सीमंतिनी भाग १३

गोष्ट एका सीमंतिनीची जीने सीमोल्लंघन केले.


रात्री सीमंतिनीचे बाबा घरी गेले. आई हॉस्पिटलमध्येच तिच्या सोबत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच मोहित हॉस्पिटलमध्ये हजर होता. डॉक्टरांचा राऊंड झाला आणि सीमंतिनीला आय.सी.यु.मधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आले. मोहित थोडावेळ तिच्या जवळ बसला आणि तिच्याच सांगण्यावरून ऑफिसला निघून गेला. तिच्या आईने मीरा वहिनीला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले आणि त्या घरी गेल्या. मीरा वहिनी आवासून हॉस्पिटल पाहत होती. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारखे ते हॉस्पिटल पाहून तिचे डोळे विस्फारले होते. ती सीमंतिनीच्या व्ही.व्ही.आय.पी रूममध्ये पोहोचली आणि इतकी प्रशस्त, स्वच्छ आणि सर्व सोईनसुविधांनी सज्ज अशी रूम पाहून सीमंतिनीला म्हणाली.

मीरा,“सीमा ताई मोठ्या लोकांची मोठी कामं. आजारी पडलं तरी मज्जाच असते बाबा या लोकांची. काय हे हॉस्पिटल? काय ही रूम? हॉस्पिटलमध्ये नाही तर एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आले असं वाटत आहे.” ती आश्चर्याने म्हणाली.

सीमंतिनी,“तुमचं तर ना काही पण असतं वहिनी.” ती हसून म्हणाली.

थोड्याचवेळात सानिका देखील तिला पहायला आली. सीमंतिनीला सानिकाशी काल जे मोहित आणि तिच्यात घडले ते सांगायचे होते, म्हणून तिने मीराला काहीतरी कारण सांगून तिथून घालवून दिले.

सानिका,“काय गं हे सीमा? इतकं कसं लागलं तुला? काल मी तुझ्या मोबाईलवर फोन केला होता. फोन घरात होता तुझा एका नोकराने सांगितलं मला की, तू हॉस्पिटलमध्ये आहेस. म्हणून काकूंना फोन केला तर त्यांनी सांगितलं सगळं आणि उद्या भेटायला म्हणून सांगितले.” ती काळजीने बोलत होती.

सीमंतिनी,“काही नाही गं पायऱ्यावरून पडले मी साडीत अडकून. मला तुझ्याशी बोलायचे आहे सानू.” ती थोडी कचरत म्हणाली.

सानिका,“ते तू तुझ्या वहिनीला इथून कटवले तेंव्हाच माझ्या लक्षात आले माझ्या. बोल ना!इतकं संकोचायला काय झालं सीमा? मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे.” ती तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली.

सीमंतिनी,“काल मोहित माझ्या जवळ आले आणि मला हार्डली किस केलं जसं काही माझ्यावर राग काढत आहेत अगदी माझा जीव गुदमरेपर्यंत मला ते सहन झालं नाही आणि मी त्यांना ढकलून दिलं.” ती म्हणाली.

सानिका,“मग काय झाले?” तिने आश्चर्याने विचारले.

सीमंतिनी,“मग काय? ते चिडले. माझी चूक मला लक्षात आली. मी त्यांना सॉरी पण म्हणत होते पण ते खूप रागावले होते. ते ऑफिसला जायला निघाले आणि मी त्यांच्या मागे जिन्यावरून पळत होते आणि साडीत पाय अडकून पडले.” ती तोंड पाडून बोलत होती.

सानिका,“मूर्ख आहेस का सीमा तू? अगं ते तुझ्यावर कसला राग काढणार? येडपट ते एक्साईटेड झाले असतील. एक्साईटेड झालं की पुरुष वागतात अग्रेसिव्ह कधी-कधी. तू त्यांना ढकलून दिल्यावर त्यांना राग येणं साहजिक आहे ना? सीमा बायको आहेस त्यांची तू. ते तुझ्यावर असा हक्क गाजवणार नाहीत तर कोणावर गाजवणार? त्यात आत्ताच लग्न झालं आहे ना तुमचं? पुरुषांना स्त्री देहाचं खूप आकर्षण आणि कौतुक असतं गं सुरुवातीच्या काळात तेंव्हा ते असं वागू शकतात. थोडं समजून घ्यायचं असतं. तर तू त्यांना ढकलून दिलं आणि वरून हा उपद्याप करून घेतलास.” ती डोक्याला हात लावून घेत म्हणाली.

सीमंतिनी,“चुकलंच माझं गं!” ती तोंड पाडून म्हणाली.

सानिका,“चुकलं तर आहेच तुझं! आता हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर काढा रुसवा तुमच्या मोहितरावांचा.” ती हसून डोळा मारत म्हणाली.

सीमंतिनी,“कशाचं काय सानू? हात पाहिलास का माझा गळ्यात? पुढचे पंधरा दिवस हात गळ्यात असणार आहे माझा अजिबात हलवायचा नाही.” ती तोंड पाडून म्हणाली.

सानिका,“धन्य आहात तुम्ही सीमा देवी.” ती तिला हात जोडून म्हणाली.

तीन दिवसांनी सीमंतिनीला घरी सोडण्यात आले आणि मोहितने पुन्हा तिला पंधरा दिवसांसाठी माहेरी पाठवून दिले. तो रोज तिला भेटायला येत होता, पण सीमंतिनी मात्र मनातून स्वतःला दोष देत होती. तिला राहून राहून अपराधी वाटत होतं. \"त्या दिवशी जर मोहितला जरा समजून घेतले असते तर इतकं सगळं झालं नसतं\" असा विचार राहून राहून तिच्या मनात येत होता, पण ती रोज संध्याकाळी मोहित येण्याची आतुरतेने वाट पाहत असायची. आजही मोहित रोजच्याप्रमाणे ऑफिसमधून तिच्या घरी आला होता. घरात मात्र आज कोणीच नव्हते. सीमंतिनीच्या आईने चहा करून थर्मासमध्ये भरून ठेवला होता आणि नाष्टाही तयार करून ठेवला होता. मीरा - समीर तिच्या मोहरी तर आई - बाबा काकांच्या घरी गेले होते. त्यामुळे सीमंतिनी आज एकटीच होती. मोहित आला सीमंतिनीने दार उघडले. मोहित घरात आला. घरात कोणीच दिसत नव्हते ते पाहून त्याने तिला विचारले.

मोहित,“अरे आज सगळे कुठे गेले?”

सीमंतिनी,“आज सगळे बाहेर गेले आहेत. बसा मी चहा आणि नाष्टा आणते.” ती म्हणाली.

मोहित,“तुझा हात गळ्यात आणि तू चहा - नाष्टा आणणार? बस इथे.” तो तिला हात धरून बसवत म्हणाला.

सीमंतिनी,“आई सगळं तयार करून गेली आहे. मी घेऊन येते ना.”

ती असं म्हणून उठणार तर मोहितने तिच्या कमरेत हात घातला आणि तिला जवळ ओढले. त्याच्या अशा वागण्याने सीमंतिनी मोहरली आणि लाजून तिची मन खाली गेली. मोहितने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला आणि तो म्हणाला.

मोहित,“सॉरी सीमा, मी त्या दिवशी तुझ्याशी हार्ष वागलो.”

सीमंतिनी,“माझंही चुकलं मी तुमच्याशी असं वागायला नको होतं.” ती डोळे झुकवून म्हणाली.

आणि मोहितने तिच्या ओठांचा ताबा घेतला. सीमंतिनी मोहितच्या मिठीत होती. दोघेही थोडावेळ शांत होते.

सीमंतिनी,“उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. मी परवा घरी येईन.” ती त्याच्या मिठीत विसावून बोलत होती.

मोहित,“तुला अजून आठवडाभर इथेच रहावे लागेल सीमा. मला अमेरिकेला जायचे आहे बिझनेस डिल संदर्भात.” तो तिच्या केसात हात फिरवत म्हणाला.

सीमंतिनी,“काय पुन्हा तुम्ही जाणार मोहित? मला तुमचा दुरावा सहन होत नाही आता. आपल्या लग्नाला दीड महिना होत आला आणि आपल्यात अजून नवरा-बायकोचे नाते निर्माण झाले नाही.” ती खट्टू होत म्हणाली.

मोहित,“सीमा मलाही तुझा दुरावा नाही सहन होत, पण काय करणार? काम महत्त्वाचे आहे जावंच लागेल. आठ दिवस रहा इथे अजून मग आहेच तू आणि मी.” तो तिला डोळा मारत म्हणाला आणि सीमंतिनी लाजली.

सीमंतिनी,“बरं ठीक आहे.” ती म्हणाली.

मोहित,“आणि हे तुझे क्रेडिट कार्ड तयार करून घेतले आहे. तू यावर कितीही खरेदी करू शकतेस आणि हे पन्नास हजार कॅश ठेव तुझ्याजवळ, तुला खर्चायला.” तो तिच्या हातात पैसे आणि कार्ड ठेवत म्हणाला.

सीमंतिनी,“पैसे नकोत मला आधीच इकडे येताना तुम्ही दिलेले पन्नास हजार आहेत माझ्याकडे.” ती म्हणाली.

मोहित,“ते अजून तू खर्च केले नाहीत? बरं मग हे पैसे तुझ्या वहिनीला दे. तू इतके दिवस इथे आहेस ना त्याचे. उद्या तुला कोणी टोमणा मारायला नको.” तो तिच्याकडे पाहत म्हणाला.

सीमंतिनी,“बरं देते.” ती पैसे घेत म्हणाली.

मोहित पुन्हा आठ दिवसासाठी परदेशात निघून गेला. सीमंतिनी माहेरी राहिली. तिने मीरा वहिनीच्या हातात पन्नास हजार ठेवले.

सीमंतिनी,“वहिनी मोहितनी हे पैसे तुला द्यायला सांगितले आहेत. ते आठ दिवस बिझनेस टूरला गेले आहेत ना आणि त्या आधी पंधरा दिवस मी इथेच आहे. हा फक्त आई-बाबांना हे कळू देऊ नकोस. ते दुखावले जातील, पण मोहित म्हणाले की आता मी त्यांची जबाबदारी आहे तर तुम्हांला त्रास कशाला उगीच? वाटलं तर याचे फिक्स डिपॉझिट कर उद्या बंटीच्या भवितव्यासाठी उपयोगी येईल.” ती म्हणाली.

मीरा,“सीमा ताई आता मोहितरावांनी दिलेच आहेत तर मी नाही कसं म्हणणार? आणि हे पैसे मी फिक्स डिपॉझिटच करेन.” ती डोळे विस्फारून पैसे घेत म्हणाली.

त्यानंतर मीराचे सीमंतिनी प्रति वागणे खूप बदलले. ती तिला कुठे ठेवू, कुठे नाही करत होती. अगदी तिचा प्रत्येक शब्द झेलत होती. तिचे सगळ्यांसमोर कौतुक करत होती. त्यामुळे सीमंतिनीचे आई-बाबा आणि समीरही सुखावले होते.

पण सीमंतिनी मात्र आतून अस्वस्थ होती. कारण मोहितच्या वागण्याचा काहीच अंदाज तिला बांधता येत नव्हता. तो घडीत तोळा तर घडीत मासा असं तिच्याशी वागत होता.

🎭 Series Post

View all