सीमंतिनी भाग ४०

रिमा सीमंतिनीला मदत करायला तयार होईल का?


भाग ४०

सीमंतिनीचे रोजचे रुटीन सुरू होते. ती आज नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली होती. ऑफिस सुटले आणि सीमंतिनी बस स्टॉपवर थांबली होती आणि तिच्या समोर पुन्हा राजस हजर होता. त्याला सीमंतिनीने पाहून न पहिल्यासारखे केले.

राजस,“हे काय मॅडम इतक्यात विसरलात मला? मी राजस जेधे आर.जे हो. तुम्हाला त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर भेटलो होतो ना?” तो म्हणाला.

सीमंतिनी,“काही लोकांना मी लक्षात ठेवत नसते.” ती म्हणाली.

राजस,“काय ओ मॅडम मी तुम्हाला फक्त इंटरव्ह्यूव द्या असं म्हणत आहे त्यात तुमचा देखील फायदाच आहे ना तुमच्या केसला बळ मिळेल आणि तुमच्या सारख्या आणखीन स्त्रिया पुढे येतील त्यांच्यावर झालेला अन्याया विरुद्ध बंड करायला, तर तुम्ही माझ्याशी उद्धट वागत आहात. इतक्या हँडसम मुलाला कोणी विसरू शकत का?” तो तोंड फुगवून म्हणाला आणि निघून जाऊ लागला.

सीमंतिनी,“गैरसमज आहे तुमचा.” ती म्हणाली.

राजस,“तुम्ही उद्धट आहातच त्यात कसला गैरसमज?” तो म्हणाला.

सीमंतिनी,“तो नाही तुम्ही हँडसम आहात हा गैरसमज आहे तुमचा. बाकी समोर कॅफेत जाऊया का? नाहीतर त्यादिवशी सारखी लोक गोळा होतील आणि यावेळी तुम्हाला चांगला चोप बसेल.” ती हसून म्हणाली.

राजस,“म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूव द्यायला तयार आहात ना?” तो खुश होत म्हणाला.

सीमंतिनी,“अगदी तसंच काही नाही पण विचार नक्की करेन. कॉफी घेऊयात.” ती म्हणाली आणि दोघे कॅफेमध्ये गेले. दोघंही तिथल्या एका कॉर्नन टेबलवर जाऊन बसले.


राजस,“मॅडम तुम्हाला काही विचारू का राग येणार नसेल तर?” तो म्हणाला

सीमंतिनी,“विचारा.”

राजस,“मी गेल्या दोन महिन्यांपासून तुमची माहिती काढत आहे मला हेच कळत नाही की तुमच्यासारखी मध्यम वर्गीय, सुंदर, सुशिक्षित मुलगी मोहित खोत सारख्या माणसाला फसलीच कशी? म्हणजे तुम्ही त्यांच्यावर केलेले आरोप खरे की खोटे याची अजून मी शहानिशा केली नाही पण त्यांच्याबद्दल मला अजून तरी फक्त आणि फक्त निगेटिव्ह ऐकायला मिळाले आहे रुड, सेल्फ सेन्टर्ड अँड एरोगंट माणूस आहे तो.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“आता कशी फसले? याला काहीच अर्थ नाही कारण आता यातून मला बाहेर पडायचे आहे तर घडून गेलेल्या गोष्टीवर विचार करून मी वेळ वाया घालवत नाही. बाय द वे तुम्हाला काय वाटतं मी मोहितवर केलेले आरोप खरे आहेत की खोटे?” तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले.

राजस,“कोणतीही स्त्री खास करून मध्यम वर्गीय स्त्री जिच्यावर मध्यम वर्गीय संस्कार आहेत ती असले खोटे आरोप स्वतःच्या नवऱ्यावर करणार नाही.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“इतका विश्वास माझ्यावर?” ती हसून म्हणाली.

राजस,“या डोळ्यांनी आत्तापर्यंत या पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या पाच- सात वर्षात खूप काही पाहिले आहे त्यामुळे खरं आणि खोट्यातला फरक कळतो मॅडम.” तो म्हणाला.

सीमंतिनी,“अच्छा! कॉफी घ्या माझ्याकडून तुम्हाला इतकी माझी माहिती काढून तुम्ही माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचलात म्हणून.” ती हसून म्हणाली.

राजस,“इट्स पार्ट ऑफ वर्क. मॅडम तुम्ही मला इंटरव्ह्यूव देणार का ते सांगा?” तो म्हणाला.

सीमंतिनी,“मला विचार करावा लागेल मग सांगेन.” ती म्हणाली.

राजस,“ठीक आहे. हे माझं कार्ड यात माझा पर्सनल नंबरही आहे. तुम्ही मला फोन करू शकता आणि हो तारखेला भेटूच कोर्टात.” तो हसून म्हणाला आणि निघून गेला.

सीमंतिनी स्वतःशीच मनात बोलत होती

‛काय चिवट माणूस आहे हा. मागच लागला आहे. तो म्हणतो ते देखील एका दृष्टीने बरोबर आहे मला पाहून अजून एखादी तरी बाई समोर आली तरी माझा लढा सार्थकी लागेल पण याच्यावर इतक्यात मी विश्वास ठेवू शकत नाही. कारण याला मोहितने देखील माझ्या मागावर पाठवलेले असू शकते. मला सावध पाऊले उचलावी लागतील. रिमा जोपर्यंत कोर्टात हजर होत नाही तोपर्यंत.’

ती याच विचारत घरी पोहोचली.
★★★

दोन महिने असे निघून गेले आणि सीमंतिनीने पुन्हा ऑफिसमध्ये फोन करून रिमा आली आहे का? त्याची चौकशी केली. तर तिला कळले की रिमा भारतात आली आहे. म्हणून तिने रिमाला इंदौरमध्ये भेटायला जायची तयारी सुरू केली पण खूप सावधपणे तिला या गोष्टीची मोहितला कुणकुण देखील लागू द्यायची नव्हती कारण मोहितबद्दल खरं काय ते रिमाच सांगू शकत होती आणि तिच्या बाजूने रिमा उभी राहिली तर मात्र मोहितचा खेळ संपणार होता.

घरात मीरावर देखील तिचा विश्वास नव्हता म्हणून तिने इंदौरला जाण्याची गोष्ट फक्त तिचे वडील आणि समीरला सांगितली होती. मीरा खूप चलाख होती त्यामुळे तिच्या आईला घोळात घेऊन ती त्यांच्याकडून सत्य काढून घेऊ शकत होती. म्हणून तिने सगळ्यांसमोर ती कामानिमित्त दिल्लीला जात आहे असे खोटे सांगितले होते. सानिका तिच्या सोबत जाणार होती हे देखील बाबा आणि समीरला सोडून कोणाला माहीत नव्हते.

तिने गवळी मॅडमशी त्याबद्दल बोलून घेतले आणि ती दुसऱ्या दिवशी ती आणि सानिका इंदौरसाठी निघणार होत्या.आज सानिका आणि ती दुपारी साडे तीनच्या ट्रेनने निघाल्या. सानिका सरळ स्टेशनवर येऊन सीमंतिनीबरोबर इंदौरला निघाली होती. त्या दोघी सतरा तासांचा प्रवास करून इंदौरमध्ये सकाळी साडे आठ वाजता पोहोचल्या. सीमंतिनीने आधीच ऑनलाईन लॉजमध्ये रूम बुक केली होती. त्या लॉजवर गेल्या आणि साधारण अकराच्या सुमारास तयार होऊन रिमाच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या. तिथे सीमंतिनी रिसेप्शनिस्टजवळ चौकशी करू लागली.

सीमंतिनी,“रिमा मॅडम ऑफिस में है क्या? मुझे उनसे काम के सिलसिले में मिलना है।” ती म्हणाली.

रिसेप्शनिस्ट,“आपकी अपॉइंटमेंट है क्या आज?” तिने विचारले.

सीमंतिनी,“जी नही लेकिन मेरा उनसे मिलना बहुत जरूरी है।” ती म्हणाली

रिसेप्शनिस्ट,“सॉरी मॅम लेकिन आप उनसे ऐसे नही मिल सकती आप अपॉइंटमेंट लीजिए फिर मिलने आयीए।”

सीमंतिनी,“प्लीज आप एक बार फोन तो कीजिए ना उन्हें उनके पास दो मिनिट होंगे तो मैं मील लूँगी। मैं बहुत दूर से आई हूॅं। ती आर्जव करत बोलत होती.

रिसेप्शनिस्ट,“ठीक है। मैं देखती हूँ आपका नाम क्या है?” तिने विचारले आणि सीमंतिनीने काही तरी विचार करून तिचे नाव सांगितले

सीमंतिनी,“मेरा नाम मिसेस सीमंतिनी मोहित खोत है।”

रिसेप्शनिस्ट,“मैम आपसे मिसेस सीमंतिनी मोहित खोत नामकी कोई लेडी मिलने आई है। बहुत रिक्वेस्ट कर रही है आपसे मिलने के लिए भेज दू क्या? मैम मैं भेज दू या नही उन्हें आपसे मिलने के लिए?” तिने इंटर कॉम वरून विचारले. रिमा सीमंतिनी मोहित खोत हे नाव ऐकून मनातून जरा चरकली. ती थोडावेळ विचारात पडली आणि रिसेप्शनिस्टच्या पुन्हा विचारण्याने भानावर आली. तिने काहीतरी विचार केला आणि म्हणाली


रिमा,“ठीक है। भेज दो।”

रिसेप्शनिस्टने प्युनला बोलवून सीमंतिनीला रिमाची केबीन दखवायला सांगितली. रिसेप्शनिस्टने फक्त सीमंतिनीला एकटीला रिमाला भेटायला परवानगी दिली. सानिका तिथेच थांबली. सीमंतिनी नॉक करून रिमाच्या समोर पोहोचली. दोघीही एकमेकांना पाहत होत्या. रिमा रंगाने गव्हाळ रंगांची, नाकीडोळी निटस, खांद्यापर्यंत रुळणारा स्टेप कट, अगदी हलका मेकअप केलेली आणि सडपातळ बांध्याची मुलगी! रिमाही तिला पाहत होती आणि मग तीच भानावर आली आणि म्हणाली.

रिमा,“प्लिज सीट!” ती म्हणाली आणि सीमंतिनी मोहित खोत भानावर आली.

सीमंतिनी मोहित खोत,“हॅलो! मैं सीमंतिनी….” ती पुढे बोलणार तर रिमाने तिचे बोलणे मध्येच तोडले.

रिमा,“तुम मोहित की बीवी हो। तुम्हारी तस्वीर मैंने मोहित के फेसबुक पर देखी है। तस्वीर से भी तुम बहुत सुंदर हो!” ती तिला पाहून म्हणाली.

सीमंतिनी,“थैंक्स! मुझे आपकी मदत चाहिए मैम!” तिने सरळ मुद्द्याला हात घातला.

रिमा,“मुझे मैम मत कहो प्लीज! रिमा कह सकती हो तुम मुझे! वैसे तुम्हे मेरा पता कहाँ से मिला और तुम्हे मेरी मदत चाहिए?” तिने आश्चर्याने विचारले.

सीमंतिनी,“मोहित से मैंने आपके बारे में सुना था और आपका बिज़नेस इंदौर में है और उसका नाम शर्मा एंड सन्स प्रायव्हेट लिमिटेड है। यह भी नेट पर आपके कंपनी की वेबसाइट सर्च की वही से आपके ऑफिस का नंबर और पता मिला।” ती म्हणाली.

रिमा,“तो मोहितने मेरे बारे में तुमसे बात की है। वैसे बहुत होशियार हो तुम, करती क्या हो तुम? एज से तो चौबीस से ज्यादा नही लगती।” ती हसून म्हणाली पण तिच्या हसण्याचा अर्थ सीमंतिनीला कळला नाही.

सीमंतिनी,“मैने एम.बी.ए. किया है और मैं पिछले एक साल से एक मल्टी नॅशनल कंपनी में जॉब करती हूँ।” तिने तिची माहिती दिली. रिमा पुढे काही बोलणार तर इंटर कॉम वाजला तिने तो उचलला आणि काहीतरी विचार करून ती म्हणाली.

रिमा,“मेरी मीटिंग है अब हम शाम को छह बजे मिलते है। तुम कहाँ ठहरी हो बता दो मैं मिलने आ जावूंगी।”

सीमंतिनी, “होटल ग्रीन लैंड!”

रिमा,“ठीक है।”

ती म्हणाली आणि सीमंतिनी तिच्या केबीनमधून बाहेर पडली.

रिमा सीमंतिनीला मदत करायला तयार होईल का? रिमा आणि मोहितमध्ये नेमकं काय घडले असेल?

©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all