स देणे प्रत्येक शब्द झेलणे अगदी सगळं मनासारखं. इतकच काय मला समुद्र आवडतो म्हणून त्याने लग्न मालवणच्या समुद्र किनारी केले. पण लग्न झाल्यावर त्याचे खरे रंग कळायला लागले. आधी त्याने लपवाछपवी केली. मला इमोशनल ब्लॅकमेल केले पण एका पॉईंटनंतर सगळं उघडकीस आले शेवटी सत्य किती दिवस लपणार ना!तो इंपोटंट आहे हे त्याने स्वतः कबूल केले आणि मी त्याच्यापासून वेळलं होण्याचा निर्णय घेतला. तो इंपोटंट आहे हे कारण तर आहेच पण त्याने हे सत्य लपवले माझ्यापासून मला माझ्या घरच्यांना फसवले आणि दुसरी गोष्ट त्याचे त्याला काहीच वाटत नाही. त्याला मी म्हणजे शोभेची बाहुली वाटले. त्याला ना माझी कदर होती ना माझ्या भावनांची! मी श्रीमंत नवऱ्याची अपेक्षा कधीच केली नव्हती. मला तर एक प्रेमळ आणि माझी कदर करणारा साथीदार हवा होता जो माझ्यावर प्रेम करेल. असो झाले ते झाले.” ती डोळे पुसत म्हणाली.

राजस,“ असं आहे तर सगळं पण मोहित खोतला पैशाचा खूप माज आहे हे आज मी पाहिले मग तुझ्याशी तर तो कसा वागला असेल?” तो म्हणाला.

सीमंतिनी,“ पण प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. हे त्याला लवकरच कळेल.” ती ठामपणे म्हणाली.

राजस,“ यु आर सो ब्रेव! बरं मग मला इंटरव्ह्यूव देणाचा विचार आहे की नाही आता तरी? ” त्याने विचारले.

सीमंतिनी,“ देईल मी तुला इंटरव्ह्यूव पण मी ही लढाई जिंकल्यावर त्याआधी नाही.” ती म्हणाली.

राजस,“ ठीक आहे पण आता आपण मित्र तर आहोत ना?” त्याने तिला साशंकपणे विचारले.

सीमंतिनी,“ हो बाबा आहोत आपण मित्र!” ती हसून म्हणाली.

रिमा कोर्टात येईल का? आणि तुम्हा सगळ्यांना वाटतं तसं राजसची एन्ट्री सीमंतिनीच्या आयुष्यतील नवीन पर्वाची नांदी असेल का?

©स्वामीनी चौगुले







🎭 Series Post

View all