Login

प्रेम हे.. अबोल अन् अंतरीचे

Love And Relationship


भाग ४(अंतिम)
आज पुन्हा ऑफिस.. पुन्हा तेच.. समीर आजही नसणार.. आपणच तर बोलत नव्हतो..जाऊ दे बघू"मीनल स्वतः शिच.. आता रोजच रूटीन झालं होतं.. मीनल बोलणार तरी कोणाबरोबर ?
मिनू सगळं आवरून ऑफिस पोहचली. त्रिशा ने हाय केल.. आणि तिच्याशी बोलायला आली.
"मीनल तु दिवसेंदिवस जास्तच उदास आणि आजारी वाटायला लागली आहे .तुला काय झालंय? तू अशी इतकी उदास का आहेस ?तुझी तब्येत ठीक नाहीये का? आजही चेहरा खूप सुकलेला दिसतोय.."त्रीशा
मीनल चे डोळे भरून आले होते पण तिने ते जाणवू दिलं नाही.
"काही नाही ग, रात्री झोप नीट होत नाहीये.. त्यामूळे असेल आणि काम हि खुप वाढलं आहे.."मिनू
"ओ के.. तुला कळलं का समीर बद्दल "त्रिषा
"काय..काय झालं त्याला?"मिनू ने अगदी काळजीत विचारलं
"हे चील.. त्याला काही नाहि झालं..त्याला प्रमोशन मिळालं..आणि त्याला कदाचित आपल्या दुसऱ्या ऑफिसला पाठवतील.." त्रीशा
"हो का.. छानच झालं तर.. तुला कस कळलं म्हणजे तो बोलला का? नाही म्हणजे तो नव्हता ना ईथे म्हणुन विचारले.."मिनल
"अग मला रोहन कडून समजलं.. त्याचं आणि सामिर च बोलण सूरू असतं ना"त्रीशा.. एवढं बोलुन तिच्या डेस्क वर गेली..खर तर किती छान गोष्ट आहे ही समीर ल प्रमोशन मिळालं.. पण हे त्याने सांगितल असतं तर अजून छान वाटलं असतं..
"हे काय आहे मिनल,पुन्हा तेच..का म्हणुन त्याने सांगावं, काय संबंध?तु अशी कशी अपेक्षा ठेवू शकतेस त्याच्याकडून? ओह गॉड.. काय सूरू आहे माझे.... अवि नाहि म्हणुन मी दुसऱ्याला जाळ्यात ओढते..अस म्हणतील लोकं.."मीनल विचार करून करून थकली होती.. तिचं डोकं भन भानायला लागलं होतं.. ती स्वतः स्वतः वर रागवत होती.. आज तिचं लक्ष कामात नव्हतंच मुळी.. तिने सरळ अर्ध्या दिवसाची रजा टाकली आणि घरी निघण्याची तयारी केली..
ती घरी निघाली होतीच की तेवढ्यात तिच्या समोर समीर उभा राहीला.. दोन्ही हात खिश्यात घालून तो फक्त तिच्या कडे बघत होता.. मिनू दोन मिन गोंधळली पण मग तिच्या लक्षात आलं की तो खरंच समोर उभा आहे.
"अरे , तु केव्हा आलास? बाहेरगावी होतास ना?"मीनल
"मी कालच आलोय..काळ संध्याकाळी आलो होतो ऑफिस ला..पण आपली भेट नाही झाली ,मग विचार केला की आज तुला भेटाव आणि प्रमोशन ची बातमी सांगावी.."समीर चेहऱ्यावर हलकीशी स्माईल ठेवून बोलत होता अन् तीचे भाव टिपत होता..
"अरे व्वा, अभिनंदन."मीनल
"चल कॉफी पिऊ या.. थोड बोलायच पण आहे आणि तस ही तु सुट्टी टाकली आहेस म्हणजे आजच काम संपलं असणारच.."समीर.. मिनू फक्त बघत होती आणि मग ते दोघेही खाली कॉफी पिण्यासाठी एका जवळच्याच कॅफे मध्ये गेले..
"हे बघ मीनल, तुझ्या मनात माझ्या विषयी, किँवा आपल्या मैत्री बाबत म्हण हवं तर बरेचं प्रश्न निर्माण झाले आहेत अस मला वाटतं.. तु सध्या खुप गोंधळात आहेस आणि मला तो गोंधळच संपवायचा आहे."समीर बोलत असताना मीनल मध्येच म्हणाली ,"अरे नाही तसं काही नाहीये तू आपलं उगीचच काहीतरी विचार करतोयस".
"एक मिनिट मला माहित आहे की तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते पण आज मला बोलू दे आणि मग तू म्हणशील तसं करू.."समीर बोलतं होता.
"मीनल मला तुझ्या आणि अविनाश च्या नात्याबद्दल माहित आहे तुमचे एकमेकांना किती प्रेम आहे हे सुद्धा मला माहित आहे .मी तुझ्याशी जे काही बोलतो वागतो ते फक्त एक मित्र म्हणून, मला तुझी खुप सुंदर आणि निखळशी मैत्री हवी आहे. त्याला प्रेमाचं नाव किंवा दुसऱ्या कोणताही नात्याचं नाव आपण देऊ नये असं मला वाटतं कारण प्रेम आणि मैत्री दोन वेगळ्या गोष्टी आहेत एखाद्यावर प्रेम असतं म्हणजे त्याच्याशी मैत्री असतेच असं नाही पण एखाद्याची खूप छान मैत्री असली तर त्यात प्रेम फुलू शकत, बहरू शकत पण अर्थातच ते दोघांना मान्य असेल तर .... आता मला तुला एवढेच सांगायचं आहे की माझ्या मनात तुझ्याविषयी फक्त आणि फक्त मैत्री आहे निखळ आणि निर्मळ ...तुझ्या मनात जो काही गोंधळ चाललेला आहे तो थांबव आता. हे बघ मीनल

काही नात्यानं नाव नसतं पण ती खुप महत्वाची असतात..
काही नाती आयुष्यात येतात आणि आयुष्य बदलून जातं ...

... आणि प्रत्येक नात्याला नाव द्यावच हे महत्त्वाचे नाही. आपण नात्यांना नाव देतो ते समाजासाठी पण खरच  त्यांच्या दबावाखाली आपण ती नाती जपतो का हे एकदा पडताळून बघायला हव.."समीर बोलत होता आणि कुठेतरी मिनू च्या मनावरच दडपण कमी झालं होतं..

"समीर, खरंच सॉरी.. माझा गोंधळ झाला होता.. मला पुन्हा त्या नात्यात अटकायच नव्हत म्हणुन मी टाळत होते तुला ..पण आज तुझं ऐकल्यावर जाणवतंय की मी गैरसमज केला होता आणि तु म्हणतोस तस नक्किच मलाही तुझि मैत्री जपायला  आवडेल.."
दोघेही आता मनमोकळे पणाने कॉफीचा आस्वाद घेत होते आणि गप्पा मारत होते..
प्रत्येक नात्याची सुंदरता वेगळी असते आणि ती आपण जपायला हवी.. काही नात्यांमधलं प्रेम हे अबोल आणि अंतरीचा ठेवलेला बरं नाही का?
तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आल्या तर आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते आणि एक उत्साह निर्माण होतो तेव्हा जरूर कळवा ....नात्यातील प्रेमाबद्दल..
धन्यवाद
#जलद कथामालिका लेखन स्पर्धा
अनुराधा पुष्कर


🎭 Series Post

View all